( feed pigeons you will be fined Rs 500 BMC Mumbai ) मुंबईत दादर, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून जुने कबुतरखाने आहेत. या बरोबर मु्ंबईच्या उपनगर परीसरातदेखील कबुतरांना खाणे देण्यात येते. यामुळे मुंबईतील रहीवाशी परीसरात मोठ्या प्रमाणात कबूतरे आढळून येतात. कबूतरांनमुळे होणार्या ञासांवर आता उपाय म्हणून मुंबई महापालिकेने ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More
बहुप्रतीक्षित मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होण्याआधीच महायुतीने उद्धव ठाकरेंना दणका देण्याची तयारी सुरू केली आहे. २०१७ साली प्रभाग आरक्षण लागू केल्यानंतर, पुढील १० वर्षे ते कायम ठेवण्याचा ठराव मुंबई पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्याचा आधार घेत येत्या निवडणुकीतही हाच नियम लागू करण्याबाबत महायुतीने निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा सुरू केल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
(Eknath Shinde) विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महायुतीनं आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मुंबईतील सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी पक्षाचे नेते दीपक केसरकर यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रामटेक बंगल्यावर पार पडली.
विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाच्या मान्यतेने मुंबई महापालिका क्षेत्रातील ३६ विधानसभा मतदारसंघासाठी मिळून एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत.
झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने जलद ताप सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत बाधित रुग्णाच्या ३ ते ५ किलोमीटर भागामध्ये सर्वेक्षण करून रक्तजल नमुन्यांचे संकलन करण्यात येणार आहे.
शंभर वर्षाहुन जुने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय कात टाकणार आहे. प्रस्तावित नविन रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची काही जागा रेल्वे आणि ठाणे महापालिकेला विकास कामासाठी देण्याचा निर्णय झाला असला तरी, तब्बल ५६० कोटी खर्चून मनोरुग्णालयाचा कायापालट होणार आहे.
केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी झाला, तरी भाजपचा कसा पराभव झाला आहे, हे विरोधी पक्षनेते अजूनही ठासून सांगत आहेत. स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत. भाजपचा देशभरात जनाधार वाढलेला असतानाही, हा त्याचा पराभव असल्याची अफवा आत्ममग्न विरोधक पसरवत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे काम आणि कार्यकर्त्यांच्यावरील अदम्य विश्वास यांच्या जोरावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला विजयी संकल्प निश्चितच ऊर्जादायी!
जरीमरी, साकीनाका येथे एका कट्टरपंथीय गुंडाकडून धार्मिक तेढ निर्माण करुन स्थानिक हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. शुक्रवारी, १५ मार्च रोजी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबाची चौकशी केली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात महिलांसाठी कौशल्य विकास विभाग उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 'आकांक्षित महिला सक्षमीकरण योजने'चा शुभारंभ देखील करण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाकरिता एकूण ५९ हजार ९५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणाकरिता महापालिकेकडून भरीव तरतूद करण्यात आली आहे. ३ हजार १६७ कोटी रुपयांची तरतूद यंदा महापालिकेकडून करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाकरिता एकूण ५९ हजार ९५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाकरिता एकूण ५९ हजार ९५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. यंदा आरोग्याकरिता ७,१९१. १३ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सन २०२४-२५ चा अर्थसंकल्प मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुंबई उपनगर पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेचा सन २०२४-२५ चा एकूण ५९,९५४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
मुंबईतील शिक्षकांचे लेसन प्लॅन कुणी बंद केले-अनिल बोरनारे, शाळा सुटल्यावर विनाकारण शिक्षकांना थांबवून ठेवणे कुणी बंद केले- अनिल बोरनारे, शासकीय कर्मचाऱ्यांसोबत सातवा वेतन आयोग कुणी मिळवून दिला. अनिल बोरनारे, अनेक महिला शिक्षकांना नाकारलेल्या बाल संगोपन रजा कुणी मिळवून दिल्या ? अनिल बोरनारे पे फिकसेशन स्टॅम्पिंग मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडा कुणी शिकविला- अनिल बोरनारे अशा अनेक कामांबद्दल शिक्षकांनीच शिक्षकांना सांगितले.
स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते म्हणाले, प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष वेधतानाच याकरिता झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवून सर्वांसाठीच स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. हीच प्रेरणा घेऊन मुंबई प्रदुषणमुक्त, स्वच्छ व हरित करण्याचा ध्यास घेत आता मुंबई खड्डेमुक्तही असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मिरा भाईंदर महानगरपालिकामधील रिक्त पदासाठी नवी भरती केली जाणार आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेद्वारे विविध पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या अधिसूचनेनुसार पदभरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार रिक्त पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सहा महिन्याकरिता कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे.
छटपूजा उत्सव जवळ आला आहे. यानिमित्ताने मुंबईतील सुमारे ८२ छटपूजा स्थळांवर भाविकांसाठी आवश्यक त्या नागरी सेवा-सुविधा पुरविण्याचे निर्देश राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.
इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जात आहे. याभरतीसंदर्भात आयसीएमआरकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, या भरतीच्या माध्यमातून टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन, लॅव अटेंडट ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. तरी या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अरबी समुद्रात तयार झालेल्या "तेज" चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे मुंबई शहरास धोका निर्माण झाला आहे. अरबी समुद्रात येत्या २१ ऑक्टोबर रोजी "तेज" चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता असून मुंबई शहर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्याने नुकतेच महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र सागरी विकास धोरण-२०२३ जाहीर केले असून यामाध्यमातून सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
गणेश जशी विद्येची देवता, तशीच ती कलेची देवता. विघ्ने येऊ नयेत म्हणून विघ्नहर्त्याची पूजा लोककलावंतांनी बांधली. गणेश लोककलेत ठायी ठायी आहे. कधी तो नुसताच संकीर्तन रूपात, तर कधी साक्षात नाट्यरूपात. त्याचे हे संकीर्तन रूप आणि नाट्यरूप लोककलांमध्ये कधी रांगड्या तर कधी प्रासादिक रूपात सादर होते. तेव्हा, अशाच लोककलेतील गणेशाचे उलगडलेले हे उत्सवी रुप...
महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये दररोज असंख्य रुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक येतात. रुग्णालयातील विविध विभाग माहित नसल्यामुळे त्यांची तारांबळ होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सेवार्थ एक मदतकक्ष असावा असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सुचवले होते. यानुसार महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये 'रुग्णमित्र हेल्प डेस्क' ची सुरुवात करण्यात येणार आहे.
साधारण गेल्या तीन महिन्यांपासून कानावर येत होते की, मुंबई शहरातला जो नागपाडा नावाचा भाग आहे, तिथे एक नागोबाचे देऊळ आहे. त्यावरुनच भागाला ‘नागपाडा’ हे नाव पडले आहे. परंतु, हे देऊळ ऐन मुसलमानी वस्तीत आहे. बहुधा ते कुणा मुसलमान व्यक्तीच्याच ताब्यात आहे. यामुळेच ते वर्षभरात एकदाच, फक्त नागपंचमीच्या दिवशीच उघडले जाते. एवढे समजल्यावर मुंबई विषयक जुनी पुस्तके, संदर्भ हे एकीकडे पाहू लागलो आणि एकीकडे हे नागोबाचे देऊळ आज नेमके कुठे आहे, याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष हे देऊळ गाठले. त्य
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका विषयक वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक चर्चा करीत विविध विषयांवर संवाद साधला.
मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा आवाज उठवला असून यासंदर्भात ते म्हणाले, पालिकेतील खिचडी घोटाळा हा जवळपास १६० कोटी रुपयांचा असल्याचे सोमय्या म्हणाले, यावेळी सोमय्यांनी पुन्हा एकदा खा. संजय राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कोविड काळातील खिचडी घोटाळा संजय राऊत यांनी यांसदर्भातली कंत्राटे मिळवून आपल्या मित्रपरिवाराचा फायदा करून दिल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका लवकरच रिक्त पदे भरणार असून अर्ज मागविण्यात येत आहेत. बीएमसीकडून नोकरभरती संदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून पालिकेअंतर्गत विविध खात्यांच्या आस्थापनेवर ‘कनिष्ठ लघुलेखक’ (इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेकरिता) या संवर्गातील एकूण २२६ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांकरिता भरतीप्रक्रिया सुरु झाली असून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच, अर्ज करताना भरतीप्रक्रियेतील पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास पालिकेच्या अधिकृत वेबसाईटच्या लिंक वरून २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत भरावयाचे आहेत. दरम्यान, सहाय्यक कायदा अधिकारी श्रेणी II (३४), सहाय्यक कायदा अधिकारी (१९)या पदांकरिता भरतीप्रक्रिया केली जाणार आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे तलावांच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली असून पालिकेकडून पाणीपुरवठ्यात लागू केलेली १० टक्के पाणी कपात दि. ९ ऑगस्ट २०२३ पासून रद्द करण्यात येत आहे. दरम्यान, जलसाठ्यातील हीच परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये कायम राहिल, असा अंदाज आहे. तसेच, ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ मध्ये काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास, त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चालत्या ट्रेनमधून एका तरुणीला हल्लेखोराने बाहेर फेकून दिल्याचा प्रकार दि.७ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात घडली आहे. पुणे - मुंबई उद्यान एक्स्प्रेसमधील महिलांच्या जनरल डब्यात ही घटना घडली असून सुदैवाने या घटनेत ही तरुणी बचावली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सहा उपनगरीय रूग्णालयांमध्ये 'डीएनबी' (डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम ) अभ्यासक्रमाकरिता शिक्षक पदांची भरती होणार आहे. या पदांसाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली असून १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहे. महानगरपालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात अर्ज उपलब्ध आहेत. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमधील शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी नागरिक येतात. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना अधिकाधिक आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आगामी काळात शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी विहार व तानसा हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू आगले. विहार तलाव आणि तानसा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई भागांत सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती, दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून शहराच्या विविध भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागा अंतर्गत २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन भायखळा पूर्व येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा तर प्रमुख पाहुणे म्हणून नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर उपस्थित राहणार आहेत.
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे मुंबईकर ‘नेमेचि होते मुंबईची तुंबई’ असे म्हणत कसेबसे पावसाळ्यांत अक्षरश: ‘जीवाची मुंबई’ करतात. पालिकेचेही दरवर्षीप्रमाणे १०० टक्के नालेसफाईचे दावे पहिल्या पावसात धुवून निघतात. यंदाही मुंबईची परिस्थिती काही वेगळी नाहीच. त्याचाच या लेखातून घेतलेला हा आढावा...
हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी शिवसेनेचे दोन तुकडे होऊन आता वर्ष पूर्ण झाले. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याने आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि अख्खी शिवसेना उद्धव यांच्या हातून निसटली; पण या सगळ्या घटनाक्रमांतून उद्धव ठाकरेंनी काहीही धडा घेतला हेच सत्य.
मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी गुजरात, पुद्दुचेरी आणि मुंबई या प्रदेशांकरिता नव्या अध्यक्षांची नेमणूक केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप होते. त्यांची या पदावरून आता उचलबांगडी करण्यात आली असून आ. वर्षा गायकवाड या मुंबई प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष असतील. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मुंबई काँग्रेसमध्ये हा बदल करण्यात
मुंबई : मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मोकळ्या जागांचे अपहरणाचे धोरण थांबवून दिलासा द्यावा. मुंबईतील खुल्या जागा महापालिकेने सांभाळाव्यात. याबाबतचे पत्र नागरिकांच्या गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. या नागरिकांमध्ये अनिल गलगली, अशांक देसाई, भगवान रैयानी, देबाशीष बसु, डॉल्फी डिसूजा, नयना कठपालिया, शरद सराफ, शैलेश गांधी, सुचेता दलाल, रंगा राव यांचा समावेश आहे.
मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना आज शनिवार दि. ४फेब्रुवारी सादर केला. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान ७ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पाचे आकारमान ४५ हजार ९४९ कोटी २१ लाख रुपये इतके होते. २०२३-२४ आकारमान ५२ हजार ६१९ कोटी ७ लाख रुपयांवर पोहोचले आहे.
मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना आज शनिवार दि. ४फेब्रुवारी सादर केला. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान ७ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. दरम्यान, मुंबई महापालिका शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्प आणि धोरणाचा अर्थसंकल्पामध्ये (BMC Budget 2023) विशेष तरतूद करण्यात आली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी ताजी असतानाच मुंबई महापालिकेसंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीचे समन्स आल्याची माहिती समोर येत असून ईडीने चहल यांना सोमवार १६ जानेवारी रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचेही माहिती समोर आली आहे.
bmc : प्रभाग क्र. ५१ मधील स्वतंत्र चाळ, विटभट्टी, गोरेगाव पूर्व येथे लोकांना पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होता. त्यासाठी तात्काळ उपाययोजना म्हणून आमदार विद्याताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने संदीप जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांच्या परवानगीने आणि आपल्या स्वखर्चाने या जलवाहिनीचे काम आज स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून केले. हा प्रश्न सोडवल्यामुळे तेथील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना एसआरएने दणका दिला आहे. किशोरी पेडणेकरांच्या वरळीतील चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएकडून मुंबई महापालिकेला देण्यात आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एसआरएने मुंबई महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकरांसाठी हा पहिला मोठा दणका आहे.
“मुंबई महापालिकेत ठाकरे परिवाराने मराठी माणसाच्या नावे सत्ता उपभोगत गेली 25 वर्ष लूटमार केली,” असा आरोप विधान परिषदेचे गटनेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर करत त्यांचा हा धंदा बंद करायचा असल्याचे आवाहन उपस्थितांना केले. घाटकोपर येथे नुकतीच भाजपची ‘जागर मुंबईचा’ सभा पार पडली. या सभेला आ. प्रवीण दरेकर संबोधित करत होते.
मुंबईतील खड्ड्यांसाठी पालिकेचे सर्व तंत्रज्ञान फोल?
महापालिकेची रुग्णालये दुरवस्थेच्या गर्तेत !
फेरीवाल्यांच्या गराड्यात अडकलेले दादर
पालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्या गोरगरीब कुंटुंबातील विद्यार्थ्यांना आता पौष्टिक नाश्त्याचे वाटप
मुंबईतील छोट्या-मोठ्या नाल्यांमधील तुंबलेला गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्जन्य वाहिन्या विभागाने बाह्या सरसावल्या आहेत.