मुंबई : लव फिल्म्सचा पहिला मराठी चित्रपट ‘देवमाणूस’, नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून उत्कट कथानकाने, उत्कृष्ट अभिनयाने, नेत्रदीपक दृश्यांनी आणि लोकप्रिय संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने सर्वत्र यशस्वी कामगिरी केली आहे.
Read More
लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने 'देवमाणूस' मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले असून त्यांच्या या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा सुरू असतानाच, या चित्रपटातील नवीन रोमँटिक गीत 'सोबती' प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मैत्रीला अर्पण केलेले हे हृदयस्पर्शी गीत आहे. 'सोबती' हे या चित्रपटातील तिसरे गाणे असून, याआधी 'पांडुरंग' या भावस्पर्शी गाण्याने आणि 'आलेच मी' झगमगत्या लावणीने रसिकांची मने जिंकली आहेत.
देवमाणूस मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत हे लवकरच साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दर्याचं पाणी’ या कोकणी गीतात एकत्र दिसणार आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर दर्याचं पाणी या गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. अलिबागच्या नयनरम्य समुद्र किनारी या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून श्रद्धा दळवी हिने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्य
भारताच्या निवडणुकांमध्ये सातत्याने परकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा अरोप होत असतो. विरोधी पक्षाचे अनेक मुद्दे हे बाहेरून आलेले असल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे. देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याला मिळणारी रसद अमेरिकेच्या ‘युएसएड’ कडून मिळत असल्याचे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने जाहीर केल्याने, अनेकांचे बुरखे फाटले आहेत...
तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट "देवमाणूस" ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच १२ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके अशा ह्या दिग्गज आणि पॉवरहाऊस कलाकारांचे वैशिष्ट्य असलेले पोस्टर्स चाहत्यांना सिनेमात असलेल्या त्यांच्या प्रभावशाली स्वरूपाची एक झलक देतात जे नक्कीच उद्या रिलीज होणाऱ्या बहुप्रतिक्षित "देवमाणूस" टीझरच्या अपेक्षा वाढवतात.
(Rahul Gandhi) इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र अर्थात ईव्हीएम हॅकिंगचा आरोप फसल्यानंतर आता मतदारयादीत घोळ असल्याचा नवा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
विधानसभा निवडणूकीनंतर अनेकांकडून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली असतानाच आता सांगली जिल्ह्यातील बहे गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर बहिष्कार टाकला आहे. त्यांच्याकडून मतपत्रिकेवर निवडणूका घेण्याचा ठराव करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
निसर्गाची किमया ही निराळीच. निसर्गाने पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला एकमेकांशी बांधून ठेवले आहे. त्यामुळे, साहजिकच प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे एखाद्या प्राण्याची टाकाऊ गोष्टदेखील दुसर्यासाठी लाखमोलाची असते. देवमाशाची उलटी ( Whale Vomate ) हा तसाच एक प्रकार होय!
विरोधकांकडून करण्यात येणारे ईव्हीएमचे आंदोलन हे आता केवळ फोटो काढण्यापुरते राहिले आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यांनी शनिवार, २५ जानेवारी रोजी कोराडी येथे माध्यमांशी संवाद साधला.
तेजस देऊस्कर दिग्दर्शित देवमाणूस या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या एक से एक कलाकारांच्या टीम मध्ये आता अभिनेते सुबोध भावे सामील झाले आहेत. अभिनेता सुबोध भावे, महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दिग्गज कलाकारांसोबत यंदा स्क्रीन शेअर करणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे.
नागपूर : विरोधी पक्षातील सर्व आमदार ईव्हीएमवर निवडून आले. त्यामुळे आधी त्यांनी राजीनामा द्यावा आणि नंतर बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी करण्याचे धाडस करावे, असे उत्तर आमदार अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar ) यांनी दिले आहे. मंगळवार, १७ डिसेंबर रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, उबाठा गटाचे नेते सुनील प्रभू यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. यावर भातखळकरांनी उत्तर दिले.
EVM एकीकडे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मविआचे नेते ‘ईव्हीएम’वरुन ‘हात’चलाखी करीत असताना, ‘इंडी’ आघाडीतील त्यांच्याच मित्रपक्षांपैकी नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्ला आणि तृणमूल काँग्रेसच्या अभिषेक बॅनर्जी यांनी ‘ईव्हीएम’वरुन काँग्रेसच्या रडारडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, त्यांच्या भूमिकेला सुरुंग लावला आहे. त्यामुळे अदानी प्रकरणाप्रमाणेच ‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावरही आता एकाकी पडल्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल.
गेले अनेक वर्ष मराठी आमि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात प्रतिष्ठित कलाकार आपल्या सर्वांचे आवडते म्हणजेच महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे, त्यांच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत प्रथमच एका आगामी मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ साठी एकत्र येत आहेत.
मुंबई : “इव्हीएम ( EVM ) मशीनविरोधात आंदोलन करणे, हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला विरोध आहे. जनतेने विचार करून महायुतीला निवडून दिले आहे. त्यांना तुम्ही एवढे अडाणी कसे समजू शकता?” असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांना केला आहे. शनिवार, ७ डिसेंबर रोजी आपल्या ’एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
ईव्हीएम मशीनविरोधात आंदोलन करणे हा तर भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या घटनेला विरोध आहे. जनतेने विचार करून महायुतीला निवडून दिले आहे. त्यांना तुम्ही एवढे अडाणी कसं समजू शकता? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांना केला आहे. शनिवार, ७ डिसेंबर रोजी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये महायुतीला अभूतपूर्व यशही प्राप्त झाले. मग काय प्रथेप्रमाणे विरोधकांनी इव्हीएमच्या नावाने आपले जुनेच रडगाणे पुन्हा एकदा सुरू केले. वस्तुतः इव्हीएमबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत स्वायत्त घटनात्मक संस्थांनी वेळोवेळी विरोधकांचे कान पिळलेले असूनही, वारंवार तेच तेच आरोप करण्यात विरोधक धन्यता मानताना दिसतात. महाराष्ट्रातही आता मोठ्या प्रमाणावर विरोधकांकडून इव्हीएमविषयीच्या अपप्रचाराची मोहीम सुरु दिसते. त्यानिमित्त
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी हे गाव गेल्या तीन-चार दिवसांपासून भलतेच चर्चेत आहे. या गावातील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा घाट घातला होता. आता कोणालाही प्रश्न पडेल की, हे सगळे पराभूत उमेदवाराचेच कारस्थान असावे. पण, नाही, हा सगळा डाव रचला तो चक्क विजयी उमेदवारानेच. माळशिरस मतदारसंघातून विजयी झाले ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आ. उत्तमराव जानकर. त्यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा १३ हजार, १४७ मतांनी पराभवदेखील केला. म्हणजे हा फरक थोडाथोडका, शे-दोनशेचाही नसून, दहा हजारांहून
'ईव्हीएम' हॅक करणे कोणत्याही परिस्थिती शक्य नसल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokkalingam यांनी दिली.
(Markadwadi) माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याबाबत घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांनंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतला. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर मारकडवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन जानकरांनी आपला निर्णय माध्यमांसमोर मांडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने या गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
संजय राऊत महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाला 'दळभद्री' म्हणत आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल दळभद्री आहे का? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना केला आहे. राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी रविवारी आपल्या 'X' अकाऊंटवरून प्रत्युत्तर दिले.
EVM मुस्लिमबहुल भागांमध्ये महाविकास आघाडीने इव्हीएम सेट कशा केल्या होत्या? असा सवाल आता महायुतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे. बाबा आढाव यांनी इव्हीएम घोटाळ्यावर भाष्य केले होते. त्यांनी केलेल्या आरोपावर आता सदाभाऊ खोत यांनी प्रतिसवाल केला आहे.
महाराष्ट्रामधील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपला पराभव मान्य करायचाच नाही असा चंग बांधला आहे. पराभवाच्या धक्क्यानंतर, ईव्हीएम वर खापर फोडून स्व:ता नामनिरळे होण्याचा प्रकार आघाडीतल्या नेत्यांनी सुरू केले आहे. अशातच आता एका कथित स्टींग ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सय्यद शुजा या युवकाने असा दावा केला आहे की ईव्हीएम मशिन हॅक करून कुठल्यातरी एका पक्षाच्या पारड्यात तो जास्त मतं टाकू शकतो.
पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरु असून लवकरच मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला उत्तर मिळेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. राज्यभरात सध्या मुख्यमंत्री कोण होणार अशा चर्चा सुरु असताना फडणवीसांनी मंगळवारी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
मुंबई : ईव्हीएमवर संशय व्यक्त करणाऱ्या विरोधकांना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. विरोधकांनी आता रडीचा डाव खेळू नये.
मुंबई : मतदानानंतरही ‘ईव्हीएम पॉवर पॅक’स्थिती ( EVM ) ९९ टक्के दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या वस्तुस्थितीजन्य असल्याचे १७२-अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. आदित्य ठाकरेंनी ( Aditya Thacheray ) मात्र, आपला वरळी हा मतदार संघ अवघ्या आठ हजार मतांनी राखला आहे. निवडणूकीच्या विजयानंतर त्यांनी निकालासंदर्भात प्रतिक्रीया दिली. "आजच्या निकालाने आमचा अपेक्षाभंग झाला. आता यात ईव्हीएमने किती प्रचार केला, ते पहावं लागणार आहे," असे म्हणत त्यांनी निकालाचे खापर ईव्हीएमवर फोडले.
हरियाणामध्ये वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) बॅटरी खराब होती, त्यामुळेच आमचा पराभव झाला; असे रडगाणे काँग्रेस पक्षाकडून सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतच्या आजवरच्या प्रवासात नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा, तसेच महाराष्ट्रातल्या घरोघरी आपली 'देवमाणूस' ही ओळख निर्माण करणारा किरण गायकवाड एका नव्या रूपात समोर येणार आहे. 'नाद - द हार्ड लव्ह' या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटात किरणचं कडक रूप पाहायला मिळणार आहे. 'नाद' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत देत या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. मोशन पोस्टरवरील किरणची भेदक नजर 'नाद' करायचा नाय असंच जणू सांगत असल्य
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम छेडछाडीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अर्ज केलेल्या असंतुष्ट उमेदवारांना निवडणूक आयोगाने अनेक पर्याय दिले आहेत. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, लोकसभेच्या आठ उमेदवारांनी आणि विधानसभेच्या तीन उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या मेमरी/मायक्रोकंट्रोलरच्या फेर तपासणीसाठी अर्ज केला होता.
काँग्रेस नेते राहुल गांधी, उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि यूट्यूबर ध्रुव राठी यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेत या नेत्यांवर ईव्हीएमबाबत खोट्या बातम्या पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
१८व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीचा निकाल लागूनही उद्या महिना होईल. संसदेतही घमासान अपेक्षेप्रमाणे सुरू आहेच.
महाविकास आघाडी म्हणजे खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याची कोटा फॅक्टरी आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शिवसनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर आता केशव उपाध्येंनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
आमच्याच पक्षाने ईव्हीएम आणले होते, ते सुरू झाले तेव्हा सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा होत्या, असे सांगत काँग्रेस ज्येष्ठ नेते लक्ष्मण सिंह यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले, निवडणूक काळात काँग्रेसने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप भाजपवर केला होता. त्यावर आता काँग्रेस नेत्याकडूनच स्पष्टीकरण आले आहे.
जगातील सर्वात आधुनिक देश असलेल्या अमेरिकेत आजही जुनाट पद्धतीने मतपत्रिकेवर शिक्का मारूनच मतदान केले जाते. तेथे क्वचितच ‘ईव्हीएम’चा वापर केला जातो. तेथील ‘ईव्हीएम’ कशी आहेत, त्याची भारतातील कोणालाही माहिती नाही. भारतीय ‘ईव्हीएम’ची कार्यक्षमता आणि अचूकता आजवर असंख्य वेळा तपासून आणि सिद्ध करून झाली आहे. म्हणूनच मस्क यांच्या ‘ईव्हीएम’वरील शेरेबाजीला काडीइतकेही महत्त्व नाही. उलट, त्यांच्या विधानाला पाठिंबा देऊन विरोधकांनी आपला बौद्धिक नादानपणा उघड केला आहे, हेच खरे!
लोकसभा निवडणुकीविषयी संशयाचे वातावरण का निर्माण केले जाते आणि त्यामागे कोण आहेत, याचे उत्तर लवकरच देण्यात येईल; असे प्रतिपादन मुख्य केंद्रीय आयुक्त राजीव कुमार यांनी केले आहे.लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशाची राजधानी दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही आपल्या कुटुंबियांसोबत मतदान केले. यावेळी त्यांनी देशातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत चालत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेविषयी दिशाभूल करण्याच्या प्रकारावरही त्यांनी उत्तर
१८व्या लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर ते आता अखेरच्या दोन टप्प्यांतील मतदान शिल्लक असताना, देशातील अराजकतावादी कायद्याच्या माध्यमातून आपला अजेंडा राबविताना दिसतात. निवडणूक रोखे, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि आता मतदानाच्या अंतिम आकडेवारीविषयी जाणीवपूर्वक होणारी संभ्रमनिर्मिती, हे देशविरोधी इकोसिस्टीमचे व्यापक षड्यंत्र उधळून लावायला हवे!
राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान, नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी सकाळी मतदान केल्यानंतर ईव्हीएमला हार घातला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
राज्यात १३ मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदान सुरु असून नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला हार घातल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असताना, ईशान्य मुंबईत उबाठा गटाकडून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रकार सोमवार, दि. २० मे रोजी उघडकीस आला. ईव्हीएम मशिनवरील नेमके कोणते बटन दाबावे, याचे प्रात्यक्षिक मतदान केंद्राबाहेर डमी मतदान यंत्राद्वारे उबाठा गटाकडून सुरू होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
देशाच्या डिजिटल क्रांतीचा प्रत्यय राजकीय पक्ष आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेत यंदाही प्रकर्षाने दिसून आला. सोशल मीडियावरील प्रचारापासून ते अगदी ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या डिजिटल प्रचारानेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. केंद्रीय निवडणूक आयोगानेही काळाची पावले ओळखत, ‘सी व्हिजिल’, सक्षम, केवायसी, ‘व्होटर हेल्पलाईन’सारखे अनेक मोबाईल अॅप्लिकेशन्सदेखील मतदारांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. त्यानिमित्ताने निवडणुकीच्या या ‘डिजिटल’ महोत्सवाचे असेच काही पैलू उलगडणारा हा लेख...
राज्यात सध्या लोकसभा निवडणूकीची रणधूमाळी सुरु आहे. सोमवारी सकाळी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतू, छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास २५ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले होते.
ईव्हीएम - व्हीव्हीपीएटी (वोटिंग स्लिप डिस्प्ले मशीन) पडताळणीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ संबंधित सर्व याचिका फेटाळून लावल्या. याशिवाय बॅलेट पेपरच्या मागणीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकाही रद्द करण्यात आल्या आहेत. ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केले जाईल आणि ईव्हीएम-व्हीव्हीपीएटीमध्ये १०० टक्के जुळवणी होणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
आपल्या अपयशाला कारणे देण्याची सवय असणे हा मानवी स्वभावाचा गुण आहेच. पण कारणे देताना किमान त्या कारणांमुळे एका व्यवस्थेच्या विश्वासावर प्रश्न उपास्थित होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असते, नाहीतर यातून होणारे नुकसान मोठे असते. पण यासाठी लागणारा विवेकच नसल्याने, ‘ईव्हिएम’वर बेमालूम टीका सुरुच असते. ‘ईव्हीएम’ची सत्यकथा या लेखातून जाणून घेऊया..
इव्हीएम’च्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. एवढेच नाही, तर भारतात राबविली जाणारी प्रचंड व्यापक निवडणूक प्रक्रिया युरोपीय देशांनाही पेलवणारी नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. त्याचबरोबर कुणाचा ‘ईव्हीएम’वर विश्वास नाही, म्हणून ही संपूर्ण यंत्रणा खाली खेचण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांना सुनावले.
या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव होणार आहे हे आता त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आधीच इव्हीएमबद्दल बोलणं सुरु केलं आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ते रविवारी माध्यमांशी संवाद साधत होते.
आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आयुष्यभर ईव्हीएमचा जप करावा लागणार आहे, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळाल्यानंतर ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत होता. तसेच एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. यावर आता किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे, असा टोला आता महाराष्ट्र भाजपाने एक्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर लगावला आहे.
मालेगाव : " हिंदुत्वाच्या विषयी भाजपाची भूमिका बदलेली नाही. भारतात राहणारा व भारतीय संस्कृतीवर विश्वास प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्माचा असेल तो भाजपा कुटुंबाचा सदस्य आहे. आमचे अनेक नगरसेवक मुस्लिम आहेत. काही खासदार होते. भाजपा मुस्लिम विरोधी असल्याची शंका निर्माण केली जाते, विरोधक जाणीवपूर्वक प्रचार करतात. एनआरसीविषयी देखील असेच झाले होते. " भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे मालेगाव (नाशिक ) येथे पत्रकारांशी बोलत होते.
भाजप विरोधात मविआतील नेत्यांनी एकत्र येऊन वज्रमुठसभा घेतली. पण, त्यानंतरही आघाडीत मतभेद दिसुन येत आहेत. यावर भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. "ही कसली वज्रमुठ, ही तर बनवाबनवीची झाकली मुठ." असे उपाध्ये म्हणाले.