For the work of parallel road in Jalgaon The mayor took the lead
Read More
महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती निवडीसाठी मंगळवार, ३० ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडीच्या कार्यक्रमानुसार २४ ते २६ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे गरजेचे होते. यानुसार आज नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जितेंद्र भगवान मराठे यांनी स्थायी तर नगरसेविका मंगला चौधरी यांनी महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी प्रत्येकी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्र दाखल करताना भाजपाचे नगरसेवक हजर होते.
ज्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात येणे भाग पडते पण येथे काळजी, देखभाल करण्यासाठी कुणीच नाही, आणि जेवणाचीही व्यवस्था नाही..., अशा गरजूंसाठी अथांग मानवताधर्म भावनेने कार्यरत आहे दिलासादायी ‘सेवालय’ प्रकल्प.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील प्रशस्त जागेत गेल्या ५ वर्षांपासून हे सेवाकार्य सुरू आहे. त्यात सध्या रोज सकाळी ९ च्या सुमारास ६० जणांना नाश्ता (उसळ, उपमा, पोहे आदी) आणि सकाळी ११ वाजता सुमारे १०० जणांना ताजा, पौष्टिक व सात्विक आहार सन्मानपूर्वक व प्र
महापालिकेची निर्मिती झाल्यापासून आ.सुरेश जैन यांचे एकहाती वर्चस्व होते. जैन यांना धोबीपछाड करत भाजपाने मिळवलेला विजय विशेष ठरला आहे.
जळगाव महानगर पालिकेच्या 19 प्रभागांमधील 75 जागांसाठी 1 ऑगस्ट रोजी मतदान झाले. 3 ऑगस्ट रोजी एमआयडीसमध्ये मतमोजणी झाली.यात मतदारांनी 75 पैकी 57 जागी भाजपा उमेदवार, 15 जागा शिवसेना व 3 जागा एएमआयएमच्या निवडुन दिल्या.
शहरातील भाजपाची ताकद या निमित्ताने समोर आल्याने विधानसभेची रणनीती मिळालेल्या जनमताच्या आधारे लोकांचा कल ठरवणे सोपे होणार आहे.
जळगाव महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणुकिसाठी मतदान 1 ऑगस्ट रोजी झाले आणि 3 रोजी मतमोजणी झाली यात भाजपाने जळगाव शहरात 40 वर्षांपासून माजी आ. सुरेश जैन यांची असलेली सत्ता उलढावून लावली. यामागची कारणमीमास तपासली असता भाजपाचे कार्यकर्ते व उमेदवार एकसंध राहिले तर सेनेत फुट पडली.
मनपा निवडणूक अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. यामुळे भावी उमेदवारांसह कार्यकर्ते प्रचारात दंग आहेत. अशातच शहरातील शाळा, आणि महाविद्यालयाच्या आवारातील धोकादायक खुल्या गटारींकडे मनपाची डोळेझाक होत असल्याचे चित्र आहे.
निवडणूकमा भाजपा, शिवसेनामाच शे खरी लढाई
सध्या केंद्रात आणि राज्यातही भाजपाची सत्ता आहे. दुर्दैवाने जळगाव महापालिकेत मात्र, भाजपाची सत्ता नाही. त्यामुळे सरकारची कितीही इच्छा असली, तरी शहरातील विकासकामांसाठी सत्ताधार्यांचाच शब्द अधिक मोलाचा असतो. त्याचा गैरफायदा घेत विकासकामांसाठी सरकारने निधी देऊनही महापालिकेतील सत्तारूढ खान्देश विकास आघाडीने दरवेळी तो निधी खर्च करण्यात आडकाठी आणली. आता महापालिकेत भाजपाची सत्ता आली तर हे शहर अधिक प्रगतीकडे जाईल, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘जळगाव तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.
जळगावला नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर महापालिकेत सत्तेवरील खान्देश विकास आघाडीने गेल्या १५ वर्षात केवळ राजकीय तडजोड आणि आपली लोकप्रियता सांभाळण्यासाठी खैरातीसारख्या वाटलेल्या महापौरपदाची अपवाद वगळता इतरांनी प्रतिष्ठाच घालवल्याचे दिसते.
जळगाव शहराचा विकास होण्यासाठी महापालिकेत भाजपाची सत्ता यावी असा निर्धार जळगावकरांनी केला आहे. त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या शिवसेना नेत्यांची काळजी अधिक वाढली आहे. यातून मतदारांची दिशाभूल करण्याचे घाणेरडे प्रकार त्यांनी सुरू केले आहेत. पण जळगावचा सुज्ञ मतदार त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही आणि महापालिकेची एकहाती सत्ता भाजपालाच देईल, असा ठाम विश्वास आ. सुरेश भोळे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.
Jalgaonkar was beaten by the rulers
जळगाव महानगरपालिकेच्या १ ऑगस्ट २०१८ रोजी होणार्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी महानगरपालिका क्षेत्रात आस्थापनांनी सुटी द्यावी अथवा दोन तासांची संबंधित मतदारांना सवलत द्यावी, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे, असे महानगरपालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी कळविले आहे.
Shivajinagar ,Mehrun, Khedi, Pimpalla, Nimkhedi ignored
जळगाव शहरातील सुसंस्कृत भाग म्हणून ओळखल्या जाणार्या सानेगुरूजी कॉलनी भागातील उद्यानांची महापालिकेने केलेल्या दुर्लक्षाने अक्षरशः वाट लागली आहे. त्यामुळे या उद्यानांमध्ये परिसरातील नागरिकांऐवजी गुरे-ढोरे आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विकास कामे केल्याचा दावा महानगरपालिकेतील सत्ताधार्यांकडून होत असला तरी प्रत्यक्षात मात्र शहरात विकास झाला कुठला? आणि समस्या सुटल्या कुठल्या? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पंधरा वर्षात स्थानिकांचे प्रश्न जैसे थे असून जळगाव शहरात बाहेरून येणार्यांची व्यथा कायमच आहे. शहरात दररोज सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिक विविध व्यवसाय आणि कामानिमित्त येतात. शहरातील नागरिकांना सुविधा मिळण्याची मारामार असताना त्यात बाहेरून येणार्यांच्या गर्दीमुळे उपलब्ध सुविधांवर ताण पडतो. मात्र महापालिकेती
शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१८ प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आज सुरेशदादांच्या मार्गदर्शनात शिवसेनेची विराट रॅली जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
शहर विकासासाठी जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाशी युती करण्याचा प्रस्ताव दिला होता पण नंतर ना. गिरीश महाजन यांच्याकडून संपर्कच झाला नाही.
जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ७५ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, भाजप व खाविआ युती करून निवडणूक लढविणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
महापालिकेतील वाघूर, विमानतळ घोटाळाप्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन, आजी-माजी नगरसेवक व अधिकार्यांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. याप्रकरणी गुरुवारी औरंगाबाद खंडपीठात कामकाज झाले. यावेळी पोलिसांनी अद्याप कारवाई का केली नाही? अशी विचारणा करीत १९ जुलैला युक्तीवाद करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना न्यायालयाने दिले.
जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकिचा बिगुल वाजला असून 1 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. 75 उमेदवारांचे भवितव्य 1 ऑगस्टरोजी मतपेटीत बंद होईल व 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.