रेडिओ क्लब जेट्टीसाठी भाऊच्या धक्क्याचा पर्याय
Read More
राज्यघटनेनुसार भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र सद्यस्थितीत सरकारने केवळ एका समाजाची, म्हणजे हिंदूंचीच धार्मिक स्थळे नियंत्रणात घेतली आहेत. कायदा सर्वांना समान असावा. त्यामुळे केवळ हिंदूंचीच नव्हे, तर अन्य धर्मियांची धार्मिक स्थळेही नियंत्रणात आणण्याविषयी सरकारने विचार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी दिले.
नागपूर : नागपूर विधानभवनाला ( Vidhanbhavan ) नवा साज मिळण्यासह या वास्तूचा आता विस्तार होणार आहे. त्यासाठी नजीकच्या शासकीय मुद्रणालयाची जागा (९ हजार ६७० चौ.मी.) अधिग्रहित करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी आणि विद्यमान हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा, असे निदेश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सोमवार, दि. १६ डिसेंबर रोजी दिले.
मुंबई : "विरोधी पक्षातील नेत्यांनी संवैधानिक संस्थांवर बिनबुडाचे आरोप करणे, हे संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे माझी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना विनंती आहे, संवैधानिक संस्थांवर असे आरोप करून त्यांचा सन्मान कमी करू नका", असे प्रतिपादन आमदार अॅड. राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी केले.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. महाविकास आघाडीच्या दिग्गजांना पराभवाची धूळ चारत, महायुतीने विधानसभेचे मैदान मारले आहे. अशातच आता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून. निवडून आलेल्या उमेदवारांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरू आहे. विरोधकांनी दिनांक ७ डिसेंबर रोजी या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. घडामोडींच्या याच धमश्चचक्रीत आता राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.
विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि महायुतीच्या गळ्यात विजयाची माळ पडली, तिथेच दुसऱ्या बाजूला मविआचा चांगलाच सुपडा साफ झाला. विधानसभेच्या निवडणुकांचा हा निकाल विरोधकांच्या मात्र अद्याप पचनी पडल्याचे दिसून येत नाही. ईव्हीएम वर दोषारोप करण्याचे काम महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुरू केले आहे. दुसऱ्या बाजूला मात्र महायुतीचे सरकार कामाला लागले असून, जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सगळे नेते सज्ज झाले आहेत. अशातच आता विधानसभा अध्यक्ष पदी पुन्हा राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड होणार असल्याची माहित
मुंबई : विधिमंडळ राजकारणाच्या इतिहासात सर्वात चर्चेत राहिलेला चेहरा म्हणजे राहुल नार्वेकर. ते पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी ( Assembly Speaker ) विराजमान होणार आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करावयाच्या मुदतीत एकमेव अर्ज आल्याने, त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे.
बॅलेट पेपरवर निवडणूका घेत असतील तर मी आज माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल, असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यावर भाजप नेते राहुल नार्वेकरांनी सुप्रिया सुळेसुद्धा राजीनामा देणार का? ते आव्हाडांना विचारा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
(Sahityaratna Annabhau Sathe Chowk) मनोरा आमदार निवासासमोरील चौकाला ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ यांचे नाव देण्यात येणार असून, विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष तथा कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या चौकाचे उद्घाटन होणार आहे.
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीसुद्धा रतन टाटांचे अंतिम दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वेनुसार जे फेरिवाले पात्र ठरलेले आहेत, त्यांना कोणीही हटवू शकत नाही. जर त्या पात्र फेरिवाल्यांना हटवले जात असेल, तर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देऊ, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवार, दि. ५ जुलै रोजी दिला. विधानसभेत शुक्रवारी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी फेरीवाल्यांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, मुंबईसह राज्यातील इतर शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच गुरुवार, दि. २७ जूनपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शोक प्रस्तावानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
(उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे व खा. संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात चाललेल्या या अधिवेशनात विरोधक पुरते अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. यापुढचे पावसाळी अधिवेशन सोमवार, दि. १० जूनपासून मुंबईत होणार आहे.
“वरळी हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. जो काम करेल त्याचा तो बालेकिल्ला होईल. येथील लोकप्रतिनिधींनी कामे केली असती, तर आम्हाला यायची वेळ आली नसती", अशा शब्दांत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला ठणकावले आहे. शनिवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाचा दौरा करीत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
माझं निर्णय घटनेला धरून आहे हे त्यांनाही माहिती आहे. पण माझा निर्णय चुकीचा आणि कुणाच्या प्रभावाखाली घेतलेला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट न्यायालयात गेले आहेत. यावर आता राहूल नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली.
मंगळवारी विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन आयोजित केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली भुमिका स्पष्ट केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी हे विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली.
ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवं आहे. बहुसंख्य मराठा समाजला या निर्णयाचा फायदा होणार नाही. आम्हाला सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून हवी. आमचा हा हट्ट नाही. मात्र, आमचा अधिकार आहे. घाईगडबड नाही पण सहा महिन्यांचा कालावधी तुम्हाला दिला आहे. आंदोलनाची दिशा एका दिवसांत ठरवणार नाही. निर्णयक बैठकीत मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. आम्हाला न्याय मिळवायचा असला तर हा लढा उभा करावाच लागेल, अशी भूमिका जरांगे पाटील यांना मांडली.
अजित पवार गट हाच मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी गुरुवारी दिला आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेबाबत निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळतः अजित पवार यांच्याकडेच असेल, असा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी निकाल देताना अजित पवारांकडे विधीमंडळातील संख्याबळ असल्याने त्यांच्याकडेच पक्षाची कमान आहे, असे सिद्ध होत असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या गटाने राष्ट्रवादीतील अजितदादांसोबत गेलेले आमदार अपात्र व्हावेत, अशी मागणी केली होती. मात्र, आता राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचे सर्वच आमदार पात्र ठरले आहेत.
जितेंद्र आव्हाड, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे घटनातज्ञ आहेत. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठी मी स्वत: ला खूप लहान समजतो, असा टोला विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी लगावला आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निर्णय देण्यात आला. यामध्ये अजित पवार यांचा पक्ष हीच खरी राष्ट्रवादी असून दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवण्यात आले. त्यानंतर राहूल नार्वेकरांनी माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे, मुंबईतील भाजप कार्यालयात एका पक्षप्रवेशाची तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार का? तसेच ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेणार नाही, अशी स्पष्टोक्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी दिली.शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावेळी विधानसभा अध्यक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडील घटनेचा आधार घेतला होता. राष्ट्रवादीबाबतही तसेच धोरण अवलंबले जाईल का, असा सवाल विचारला असता नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटनुसारच निकाल दिला जाणार आहे.
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात उबाठा गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शवली आहे.
पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहूल नार्वेकरांच्या नावाची घोषणा करत त्यांची नियुक्ती केली आहे. अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलण्याची धमक असेल तर ती जास्त योग्य आहे, असे प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहूल नार्वेकरांची निवड केली. यावर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना नार्वेकरांनी हे वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, असे आवाहन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवले आहेत, त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, दि. २७ जानेवारी रोजी केले.महाराष्ट्र विधानसभेत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी दृकश्राव्यव्दारे (ऑनलाईन) पंतप्रधान मोदी यांनी या परिषेदेला संबोधित करून शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्य
अजित पवार यांनी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याला शरद पवार यांची परवानगी होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवार, दि. २५ जानेवारी रोजी केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर त्यांची उलटसाक्ष नोंदविण्यात आली.
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित मैं अटल हुं हा चरित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चरित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अटलजींची व्यक्तिरेखा साकारली आहे. दरम्यान, या चित्रपटाचा विशेष शो विधिमंडळात दाखवण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना केली.
राज्यात सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आहे. १० जानेवारी रोजी कोणालाही अपात्र न करता खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात आता शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. उबाठा गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात मंगळवारी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वकील असिम सरोदे यांनीदेखील नार्वेकरांच्या निकालावर भाष्य केले होते. यावरून आता भाजप आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही जे करत आहात तेच मुळात लोकशाही, संविधानविरोधी आहे. जनतेच्याही न्यायालयात तुम्ही आज पराभूत झाला आहात असे ते म्हणाले आहेत.
वरळीच्या डोम सभागृहात वेड्यांची जत्रा भरली होती, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरेंनी मंगळवारी महापत्रकार परिषद घेतली होती. यावर आता नितेश राणेंनी टीका केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिला. कोणालाही अपात्र न करता खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल त्यांनी दिला. या निकालानंतर आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटाने राहूल नार्वेकरांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नागपुर येथील मौदा पोलिसांनी १२ जानेवारीला नागपूर ग्रामीणचे उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले यांच्यासह ९ जणांना अटक केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याविरोधात ते आंदोलन करत होते. यावेळी सरकारी कामात बाधा आणल्यामुळे भांदवि कलम ३५३ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० जून २०२२ विधानपरिषदेची निवडणुक पार पडली आणि त्याचं दिवशी रात्रीपासून एकनाथ शिंदे त्यांच्या काही समर्थक आमदारांसोबत नॉट रिचेबल झाले. आणि त्यानंतर शिंदेंनी सूरत गाठलं. पुढे २२ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंडाचं रणशिंग फुंकलं आणि त्यानंतर ठाकरेंच्या एकछत्री अमंलामुळे शिवसेनेत फुट पडली. त्यानंतर रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई ठाकरेंनी लढली. त्यात ही त्यांचा दारुण पराभव झाला. हे आपल्याला कालच्या आमदार अपात्रतेच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. पण उद्धव ठाकरेंच्या कोणत्या चुकांमुळे पक्षात फ
संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल असंसदिय शब्दांचा वापर केल्याने त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याच शिवसेना आमदार व मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटल आहे. १०जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यावर प्रतिक्रीया देताना ११जानेवारीला पत्रकारांशी ते बोलत होते.
नुकत्याच १० जानेवारीला लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ११ जानेवारी ला गंगापुर उपसा सिंचन योजनेच्या भूमिपुजन सोहळ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल मत मांडल आहे. काल लागलेल्या निकालावर आनंद व्यक्त करतो. आणि कोणालाही आता शंका असण्याचे कारण नाही की हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल अस ते यावेळी म्हणाले.
आज १० जानेवारीला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेवर निकाल सुनावणार आहेत. या निकालाची संपुर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. अध्यक्ष काय निकाल देणार याबद्दल राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
मुंबई : आज १० जानेवारीला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेवर निकाल सुनावणार आहेत. या निकालाची संपुर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. अध्यक्ष काय निकाल देणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राहूल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना आजच्या निकालात सर्वांना न्याय मिळेल अस म्हटल आहे.
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज १० जानेवारी २०२४ ला दुपारी चार वाजता जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कायद्याला धरुन निकाल देणार असल्याच आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही याप्रकरणी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. निकालापूर्वी राहूल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावर होत असलेल्या टीकेलाही शिंदेंनी उत्तर दिले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान मंडळाचे नियम-परंपरांचे पालन करून व कायद्याचे रक्षण करून निकाल देतील असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. शिंदे-नार्वेकरांची भेट ही नियमित प्रक्रिया असून त्याचा निकालाशी संबंध नाही.
शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी विधानसभाध्यक्षांनी यावेळी केली.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी देण्यास सुरुवात केली आहे. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले आहेत.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी देण्यास सुरुवात केली आहे. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले आहेत. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे,
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिला. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले होते. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे, शिवसेना पक्षाची १९९९ च्या घटनेला ग्राह्य धरुन अध्यक्षांनी हा निकाल दिला आहे.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिला. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले होते. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे.
बुधवारी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे. दरम्यान, त्याआधीच विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याने उद्धव ठाकरेंनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता राहूल नार्वेकरांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी भेट झाली आहे. येत्या दोन दिवसात आमदार अपात्रतेवर न्यायालयात निकाल लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान,शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर निकाल देणार आहेत, त्यावर या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.