सध्या सर्वत्र गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरण चांगलेच गाजत आहे. 1,039 कोटींच्या या घोटाळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाव आल्याने या घोटाळ्याने राजकीय वर्तुळात एक वेगळाच भूकंप केला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ‘ईडी’च्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या ‘गुरु आशिष कन्स्ट्रक्शन’ कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला. या घोटाळ्यामुळे अनेक नागरिक अ
Read More
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला असतानाच, संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.