दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. ७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ‘मुंज्या’च्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता पहिल्या दिवशी हा चित्रपट १-२ कोटी कमावेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४ कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Read More
मराठीत सध्या विनोदी, भयपट, थ्रिलर असे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळत आहेत. असाच थरारक चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. 'निळावंती' असे या चित्रपटाचे नाव असून एका ग्रंथावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून या पोस्टरमध्ये एक स्री हातात कंदील घेऊन जंगलात चालताना दिसत आहे. ती येतिय... या टॅगलाईनचा नेमका अर्थ काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात चलबिचल करत आहे .याव्यतिरिक्त पोस्टरमध्ये असलेली ती पाठमोरी अभिनेत्री नक्की कोण आहे, याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागली आहे
अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार निर्मित व प्रणय चोकसी आणि ‘डान्सिंग शिवा’ प्रस्तुत तसेच सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटात मराठीतील अनेक मालिका आणि विविध नाटकांमधून अभिनय करणारा अभिनेता संग्राम समेळ एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
सुजिथ दिग्दर्शित 'साहो' चित्रपटाची चित्रपटक्षेत्रात सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, सध्या चित्रपटांमध्ये असलेली स्पर्धा लक्षात घेता चित्रपटकर्त्यांनी प्रदर्शनाची तारीख १५ ऑगस्टऐवजी ३० ऑगस्ट करण्याचा निर्णय घेतला.
'साहो' या बिग बजेट ऍक्शन थ्रिलर चित्रपटामधील 'सायको सैया' हे बहुप्रतीक्षित पार्टी सॉंग आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे कलाकार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा एक वेगळाच अवतार या गाण्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'साहो' या भारतातील आगामी ऍक्शन थ्रिलर चित्रपटाविषयी सर्वत्र चर्चा असताना या चित्रपटातील पहिल्याच 'सायको सैया' या गाण्याचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला. 'सायको सैया' हे गाणे ध्वनी भानुशली यांनी गायले असून तिनिष्क बागची यांनी लिहिले आहे.
मनमार्जिया फेम तापसी पन्नूच्या 'गेम ओव्हर' आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या टीजरमधील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक देखील झाले. नुकताच आलेला ट्रेलर अतिशयक रोमांचक असून यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्कंठा आणखीनच वाढणार आहे.