programe

वाढवण बंदर : शाश्वत प्रगतीसह भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी खुला करणारा विकासमार्ग

वाढवण प्रकल्प हा बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा खासगी क्षेत्रातील भागीदारांच्या सक्रिय सहभागासह संयुक्त उपक्रम आहे. हे बंदर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या बंदराचा पहिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. हे बंदर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि पारगमन वेळ आणि खर्च कमी करेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असेल. या

Read More

एसआरए’च्या सदनिका विकण्याची मुदतमर्यादा कमी करणार; गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यांना प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका १० वर्षांच्या आत कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तथापि ही मर्यादा पाच वर्षापर्यंत कमी करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.

Read More

भारतात 'जंक फूड'च्या जाहिरातींवर बंदी येणार का? काय म्हणते WHO?

आजच्या धावपळीच्या ताणतणावयुक्त जीवनशैलीमुळे मनुष्याला आपले व आपल्या कुटुंबीयांचे शारीरिक स्वास्थ्य जपणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अस्वास्थ्यकारक आहार हा जागतिक आरोग्य चिंतेचा विषय बनत असताना, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मुलांसाठी जंक फूडच्या विपणनावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. मसालेदार अन्न, मैदा, जंक फूडच्या अतिसेवनामुळे पोटाशी संबंधित आजार होतात. यामुळे लठ्ठपणा येतो. पूर्वी हा आजार वयाच्या ७० व्या वर्षी यायचा. आता तो अवघ्या 30 व्या वर्षी दिसत आहे. जर तुम्ही संतुलित आहार घेतला तर पोटाशी संबंधित

Read More

ठाणेकरांनो! पाणी जपून वापरा! गुरुवार-शुक्रवार 'या' भागांत पाणी येणार नाही!

ठाणे : स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे शुक्रवार दि. २६ मे रोजी सकाळी ९ ते शनिवार दि. २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामे या अवधीत केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलले जाणार आहेत. या कामांसाठी हा २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121