चीनचे वादग्रस्त जहाज 'युआन वांग ५' मंगळवारी दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात पोहोचले. 'युआन वांग ५' हे एक संशोधन जहाज असल्याचा चीन चा फोल दावा आहे, परंतु, सुरक्षा विश्लेषकांनी "गुप्तचर जहाज" म्हणून संबोधले आहे. भारताने व्यक्त केलेल्या आक्षेपाला न जुमानता चीनचे संशोधन जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल झाले आहे. श्रीलंकेच्या पाण्यात असताना संशोधन करणार नाही या अटीवर 'डॉक' करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे बंदर अधिकाऱ्यांनी सांगितले
Read More