(Haffkine) लसनिर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात एकेकाळी नावलौकिक असलेले 'हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ' राज्य शासनासाठी पांढरा हत्ती ठरू लागले आहे. या महामंडळाने २०१६-१७ ते २०२१-२२ या पाच वर्षांत तब्बल ७१ टक्के औषधांचा पुरवठाच केला नसल्याची माहिती 'कॅग'च्या अहवालातून उघड झाली आहे.
Read More
भारताच्या आरोग्य क्षेत्रात गेल्या काही वर्षांत आमूलाग्र बदल होण्यास प्रारंभ झाला. त्यातही प्रामुख्याने कोरोना संसर्गाच्या कालखंडामध्ये भारतीय आरोग्य व्यवस्था अधिकच बळकट झाली. त्यामुळेच अपवाद वगळता कोरोना काळात आवश्यक औषधे, ऑक्सिजन पुरवठा, लसनिर्मिती आणि लसीकरण यशस्वी पार पडणे शक्य झाले. आता देशाची आरोग्यव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसह ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्याविषयी...