ध्यान, प्राणायाम, वेगवेगळ्या मुद्रा, घरातील संस्कारांच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत, युवा पिढी घडवणार्या रुपेश बाविस्कर यांच्याविषयी...
Read More
प्रयागराजमध्ये होत असलेला, महाकुंभ ( Prayagraj Mahakumbh ) हा परमेश्वरी कृपा आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करणे, म्हणजे मोक्षप्राप्तीच. हा एक धार्मिक विधी नाही, तर आत्मशुद्धी, तपश्चर्या आणि भगवंताशी संपूर्णतः एकरूप होण्याचा अनुपम योग आहे. वेद, उपनिषदे आणि पुराणांमध्ये महाकुंभाचे महत्त्व अनादिकालापासून सांगितले गेले आहेच. महाकुंभ म्हणजे हा परमात्म्याच्या साक्षात्काराचा आणि ईश्वरी तेजाच्या अनुभूतीचा प्रसादच. या महाकुंभाविषयी परंपरेचा घेतलेला
नवी दिल्ली : “अध्यात्म आणि विज्ञान यात कोणताही परस्परविरोध नाही. विज्ञानाबरोबरच अध्यात्मातही श्रद्धा असलेल्या व्यक्तीलाच न्याय मिळतो. त्याचवेळी ज्याला आपल्या ज्ञानाचा अहंकार आहे, त्याला तो मिळत नाही. श्रद्धेमध्ये अंधत्वाला स्थान नाही,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) ( RSS ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी केले.
भारतातील राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, अध्यात्म वगैरे जवळपास सर्व क्षेत्रांतील सर्वोच्च व्यक्ती एकाच ठिकाणी एकाच सोहळ्यात एकत्र आल्याचे उदाहरण भारताच्या इतिहासात नाही. पण, सोमवारी अयोध्येत झालेल्या प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ही गोष्ट प्रत्यक्षात घडली. भारताच्या सर्व भागांतील आणि सर्व क्षेत्रांतील दिग्गज नेते आणि कलाकार या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहिले होते, हीच प्रभू रामांची ताकद आणि प्रभाव...
‘वाद-विवाद-संवाद’ या विषयावर मागील आठ श्लोकांतून समर्थांनी आपले विचार वेगवेगळ्या पद्धतीने मांडले आहेत. वादविवादाला उद्युक्त करणार्या अहंभावाला विवेकाने आवरता येते. विवेकाने अहंकाराला दूर सारून आपल्या आचारविचारात पालट करायचा असेल, तर परमेश्वराची भक्ती केली पाहिजे.
आयुर्वेदाचा आधार लेखक सुश्रुत वनस्पतींची भाषा समजू शकत होता आणि त्यामुळे त्याला वनस्पतींचे गुण आपोआप समजत असत. म्हणूनच त्याचे नाव ‘सुश्रुत’ असे सार्थ ठेवण्यात आले.
सुर्याच्या किरणांचे पृथक्करण केल्यास त्यातून दृश्यमान होणारे सप्तरंगच असतात. परंतु, या सप्तरंगापूर्वी आणि नंतरही अनेक रंग शलाका असतात. लाल रंगापूर्वीच्या रंग शलाकांना ‘इन्फ्रारेड’, तर जांभळ्या रंगानंतरच्या रंगशलाकांना ‘अल्ट्रावायोलेट’ असे म्हणतात. विद्युत उपकरणात या रंगशलाका दृग्गोचर होतात, पण मानवी नेत्र त्या रंगशलाका पाहू शकत नाही.
समर्थांच्या मते, आपली कृती, आपण करीत असलेली क्रिया महत्त्वाची आहे. नुसत्या क्रियाशून्य बडबडीला काही अर्थ नसतो. अशी बडबड, असा उपदेश लोक तेवढ्यापुरता ऐकतात व विसरतात. कारण, त्यामागे सांगणार्याच्या शब्दाला कृतीचे पाठबळ नसल्याने ते सांगणे, तो उपदेश प्रभावशाली होऊ शकत नाही.
समर्थ सांगत आहेत की, तुमच्या हितासाठी जे सत्य आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या हितासाठी तुम्हाला याचा शोध घ्यायचा आहे. आत्मप्रचिती घ्यायची आहे. माझे सांगणे जसेच्या तसे न स्वीकारता खरे हित शोधण्याचा तुम्हीच प्रयत्न करा. आत्मप्रचितीने खर्या हिताची जाणीव होते.
स्वानुभवाने सांगावेसे वाटते की, गायनाने वस्तुलाभ व घटनाप्राप्ती होऊ शकते. पण, यावर अधिक संशोधन व प्रयोग होणे आवश्यक आहे.
आचार्य म्हणजे शुद्ध आचरणाने परिपूर्ण असलेले दिव्योत्तम व्यक्तिमत्व अशा आचार्यांची प्रत्येक कृती व त्याचे सदाचारसंपन्न जीवन हे ब्रह्मचार्यांसाठी आदर्शांचा प्रेरक दीपस्तंभ असतो. आचार्य आपल्या विद्यार्थ्यांना ‘ब्रह्मचारी’ नावाने संबोधतात, ‘विद्यार्थी’ म्हणून नव्हे. कारण, विद्यार्थी म्हणजे केवळ विद्येला ग्रहण करणारा! पण, ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मणि चरति- नेहमी ब्रह्मतत्वात विचरण करणारा!
दरवर्षीप्रमाणे नित्यनेमाने येणारे गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांच्या उत्साहाला उधाण आणणारा महाराजाच. गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा अप्रतिम मिलाप असलेला हा उत्सव म्हणजे ‘स्कील इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ची प्रेरणा देणारा उत्सव असतो.
सर्व भारतीय शास्त्रांचे आधारशास्त्र म्हणजे योगशास्त्र होय. सांख्य दर्शनानुसार सारी सृष्टी पंचमहाभूतांच्या क्रमागत आविष्काराने उत्पन्न झाली आहे. प्रत्येक वस्तूत, मग ती सजीव असो की निर्जीव असो, पंचमहाभूतांचा अविष्कार असतो. पंचतत्वांशिवाय कोणतीच वस्तू साकारू शकत नाही आणि म्हणून प्राप्त होऊ शकत नाही.
अत्यंत आदरपूर्वक रामनाम घ्यावे, असे सांगून समर्थांनी मनाच्या श्लोकांचे पहिले शतक संपवले आहे. येथून पुढे मनाच्या श्लोकांच्या दुसर्या शतकात प्रवेश करताना भक्तांना येणार्या समस्या विचारात घेऊन स्वामी विवेकाचे महत्त्व सांगणार आहेत. सगुणभक्ती आणि सदाचरण या विषयांवर चर्चा करणार आहेत.
रामनामाचा अभ्यास, चिंतन, नाम घेणे हे आपले अंतःकरण सुधारावे यासाठी आहे. आपल्या आनंदप्राप्तीतील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे अहंकार. जर जपसाधनेने अहंकार वाढत असेल, मी इतरांपेक्षा निराळा असून श्रेष्ठ आहे, असा सूक्ष्माहंकार उत्पन्न होत असेल, तर नामाचे खरे महत्त्व समजले नाही, असे म्हणावे लागेल. रामनामाच्या अभ्यासाने माणसाला चारित्र्यसंपन्न, नीतिमान व निगर्वी जीवनातील आनंद गवसला पाहिजे. विकारवशतेेतून सुटण्याचा काय आनंद असतो, याचा शोध लागला पाहिजे. समुदायात गेल्यावर किंवा सार्वत्रिक आनंद घेत असताना अतिआदराने रामनामाच
तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनीचे ‘सीईओ’ टीम कूक केवळ ‘अॅपल’चे दालन खुले करण्यासाठी भारताच्या आर्थिक राजधानीत दाखल होतात, हा वरकरणी वाटतो तितका सोप्पा विषय नक्कीच नाही. भारतीय बाजारपेठ आज मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्त्य देशांना खुणावत असल्याची ही शुभचिन्हेे आहेत. त्याचेच केलेले हे आकलन...
देशाची सर्वांगीण प्रगती साधण्याकरिता त्या-त्या देशात ब्रह्मशक्ती आणि क्षत्रशक्ती यांचा समन्वय असणे अत्यंत मोलाचे आहे. कारण, राष्ट्राचे अस्तित्व सुरक्षित ठेवावयाचे असेल, तर तेथील व्यवस्था या दोन्ही तत्त्वांनी संयुक्तिक असाव्यात.
शारदीय नवरात्रोत्सवात आज सरस्वतीपूजन. सरस्वतीचं एक प्रतिभासंपन्न रूप म्हणजे प्रतिभाताई! ज्यांनी केवळ आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिलेले आहे.
आज ‘ज्ञानेश्वरी’ जयंती. ‘ज्ञानेश्वरी’च्या आरंभीचे गणेशाचे मंगलाचरण म्हणजे गणपतीवरचे अर्थगर्भ व नितांतसुंदर असे स्वतंत्र काव्यच आहे! ही गणेशाची निव्वळ स्तुती नाही, तर हे श्रीगणेशाच्या रुपाचे खरे वर्णन आहे. माऊलींनी ही गणेशमूर्ती म्हणजे समस्त वेदवाङ्मयची मूर्ती आहे, अशी कल्पना केली व तिचे वर्णन केले.
इच्छा द्वेष: सुखं दु:खं संघातश्चेतनाधृतिः ॥ (अ.१३ श्लो.६ ) गीतेतील सहाव्या श्लोकातील हे सूत्र अतिशय महत्त्वाचे असून जडात चेतना कशी उत्पन्न झाली, याचे महाविज्ञान सांगते. 'E = mc2' सूत्राद्वारे परमाणूला फोडल्यानंतर त्यातून भयानक ऊर्जा प्राप्त होते, हे सांगून आईनस्टाईनने विज्ञानक्षेत्रात क्रांती घडवून आणली. तद्वत् व्यासांचे वरील सूत्र लक्षात आल्यास जडातून चैतन्य कसे उत्पन्न झाले, याबद्दल आज जो न संपणारा वाद उत्पन्न झाला आहे, त्याचे उत्तर याच सूत्रात सापडते. आजच्या विज्ञानानुसार सदा भयानक वेगाने फिरण
आपण सगळे घाईघाईत उतावीळ होऊन जीवन का जगतो आणि आपले आयुष्य वाया का घालवतो? ज्यात जीवन जाणवत नाही, ते जगायचे तरी कसे? जीवनाच्या प्रत्येक क्षणाची जाण बरेच काही देऊन जात असते, ते क्षण जसेच्या तसे नैसर्गिकपणे जगता येत नसतील, तर त्याला जगणं तरी कसे म्हणायचे? हेन्री डेव्हीड थोरो यांनी जीवनाविषयी खूप सुंदर शब्दांत वर्णन केले आहे. आपले जीवन खूप मूल्यवान आहे. फक्त जीवन नाही, तर प्रत्येक दिवस आणि मिनीट आणि क्षण our lives are so precious not just 'life' but every single day and moment.' थोरोचे हे शब्द आणि वॉल्डन पॉण्डच
समर्थांचे आराध्यदैवत राम असल्याने ‘जगीं होईजे धन्य या रामनामे’ असे स्वामी म्हणाले. स्वामींच्या मते, राम हाच अंतरात्मा असून तो परब्रह्म आहे. रामनामाचा जप करीत असताना रामाच्या अंगी असलेल्या अनेक गुणांंची आठवण येते. रामचरित्राचा अभ्यास करताना लक्षात येते की, रामाच्या ठिकाणी अनेक उत्तमोत्तम गुण एकवटले आहेत. त्या रामाला आपला आदर्श मानून त्याच्या गुणांची उजळणी आपल्या मनात होत राहिली, तर त्या गुणांचा स्पर्श आपल्या अंत:करणाला होतो.
पुणे : गणेशोत्सवाची खरी धामधूम सुरू होते,गणेशमूर्तींच्या खरेदीने. गणेशमूर्तीची निवड करणे म्हणजे गणेशभक्तांची खरी कसोटी.गणेशाची अनेक सुंदर रूपं मोह घालतात. त्यांचे रंगीत पितांबर व उपरणे आणि सगळा साज जितका सुंदर तितके मन हरखून जाते आणि अशी सुंदर मूर्ती घरच्या गणेश स्थापनेसाठी निवडली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांचा तर जास्तीत जास्त भव्य मूर्ती घेण्याकडे कल असतो. पण मूर्ती कितीही सुंदर असल्या तरी विसर्जनानंतर मात्र पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण करतात. पाण्यात न विरघळणारे प्लॅस्टर ऑफ पॅरीस आणि विविध रसायनयुक्त प
परमार्थ साधनेला सुरुवात करायची, तर ती तरुणवयात करायला हवी. भगवंताला ओळखण्यासाठी, त्याच्या चिंतनात रममाण होण्यासाठी वयाचे ज्येष्ठत्व येईपर्यंत वाट पाहत थांबलो, तर साधारणतः साधनेला सुरुवात होत नाही आणि ती साध्य होणेे कठीण असते. भगवंत आणि परमार्थ साधना हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. याची जाणीव माणसाला तरुण वयातच व्हावी. ज्या भक्ताला अशी जाणीव होते, तो संयमाने, सदाचाराने आपले आयुष्य घालवतो. त्याच्या अंगी मनाची एकाग्रता, प्रसन्नता येते. त्याच्या अंगीविवेकनिष्ठा येते. असा हा ज्ञानीभक्त आनंदी असतो. अशा भक्त
आजचे युग हे विज्ञान युग मानले जाते. विज्ञान संशोधनाद्वारे प्रगत होत असते. वैज्ञानिकांना आपल्या मनाच्या एकाग्रतेमुळे अशी संशोधने करणे शक्य झाले आहे. सर्व थोर वैज्ञानिक आधुनिक ऋषीच होत. आपले मन ध्यानाद्वारे एकाग्र करून ऋषी आध्यात्मिक चिंतन करीत आणि त्याद्वारे ज्ञानविज्ञानातील गहन तत्त्वे समाजासमोर ठेवित असत. वेदांमध्ये बरेच ज्ञानविज्ञान साठविले आहे. परंतु, दुर्दैवाने आज वेद म्हणजे केवळ मंत्र मानले जातात. वैदिक परंपरेने केवळ ज्ञानाचा किंवा विज्ञानाचाच एकांगी बडेजाव केला नाही, तर ज्ञानाची पूर्ती होण्याकरिता
परमात्म स्वरूपाचे चिंतन आणि अध्यात्मतत्वांचे चिंतन-मनन करणे खर्या भक्ताला आवडते. त्यात आपल्याला आत्मोद्धाराचा मार्ग सापडेल, याची भक्ताला खात्री असल्याने इतर गोष्टीत तो आपला वेळ फुकट घालवीत नाही. भक्त सर्वाथाने भगवंताचा झाला असल्याने त्याच्या ठिकाणी गर्व, ताठा, ज्ञानाचा वृथा अभिमान निर्माण होत नाही
ज्ञानवंता हेचि खरे सुख!
नम्रता हा जीवनाचा आधार आहे. आपल्याकडे सर्व काही असेल, पण नम्रता अंगी नसेल, तर सर्व काही व्यर्थ समजले जाते. आज-काल समाजात वाईट लोकांना महत्त्व दिले जात असले, तरी चिरस्थायी मोठेपणा मिळतो, तो विनयशीलमुळेच. ज्याच्या अंगी नम्रता असते, तो यशाचे शिखर गाठतो
साधनेद्वारे झालेली गुणाणुरचना, शरीरशुद्धी व चित्तशुद्धीकरिता असल्याने त्यासाठी गुणाणुंची रचना अतिशय शुद्ध म्हणजेच सुसंस्कृत हवी. योगसाधना म्हणजे प्राणायाम, ध्यानधारणा करताना साधकाच्या शरीरातील असली उपयुक्त गुणाणुरचना आपोआप घडत असे. साधकाचा मूळ स्वभावच बदलत असतो
ध्यानाचा अभ्यास दृढ आणि दीर्घकाळ करण्याच्या अवस्थेला ‘धारणा’ म्हणतात. १५ मिनिटे ध्यान कायम ठेवल्यास एक मिनिट अवस्थेची प्राप्त होऊ शकते. धारणेमध्ये ध्येयविषय सोडून अन्य विषयाचे अस्तित्व उरत नाही. सखोल ध्यान म्हणजे धारणा. धारणा ही समाधीची पहिली पायरी आहे. साधकाचा पिंडधर्म जागृत होतो. पिंडधर्म जागृत झाल्यावर साधक आपल्या पिंडधर्मानुसार समाधीअवस्था आणि ज्ञान प्राप्त करेल.
स्वामी विवेकानंदांचा सर्वसमावेशक धर्मविचार आज दि. १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचा हा दिवस ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणूनही देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.त्यानिमित्ताने स्वामी विवेकानंदांच्या सर्वसमावेशक धर्मविचारांचे या लेखातून केलेले हे चिंतन...
आजच्या वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त महाभारतातील शिव-विष्णुसहस्रनाम तथा श्रीशंकर नि श्रीनारायणाचे ऐक्य कथन करणारा लेख...
नुकतीच कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी केली. वेदमंत्रात वर्णिलेली ही पौर्णिमा अतिशय शाश्वत स्वरूपाचे सुख देणारी आहे. अशा या पौर्णिमेच्या रात्री दिव्य गुणांनी परिपूर्ण होत आम्ही आमचे ज्ञान-विज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावयास हवे. नेहमीच आत्मकल्याणाच्या दिशेने वाटचाल करणे हीच खरी पौर्णिमा...
प्रत्येक पुस्तक तुम्हाला एक नवा अनुभव देते. एक नवी कहाणी सांगते. पण, एखादे पुस्तक असे असते जे एखाद्या भाषेच्या साहित्यविश्वात घटना ठरावे, अशी घटना जिचे पडसाद दीर्घकाळ जाणवत राहतील, दूरगामी ठरतील अशी एक महत्त्वाची साहित्यिक घटना म्हणजे डॉ. अरुणा ढेरे लिखित ‘लल्ला’ हे पुस्तक असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
‘राष्ट्र’ ही एक व्यापक संकल्पना आहे. वेदांनी समग्र भूमीलाच ‘राष्ट्र’ म्हणून संबोधले आहे. अथर्ववेदातील बाराव्या कांडातील पहिले सूक्त हे ‘भूमिसूक्त’ म्हणून ओळखले जाते. यात या भूमीवर राहणार्या मनुष्यांसह इतर प्राण्यांची काळजी वाहिली आहे. आपली भूमी सर्वदृष्टीने सुखसंपन्न कशी होईल? तसेच या भूमीवर निवास करणारे नागरिक व इतर प्राणी आनंदाने कसे जगतील, यासंदर्भात सुंदर विश्लेषण एकूण ६३ मंत्रांमध्ये झाले आहे.
साधकाला आपले मन, साधनेच्या पूर्वावस्थेत खूप सांभाळावे लागते. त्याला यम, नियम व चांगल्या संस्कारांचे कुंपण घालावे लागते.एखादी कृती पुन्हा पुन्हा केल्यास आपल्याला त्याची सवय लागते. सवयींमुळे स्वभाव बनत असतो. सवय नकळत लागत असते. आपण जाणीवपूर्वक एखादी सवय लावून घेऊ शकतो व ती सोडूही शकतो.
गरज आहे ती प्रेम व सद्बुद्धी यांच्या सन्मिलनाची! या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील, तेव्हा निश्चितच सर्वांच्या मनातून द्वेषाची भावना नाहीशी होईल. सर्वजण बंधू-भगिनी बनून जीवन जगतील.
कोरोनाकाळात आपला स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून, कोरोनाग्रस्तांवर उपचार करून, श्रीपंत सांप्रदायातील सर्व जबाबदार्या सांभाळणार्या बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ येथील आध्यात्मिक देवदूत डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्याविषयी...
प्रतिकूल परिस्थितीमध्येही सकारात्मक विचार जागृत ठेवणारे आणि त्याद्वारे आयुष्याचे संचित जपणारे, समाजासाठी कार्य करणारे एन. एम. म्हणजेच नथुराम अनंत कदम...
१३० कोटी लोकसंख्येचा 'भारत' हा वैदिक संस्कृतीचे वरदान लाभलेला जगातील सर्वोत्तम देश! वर्तमानयुगीन लोकशाहीचा अंगिकार केलेल्या या राष्ट्राचाच विचार केल्यास इथे विविध भाषा बोलणारे, नाना विचारांचे, मत-पंथांचे नागरिक राहतात.
वेदांची अमृतवाणी आम्हाला दान देण्याचा संदेश देते. जे काही आपल्याजवळ आहे, ते इतरांना द्या. त्यास आपल्या जवळ ठेवू नका. भगवंत ‘सोम’ आहे. म्हणजेच तो ऐश्वर्याचा स्वामी आहे. त्याने आपले सारे वैभव, आध्यात्मिक व भौतिक ज्ञान सार्या विश्वास दिले आहे.
निरुक्तशास्त्रात या शब्दाची व्युत्पत्ती अतिशय सुंदररीत्या केली आहे. निरुक्त शास्त्रात 'देव' शब्दाची व्याख्या अतिशय समर्पकपणे केलेली आहे, ती अशी 'देवो दानात्, द्योतनात दीपनात् द्युस्थानो भवतीति।' जो सतत साऱ्या जगाला ज्ञान, गुण, धनवैभवाचे दान करतो, जो स्वप्रकाशाने समग्र विश्वाला चमकवतो, असा तो देव!
सुसंस्कृत, धाडसी, विवेकी, स्वामीनिष्ठ समाज घडवण्याच्या कामात रामदासांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे शिवरायांच्या स्वराज्यास अनुकूल असा मराठी भाषिक समाज तयार होत गेला. क्षात्रवृत्तीने तो परकीय सत्तेच्या जुलमी कारभाराच्या विरोधात ठामपणे उभा राहिला. शिवरायांचे ध्येय राजकीय स्वातंत्र्य हे धर्म, देश व स्वराज्य रक्षणार्थ होते.
समर्थवाङ्मयाचे अभ्यासक समर्थांचा राजकारणाशी संबंध नव्हता, हे प्रथम गृहित धरतात व त्यानुसार पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रा. फाटक हे त्यापैकी एक नसले तरी समर्थांचा राजकारणाशी संबंध होता, हे मानायला ते तयार नाहीत. प्रा. फाटकांचा दासबोधाचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी दासबोधातील ‘देवकारण’ व ‘राजकारण’ या दोन शब्दांचा उल्लेख केला आहे. समर्थांनी ‘राजकारण’ या शब्दासारखाच ‘देवकारण’ हा शब्द वापरला आहे.
प्रपंच ‘नेटका’ होण्यासाठी प्रापंचिकांना दिलेली शिकवण प्रपंचापुरती न राहता ती सामाजिक होऊन जाते. सामान्यपणे वार्धक्याची स्थिती सर्व समाजात याच स्वरूपाची असते. अशा रीतीने सामान्य माणसाच्या जीवनातील यथार्थता स्वामींनी दासबोधात मांडली आहे.
कलियुग आणि विज्ञानयुग हातात हात घालून वावरत आहे. ‘भौतिकाचे शोध’ आणि ‘दूर जाणाराबोध’ यांची सांगड घालण अवघड! कलि बुद्धीमध्ये शिरलेला असल्यावर सत्याचा बोध कसा होणार? शोधामधून शाश्वत सुखाची प्राप्ती करणे म्हणजे मृगजळामागे धावणं! देहालायंत्रामुळे आराम मिळाला तरी, मनाचा आराम हरवला आहे. मनाला विश्रांती मिळाली की, ते ताजेतवाने, टवटवीत होते. मनाची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी काय करावे, हे फार कमी लोकांना ज्ञात असते.
मागील लेखात कुविद्येची लक्षणे सांगून झाली. कुविद्येमुळे सुसंस्कृत समाजाचे मोठे नुकसान होते. समाजात अनेक प्रकारची माणसे असतात. आज सभोवताली दिसणारे समाजाचे चित्र फारसे आशादायक नाही. हा विषय समाजशास्त्राचा असला तरी, त्यावर चिंतन झाले पाहिजे.
दासबोधातील श्रवणभक्तीचे समर्थकृत वर्णन तसेच श्रवणासंबंधी काही शास्त्रीय माहिती आपण मागील लेखात पाहिली. माणसाने पुष्कळ ऐकले, वाचन केले, अभ्यासले आणि त्यातील सार आत्मसात केले की त्याला वाटू लागते, आपण हे दुसऱ्याला सांगितले पाहिजे. या वृत्तीतून श्रवणानंतर कीर्तन हे स्वाभाविकपणे येते. परमेश्वराची भक्ती करण्याचा हा चांगला मार्ग आहे. स्वामींनी म्हटले आहे की, ‘कलौ कीर्तन वरिष्ठ’ म्हणजे या कलियुगात कीर्तनभक्ती श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे ज्या सज्जनांच्या सभेत भगवंतासाठी गायन चालू असते, तेथे भगवंत उभा असतो असे विष्णूं
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असा आग्रह बंगारू आदिगलर यांनी आपल्या अनुयायांकडे धरला. ‘किमान वाचायला-लिहायला तरी सर्वांना यायला हवे.
श्रीकृष्णाने आपल्या हातांनी अश्वांना न्हाऊ घातले. त्या चारही घोड्यांवर चिलखते घातली. सारी शस्त्रे रथात ठेवली. वानराची प्रतिमा असलेला ध्वज रथावर फडकवला.