पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी सेनादलांना कारवाईचे स्वातंत्र्य दिले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीदेखील पंतप्रधानांची भेट घेतल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे
Read More
विरार, दि. 24 : प्रतिनिधी खा. डॉ. हेमंत सवरा व आ. राजन नाईक यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 23 एप्रिल रोजी वसई-विरार महापालिकेत विकासकामे आणि महत्त्वाच्या विषयांवर आढावा घेण्यासाठी बैठक झाली. बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून प्रलंबित विकासकामांना यामुळे गती मिळणार आहे.
महाड नवेघर येथील २५ एकर जमीनीपैकी ३ गुंठे जमीन ही कुणबी समाजाला देण्यात आली आहे. तर त्याच ठिकाणी उपलब्ध असलेली सहा गुंठे जागा बुरुड समाजाला समाजमंदिर आणि विद्यार्थी वस्तीगृहासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पुढील १५ दिवसात प्रस्ताव देण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाप्रमुखांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला खिंडार पडले आहे. मंगळवार, १५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
समृद्धी महामार्ग प्रतिष्ठित " स्कॉच २०२५" पुरस्काराने सन्मानित
सध्या सोशल मीडियावर ‘घिबली’ स्टाईलने आपल्या फोटोंना इफेक्ट देण्याच्या एका ट्रेंडची चांगलीच चलती आहे. पण, नेमका हा ‘घिबली’ प्रकार तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसतो. तर जपानमधील ‘स्टुडिओ ‘घिबली’ हा केवळ एक स्टुडिओच नाही, तर ती एक संकल्पना आहे, एक अनुभव आहे. ‘स्टुडिओ घिबली’च्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने जपानी संस्कृती, समृद्ध निसर्ग, मानवी भावना आणि कल्पनारम्य कथांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते. तेव्हा, या ट्रेंडच्या निमित्ताने अॅनिमेशनची जादूई नगरी असलेल्या ‘स्टुडिओ घिबली’च्या दुनियेची ही सफर...
मुंबई : जपानी अॅनिमेशनमध्ये वेगळीच जादू निर्माण करणारी स्टुडिओ घिबली (Studio Ghibli) ही कंपनी त्यांच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. मऊ, जलरंगसदृश पार्श्वभूमी, सूक्ष्म तपशील असलेल्या दृश्यरचना आणि भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टींमुळे ही शैली जगभर लोकप्रिय झाली आहे. माय नेबर टोटोरो (My Neighbor Totoro), स्पिरीटेड अवे (Spirited Away), प्रिन्सेस मोनोके (Princess Mononoke) यांसारख्या चित्रपटांमुळे घिबली (Ghibli) अॅनिमेशनला एक वेगळाच दर्जा मिळाला.
( Take aptitude test of 16 lakh students of class 10th BJP Anil Bornare demand to the Education Minister ) दहावीनंतर करिअरची दिशा ठरविणारी कलचाचणी चार वर्षांपासून बंद असून ही कलचाचणी सुरू करण्याची मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष व भाजप प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
वा! चित्राताई वाघ वा! अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी आमदार चित्रा वाघ यांचे तोंडभरून कौतूक केले. गुरुवार, २० मार्च रोजी अनिल परब यांनी चित्रा वाघ यांच्यावर टिका केली. त्यावर चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले. याबद्दल नारायण राणे यांनी ट्विट करत त्यांचे कौतूक केले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, अंधत्वाचे प्रमुख कारण ठरणार्या आजारांपैकी एक म्हणजे काचबिंदू (Glaucoma). हा एक डोळ्यांचा गंभीर आजार असून वेळीच निदान आणि उपचार न केल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते. याच आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक काचबिंदू सप्ताह’ दरवर्षी मार्च महिन्यात साजरा केला जातो. आज दि. १२ मार्च हा दिवस ‘जागतिक काचबिंदू दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने नेत्ररोगतज्ञ, ‘अनिल आय हॉस्पिटल्स ग्रुप’च्या मेडिकल डायरेक्टर, डॉ. अनघा हेरूर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्
काचबिंदू म्हणजे काय? काचबिंदू झाल्यानंतर डोळ्यांवरील उपचार पद्धती काय असते? डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय उपाय करावेत? जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त (World Glaucoma Week) प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ अनिल आय हॉस्पिटल्स ग्रुप मेडिकलच्या डायरेक्टर, डॉ. अनघा हेरूर यांची विशेष मुलाखत
पाच लाख रुग्णांवर उपचार, एक लाखांहून अधिक शस्त्रक्रिया आणि दहा हजारांहून अधिक लॅसिक उपचार... २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत लाखो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम करणार्या डोंबिवलीच्या डॉ. अनघा अनिल हेरूर या खर्या अर्थाने नेत्रचिकित्सा क्षेत्रातील कर्मयोगिनी ठरल्या आहेत. त्यांचा नेत्रदीपक प्रवास जाणून घेऊया....
Anil Parab सपा आमदार अबू आझमीने औरंग्याची भलामण केल्यानंतर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या 'उबाठा' गटाच्या आ. अनिल परब यांनी स्वतःची तुलना धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांशी केली आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून, त्यांचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी आंदोलन केले जाणार आहे.
'साहेब मला माफ करा' असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकाने त्यांना सोडचिठ्ठी दिली आहे. उबाठा गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
विलेपार्ल्यात निर्णय घेणारे राऊत आणि अनिल परब कोण? असा सवाल जितेंद्र जनावळे यांनी केला आहे. उबाठा गटाचे विलेपार्ले येथील उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी अनिल परब यांच्यावर आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
मुंबई मेट्रो मार्ग ४ वडाळा - कासारवडवली या प्रकल्पामध्ये स्थापत्य कामात तब्बल १२७४.८० कोटी रुपयांची वाढ आणि ५ वर्षांची प्रकल्प दिरंगाई झाल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. आरटीआयच्या माध्यमातून अनिल गलगली यांनी ही माहिती उघड केली आहे.
मुंबई मेट्रो मार्ग ९ (दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर) आणि मेट्रो मार्ग ७अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल) यांसाठी नव्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही मेट्रो मार्गांचे कार्यादेश दि. ९ सप्टेंबर २०१९रोजी जारी करण्यात आले होते. मात्र, विविध अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण होण्यात विलंब होत आहे. त्यामुळे या मार्गांवरील नागरिकांना मेट्रो सुविधेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती माहिती अधिकारात एमएमआरडीएने दिली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरी दरम्यानचा ७६ कि.मी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या टप्प्यातील ठाणे व नाशिक जिल्ह्याला जोडणाऱ्या बोगद्यांवर ऐतिहासिक स्थानिक वारली लोकसंस्कृतीची मुद्रा उमटवून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संस्कृती संवर्धनाचा एक अनोखा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे बोगद्यावर चित्रकला रेखाटण्याचा राज्यातील हा पहिलाच अनोखा प्रयत्न आहे.
नागपूरच्या गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात तीन वाघ आणि एका बिबट्याला ‘बर्ड फ्लू’ची लागण होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला (gorewada animal died). या घटनेचे देशात गंभीर परिणाम उमटले (gorewada animal died). पिंजराबंद अधिवासातील वन्यजीवांनाही या विषाणूची लागण होऊ शकते आणि त्यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो, ही बाब महाराष्ट्रात प्रथमच घडली. पक्ष्यांमधील हा विषाणू प्राण्यांमध्ये कसा संक्रमित होतो, यामागची कारणे काय आणि त्यावरील उपाय काय अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी पक्षीतज्ज्ञ पशुवैद्यक डॉ. शिवानी तांडेल यांची मुलाखत...
अॅनिमल' चित्रपटात मिळालेल्या घवघवीत यशानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरी विशेष चर्चेत आहे. बुलबुल चित्रपटातील तृप्ती 'अॅनिमल' आणि 'भूल भूलैय्या ३' मध्ये वेगळ्याच अंदाजात दिसली. एका चित्रपटामुळे एका पाठोपाठ एक मोठे चित्रपट तिने पटकावले. लवकरच ती 'धडक २' मध्ये झळकणार असून अनुराग बासू दिग्दर्शित 'आशिकी ३' मध्येही तिची वर्णी लागली होती. मात्र, आता 'आशिकी ३' मधून तिचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळत आहे.
(Chandrashekhar Bawankule) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी तीन महत्त्वपूर्ण समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळेस पक्षाच्या काही नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
कल्याण : विद्यार्थ्यांनी जोपसलेला छंद करिअर मध्ये रूपांतरित करण्याचे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व शालेय शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे यांनी केले. छत्रपती शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यामंदिरच्या ( Abhinav Vidyamandir ) आचार्य अत्रे नाट्यगृहात झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
अनिल शर्मा दिग्दर्शित गदर चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. गदर १ आणि गदर २ या दोन्ही चित्रपटातील सनी देओल यांच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे. दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर लवकरच गदर ३ येणार असेही सांगितले जात आहे. आणि या तिसऱ्या भागात नाना पाटेकर दिसणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच, नुकताच अनिल शर्मा दिग्दर्शित वनवास हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात अभिनेते नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत होते.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असणारा वनवास हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या. खरं तर बऱ्याच काळानंतर नाना पाटेकरांचा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतील असं वाटलं होतं पण जरा उलटंच झालं. प्रेक्षकांनी वनवास चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केलेली आकडेवारी समोर आली असून जितकं चित्रपटाचं बजेट होतं तितकी देखील कमाई हा चित्रपट अद्याप करु शकला नाही
नागपूर : कल्याण ( Kalyan ) येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी विधानपरिषदेत दिली.
मुंबई : अखेर, कुर्ला ( Kurla ) स्टेशनपर्यंत बस सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. कुर्ला स्टेशन पर्यंत बस सेवा पूर्ववत करण्याबाबत मागील ३ दिवसापासून चुकीची माहिती देत बस सेवा स्थगित करत सामान्य प्रवाश्यांना वेठीस धरणारे वरिष्ठ वाहतुक अधिकारी लक्ष्मण महाले यांची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांसकडे केली आहे.
कुर्ल्यातील बेस्ट बस दुर्घटनेमुळे अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक नियोजनाची आवश्यकता असे अनेक मुद्दे चर्चेत आले आहे. मुंबईचे वाहतूक नियोजन आखताना महानगरपालिका, एमएमआरडीए, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील समन्वयाची आवश्यकता याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
(Kurla Best Bus Accident ) बेस्ट मध्ये भाडे करार तत्त्वावर बसेस घेण्याचे कंत्राट वर्ष २०१८ ते २०२१ या काळात तत्कालीन सत्ताधारी उबाठा सेनेच्या नेतृत्वात आणि उबाठा सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार देण्यात आले होते. त्यावेळी भाजपने सदर प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता वाढणाऱ्या अपघातामुळे आणि झालेल्या जीवितहानीमुळे सदर बाबीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्
'अॅनिमल' चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची कायमस्वरुपी छाप उमटवणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यांच्या बहुरंगी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मराठी, हिंदीतील अनेक भूमिकांचे आजवर कौतक झाले. आणि आता थेट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनी मराठमोळ्या उपेंद्र लिमये यांचं कौतुक केलं आहे.
हिंदी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमी आपल्या अभिनयाने समृद्ध करणारे अभिनेते नाना पाटेकर लवकरच ‘वनवास’ या चित्रपटातून नवी भूमिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘वनवास’ हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘दै. मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना नाना पाटेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ‘नटसम्राट’ नाटक आणि चित्रपटाबद्दल भाष्य केले.
नाशिक : हिंदू देव-देवतांवर खालच्या पातळीवर टीका करुन हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल मौलाना साजिद रशिदी याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महर्षी पंचायतन सिद्धपीठमचे महंत तसेच ‘अखिल भारतीय संत समिती’, धर्म समाज महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे ( Aniketshastri ) यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे पत्र उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सपकाळे यांना सोमवार, २ डिसेंबर रोजी देण्यात आले.
ठाणे : नालासोपारा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक व वसईच्या ( Vasai ) आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. गुरुवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी आम आदमी पक्षाने ( AAP ) आपली पहिली ११ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजप आणि काँग्रेसमधून ‘आप’मध्ये आलेल्या सहाजणांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपमधून आपमध्ये आलेल्या बी. बी. त्यागी, अनिल झा आणि ब्रह्मसिंह तंवर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते की, “निवडणुकीसाठी तिकीटवाटपाचे काम केवळ जनमत आणि संभाव्य उमेदवारांच्या विजयाच्या शक्यतांच्या आधारे क
शिक्षणामुळे एखाद्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण, तो बिघडूही शकतो, याचं उत्तम सादरीकरण करणारा चित्रपट म्हणजे ‘छबिला’. अनिल भालेराव दिग्दर्शित आणि लिखित ‘छबिला’ हा चित्रपट 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘इफ्फी’च्या ‘फिल्म बाजार’ या विभागात लक्षवेधी ठरला. ‘लमाण’ या समाजाविषयी फारशी लोकांना माहिती नसेल. खाणीतील दगड फोडून आपला उदरनिर्वाह करणारा अगदी अल्पसंख्याक असा हा लमाण समाज. शिकल्या-सवरलेल्या समाजाने त्यांना कायमच दूर ठेवल्यामुळे त्यांच्या मानसिक, आर्थिक, शारीरिक अडचणी कोणी जाणून घेतल्या
नागपूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथील मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला. कामठीचे मतदार विजयी करणार असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे ( Mahayuti ) सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली : एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय) ने चॅटजीपीटीला प्रशिक्षण देण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीने अनधिकृतपणे वापरल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने ओपनएआयला ( OpenAI ) समन्स जारी केले आहे.
अनिल देशमुखांनी स्वतःच स्वतःवर हल्ला घडवून आणला असून या घटनेतील सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत, असा दावा भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे. सोमवारी रात्री अनिल देशमुखांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याने ते गंभीर जखमी झालेत. दरम्यान, यावर परिणय फुकेंनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. त्यांच्या या आरोपाला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो हा आरोप हास्यास्पद आहे. विरोधकांना उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचेही दरेकरांनी सुनावले आहे. ते पत्र
Justice Chandival यांच्याकडून Anil Deshmukh यांची पोलखोल!
वन विभागाने कल्याणमधील पलावा सिटीमधील एका इमारतीमध्ये शनिवारी छापा टाकून विदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस आणली होती (kalyan exotic animal). या छाप्यामधून काही देशी प्राण्यांसह ओरॅंगोटॅनसारख्या विदेशी प्राणी ताब्यात घेतले होते (kalyan exotic animal). या घटनेतील आरोपी अजूनही फरार असून वन विभागाचे अधिकारी त्याच्या मागावर आहेत (kalyan exotic animal). मात्र, यानिमित्ताने कल्याण, ठाणे, मुंब्रा परिसरात चालणाऱ्या विदेशी प्राण्यांच्या बेकायदा खरेदी-विक्रीचे जाळे उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. (kalyan exotic animal
सचिन वाझे आणि अनिल देशमुखांकडून तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न झाला, असा खुलासा निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केला आहे. १०० कोटी वसूली प्रकरणाच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोग स्थापन करण्यात आला होता. परंतू, या आयोगाचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आला नाही. दरम्यान, न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
न्यायमूर्ती चांदीवाल यांनी १०० कोटी वसूली प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या अहवालाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
काटोलमध्ये संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी सर्व प्रकारची सबसिडी आणि मदत देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. काटोल विधानसभेचे उमेदवार चरणसिंग ठाकुर यांच्या प्रचारार्थ आयोजित नरखेड येथील सभेत ते बोलत होते. बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड, अकोल्यातील मुर्तिजापूर आणि हिंगणा येथे त्यांच्या सभा पार पडल्या.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने विकीपिडीया ( Wikipedia ) या परदेशी माध्यममंचास त्याच्या कार्यशैलीविषयी नोटीस बजावली आहे. ऑपइंडिया या प्रसारमाध्यमाने विकिपीडियाच्या भारतविरोधी भूमिकेबद्दल तपशीलवार डॉजियर जारी केल्यानंतर काही दिवसांनी केंद्र सरकारने या परदेशी प्लॅटफॉर्मला नोटीस जारी केली आहे. त्याचवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने एएनआयला सरकारचे प्रचाराचे साधन म्हणून संबोधल्याबद्दल विकिपीडियाला फटकारले आहे. स्वत:ला विश्वकोश म्हणू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Mansukh Hiren ची झालेल्या हत्येप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह, सचिन वाझे हे एकच असल्याचे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केले. तसेच १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणात आपल्याला अडकवण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. याचपार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता फडणवीसांनी जशास तसं उत्तर दिले आहे.
PM Modi Diwali : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच भारताच्या संरक्षण दलांचे सर्वोच्च अधिकारीदेखील देशाच्या सीमावर्ती भागात तैनात सैनिक आणि अधिकाऱ्यांसमवेत दिवाळी साजरी करणार आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान पोर्ट ब्लेअरमधील अंदमान आणि निकोबार कमांडमध्ये तैनात असलेल्या सैन्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आगामी 'वनवास' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर प्रेक्षकांची उत्सुकता संपली असून चित्रपटाचा टीझर भेटीला आहे. 'अपने ही देते है अपनो को वनवास' अशा टॅगलाईनखाली असणाऱ्या 'वनवास' चा टीझर आला आहे.
शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी शरद पवार गटाची ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली. यात काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांना तिकीट देण्यात आले आहे.
भारत अॅनिमेशन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या मार्गावर असून भारत येत्या काळात जगभराला सामग्री पुरवेल, असे दिसून येते. विविध क्षेत्रांत भारत आत्मनिर्भर होत असताना, या क्षेत्रातही त्याचे वाढते योगदान त्याला प्रमुख जागतिक खेळाडू अशी ओळख मिळवून देणारी ठरणार आहे.
( MahaVikas Aghadi ) एखाद्या राज्याचा गाडा सुरळीत हाकण्यासाठी जसा मुख्यमंत्री सक्षम लागतो, तसाच गृहमंत्रीही. देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील अशी काही नावे त्यात घेता येतील. महाविकास आघाडीचा सत्ताकाळ मात्र या महत्त्वाच्या पदांना गालबोट लावणारा ठरला. या सरकारचा गृहमंत्री पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचे ‘टार्गेट’ देतो आणि मुख्यमंत्री मान डोलावतात, यापेक्षा वाईट अनुभव महाराष्ट्राने कधी घेतला नाही. या प्रकरणात तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतरही निष्पापतेची टिमकी मिरवण्याची संधी ते सोडत नाहीत. त्यामुळे मत