जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी डोडा येथील सुरक्षा दलाच्या तात्पुरत्या तळावर गोळीबार केला आहे. दि. ९ जून २०२४ नंतर झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे. हा हल्ला करून दहशतवादी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. बुधवार, दि. १२ जून २०२४ सकाळी हा हल्ला झाला. एक दिवस अगोदर, दि. ११ जून (मंगळवारी) दहशतवाद्यांनी कठुआ भागातील एका गावात घुसून काही गावकऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला होता.
Read More
पाकिस्तानमध्ये दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. आताच मिळालेल्या माहितीनुसार, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी बलुचिस्तानमध्ये १० बॉम्ब आणि ग्रेनेड हल्ल्यांमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
इस्लामिक दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात निरपराध ज्यूंना त्यांच्या मुलांसमोर ठार केले. इस्रायलने जारी केलेल्या नवीन फुटेजमध्ये हमासचे दहशतवादी एका ज्यू पित्याला त्याच्या मुलांसमोर ग्रेनेडने उडवताना दिसत आहेत.
इस्रायलवर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा आजवरच्या इतिहासातील सर्वात भीषण असाच. कोणत्याही दहशतवादाचे समर्थन होऊच शकत नाही, असे असताना काँग्रेसने जाहीरपणे ‘हमास’ला पाठिंबा दिला. तसेच देशभरातील मुस्लीम संघटनादेखील आता काँग्रेसचे अनुकरण करीत ‘हमास’ला समर्थन देताना दिसतात. त्यामुळे इस्रायल-‘हमास’ संघर्षाने काँग्रेससह दहशतवादाला पाठिंबा देणार्या देशविरोधी मुस्लीम संघटनांचा चेहरा पुनश्च उघडा पडला आहे.
एकूणच अमेरिकेच्या वर्चस्ववादी परराष्ट्रीय धोरणामुळे इस्लामी राजवटी असणार्या देशांमध्ये हस्तक्षेप, तेल-पेट्रोलच्या साठ्यांवर प्रभाव, लष्करी अस्तित्व, ज्यू जनतेला पाठिंबा ही कारणे लादेनने दिली. तसेच यात एक वाक्य असेही आहे की, “इराकवरच्या अमेरिकेच्या निर्बंधांमुळे दीड दशलक्ष मुले अन्नावाचून मरण पावलीत, त्याविषयी कुणाला कळवळा नाही. पण, तुमचे केवळ तीन हजार मेले, तर सगळे जग तुमच्यासाठी उभे राहिले. तसेच सामान्य नागरिकांवर आम्ही हल्ला केला. कारण, याच स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी अमेरिकेच्या सरकारला निवडून दिले आहे
मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र दाखवल्याने फ्रान्समधील शिक्षकाचे धर्मांध मुस्लीम विद्यार्थ्यानेच मुंडके छाटले. पण, हा केवळ वैयक्तिक हल्ला नसून इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याच शब्दात ‘इस्लामी दहशतवादी हल्ला’ असल्याचे स्पष्ट होते. मात्र, इस्लामी कट्टरतावादावर नेमका रामबाण इलाज काय याचा विचार व कृती करण्याची वेळ या हत्येने जगासमोर येऊन ठेपली आहे.
‘द रिलक्टंलट फंडामेन्टॅलिस्ट’ हे पुस्तक मोहसीन हमीद याने ९/११ नंतरच्या अनुभवांवर आधारित लिहिले आहे. भारतात ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट त्या पुस्तकातील कहाणीला धरूनच काढण्यात आला. तसेच, अनेक गाणी, नाट्य, साहित्यनिर्मिती ९/११ नंतर करण्यात आली. सर्वांचा रोख मुस्लिमांना कशा भेदभावाला सामोरे जावे लागले, हाच होता. आपण इस्लाम म्हणून कसे पीडित आहोत, हेच ठसविण्याचा प्रयत्न या साहित्यकृतींनी केला.
भारताच्या लष्करी वाहनांवर झालेला दहशतवादी हल्ला हा पाकपुरस्कृतच होता हे पुन्हा अधोरेखित करण्याची आवश्यकता नाही. पाकिस्तानने द्विराष्ट्र मैत्रीनीतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून चालविला आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकेची मनधरणी करण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र, चीन वगळता अन्य कोणताही देश त्याला दारात उभे करायला तयार नाही.
अफगाणिस्तानात गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता
पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा वाद चांगलाच चिघळत असताना शनिवारी बलुचिस्तानमध्ये अतिकेरी हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन घटनांमध्ये १० पाकिस्तानी सैनिक मारले गेले.
२००५ पासून आज २०१९ पर्यंत बलुच अतिरेक्यांचे हल्ले चालूच आहेत. कारण, पाकिस्तान सरकारला आणि चीनला असा त्रास देत राहणं, हेच तर बलुच अतिरेक्यांचं उद्दिष्ट आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी योजना आखल्यावर नेमकं त्या रात्री काय घडलं, याची माहिती पंतप्रधानांनी अखेर उघड केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला पंतप्रधानांनी ही मुलाखत दिली आहे.
काही वर्षांपूर्वी झालेल्या उरी हल्ल्याप्रमाणेच दहशतवाद्यांकडून पुलवामामध्ये आयईडी हल्ला करण्यात आला.