( no retirement rule after the age of 75 in BJP Chandrashekhar Bawankule ) “भाजपमध्ये ७५ वर्षे वयानंतर निवृत्तीचा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही. उबाठाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे,” असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी केले.
Read More
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच मुळापासून घाव घातल्याने, घुसखोरांची कागदोपत्री निपज तरी थांबेल, अशी आशा...
प्रत्यक्ष जन्मदात्याला तुरुंगात टाकणार्या आणि ज्येष्ठ बंधूंची हत्या करणार्या औरंगजेबाने आपल्या पोटच्या पोरांचीही गय केली नाही. आपल्या बहुतेक पुत्रांना एकतर आजन्म तुरुंगवासात टाकले किंवा त्यांना आपला जीव वाचविण्यासाठी आयुष्यभर रानोमाळ भटकविले. अशा औरंगजेबाने हिंदू आणि शिखांच्या महापुरुषांची हत्या केली. हिंदूंचा धार्मिक छळ केला, यात नवल ते काय! पण, ज्या जिहाद्याने महाराष्ट्राच्या छत्रपतींची हाल हाल करून हत्या केली, अशाबद्दल चुकूनसुद्धा चांगले शब्द काढण्याची कोणाची हिंमत या महाराष्ट्रातच होते, हा हिंदवी अस्म
देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांचे ही नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणे आहे.
Manipur राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर, भाजपचे ईशान्य प्रभारी संबित पात्रा यांनी पक्षाच्या आमदारांशी अनेकदा चर्चेचे आयोजन केले. परंतु या प्रकरणाचा तिढा सुटता सुटत नाही. गेल्या दोन दिवसांपासून संबित यांनी राज्यपाल अजय कुमार यांची दोन वेळा भेट घेतली.
‘केवल कुंभक’ हा एक उच्च कोटीतील प्रयत्नाशिवाय साधणारा प्राणायाम ( Pranayama ) आहे. योगशास्त्राचा मूळ उद्देश चित्तवृत्ती निरोध साधून देणारा हा प्राणायाम आहे, ज्यात कोणतीही आग्रही भूमिका अपेक्षित नाही. यम, नियमांचे पालन शनैः शनैः साधत गेल्यास हा प्राणायाम साधतो.केवल कुंभकाचे सिद्धीचा एकमेव उपाय म्हणजे मनोलय साधणे हा होय. त्यासाठी आसन नव्हे, योगासन, प्राणायाम यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास अत्यावश्यक आहे.
एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीत कमविलेल्या चल-अचल संपत्तीचे त्याच्या पश्चात योग्य पद्धतीने वाटप होण्याकरिता, संपत्ती नियोजन प्रत्येकाने त्याच्या हयातीतच म्हणजे, तो जीवंत असतानाच करावे. यासाठी नामांकन (नॉमिनेशन) ( Nomination Rules ) आणि इच्छापत्र (व्हिल) हे दोन प्रमुख पर्याय आहेत. भारतीयांमध्ये इच्छापत्राबाबत अजूनही पुरेशी जागरुकता असल्याचे दिसून येत नाही. इच्छापत्र करणार्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. बर्याच जणांना याबाबत पुरेशी माहितीही नसते. या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन करणे सहज आणि सोपा पर्याय आहे. त्
दाक्षिणात्य सूपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २ - द रुल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच १०० कोटींचा गल्ला पार केला होता. त्यानंतर चित्रपटाने अवघ्या कमी कालावधीत १००० कोटींचा पल्ला बॉक्स ऑफिसवर पार करत भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे.
सर्वत्र सध्या केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे ‘पुष्पा २ : द रुल’. २०२४ हे वर्ष अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ ने तुफान गाजवलं. बॉक्स ऑफिसवर १०००' कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने एक नवा इतिहास रचला. पण तुम्हाला माहित आहे का भारतात आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा पाहिला गेलेला चित्रपट ‘पुष्पा’ किंवा ‘बाहूबली’ नसून वेगळाच आहे आणि त्या चित्रपटाची तब्बल २५ कोटींची तिकिटं विकली गेली होती.
मुंबई : काही दिवसात ग्रेगोरियन नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. लोक या इंग्रजी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ( Mumbai Police ) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबई पोलिसांकडून मध्यरात्री मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचा पालन न करणारे वाहन चालक तसेच मध्यरात्री फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
अभिनेता अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा २ : द रुल' या चित्रपटामपळे चांगलाच चर्चेत आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. जगभरात या चित्रपटाने ७ दिवसांत १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे अल्लूच्या 'पुष्पा २' ची चर्चा सुरु असून दुसरीकडे तो लवकरच राजकारणात प्रवेश करणार अशाही चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, यावर आता अभिनेत्याच्या टीमने स्पष्टीकरण दिले आहे.
'पुष्पा २ : द रुल' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हैदराबाद मधील संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत २ जणांचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि आता त्यावर तेलंगणा पोलिसांनी कारवाई करुन अल्लु अर्जुनला ताब्यात घेतले आहे.
९० च्या दशकातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा आवडता सुपरहिरो म्हणजे ‘शक्तिमान’. अभिनेते मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तिमान आजही पुन्हा पाहावासा वाटतो. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ‘शक्तिमान’ हा चित्रपट येणार असे सांगितले जात आहे. पण नेमकी यात शक्तिमान कोणी साकारावा यावरुनही वेगळा वादंग आणि चर्चा सुरु आहे. पण मुकेश खन्ना यांनी स्वत:च दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याचे नाव सुचवले आहे.
सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २ : द रुल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. अनेक चित्रपटांच्या कमाईचे त्याने रेकॉर्ड मोॉले असून प्रदर्शनानांतरच्या पहिल्या सोमवारी कलेक्शनच्या परीक्षेत पुष्पा २ पास झाला आहे की फेल हे जाणून घ्यायला हवं. ५ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट देशभरात तेलुगु भाषेसह हिंदी, तमिळ,कन्नडा, मल्याळम आणि बंगालीत प्रदर्शित झाला. पुष्पा २ या चित्रपटाने जगभरात पाच दिवसांत ९०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटामुळे दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन प्रेक्षकांचा आवडता अभिनेता झाला आहे. 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडित काढून नवा इतिहास रचला आहे. दरम्यान, जितका या चित्रपटात अल्लू अर्जूनचा अभिनय गाजला त्याच प्रमाणे अभिनेता फहाद फालिसच्याही अभिनयाची तितकीच चर्चा झाली. पण या चित्रपटातील त्याची भूमिका कदाचित फारशी प्रेक्षकांना आवडली नसल्यामुळे अशी माहिती मिळत आहे की फहाद फासिल 'पुष्पा ३'मध्ये दिसणार नाही.
बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांच्या मनावर सध्या एकाच चित्रपटाने अधिराज्य गाजवलं आहे तो म्हणजे अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २' या चित्रपटाने. देशभरात ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १०० कोटींच्या पुढे कमाई करण्यास सुरुवात केली होती. प्रेक्षकांनी दिलेला दणकून प्रतिसादामुळे ‘पुष्पा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे नवे रेकॉर्ड तयार करत इतिहास रचला आहे.
अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २'ची सध्या देशभरात चांगलीच चर्चा सुरु आहे. एकीकडे प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. मात्र, दुसरीकडे चित्रपटाच्या शोदरम्यान काही दुर्घटना देखील घडल्या आहेत. हैदराबादमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. यावरुन अभिनेता अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल झाला असून या सर्व प्रकरणावर अल्लू अर्जुनने मौन सोडलं आहे.
उल्हासनगर : ‘उल्हासनगर महानगरपालिके’चे आयुक्त विकास ढाकणे यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असून विभागातील कर्मचार्यांची कर आकारणी व कर संकलन याबद्दलची बौद्धिक पातळी, काम करण्याचा कार्यक्षमता व वसुलीच्या उदिष्टांच्या पूर्ततेसाठी लागणारी इतर क्षमता यांचा मेळ असणे आवश्यक असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या ( Municipal Corporation ) आर्थिक हिताकरिता मालमत्ता कर विभागातील कर्मचार्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी मालमत्ता कर विभागातील सर्व कर्मचार्यांची तसेच महापालिकेतील इच्छुक
(President's Rule) महाराष्ट्रात २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या काही घटना घडल्या. राष्ट्रपती राजवट लागू झाली, पहाटेचा शपथविधी होऊन औटघटकेचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षाच्या काळात राजकीय वर्तुळात सुरू झालेली नाट्यमय घडामोडींची मालिका अजूनही सुरूच आहे. परंतु या सर्व घडामोडींना कारणीभूत असलेली राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागू झाली या मुद्यावर आता उपमुख्यमंत्री द
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जास्त वजन घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. नुकतेच वांद्रे टर्मिनस येथे अंत्योदय एक्स्प्रेसच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलत नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार आता विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
( Uniform Civil Code )उत्तराखंडच्या समान नागरी कायद्याची नियमावली तयार झाली असून आता लवकरच राज्यात कायदा लागू केला जाईल, असे प्रतिपादन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी केले आहे.
पुण्यलोक अहिल्यादेवींनी आपल्या अधिपत्याखालील प्रांतात सांस्कृतिक आणि सनातन सांस्कृतिक राष्ट्राचे जागरण केले. देवींच्या रुपाने छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे स्फुल्लिंग पेशवाईच्या आणि पर्यायाने होळकरांच्या पराभवानंतरही या वननिवासी आदिवासी जमातींनी धगधगते ठेवले. ब्रिटिशांना आदिवासींच्या या स्वातंत्र्यासंग्रामाची दखल घ्यावीच लागली. त्रोटक स्वरुपात का होईना, 1822 साली झालेला कोळ्यांचा पहिला उठाव आणि पाठोपाठ 1844च्या सुमारास झालेला कोळ्यांचा दुसरा उठाव नोंदवावा लागला. त्याविषयी...
एअर इंडिया कंपनीने अखेर २५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यांच्या 'बेजबाबदार ' वर्तनामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. मंगळवारी व बुधवारी हजारो प्रवाशांना शेकडो विमाने रद्द झाल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. अचानक अनेक कर्मचारी यांनी 'सिक लिव' (आजारी रजा) घेत सामुहिक रजा घेतली होती.
काँग्रेसशासित कर्नाटकात त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिची हत्या करण्यात आली. हत्या करणारा फैयाझ जो आरोपी म्हणून सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, तो एकेकाळी तिच्याच वर्गात शिकत होता. त्याने नेहाला लग्नासाठी विचारले असता, आपण एकाच धर्माचे नसल्याने मी लग्न करू शकत नसल्याचे नेहाने फैयाझ याला स्पष्ट सांगितले होते. यामुळेच त्याने नेहाचा बळी घेतला. तिच्या वडिलांनी माझी मुलगी ‘लव्ह जिहाद’चा बळी गेली असून, देशात ‘लव्ह जिहाद’ मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरत असल्याचे सांगितले.
आरबीआयने आपल्या नियमावलीत बदल केले आहेत. आता नव्या कायद्यानुसार कर्जदाराला बँकेकडून 'की फॅक्ट स्टेटमेंट ' द्यावे लागणार आहे. त्यामध्ये बँकेला सगळी इत्यंभूत माहिती ग्राहकाला द्यावी लागणार आहे.आकारलेली किंमत,एकूण फी,वार्षिक कर्जाचे दर, वसूलीची धोरणे व नियम,तक्रार निवारणासाठी संपर्क क्रमांक व दुसरीकडे ट्रान्स्फर केले असल्यास थर्ड पार्टीची माहिती ही सगळी माहिती ग्राहकांना पारदर्शकतेने कळवावी लागणार आहे.
“पुष्पा फ्लावर नही फायर है” असं म्हणत प्रेक्षकांनी अक्षरश: अल्लू अर्जूनला डोक्यावर घेतले होते. आता चाहते ‘पुष्पा २’ (Pushpa 2 : The Rule) ची वाट पाहात असून या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अनेक हिंदी चित्रपटांना मागे टाकले आहे. चित्रपट यशस्वी होण्यामागे दोन महत्वाची कारणे असतात. त्यापैकी एक म्हणजे प्रेक्षकांना प्रतिसाद आणि दुसरं म्हणजे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन. अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शनानंतर १०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिस कलेक्शन करतात. पण ‘पुष्पा २’ (Pushpa 2 : The Rule) या चित्रपटाच्या तिकीट विक्रीनेच १००० कोटी
अल्ट्ररनेटिव फंड साठी (Alternative Fund) नियमात बदल करण्याची मागणी कर्जदारांकडून सातत्याने करण्यात येत होती. आरबीआयने यांचा आढावा घेत यातील कडक शिथिल करत गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने विदेशी पाळीव वन्यजीवांचा ताबा आणि त्यांच्या प्रजननासंबंधीचे नियम अधिसूचित केले आहेत (exotic pet). 'वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२'च्या कलम ४९ एम अंतर्गत हे नियम तयार करण्यात आले आहेत (exotic pet). त्यानुसार 'वन्यजीव संरक्षण कायद्या'च्या क्षेणी ४ मध्ये 'सायटीस'अंतर्गत संरक्षित करण्यात आलेले प्राणी जर तुम्ही पाळत असाल, तर त्यांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. (exotic pet)
चटका बसण्याचा अनुभव आपण सर्वांनीच आयुष्यात कधी ना कधी घेतला असेल. पण, घरात असेल अथवा कारखान्यांमध्ये आगीने भाजवण्याचे अपघात दुर्देवाने घडून येतात. तेव्हा, अशावेळी नेमके प्रथमोपचार काय करावे? असे प्रसंग घडू नये म्हणून कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता येतील? यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
देशखळी हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (एनसीएससी) अध्यक्ष अरुण हलदर यांनी दि. १६ फेब्रुवारी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला. या अहवालात अरुण हलदर यांनी संदेशखळी येथे टीएमसी नेत्याकडून महिलांवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपती मुर्मू यांना केली आहे.
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील बलात्कारांच्या प्रकरणांवर राष्ट्रीय अनुसूचित जात आयोगाने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला आहे. अहवालामध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी स्थिती आहे, अशी शिफारस केली आहे.
दि. २८ मे, १८८३ रोजी स्वा. वि. दा. सावरकर यांचा जन्म ज्या वाड्यात झाला, तो दुमजली वाडा ब्रिटिश सरकारने जॅक्सन वधानंतर १९१०साली जप्त करून काही वर्षांनंतर त्याचा लिलाव केला. हा वाडा मारूतीराव चव्हाण यांनी विकत घेतला. पुढे तो वारसाहक्काने पांडुरंग चव्हाण यांच्या मालकीचा झाला.
पूर्व समुद्रात ‘गाझी’चा निकाल लागत असतानाच, इकडे पश्चिमेला भारतीय नौदलाने कराचीवर जबर हल्ला चढवला. दि. ४ व ५ डिसेंबर आणि पुन्हा दि. ८ व ९ डिसेंबर असे लागोपाठ दोन हल्ले चढवून नौदलाने कराचीचं पेकाट मोडून टाकलं.
दिवाळी सणाच्या काळात कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. या बोनसरुपी म्हणून काही कंपन्यांकडून कार, बाईक अशा महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. दरम्यान, दिवाळी बोनस जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरांपासून ते अगदी खाजगी कंपनी काम करणाऱ्यापर्यंत सर्वांनाच मिळत असतो. पण हा बोनस देण्याचा निर्णय केव्हापासून अतस्तित्वात आला याची एक रंजक गोष्ट आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
ईशान्य भारतात जेव्हा परकीयांनी पाय रोवण्यास आणि धर्मांतरास उघड सुरुवात केली, तेव्हा तेथील टोळ्यांनी आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्राणपणाने लढे दिले. त्यांच्या शौर्यगाथा कथन करणार्या या पुस्तकाविषयी...
संपूर्ण देशात सध्या एकदिवसीय आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. ५ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या वर्ल्ड कपचा आज (२१ ऑक्टोबर) साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड हा विसावा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आहे. यावेळी कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.
न्यायालयाचे कौतुक एवढ्याचसाठी की, संसद, धर्म व संस्कृती मानणार्यांची मते, त्यांच्या मतांचा आदर राखणे या सगळ्याचा उचित व कालसापेक्ष विचार समलैंगिक विवाहविषयक निकाल देताना न्यायामूर्तींनी केलेला दिसतो. आता संसद या सगळ्याचा कसा विचार करेल, हे येणारा काळच ठरवेल.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका मुस्लिम महिलेने मायदेशी परतून हिंदू धर्म स्वीकारला आहे. या महिलेचे नाव खुशबू बानो असून ती आता खुशबू या नावाने ओळखली जाणार आहे. खुशबूने विशाल नावाच्या तरुणाशी लग्नही केले असून हा विवाह बुधवार, दि. ११ सप्टेंबर २०२३ रोजी अगत्स्य मुनी आश्रमात वैदिक मंत्रोच्चारात पार पडला.
बळवंत रामचंद्र बर्वे हे सावरकरांच्या प्रभावळीतले, अभिनव भारतचे सभासद. स्वतांत्र्य सेननानी. जॅक्सन वध खटल्यात गुन्हेगार ठरवून बळवंत यांना दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागली. त्यांचे राष्ट्रप्रेम, निष्ठा शब्दातीत. त्यांच्या ‘स्मृती’ या लेखात जागवल्या आहेत.
मंत्रालयात केल्या जाणाऱ्या आत्महत्येच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी एका व्यक्तीने शिक्षक भरती लवकर घेण्यात यावी तसेच कंत्राटी पद्धतीने करण्यात येणारी भरती थांबविण्यात यावी या मागण्यांसाठी दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सुचनांमुळे मंत्रालयात होणारे प्रकार थांबण्यास यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दि. १८ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय सैन्याने निजामाचा पराभव केला. हैदराबाद संस्थानाचे भारतामध्ये विलीनीकरणाला आता ७५ वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून हे विलीनीकरण नेमके कसे झाले, हे सगळ्या भारतीयांना समजणे गरजेचे आहे. त्यासाठी हा लेखप्रपंच...
१९२९ ते १९३६ या काळात बंगालमध्ये क्रांतिकारक तरुणांनी इंग्रज सरकारविरुद्ध जो लढा उभारला होता, त्यात अनेकांना सेल्युलर तुरुंगाची हवा खावी लागली, अशा काही देशभक्तांच्या या कहाण्या.
स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षं उलटून गेली असून, या काळात जग आमूलाग्र बदलले आहे. भारतातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीही या काळात पूर्णपणे बदलली. आतापर्यंत राज्यघटनेत १००पेक्षा अधिक दुरुस्त्या देखील करण्यात आल्या आहेत. असे असताना बदलत्या काळाशी सुसंगत कायदे करण्यास विरोध करणे, हा अविचारच म्हणावा लागेल.
भारताला स्वातंत्र्य मिळावं, यासाठी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतलेल्या अनेकांसोबतच मिळवलेलं स्वातंत्र्य अबाधित राहावं, स्वातंत्र्याचा अर्थ लोकांस समजावा, यासाठी झटणारीही अनेक थोर व्यक्तिमत्त्वे होती. या अनेकांपैकी एक म्हणजे लेखक, संपादक, शिक्षक आणि समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर. त्यांच्या विचारवाङ्मयाची ही चिकित्सा...
स्वातंत्र्यसेनानी रघुनाथ चिंतामण आमडेकर... कोवळ्या वयात इंग्रजांनी त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. गुन्हा काय? तर भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आजच्या भागात या वीराची शौर्यगाथा...
भारतात राष्ट्रवादाची चर्चा करताना विवेकानंद -अरविंद-लोकमान्य आणि स्वा. सावरकर यांना वगळून राष्ट्रवादाची चर्चा पूर्ण होऊ शकणार नाही. या व्यक्तींच्या विचारांचा अभ्यास करायचे ठरले, तर त्यांतून हिंदुत्वही बाजूस काढता येणार नाही. येथील राष्ट्रवादातून हिंदुत्व वगळणे म्हणजे देहाच्या कुडीतून चैतन्यतत्त्व बाजूस करणे आहे.
भारतभरातील जाहिरातदारांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय संस्था इंडियन सोसायटी ऑफ अॅडव्हर्टायझर्स (आयएसए) ने २ ऑगस्ट रोजी मुंबईत आपली मीडिया चार्टर लाँच केली.या चार्टरसह, जाहिरात संस्थेचे उद्दीष्ट ब्रँड्सच्या हितांचे रक्षण करताना निष्पक्ष आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करणे हे असेल.हे एक मजबूत आणि नैतिक जाहिरात इकोसिस्टम तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज करताच अफगाणिस्तानचे बहुसंख्य मुसलमान अक्षरशः जीव मुठीत घेऊन देशाबाहेर पळण्याच्या तयारीत होते, हे जगाने पाहिले. ७२ टक्के लोक गरीब असलेल्या अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबानी राजवट आली, तेव्हा ९७ टक्के लोक दारिद्य्राच्या दरीत लोटले गेले, तर अशीही तालिबानी राजवट.
हजार - दोन हजार वर्षांपूर्वी जेंव्हा भारत जागतिक व्यापाराच्या शिखरावर होता, तेंव्हा त्या व्यापारात सगळ्यात मोठा वाटा होता, कापड उद्योगाचा ! सुती वस्त्र असो किंवा रेशीम – मलमल चे, भारतीयांचा डंका सगळ्या दुनियेत वाजत होता. युरोपला सुती वस्त्रांची ओळख भारताने करुन दिली. त्यांना फक्त लोकरीचे गरम कपडे माहिती होते. कापसाच्या शेतीबद्दल तर ते अनभिज्ञच होते. पूर्व आणि पश्चिम, दोन्ही दिशांचे देश भारतीय वस्त्रांच्या मोहात / प्रेमात पडले होते.
नुकतीच २२व्या विधी आयोगाने देशद्रोह कायदा कायम ठेवण्यासह, कायद्यातील शिक्षेची तरतूद किमान सात वर्षे तुरूंगवासासह जन्मठेपेपर्यंत वाढविण्याची शिफारस केली. त्यामुळे विधी आयोगानेही या कायद्याच्या वैधतेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले असून, हा कायदा रद्द करण्याची मागणी करणार्यांना सणसणीत चपराक लगावली आहे.