सावरकर या महान व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. सावरकरांच्या प्रतिभेला हयातीत न्याय मिळाला नाहीच. पण, मृत्यूनंतरही वाचाळवीरांनी त्यांना अपमानित करण्याची एकही संधी सोडली नाही. म्हणूनच सावरकर नव्याने लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. याचाच प्रयत्न म्हणून योगेश सोमण यांनी सुरु केले ‘विनायक दामोदर सावरकर’ या एकलनाट्याचे प्रयोग... या लेखात जाणून घेऊया, सोमण यांच्या या नाटकाबद्दल, त्यांच्याच लेखणीतून...
Read More
इकडे येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यास महराष्ट्रातील जनता राहूल गांधींना इथे फिरु देणार नाही, अशा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिला आहे. राहूल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेचा समारोप महाराष्ट्रात होणार आहे. तसेच येत्या १७ तारखेला शिवाजी पार्कवर राहूल गांधींची मोठी सभा होणार आहे. दरम्यान, त्याआधी मनसेकडून राहूल गांधींना इशारा देण्यात आला.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात चापेकर बंधू यांचे नाव अमर झाले आहे. क्रांतिकार्यात सहभागी झालेले, एकाच घरातील तीन बंधू फासावर लटकावले जाण्याचे हे एकमेव उदाहरण असावे. त्यांच्या असीम त्यागाची आणि असामान्य धाडसाची कहाणी सांगणारी पुस्तके म्हणजे ’कंठस्नान आणि बलिदान’ (लेखक-वि. श्री. जोशी) आणि ’चापेकर पर्व’ (सच्चिदानंद शेवडे). याशिवाय वि. श्री. जोशी यांच्या ‘मृत्युंजयांचा आत्मयज्ञ‘ या पुस्तकातही जोशी यांनी या वीरांबाबत एक दीर्घ प्रकरण लिहिले आहे.
ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने मिरची लागते, त्या सर्वांसाठी सावरकरांचे कौशल्य विचार औषधाचे काम करेल, असे वक्तव्य कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. नागपूर येथे मंगळवारी आयोजित 'महापुरुषांचे कौशल्य विचार' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते.
“हिंदुत्व हा माझा प्राण आहे”, असे अभिनेता प्रसाद ओक याने म्हणत त्याच्या लेखी हिंदुत्वाची व्याख्या त्याने मांडली आहे. ‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाचा मुहुर्त संपन्न झाला. यावेळी ‘महाएमटीबी’शी बोलताना प्रसाद ओक याने त्याच्यासाठी हिंदुत्व काय आहे? हे व्यक्त केले. २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.
कर्नाटकमध्ये कॉग्रेसच सरकार स्थापन होऊन एक महिना पूर्ण झाला. कॉग्रेसने कर्नाटक निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या घोषणापत्रात काय घोषणा केल्या होत्या. घोषणापत्रात पाच हमी जाहीर केल्या होत्या.
चिड आणि संताप कशाही प्रकारे व्यक्त होऊ शकते. मी कुठे थुंकलो मला दाखवा. माझ्या दाताचा त्रास होता म्हणून ती कृती झाली अशी सारवासारव संजय राऊतांनी केली आहे. संजय शिरसाट यांच्याबाबत प्रश्न विचारताच राऊत थुंकल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गद्दारांवर थुंकणं हा हिंदु संस्कृतीचा भाग आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. इतकेच नाही तर यासाठी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दाखला देखील दिला आहे.
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त होते, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन महाराष्ट्र सदनात प्रथमच आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती कार्यक्रमात काढले. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते.
मुंबई : "स्वातंत्र्यवीर सावरकर हे मानवरूपी कल्पवृक्ष होते. ज्याप्रमाणे एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले, फळ, मुळं उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते; त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील, कवी, लेखक, साहित्यिक, तत्वचिंतक, समाजसुधारक, व्हिजनरी असे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे सावरकर यांचे प्रखर विचार हे आजच्या युवा पिढी पर्यंत पोहोचवणे हे आपली जबाबदारी आहे", असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याबद्दल आपल्या भविष्यातील पिढ्यांना माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या माध्यमातून दि. २१ मे ते २८ मेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ‘वीरभूमी परिक्रमा’ याअंतर्गत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्रातील पावन झालेली शहरे ‘वीर सावरकर सर्किट’अंतर्गत पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने एक कार्यक्रम हाती घेतला आहे. यानिमित्त
मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगते अग्निकुंड असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मॉरिशसमध्ये भव्यदिव्य पुतळा उभारण्यात आला आहे. मॉरिशसची राजधानी असलेल्या पोर्ट लुईसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला असून, सावरकरांच्या जयंतीनिमित्त्त रविवार, दि. २८ मे रोजी या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी केलेल्या सावरकरांविषयीच्या आक्षेपार्ह विधानावर राऊतांनी मौन बाळगले. काँग्रेसच्या नेत्यांकडून सावरकरांविषयी वारंवार टिप्पणी केली जाते. मात्र, शिवसेनेने (ठाकरे गट) यावर प्रतिक्रिया देणे टाळले. यावरून, सावरकरांविषयी शिवसेना दुटप्पी भूमिका घेते, हेच यातून स्पष्ट होते.
न्यायालयाचा अवमान करणे व शिक्षेच्या नावाने तमाशा करणे, हे पुन्हा एकदा सुरू झाले आहे. प्रश्न एवढाच राहतो की, मरणपंथाला लागलेल्या काँग्रेसला यामुळे संजीवनी तर मिळणार नाही ना?
''उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेसकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Savarkar) अपमान केला जात होता, त्यावेळी शिवसेना गप्प होती. जर उद्धव ठाकरेंकडे स्वाभिमान असता तर त्यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे काँग्रेसींना जोडे मारण्याचे काम केले असते. मात्र खरी शिवसेना आता भाजपसोबत असल्याने राहुल गांधींना जोडे मारण्याचेही काम आम्हाला करावे लागत आहे. स्वतःला सावरकरवादी म्हणवून घेणारे सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत हे दुर्दैवी आणि शरमेची बाब आहे,'' या शब्दांत उपमुख
स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात यापुढे एक शब्दही सहन करणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यावतीने रविवारी मुंबई आणि ठाण्यात आयोजित सावरकर गौरव यात्रेत ते बोलेत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकरांचा वारंवार अवमान करणार्यांना सावरकर गौरव यात्रेतून सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. सावरकर गौरव यात्रा ही तर केवळ एक छोटीशी झलक आहे. यापुढे आम्ही सावरकरांचा अवमान सहन करणार नाही. सावरकरांवर बोलताना नेत्यांन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या अवमानकारक विधानाचे गुरुवारी विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. गांधींनी सावरकरांचा पुन्हा अवमान केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. शिवाय, आमदार संजय शिरसाट, भाजप नेते आशिष शेलार यांनीही हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.
बदलापूर येथील प्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार अनंत शंकर ओगले यांनी आजवर अनेक ऐतिहासिक, राजकारणी व्यक्तिमत्त्वांचा आढावा त्यांच्या लेखणीतून घेतलेला आहे
स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रा स्व संघ , विहिंप , राष्ट्र सेविका समिती सोबत हिंदू महासभा यांची वृक्ष रोपण करून मानवंदना....
शिवसेना उपविभागप्रमुखांनी महाराष्ट्रातून राहुल गांधींना पोस्टाने पाठवले पुस्तक
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, तिरंगा स्पोर्टस क्लब आणि सर्वोदय रुग्णालय, घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवाळीनिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
काँग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला चपलेचा हार घातल्याचा व त्यांच्या पुतळ्याला काळे फासण्याचा निंदनीय प्रकार समोर आला
ते म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या आयुष्यातील यश हे त्यांच्या स्वकर्तृत्वाचेच द्योतक असले तरी तात्यारावांच्या जीवनप्रवासात वहिनी येसू सावरकर आणि पत्नी माई सावरकर या दोघींचाही सिंहाचा वाटा आहे. घर, कुटुंब, समाजकार्य अशा सगळ्याच कसोट्यांवर उत्तुंग ठरलेल्या येसूवहिनी आणि माई सावरकर...
एक क्रांतिकारक म्हणून सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जेवढे योगदान आहे, तेवढेच सावरकरांचे ‘इतिहास लेखक’ या नात्याने मराठी साहित्यक्षेत्रात योगदान आहे. त्याविषयी...
हिंदुत्व, धर्मसुधारणा, हिंदुराष्ट्र या सर्वांच्या हक्काचं रक्षण करणारी लोकशाही याची सुयोग्य सांगड घालणारी राष्ट्राच्या प्रगतीची नीती सावरकर आपल्याला सांगत होते. अशीच तत्त्व श्रीकृष्ण, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्या त्या काळात सांगून ठेवली होती आणि आचरून दाखवली होती.
दोघांच्याही जीवनाकडे बघितले, तर त्यांचे जीवन हे क्रांती करण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रांतिकारकासारखे दिसते. पण, मार्क्स हा क्रांतीचा विचार देऊन समीक्षा करून थांबतो, तर सावरकर स्वत: क्रांती करण्यासाठी सिद्ध असलेले दिसतात.
सावरकर हे मुसलमान किंवा इस्लामद्वेष्टे होते, असा मोठा गैरसमज बहुतांश लोकांमध्ये आहे. सावरकरांनी मुसलमानांना वगळण्यासाठी हिंदुत्वाची व्याख्या केली, त्यांना त्यांच्या हिंदुुराष्ट्रात मुसलमानांसह अल्पसंख्याकांना नागरिकत्वाचे दुय्यम स्थान द्यायचे होते, त्यांना हिंदूंचा बहुसंख्यावाद अल्पसंख्याकांवर लादायचा होता, अशाप्रकारचे आरोप सावरकरांवर केले जातात.
‘सावरकर आणि युद्धशास्त्र’ याचा विचार हा व्यापक आणि दूरदृष्टीचा होता, हे त्यांचे चरित्र वाचताना प्रकर्षाने जाणवते. युद्धशास्त्राविषयीची सजगता ही तळमळ त्यांनी अनेक ठिकाणी प्रदर्शित केली, तर काही वेळा परखड शब्दांतूनही व्यक्त केली आहे.
'हिंदुत्व' या ग्रंथातच स्वतंत्र इस्रायल राष्ट्र झाले, तर आमच्या ज्यू मित्रांप्रमाणे आम्हालाही आनंद होईल," असे सावरकरांनी म्हटले आहे. त्यापुढे जाऊन सावरकर असे म्हणतात की, "जर उद्या ज्यू राहत असलेले पाश्चिमात्य देश आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाले, तर पाश्चिमात्य देशांत राहाणार्या ज्यूंना इस्रायलबद्दल सहानुभूती वाटल्याशिवाय राहणार नाही." सावरकरांनी १९२२ मध्ये उपस्थित केलेला प्रश्न आज जवळजवळ १०० वर्षांनीही तितकाच व्यवहार्य आहे. इस्रायल आणि ज्यूंविषयी सावरकरांच्या सखोल ज्ञानाचे दर्शन त्यातून होते.
सावरकरांवरची राजकीय बंधने उठल्याबरोबर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, अशी अपेक्षा सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेकांनी जाहीरपणे व्यक्त केली. परंतु, काँग्रेस ही निर्भेळ राष्ट्रवादी नसल्याने, ‘हिंदुत्व’ या मुद्द्यावर काँग्रेसशी मतभेद असल्याने व गांधींच्या अहिंसा, ब्रह्मचर्य, मुस्लीम तुष्टीकरण या गांधीगोंधळात फसलेल्या काँग्रेसमध्ये जाणे आपल्याला शक्य नाही हे सावरकरांनी स्पष्ट केले.
‘देहाकडून देवाकडे’ जाताना वाटेमध्ये देश लागतो, याचे सदैव भान असलेले; किंबहुना देशालाच ‘देव’ मानणारे तेजस्वी क्रांतिसूर्य म्हणजे अर्थातच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वापुढे ‘अष्टपैलू’, ‘बहुआयामी’ वगैरे शब्द फिकेच पडतात. ‘शतपैलू’ असंच त्यांचं वर्णन करायला हवं. भाषाप्रभू, वक्ता, नाटककार, इतिहासकार, महाकवी... ही यादी न संपणारी आहे. मात्र, त्यांनी प्रत्येक पैलू मातृभूमीलाच अर्पण केला. देवाला फूल वाहतात तितक्या सहजतेने देशाच्या चरणाशी त्यांनी मन वाहिलं. त्यांच्याच शब्दात सांग
आपले सारे काही मातृभूमीला अर्पण केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही राष्ट्राला मार्गदर्शक आहेत. अशा या ‘कालजयी सावरकरां’चे विचार आजही जनसामान्यांसमोर विशेषत: तरुणांसमोर सतत मांडत राहणे अत्यंत आवश्यक आहे
संघ आणि सावरकर संबंधांची चर्चा जर आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, बाबाराव सावरकर या अनुषंगाने केली तर? शेवटी संघ परिवार असो वा हिंदू महासभा किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना, त्यांचं लक्ष्य एकच आहे, या देशाला परमवैभव प्राप्त करून देणे.
‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण, तुज सकल चराचर शरण’ भारताच्या मुख्य भूमीपासून १२०० किलोमीटर दूर समुद्रात एका बेटावर आपल्या आयुष्यातली अमूल्य ५० वर्षे स्वातंत्र्यलक्ष्मीच्या सेवेविण व्यय जाणार, या विचारानेच व्याकुळ सावरकरांनी अंदमानात पोहोचायच्या आधीच दुहेरी जन्मठेपेची शिक्षा कमी करून घेण्याचे प्रयत्न सुरू केले; जेणेकरून शत्रूच्या बंदिवासात झुरण्यापेक्षा ‘शत्रूची माफी मागून नाही’ तर शत्रूशी तह करून मायभूमीची निरंतर सेवा करता यावी! स्वदेशस्वातंत्र्यार्थ क्रांतीलढ्यात प्रत्यक्ष भाग घेता आला नाही तरीही द
‘सावरकर’ या नावाला ज्या बंधूंनी मंत्रसामर्थ्य बहाल केले, त्या बंधुत्रयींचे शिरोमणी म्हणजे तात्याराव. तात्यारावांचं सारं जीवन समिधेसारखं स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकुंडाला समर्पित होतं. पण, आश्चर्य हे की, या समिधा जेव्हा एखाद्या क्रांतिकारक विचाराच्या, कृत्याच्या संपर्कात येत, तेव्हा आतल्या अग्नीने धडाडून पेटून उठत आणि जेव्हा एकांतात विचारमग्न असत, तेव्हा त्याच समिधेच्या काष्ठावर मनातले विचारकाव्याची लसलसती पालवी होऊन अंकुरत; क्वचित प्रेमकवितांची सुकुमार फुलंही त्यावर उमलत! जितकी प्रखर-ज्वलंत ध्येयनिष्ठा,
‘अनादि मी, अनंत मी’ या नाट्य कलाकृतीच्या माध्यमातून, मराठी भाषेतील सर्वोच्च दर्जाची एक उत्तम नाट्यसंहिता आणि स्वा. सावरकरांची समग्र जीवनगाथा पुन्हा एकदा नव्या पिढीला, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती व्हावी आणि स्वा. सावरकरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाच्या अनमोल, परंतु विसरलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळावा, या उद्देशाने येत्या स्वा. सावरकर जयंती दिनी म्हणजे २८ मे, २०१९ पासून ‘अनादि मी, अनंत मी’ या महानाट्याचे ध्वनिनाट्य स्वरूपात (ऑडियो ड्रामा) रूपांतरण प्रकाशित करण्याचा मी
सावरकरांनी ‘परराष्ट्र नीती’ या विषयावर आपले विचार मांडले होते. जागतिक स्तरावर भारताने इतर देशांशी राखावयाचे संबंध यावर सावरकरांनी मार्गदर्शन केलं होतं आणि मोदींनी आखलेली परराष्ट्रनीती ही सावरकरांनी सांगितलेल्या मार्गाशी मिळतीजुळती असल्याचं दिसून येतं.
आज सावरकरांवर व्याख्याने देताना मला जाणवतं, गावागावांत ‘सावरकर’ जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. सावरकरांचा अभ्यास करणारी सशक्त पिढी उभी राहते आहे, ऑडिओ बुक्स, नाटक, गीतपर कार्यक्रम यातून सावरकर पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीदेखील तुम्ही स्वत: वाचल्याशिवाय तुम्हाला ‘उत्तम, उदात्त आणि महन्मधुर’ म्हणजे काय आहे, ते कळणार नाही.
राष्ट्रकार्य हे सतीचं व्रत मानून केवळ देशसेवेत त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. आता ही आपली जबाबदारी आहे की, आपण त्यांना जगासमोर 'माफीवीर सावरकर' म्हणून पोहोचवतो की, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' म्हणून...
समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराने आलेली सूज्ञता, अभ्यासात पडत असलेली भर आणि मुळातून संदर्भ अभ्यासण्याची प्रवृत्ती वाढीला लागल्याने सध्याच्या काळात सावरकरद्वेषाचे हे उद्योग तग धरणारे नाहीत. मात्र, सर्वच सावरकरप्रेमी अभ्यासकांनी आपापल्या परीने योग्य संदर्भ देत आणि साक्षेपी लेखन करीत या ‘जमात-ए-पुरोगामी’चे पितळ उघडे पाडणे, ही काळाची गरज आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनुसार कृतिशील कार्य करण्याचा लौकिक असलेले मुंबईचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ हे सर्वार्थाने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार प्रखरतेने नेत असून यात स्तरातील मंडळी सहभागी होत आहेत. तेव्हा, स्मारकाचे विविध उपक्रम तसेच कार्यक्रमांची माहिती देणारा हा लेख...
स्वा. सावरकरांनी भागानगरचे आंदोलन अधिक तीव्र केले. राज्यात नागरिकांच्या अधिकाराची स्पष्ट मागणी केली. सर्व भारतीयांना निजामाविरुद्ध उभे करून जातीयवादी हुकूमशाही नष्ट करून सामान्य लोकांचं राज्य आणण्याची इच्छा सावरकरांना होती. संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांचे जत्थे हैदराबाद (भागानगर) कडे निघाले होते. १० महिन्यांत चार हजार स्वयंसेवक तुरुंगात गेले होते. तेव्हा, भागानगरचे आंदोलन आणि सावरकरांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारा हा लेख...
अप्पा फक्त तात्यारावांचे अंगरक्षकच नव्हे, तर सावरकरांच्या सहवासात राहून त्यांना क्रांतिकारकांप्रमाणे आपणही राष्ट्रस्वातंत्र्यार्थ हौतात्म्य स्वीकारावे अन् जीवन सार्थकी लावावे, असे त्यांना वाटू लागले.
कडवे राष्ट्रभक्त, सच्चे समाजसेवक, प्रतिभावंत साहित्यिक, नामवंत कवी, हिंदुत्व तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते, वैज्ञानिक द़ृष्टी लाभलेले बुद्धीवादी, जातीभेद-अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर होय. सावरकरांच्या क्रांतिकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
डेव्हिड गार्नेट आणि गाय अल्ड्रेड या सावरकरांच्या ब्रिटिश सहकाऱ्यांनी केवळ सावरकरांची पदोपदी मदतच केली नाही, तर इंग्रजांनी सावरकरांवर केलेल्या अन्यायालाही त्यांनी वाचा फोडली. आत्मचरित्र, वृत्तपत्रे, मासिकांमध्ये या दोघांनी सावरकरांविषयीच्या आठवणी, प्रसंग यांचे यथोचित चित्रण केले आहे. तेव्हा, सावरकरांच्या या फारसा परिचित नसलेल्या दोन ब्रिटिश सहकाऱ्यांविषयी....
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३६व्या जयंतीनिमित्त 'स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र' आयोजित पुस्तक प्रकाशन व विशेष सन्मान कार्यक्रम संपन्न झाला.
आपली भूमी आणि आपली माती याची अनावर ओढ लागली की त्या भूमीला, मातीला स्पर्श करावासा वाटतो. तिथे जाण्यासाठी मन आसुसतं