: ( MHADA documents at one click ) ‘म्हाडा’चे स्कॅन केलेले सुमारे १५ कोटी कागदपत्रे (काही संवेदनशील कागदपत्रे वगळून) सार्वजनिक केले जाणार असून ‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळावर येत्या आठ दिवसांत अपलोड केली जाणार आहेत.
Read More
म्हाडाचे स्कॅन केलेले सुमारे १५ कोटी कागदपत्रे, नस्त्या (संवेदनशील वगळून) सार्वजनिक केले जाणार असून 'म्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळावर येत्या आठ दिवसात अपलोड केली जाणार आहेत. यामुळे 'म्हाडा'शी संबंधित विविध माहिती व दस्तऐवज नागरिकांना अधिक सुलभतेने एका क्लिकवर केवळ बघण्यासाठी वर्गवारीनुसार उपलब्ध होणार आहेत. याद्वारे 'म्हाडा' पारदर्शक कारभाराच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पाऊल टाकत असल्याचे 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला.
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच मुळापासून घाव घातल्याने, घुसखोरांची कागदोपत्री निपज तरी थांबेल, अशी आशा...
Rohingya - Bangladeshi infiltrators उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे १८ जुलै २०२४ रोजी हजारो रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या जन्म दाखल्यांची बनावट कागदपत्रे उघडकीस आली आहेत. आता याप्रकरणाची चौकशी करण्यात आली असून एकूण ५२ हजारांहून अधिक बनावट कागदपत्रे उघडकीस आली होती. एकूण ५२ हजारांहून अधिक बनावट जन्मदाखले असल्याची माहिती समोर आली आहे. या फसवणुकीत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळसह भारतातील अनेक राज्यातील नागरिकांच्या प्रमाणपत्रांचा यामध्ये समावेश होत आहे. ही सर्व बनावट कागदपत्रे रद्द करण्यात आली होती, अस
राज्यातील पुणे येथील रांजणगाव येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २१ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्रिपुरा पोलिसांनी ३ रोहिंग्या, मुस्लिम आणि २ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. याप्रकरणात आता पुणे पोलिसांनी १० अवैध घुसखोरांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ ऑक्टोबर रोजी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यासोबत त्यांच्याकडे बनावट अधारकार्ड असल्याची माहिती याप्रकऱणातून उघडकीस आली आहे.
मागच्या एक वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचार आणि दोन गटात तणावाचे वातावरण आहे. त्यातचं आता बनावट आधार आणि मतदार ओळखपत्र बनवून परदेशी घुसखोरांना भारतात आश्रय देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांचे विशेष पथक त्यांचा माग काढत असून, अलीकडेच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बनावट भारतीय ओळख घेऊन भारतात आरामदायी जीवन जगणाऱ्या एका बांगलादेशी घुसखोराला गुजरात राज्यातून पकडण्यात आले आहे. मिनार हेमायत असे आरोपीचे नाव आहे. मिनार हेमायतला सुरत एसओजीने अटक केली आहे. तो शुभो सुनील दास नावाच्या बनावट हिंदू ओळखीसह राहत होता आणि त्याच नावाची सर्व बनावट कागदपत्रेही त्याच्याकडे सापडली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे तो कतारची राजधानी दोहा येथे दोन वर्षांपासून काम करत होता.
मथुरेतील श्री कृष्णजन्मभूमीच्या जागी असलेले मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर मुघल शासक औरंगजेबाने तेथे शाही ईदगाहची इमारत बांधली होती. अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे दिली आहे. माहिती अधिकारांतर्गंत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, एएसआयने ही माहिती दिली.
डीजिटल लॉकर योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या सुविधेमुळे नागरिकांना कुठेही जाताना त्यांचे सर्व महत्त्वाचे कागदपत्र मोबाईलमद्धे डिजीटल लॉकरच्या माध्यमातून ऑनलाइन स्वरूपात ठेवता येणार आहेत.
इतिकासकालीन विविध दस्तावेजांचा, नाण्यांचा ऐतिहासिक ठेवा बंदिस्त न राहता, लोकाभिमुख व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती करणार्या संतोष चंदने यांच्याविषयी...
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळ सेवा भरती-२०२१ अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पहिल्या टप्प्याअंतर्गत सदर जाहीर सूचीतील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतींची पडताळणी दि. ०६ जून व दि. ०७ जून, २०२२ या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली
मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर तीन दिवसांपूर्वी आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. सोमवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाकडून त्यांच्या घरी छापा टाकण्यात आला. यादरम्यान मोठ्याप्रमाणात कागदपत्रे जप्त केल्याचे दिसून येत आहे.
स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी संशोधन करण्यासाठी तैवान सरकारने भारतीय संशोधक आणि इतिहासकारांना तैवानला येण्याचे निमंत्रण दिले आहे. खास यासाठी तैवान सरकारने आपले राष्ट्रीय अभिलेखागार उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतल्या तैवान दूतावासाचे उपप्रतिनिधी मुमिन चेन हे शनिवारी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एफआयसीसीआयद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित होते.
येथील भावसार समस्त पंच व श्री भावसार क्षत्रिय समाज मंदिर ट्रस्ट या दोन्ही संस्थांचे खोटे शिक्के व प्रोसिडिंग बुक बनवून त्या आधारे जळगाव येथील धर्मदाय आयुक्तांकडे आम्हीच खरे ट्रस्टी व अध्यक्ष असल्याची बतावणी करुन नवीन कार्यकारिणी घोषित झाली होती.