अजूनही श्रीलंका गंभीर आर्थिक संकटाच्या गर्तेतून बाहेर पडलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून तर नागरिकांच्या रोषाला तोंड देणार्या श्रीलंकेतील सत्ताधार्यांना आक्रमक जनरेट्याने जबरदस्त धक्का दिला. हजारो आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानात घुसून त्यावर ताबा मिळवल्याचे आपण पाहिले. याचे मुख्य आणि तात्कालिक कारण जनतेच्या रोजच्या गरजा पूर्ण करणे सरकारला अशक्य झाले, हे होते. तेव्हा, रशिया-युक्रेन युद्धाचा श्रीलंकन अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आणि आगामी काळातही कर्ज उभारणे या देशासाठी किती कठीण ठरु
Read More
घराणेशाहीचा नाग देशाच्या सार्वभौमत्वाला कसा विळखा घालतो आणि एखादे संपन्न राष्ट्र अराजकाच्या गर्तेत कसे ओढले जाते, त्याचे श्रीलंका हे उत्तम उदाहरण मानावे लागेल. अन्य आशियाई देशांनी यातून योग्य तो धडा घेणे आवश्यक आहे.
श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातून पलायन केलेल्या गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला.
आर्थिक संकटाचा सामना करत असलेला श्रीलंका सध्या गृहयुद्धाच्या भीषण टप्प्यातून जात आहे. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे, कोलंबोमध्ये हजारो आंदोलकांनी पोलीस बॅरिकेट्स तोडले आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर कब्जा केला. २२ दशलक्ष लोकसंख्येचे राष्ट्र असलेल्या श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीचा अंदाज यावरून लावता येतो की, राजपक्षेंना कुटुंबासह राष्ट्रपती भवन सोडावे लागले. ते सध्या कुठे आहेत, याचा खुलासा झालेला नाही.
राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री, पर्यटनमंत्री, सुरक्षामंत्री असे सगळेच राजपक्षे. त्यामुळे साहजिकच राजपक्षे घराण्याच्या हातातच श्रीलंकेच्या तिजोरीच्या चाव्या होत्या. पण, जनतेचे भले करण्यापेक्षा या राजघराण्याने केवळ आणि केवळ आपले आणि आपल्या कुटुंबाचे खिसे भरण्यातच धन्यता मानली
अत्यंत वाईट आर्थिक संकटातून जात असलेले आपले शेजारी राष्ट्र श्रीलंका आता राजकीय उलथापालथींना सामोरे जात आहे. अनेक दिवसांपासून तीव्र विरोध होऊनही आपली खुर्ची न सोडणाऱ्या पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी अखेर जनमताच्या रेट्यापुढे हार पत्करली आणि अखेर पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे
श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात आता श्रीलंकेतील तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांनी राजपक्षे यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत
भारताने नाकारलेली संधी चीनने साधली. विकासाचा अनुशेष असलेल्या दक्षिण श्रीलंकेत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या स्वप्नाला राजपक्षे भुलल्याने श्रीलंका अलगद चीनच्या जाळ्यात सापडली. त्यांच्या कारकिर्दीत चिनी कंपन्यांना पायाभूत सुविधा विकासाची अनेक मोठी कंत्राटे देण्यात आली.
मोदी सरकारच्या कार्यशैलीमुळे नेपाळ, बांगलादेश आदी शेजारी भारतापासून दुरावत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले गेले. मात्र, अशा परिस्थितीत श्रीलंकेने ‘इंडिया फर्स्ट’ नीती अवलंबण्यातून शेजारी देशांचे उदाहरण देऊन मोदी सरकारवर टीका करणार्यांना सणसणती चपराक बसल्याचेच स्पष्ट होते.
श्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. रविवारी दुपारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात त्यांनी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सजीथ प्रेमदासा यांच्यावर मात केली. सजीथ प्रेमदासा यांनी स्वतःचा पराभव मान्य केला आहे.