२०१८ मध्ये ‘श्रावणक्वीन’ झालेली आयुषी भावे हिने मॉडेलिंगसोबतच अभिनयातही आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय, ‘रूपनगर के चित्ते’, ‘जोगी’ या हिंदी चित्रपटांतही ती झळकली होती. मूळत: नृत्यांगना असणार्या आयुषीने अभिनय क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली. सध्या ती ‘१०:२९ की आखरी दस्तक’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असून याच निमित्ताने आयुषी भावे सोबत ‘दै. मुंबई तरुण भारत’ने साधलेला सुसंवाद.
Read More
लावणी कलावंतांचे उपेक्षित जगणे समजून घेऊन त्यांच्या मुलांना जीवनाच ध्येय दाखवणार्या सुरेश राजहंस यांची ही गोष्ट! सुरेश राजहंस यांचा ‘सेवाश्रम’ हा प्रकल्प अशा तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी काम करतो. ‘सेवाश्रम’चा हा प्रवास लेखाच्या माध्यमातून उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न...
दोन दिवसांच्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या वगाचा ओझरता आढावा या लेखात घेतला आहे. वाचकांनी त्यावरून मुस्लीम मराठी साहित्याकारांच्या मनात डोकावण्याची संधी घ्यावी. मी तर म्हणेन की दोन समाजांमधील वैचारिक दुरी कमी करण्यासाठी हिंदूंनी मराठी मुस्लीम संमेलनांना उपस्थित राहावे.
प्रा.चंद्रकुमार नलगे यांच्या "महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव" आणि "पठ्ठे बापूरावांच्या शोधात" या पुस्तकांवर आधारित हा चित्रपट असणार
काही दिवसांपूर्वी झाली होती कोरोनाची लागण
तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०१८-१९ साठीचा हा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना घोषित करण्यात आला आहे.