मोदीजींनी पाकड्यांना घरात घुसून मारले – आचार्य पवन त्रिपाठी #mumbaiganesha #majha_siddhivinayak #ganesha #lordganesha #ganeshotsav #ganeshchaturthi #ganeshutsav #india #maharashtratourism #bappamajha #mumbai_ganesh_utsav_ #jayostute_maharashtra #maharashtra_desha #ganpatibappamorya #ganpatibappa #bappamorya #ganpati #ganapati #bappa #morya #ganesh #mum_ganpati #bappa_maza #ganpati_bappa_morya #ganpativisarjan #siddhivinayak #siddhivinayaktemple #siddhivinayakmandir #siddhivinayakonline
Read More
दरवर्षीप्रमाणे यंदाही माघी गणेशोत्सवानिमित्त प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी पारंपरिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. या उत्सवामध्ये गुरुवार, दि. ३० जानेवारी ते मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन न्यासच्यावतीने करण्यात आले आहे.
गोवा पणजी येथे २० ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ५५वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला. गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी या महोत्सवाची सांगता झाली. तसेच, यावेळी भारतीय फिचर चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा देखील संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीचा ठसा उमटवत घरत गणपती चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदीवडेकर यांन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकिय पदार्पण हा पुरस्कार पटकावला.
शनिवार, ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यासाठी सध्या सगळीकडेच गणपतीच्या आगमनाची लगबग सुरु आहे. यावर्षी काय विशेष करायचं? मुर्ती कशी असेल? कोणता मुहुर्त चांगला असेल? हे जाणून घेण्यासाठी भक्तांची धडपड सुरु आहे. पुण्यातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुण्यातील मानाचे ५ गणपती कोणते आणि त्यांचं इतिहास आणि महत्व याबद्दल जाणून घेऊया.
राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे. तसेच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ पुन्हा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गुरुवारी येथे केले. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिली.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. यंदाच्यावर्षी दि.०७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या १३०१ बसेस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत.
७ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी आता लालपरीही सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे.
उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालापुर्वी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेल्या आहेत. गणरायाच्या आशिर्वादाने आज १० जानेवीराला होणाऱ्या आमदार अपात्रता निकाल त्यांच्या बाजूने सकारात्मक लागेल अशी आशा त्यांना आहे.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावरुन आदेश बांदेकरांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना हटवण्यात आलं. तर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी २४ जुलै २०१७ ते २३ जुलै २०२३ पर्यंत ६ वर्षांचा अनुभव आदेश बांदेकरांनी सोशल मिडीयावरुन व्यक्त केला आहे. यावेळी आदेश बांदेकरांना अश्रु अनावर झाले.
संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, आज विसर्जनादरम्यान सांगलीतून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. गणेश विसर्जनादरम्यान डीजेच्या दणदणटामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या दोन स्वतंत्र घटना असून दोन्ही घटना सांगली जिल्ह्यात घडल्या आहेत.
ढोल - ताशांचा कडकडाट बेंजो - स्पिकरचा टिपेला गेलेला सूर फटाक्यांची आतिषबाजी अशा कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे यंदा दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान शंभर डेसिबल आवाजाची पातळी ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात नोंदवण्यात आली. या भागात बुधवारी दीड दिवसांच्या गणरायाच्या मुर्त्यांचे विसर्जन होताना विशिष्ट वेळेवर किती डेसिबल आवाजाची कोणत्या वाद्यांमुळे नोंद झाली, याप्रश्नी सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे, त्यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई तसेच ठाकरे कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आग्रोळी गावातील कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना आजच्या पिढीकडून देखील तितक्याच मनोभावे जोपासली जात आहे. अत्याधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात एक गाव एक गणपती ही संकल्पना अनेकांना अप्रुप करण्यासारखी आहे.
मोरया या शब्दाचा अर्थ मोजक्याच लोकांना माहिती असेल. महाराष्ट्रातील पुण्यापासून १८ किलोमीटर अंतरावर चिंचवड नावाचे गांव असून, ते आधी मोरया नावाने ओळखले जात होते. येथील प्रत्येकजण मोरयाबद्दल आजही जागरूक आहे. १३७५ सालात जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम भक्त होते. त्यांचे बाप्पांप्रती समर्पण आणि भक्ति सर्वत्र पसरली होती. चिंचवडमध्ये आजही मोरया गोस्वामी त्यांच्या नावाचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून ९५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शना
बदलापुरात योगासने करणारा गणपती असा देखावा असणारा लक्ष वेधून घेतो आहे. सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करणाऱ्या नरेकर कुटुंबीयांनी यंदा योगाचे महत्त्व सांगणारा देखावा सादर केला आहे. योगाचे महत्व सांगताना गणपती स्वतः पद्मासन घालून बसलेला आहे. तर गणेशाचे वाहन असलेले पाच उंदीर वेगवेगळे आसन करत आहेत.
गणेश चतुर्थीचा सण आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी गणपती बाप्पांचे मंडप सजविण्यात आले असून सुबक मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. असाच एक सुंदर मंडप बेंगळुरूच्या श्री सत्य गणपती मंदिरात बनवण्यात आला आहे, जिथे भक्तांनी बाप्पांचा मंडप नाणी आणि नोटांनी सजवला आहे. हा मंडप अडीच कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाचा आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात चांगले दिवस यायला हवे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणरायाकडे शुभआशीर्वाद मागितले आहेत. तसेच नियमानुसार गणपती बसवणाऱ्या मंडळांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा केली आहे.
राज्य मंत्रीमंडळ बैठकीत गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅसिनो कायदा संबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यात आला आहे. तर, केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती आजच्या बैठकीतून मिळते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मुंबईतील गणेशोत्सव म्हटला तर बाप्पाचा जयघोष आणि सार्वजनिक मंडळांची ऐट पहायला मिळते. मुंबईतील या गणेश मंडळाचे दर्शन आता एकाच क्लिकवर होऊ शकणार आहे. आपला उत्सव जागतिक दर्जावर पोहचवण्यासाठी आम्ही उचलेलं हे छोटसं पाऊल आहे. हॅशटॅग बाप्पा या संकेतस्थळाद्वारे ते शक्य होणार आहे.
पुण्यातील एका दाम्पत्याने घराच्या बाहेर गणपतीची मूर्ती बसवली म्हणून वानवडी येथील फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहहरचना सोसायटीने तब्बल ५ लाख ६२ हजार ठोठावला आहे. यासोबतच कमिटीने गणपतीची मूर्ती काढण्यासाठी नोटीसही दिली आहे. मात्र नोटीस देऊनही ज्येष्ठ दाम्पत्याने मूर्ती काढण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात दाम्पत्याने न्यायालयात याचिका दाखल केली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचे विलोभनीय रुप विराजमान झाले. फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.
“शहरातील आनंदवली परिसरात प्रसिद्ध नवश्या गणपती शेजारी अनधिकृत दर्गा आहे. ती दर्गा तत्काळ हटवावी. प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास आम्हालाही कारसेवकांचा इतिहास आहे” असा थेट इशारा ‘सुदर्शन राष्ट्र निर्माण ट्रस्ट‘चे सुरेश चव्हाणके यांनी दिला.
किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या 'रे' आणि जेलीफिशचा त्रास दीड दिवसांच्या विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर आलेल्या भाविकांना, तसेच जीवरक्षकांना झाल्याचे निदर्शनास आले आहे. समुद्रात, गुडघाभर पाण्याच्या जागी मोठ्या प्रमाणात स्टिंग रे आणि जेली फिश यांचे दंश लोकांना झाले. परंतु, भरती ओहटीची तीव्रता लक्षात घेता, हा त्रास दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळीच जास्त जाणवला.
खानापूर तालुक्यातील चिंतामणी गणेश मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त नाविन्यपूर्ण गणरायाची मूर्ती बनवण्याचा उपक्रम दरवर्षी होत असतो. यावर्षी या मंडळाने १ लाखांहून अधिक छोट्या आकाराच्या आरशांपासून सजावट करत गणेश मूर्ती तयार केली आहे. ही मुर्ती तब्बल सहा फुट उंचीची आहे. बाप्पाची आगळी वेगळी सजावट आणि सामाजिक संदेश देणारी सजावट करणाऱ्या नागनाथ नगरच्या चिंतामणी गणेश मंडळाने जागतिक स्तरावर बहुमान मिळवला आहे.
ऐसा सर्वांगे सुंदरु। सकळ विद्यांचा आगरु। विविध पुराणांमध्ये श्रीगणनायकाचे वर्णन अतिशय विलोभनीय केले आहे. परंतु, समर्थ रामदासस्वामींनी केलेले दासबोधातील गणरायाचे वर्णन वाचले की त्याची हुबेहूब प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते आणि मुख्यतः एवढे अचूक असे वर्णन समर्थांनी केले कसे? हा प्रश्न पडतो. तेव्हा गणेशोत्सवानिमित्त दासबोधातील श्रीगणेश दर्शन...
पुणे : गणेशोत्सवाची खरी धामधूम सुरू होते,गणेशमूर्तींच्या खरेदीने. गणेशमूर्तीची निवड करणे म्हणजे गणेशभक्तांची खरी कसोटी.गणेशाची अनेक सुंदर रूपं मोह घालतात. त्यांचे रंगीत पितांबर व उपरणे आणि सगळा साज जितका सुंदर तितके मन हरखून जाते आणि अशी सुंदर मूर्ती घरच्या गणेश स्थापनेसाठी निवडली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांचा तर जास्तीत जास्त भव्य मूर्ती घेण्याकडे कल असतो. पण मूर्ती कितीही सुंदर असल्या तरी विसर्जनानंतर मात्र पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण करतात. पाण्यात न विरघळणारे प्लॅस्टर ऑफ पॅरीस आणि विविध रसायनयुक्त प
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन नार्वेकरांच्या गणपतीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केल्याने ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवर अनेकदा अपशब्द किंवा आक्षेपार्ह भाषेत टीका केली. मात्र, राजकीय मतभेद बाजूला ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन नार्वेकर कुटुंबियांची भेट घेतली व गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात, आपल्या सर्वांनाच हे जाणवले असेलच की, बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा आपल्याला निसर्गाचा आशीर्वाद लाभणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना जणू निसर्गाने दिलेली धोक्याची सूचनाच होती. आरोग्यविषक चिंता वाढत असताना आणि ‘कोविड-19’ चा सर्रास होणारा प्रसार सरते शेवटी नियंत्रणात आणला जात असताना, आपला देश गणेश चतुर्थीचा, सगळ्यांच्या आवडीचा असा सण साजरा करण्यास सज्ज होत आहे. पण, महामारीच्या माध्यमातून आपण सगळे आपल्या या कठीण काळापासून काही शिकलो आहोत का? याचाच ऊहापोह करणारा हा लेख...
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही एक खुशखबर आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही प्रवाशांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस धावणार आहे
गणपती ही आबालवृद्धांपासून सर्वांना आपलीशी वाटणारी देवता. लडिवाळ भक्ती जिची केली जाते अशी देवता म्हणजे गणपती. प्रत्येक देवतेला एक इतिहास, उगमस्थान असते, पुढे पंथ-संप्रदाय असतो. त्याला गणपती देवता अपवाद नाही. आज अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पाला निरोप देतानास गणपतीच्या अशाच काही कथा या लेखातून जाणून घेऊया...
गणपतीपुळ्याच्या समुद्रात सांगलीतील एकाचा बुडून मृत्यू
सोनपावलांनी घरी रविवारी विराजमान झालेल्या ज्येष्ठगौरींचे आज पूजन आणि उद्या विसर्जन. त्यानिमित्ताने महालक्ष्मीची परंपरा आणि त्यासाठी गृहिणींची साग्रसंगीत तयारीची लगबग याचे हे शब्दचित्रण...
सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि लाडका सण म्हणजे गणेशोत्सव! संपूर्ण घराण्याला एकत्र आणणार्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सामील करून घेणारा असा हा गणपतीचा उत्सव आहे. सकाळ-संध्याकाळ टाळांच्या गजरात आरती करण्याची मज्जा, गोडाचे जेवण व रात्री जागरण असे बेधुंद वातावरण तयार करणारा गणपती नेमक्या कोणत्या गावचा? आपल्या संस्कृतीत कसा आला? त्याचा प्रवास आणि मूर्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून अपरिचित माहिती देण्यासाठी हा लेखप्रपंच....
मंगळवार दिनांक २७ जुलै रोजी अंगारकी चतुर्थी असून प्रतिवर्षी आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक गणेश भक्त लांबून लांबून टिटवाळा नगरीत येत असतात . यावेळी मोठ्या प्रमाणांत मंदिर परिसरात गर्दी होत असते . या वर्षीदेखील कोरोनाचे सावट आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मंदिराच्या आवारात भाविकांची खूप गर्दी होण्याची शक्यता आहे.
अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि गुरुजी अभिजित जोशी यांनी सादर केली आहे गणरायाची व्हर्च्युअल प्राणप्रतिष्ठापना व उत्तरपूजा!
२७ जुलै पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या असल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली
येथील कृषी कॉलनीतील श्री नवसाचा गणपती मंदिर येथे रविवार, 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान 13 कोटी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा सामूहिक नामजप परिपूर्ण झाला असून त्यानिमित्त श्रीराम कथा तसेच यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सोसायटी लहानापासून ते वृद्धांपर्यंत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचा गोंगाट व कर्कश आवाज न करता कार्यक्रम पार पाडला.
संपूर्ण देशात आंनदाचे, उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. सगळ्यांचाच लाडका पाहुणा गणपती बाप्पा वाजतगाजत घरोघरी आला आहे.
घराघरात व अनेक गणेशोत्सव मंडळातही गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाची आज दिवसभरातील काही निवडक छायाचित्रे...
दासबोध ग्रंथ लेखनास सुरुवात करताना त्यांनी प्रथम गणेशाला वंदन केले आहे.
टवाळ्यातील महागणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अंगारक संकष्ठी चतुर्थी निमीत्ताने लाखो भाविक भक्तांनी रीघ सकाळपासून पाह्याला मिळाली