लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्या नेतृत्वातील सेरेन एंटरटेनमेंटने धर्मा प्रोडक्शनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. प्रसिध्द चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन आणि धर्माटिक एंटरटेनमेंटमध्ये अदर पूनावाला यांनी १ हजार कोटी रुपये किमतीचे ५० टक्के भागभांडवल विकत घेतले आहे. त्यामुळे ना रिलायन्स, ना सारेगामा तर पूनावाला यांनी ५० टक्के भागीदारी मिळाली आहे.
Read More
मलेरियावरील दुसऱ्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजूरी मिळाली आहे. ऑक्सफोर्ड आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ही लस (R21/मॅट्रिक्स-M) तयार केली आहे. दरम्यान, मलेरिया रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली ही दुसरी लस असून याआधी जागतिक आरोग्य संघटनेने २०२१ मध्ये मलेरियाच्या RTS,S/AS01 या लशीला मंजूरी दिली होती. त्यामुळे आता जगात मलेरियावर दोन लशी उपलब्ध झाल्या आहेत.
कोविशिल्डच्या यशानंतर सिरम इन्स्टिट्यूटची नवीन लस लवकरच बाजारात येणार आहे. या लसीमुळे डेंग्यु आणि मलेरिया या आजारांवर नियंत्रण मिळणार आहे.
गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाशी लढण्यासाठी भारतातील पहिली बहुउपयोगी मानवी (ह्यूमन) ‘पॅपिलोमाव्हायरस’ लस पुण्याच्या ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने विकसित आणि उत्पादित केली आहे. ही लस खासगी बाजारात उपलब्ध झाली असून, वर्षअखेरीस ती सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उपलब्ध करुन देण्याची सरकारची योजना आहे. त्यानिमित्ताने...
“सेवा हाच भारताचा खरा स्वभाव आणि चेहरा असून, ’स्वस्थ भारत’ हे आमचे लक्ष्य आहे. ’रोगमुक्त भारत’ ही त्यातली पहिली पायरी आहे. प्रत्येक जण निरामय असावा,” अशी आपल्या संस्कृतीची शिकवण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.
सध्या असेच एक संशोधन चर्चेत असून सार्या माध्यमांचे लक्ष एका बातमीने वेधून घेतले आहे. ते म्हणजे अतिशय दुर्धर मानला जाणारा महिलांचा ‘गर्भाशय मुखाचा कॅन्सर.’ या भयंकर वेदनादायी आजारावर लस शोधण्यास संशोधकांना यश मिळाले असून औषध व लस संशोधनात देशात अग्रणी असलेल्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’ या संस्थेने हे लक्षणीय यश प्राप्त केले आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत असून केंद्र सरकारने त्वरित याबाबत दखल घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीची अंमलबजावणी हाती घेतली आहे. त्याविषयी सविस्तर...
जगभर थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्स या आजारावरच्या लशीबद्दल भारताच्या सीरम इन्स्टिट्युटच्या आदर पूनावाला यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे
भारतीय कंपनी ‘बायोलॉजिकल ई’ तर्फे विकसित व निर्मित ‘कॉर्बिव्हॅक्स’ आणि अमेरिकन कंपनी ‘नोव्हाव्हॅक्स’तर्फे विकसित व ‘सीरम इन्स्टिट्यूट’तर्फे निर्मित ‘कोव्होव्हॅक्स’ या दोन नव्या कोरोनाविरोधी लसींना केंद्र सरकारने आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे.
या मिळालेल्या ‘फॉर्म्युला’चा उपयोग करून भारत सरकारकडून सगळ्या चाचण्या होण्यापूर्वीच ‘सीरम’ने कोट्यवधी रुपयांचा धोका पत्करून कोरोनाच्या ’कोव्हिशिल्ड’ या लसीची निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि या जागतिक संकटसमयी पूनावाला हे पुन्हा एकदा भारताचे पर्यायाने संपूर्ण जगाचे तारणहार बनले. या ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चा सगळा कारभार आता सायरस पूनावाला यांचा मुलगा आदर पूनावाला हे बघतात. जगाला फक्त लस आणि औषध पुरवणे एवढाच काम न करता जागतिक स्वच्छता आणि बालसंगोपनासाठी पण ‘सीरम’ काम करते. अशा या दानशूर व जागतिक संकटसम
पुण्याच्या 'सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांची घोषणा
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सोमवारी याची घोषणा केली. जॉन्सनच्या कार्यालयाच्या वतीने असे म्हटले गेले होते की, 'सीरम संस्थेने यूकेमध्ये २४० दशलक्ष पौंड (सुमारे २४४८ कोटी रुपये) गुंतविण्याचा निर्णय घेतला हे आनंददायक आहे. या प्रकल्पांतर्गत, यूकेमधील विक्री कार्यालये, क्लिनिकल चाचण्या, संशोधन आणि विकास यांद्वारेही लस तयार होण्याची शक्यता आहे.' या शब्दांत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कार्यालयाने पुनावाला यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
सिरमचे सीईओ आदर पूनावालांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना हात जोडून विनंती
नवी दिल्ली : भारतातील कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसते आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार यापुढे अन्य देशांना 'अॅस्ट्राजेनेका' लस पुरवणार नसल्याची माहिती मिळते आहे.
आज जर चीन अशा प्रकारे भारतामध्ये हस्तक्षेप करत असेल तर तशाच प्रकारचा हस्तक्षेप आपण चीनमध्ये करू शकतो का? चीनमध्ये पर्यावरणाच्या नावाखाली तेथील कारखाने आपण थांबवू शकतो का? तेथील संस्था आणि वेगवेगळ्या मानवाधिकारवाद्यांना/ पर्यावरणवाद्यांना मदत करून त्यांची आर्थिक प्रगती थांबवू शकतो का? याचा विचार करून रणनीती ठरवायला हवी.हिमकडा घातपातामुळे कोसळला?
कोरोनालस सर्वसामान्यांसाठी साठी ही लस कधी उपलब्ध होणार? यासंदर्भात एम्सचे संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. भारतात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. मोदी सरकारमार्फत कोरोना लस दिली जाते आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीत दुपारी दोन वाजताच्या सुमारास आग लागली. जिथे लस बनवली जाते तिथेच आगीचा भडका उडाला. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे.
कोरोनाव्हायरस विरोधात लढ्यात भारताने आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. भारतीय बनावटीची आणखी एक स्वदेशी लस तयार झाली आहे आणि परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. आधी कोरोना प्रतिबंधक लस म्हणून इंजेक्शन आणि आता नाकावाटे दिली जाणारी लससुद्धा तयार करण्यात आली आहे.
‘फ्रंटलाईन वर्कर्स’ आणि ‘कोरोना योद्ध्यां’ना. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वस्वी कौतुकास्पद असून, त्यांनी एक नवीन राजकीय पायंडा पाडल्याचे म्हणता येईल.
आजपासून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीच्या पुरवठयास सुरुवात केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक पहाटे ५ वा जण्याच्या सुमारास विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली.
आजपासून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीच्या पुरवठयास सुरुवात केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या दिशेने रवाना झाले होते. आज सकाळी जवळपास ५.०० वजात सीरम इन्स्टिट्युटद्वारे पुण्यातून रवाना झालेली 'कोव्हिशिल्ड' लशीचे डोस कंटेनरमधून दिल्लीसाठी रवाना करण्यात आले. ही लस घेऊन 'स्पाईस जेट'चे विमान सकाळी १०.०० वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहे.
आजपासून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीच्या पुरवठयास सुरुवात केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या दिशेने रवाना झाले होते. आज सकाळी जवळपास ५.०० वजात सीरम इन्स्टिट्युटद्वारे पुण्यातून रवाना झालेली 'कोव्हिशिल्ड' लशीचे डोस कंटेनरमधून हैद्राबाद,विजयवाडा आणि भुवनेश्वरला रवाना करण्यात आले. ही लस घेऊन 'स्पाईस जेट'चे विमान दुपारी १२.३० वाजता विमानतळावर दाखल झाले आहे.
‘सीरम इन्स्टिट्यूट’ आणि ‘भारत बायोटेक’ या दोन भारतीय कंपन्यांच्या कोरोनारोधी लसींना केंद्र सरकारने मंजुरी दिली आणि एकच गहजब माजवला गेला. भारताच्या यशोगाथेला विरोध करण्यालाच आपले यश मानणार्या तथाकथित उदारमतवाद्यांनी ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’चा वापर करण्यावर आक्षेप घेतला. समाजवादी पक्ष, काँग्रेस यांसारख्या राजकीय पक्षांनीदेखील स्वदेशात विकसित केलेल्या भारतीय लसीचा विरोध करता करता अकलेचे तारे तोडले. मात्र, भारतीय कोरोनारोधी लस आणि जगातील अन्य देशांची नेमकी भूमिका काय, हे समजल्यास इथे ‘सीरम इन्स्टिट्यूट’ व
कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादन केलेल्या कोव्हीशिल्ड लसीची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि अशातच आता लहान मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या न्यूमोनिया आजारावरील 'न्यूमोसिल' लसीला अधिकृत मान्यता मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत ही लस रुग्णसेवेत दाखल सुद्धा झालेली आहे.
सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने कोविड -१९ लस कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराकरिता औपचारिक मान्यता मिळवण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) अर्ज केला आहे. व असा अर्ज करणारी ही पहिली स्वदेशी कंपनी ठरली आहे.
सिरम इन्स्टटयूटचे मालक आदर पुनावाला यांनी भारतीय बनावटीच्या 'कोव्हीशील्ड' या लसीला आपत्कालीन स्थितीत वापरायची परवानगी मिळाल्याची आनंदवार्ता देण्यास ट्विट केले व यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुद्धा आभार
मुंबईतील केईएममध्ये आतापर्यंत १००; तर नायर रुग्णालयात १४८ स्वयंसेवकांना कोव्हीशिल्डची लस देण्यात आली आहे.
शरद पवार यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यामुळे ते बिनधास्त फिरत आहेत, यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांसमोर त्याबद्दलची नेमकी माहिती दिली. ते म्हणाले मी कोरोनाची लस घेतल्याचे वृत्त चुकीचे आहे. कोरोनाची लस घेतली नाही पण सिरममध्ये जाऊन रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्याचे ( R ट्रिपल BCG बूस्टर) लस घेतली आहे.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे (बीएमजीएफ) सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कोरोना महामारी आणि लसीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. हर्ड इम्युनिटीद्वारे कोरोना महामारी संपेल या भरवशावर बसून चालणार नाही, कोरोनाची लस यासाठी महत्वाची आहे. तसेच कोरोना लसीच्या निर्मितीत भारताची भूमीका महत्वाची असेल. कारण भारताकडे चांगल्या गुणवत्तेची लस निर्मिती करण्याची क्षमता आहे.
'कोविशील्ड'बाबतचे वृत्त ; सिरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
भारतात १०० दशलक्ष लसींचे उत्पादन