ठाणे येथील बाळकुम ते गायमुख या १३.४५ कि.मी. लांबीच्या खाडी किनारा मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेले असून या कामाची एकूण किमंत रू.३,३६४.६२ कोटी इतकी आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १३.४५ कि.मी. असून यातील ६.६४ कि.मी. लांबी करिता पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे या लांबीकरिता काम सुरु करण्यास कोणताही अडथळा नाही, अशी माहिती राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
Read More
उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएचएस) आणि वन विभागाच्या 'कांदळवन प्रतिष्ठान'मध्ये सामंजस्य करार झाला आहे. (thane creek mudflat)
रायगड जिल्ह्यातील काळिंजेच्या खाडीत दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन झाले आहे (kalinje creek). मच्छीमारांना खाडीत मासेमारी करतेवेळी हा जीव सापडला (kalinje creek). त्यांनी लागलीच या जावीला जाळ्यातून बाहेर काढून खाडीत पुन्हा सोडले. यानिमित्ताने काळिंजेच्या खाडीचे जैविक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. (kalinje creek)
ठाणे पोलीस आयुक्तालयासमोर कळवा खाडी पात्रातील अतिक्रमण ठाणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी निष्कासित केले होते. या मोकळ्या झालेल्या जागेवर निसर्ग उद्यान वॉकिंग पथ आणि दशक्रिया विधी घाट उभारावे. अशी मागणी ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने आमदार संजय केळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात ठाणे खाडीला रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळणार, असे जाहीर झाले होते. त्याप्रमाणे आज ठाणे खाडीला 'रामसर पाणथळ स्थळाचे प्रमाणपत्र' प्राप्त झाले आहे. ठाणे खाडीसह इतर २८ नवीन स्थळांचा ‘रामसरमध्ये समावेश करण्यात आला आहे. या 28 स्थळांना यामुळे आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
जूनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व संरक्षित जंगलांच्या सीमेपासून किमान 1 किमीचा इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) असावा, असा आदेश जारी केला होता. मात्र हा आदेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याला लागू होणार नाही असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी दिले. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दाखल केलेल्या अंतरिम स्पष्टीकरण अर्जानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे.
जून महिन्याच्या सुरवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोंड खाडी किनारी एका सिमेंटच्या पोत्यात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून या बिबट्याचे चारही पाय आणि शीर गायब होते. पंचनामा करून वन विभागाने हा मृत देह ताब्यात घेतला. पुढील तपासात एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) सोमवारी दि. १३ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला '(एमआयडीसी') ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात (टीसीएफएस) सांडपाणी गळती झाल्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावली आहे. आणि तातडीची पावले न उचलल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. गळती प्लग करण्यासाठी.
आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या पाणथळ प्रदेशावरील आधारित ‘‘रामसार’ अधिवेशना’चे २०२२ हे पन्नासावे वर्ष आहे. पानथळ अधिवासाचे महत्व आणि ‘रामसार’ प्रकल्पांबाबतच्या इतिहासाची उहापोह करणारा हा लेख..
ठाणे खाडी परिसरात नुकतेच रामसर स्थळाच्या यादीकरिता दहा किमीपर्यंतचा भाग ‘हरित प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने जैवविविधतेचा खजिना असलेल्या पाणथळींविषयी...
मुंब्रा येथील देसाई खाडीत भूमाफियांनी कांदळवनांची तोड करुन त्यावर रस्ता तयार केला होता. जून, २०२१ मध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ स्वरुपातील ग्राऊंड रिपोर्ट 'दै. मुंबई तरुण भारत'ने प्रसिद्ध केला होता. त्यानंतर महसूल विभागाकडून ही कांदळवन आच्छादित जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सरतेशेवटी जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर शुक्रवारी (११ फेब्रुवारी) कांदळवन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी या रस्त्याचे बांधकाम तोडून जमीन मोकळी केली.
‘वेला’ प्रदेश म्हणजेच सागरी किनारा आणि त्या आसपासचा भरती-आहोटीच्या क्षेत्रात येणारा परिसर. या परिसरामध्ये समुद्र आणि जमीन यांची सरमिसळ असते. याच परिसरामधील एक परिसंस्था म्हणजे खाडीची. महाराष्ट्राला समृद्ध खाड्यांचा प्रदेश लाभला आहे. यामधील काही खाड्यांची आणि त्यामधील जैवविविधतेची ओळख करुन देणारा हा लेख... konkan creek
महाराष्ट्राला वनसंपत्तीप्रमाणेच सागरीसंपत्तीही लाभली आहे. राज्याच्या किनारपट्टीभागात वेगवेगळ्या स्वरुपाच्या सागरी परिसंस्था आपल्याला पाहायला मिळतात. याच परिसंस्थेमधील एक परिसंस्था म्हणजे ‘खाडी’. कोकण किनारपट्टीला जैवविविधतेने संपन्न अशा अनेक खाड्या लाभल्या आहेत. त्यापैकी दाभोळ आणि आंजर्ले खाडीची ओळख करुन देणारा हा लेख...
'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'च्या 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रा'ला (इएसझेड) केंद्र सरकारने अंतिम मंजूरी दिली आहे. ४८.३०५ चौ.किमी विस्तार असलेल्या या अभयारण्याचे इएसझेड क्षेत्राची अंतिम अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध झाली. या अधिसूचनेमुळे रखडलेल्या बांधकामांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या ३० वर्षांमध्ये मुंबई महानगराच्या खाडीतील १०७ चौ.किमी क्षेत्र नैसर्गिकरित्या लुत्प होऊन त्याठिकाणी दलदलीचा (मडफ्लॅट) आणि कांदळवन आच्छादित अधिवास निर्माण झाला आहे. परिणामी अरुंद झालेले खाडीक्षेत्र हे शहरी भागातील पूरपरिस्थितीला आणि सुपीक जमिनीच्या नष्टतेला कारणीभूत ठरले असून येत्या काळामध्ये ही समस्या वाढणार असल्याची एका अभ्यासाअंती समोर आले आहे.
'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' परिक्षेत्रात आढळ
'बकावान रोटुंडाटा' गोगलयीचे प्रजननासाठी एकत्रीकरण
'मॅंग्रोव्ह सेल'कडून ठाणे खाडीत 'फ्लमिंगो दर्शन सफारी'ला सुरुवात
३ सेक्शन पंपासह ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शीव-पनवेल महामार्गावर ठाणे खाडीवरील दोन पूल सध्या वाहतुकीस अपुरे पडत असल्याने या खाडीवर आता तिसरा पूल बांधण्यात येणार असून त्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
ल्या महिनाभरापासून पेट्रोल, डिझेलच्या किंमती रोजच्या रोज वाढत असल्याने समुद्रात तस्करी करणार्या समुद्र चाच्यांच्या पथ्यावर पडले आहे.