दि. १५ ऑगस्ट २०२५ पासून शासनाच्या सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणार नाही, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिला.
Read More
( Implementation of Pratyay online system under the guidance of Revenue Minister Chandrashekhar Bawankule ) राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने आज प्रत्यय ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू महसूल विभागाने आज महत्वाकांक्षी पाऊल टाकले.
हल्लीचा जमाना हा ऑनलाईन खरेदीचा. तरीही ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांचे हक्क, अधिकार यांच्याविषयीची जागरुकता अभावानेच दिसून येते. पण, ई-कॉमर्सच्या युगात ग्राहकांनी खरेदी करताना खबरदारी घेण्याबरोबरच, आपले हक्क समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे. आज ‘जागतिक ग्राहक दिना’निमित्ताने याबाबतचा घेतलेला सविस्तर आढावा...
मुंबई : सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. हा विभाग सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतो. त्यामुळे मराठी चित्रपटाचे सर्व चलछायाचित्रण मोठ्या प्रमाणात गोरेगाव येथील चित्रनगरीत व्हावे यासाठी आकारण्यात येणारे दर कमी करावे. कुठल्याही निर्मात्याला महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यासाठी एक खिडकीद्वारे ( Ek Khidki ) तात्काळ ऑनलाईन परवानगी देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या २६,००० घरांच्या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस १० जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत २६,००० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २२६४ सदनिकांच्या विक्रीकरिता जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. ०६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
सिडकोच्या बहुप्रतिक्षित 'माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेसाठी केवळ चोवीस तासात बारा हजार अर्ज प्राप्त झाले आहे. दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू झालेल्या या योजनेच्या पहिल्या २४ तासांतच १२,४०० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ११ ऑक्टोबर रोजी वाशी, नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गटासाठीच्या या या योजनेचे उदघाटन करण्यात आले.
संगणकापासून ते अगदी भाजीपाल्यापर्यंत ऑनलाईन वस्तूंची खरेदी ही आता भारतीयांच्या सवयीचा एक अविभाज्य भाग. त्याच पठडीत पुस्तकांचीही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी-विक्री जगासह भारतातही होताना दिसते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी ‘ऑनलाईन सेल’ झळकणार असून, यादरम्यान पुस्तकांवरही मोठ्या प्रमाणात सवलती पाहायला मिळतात. त्यानिमित्ताने भारतातील ऑनलाईन पुस्तक खरेदी-विक्रीच्या वाढत्या प्रमाणाविषयी विविध पुस्तके विक्री करणारी संकेतस्थळे, काही प्रकाशन संस्था आणि वाचक यांच्या प्रतिक्रियांचा घेतलेला हा कानोसा...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाल्यापासून त्यासाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी गर्दी केलीये. राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणं आणि त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आलीये. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. दरम्यान, या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे जाणून घेऊया.
मुंबई महापालिकेने अर्थसहाय्य करून महिला बचत गटांना वेगवेगळ्या उत्पादनाच्या निर्मितीसाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिलेले आहे. आता महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने ग्राहकांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. महापालिकेने दिलेल्या संकेतस्थळावर दररोज नवनवीन उत्पादनांची भर पडत असून महिलांना रोजगार मिळत आहे.
सगळ्यांना ऑनलाईन व्यवहार करण्यात खूप सुलभता मिळते तसेच त्यांचे फायदे देखील आहेत इतके दिवस तुम्ही क्रेडिट कार्डबद्दल नक्कीच ऐकले असाल तर तुम्हाला सांगितले की वर्च्युअल क्रेडिट कार्डबद्दल सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
मुंबईकरांना तात्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी टाटा पॉवरने संपूर्ण डिजिटलाईज्ड सेवा सुरु करून ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्याच्या प्रक्रियेत क्रांती घडवून आणली आहे. या नव्या प्रक्रियेमुळे आता नवीन वीज जोडणी केवळ ७ दिवसांमध्ये मिळू शकते.
गर्दीच्या काळात लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ऑनलाईन आरक्षण सुविधा सुरु केली आहे. या अदयावत आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. ही प्रणाली सुरू झाल्यापासून पाच महिन्यात १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची ऑनलाईन विक्री झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
दि. ०१ नोव्हेंबर २०२३ ते दिनांक ०५ मार्च २०२४ या कालावधीत हयातीचे दाखले सादर न करणा-या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सोमवार, दिनांक ०६ मे पर्यंत हयातीचे दाखले बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन – आय.बी.) विभाग येथे ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत अथवा, केंद्र शासनाच्या ‘जीवनप्रमाण'या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दि. ११ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी केल्यानंतर देशभरात या कायद्याबाबत चर्चा करण्यात येत आहे. आता अधिसूचना जारी केल्यानंतर भारतीय नागरिकत्वासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
भारत सरकारने नुकतेच ‘चक्षु’ नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले. या माध्यमातून नागरिक व्हॉट्सअॅप, एसएमएस अशा कोणत्याही माध्यमातून सायबर गुन्ह्यांची तक्रार करू शकतील. त्याविषयी...
ऑनलाईन लॉटरीचे हफ्ते सरकारला जात आहेत की, संजय राऊतांना मातोश्रीसाठी हफ्ते जमा करायचे आहेत याबद्दलचे पुरावे माझ्याकडे येत आहेत, अशी माहिती भाजप आमदार नितेश राणेंनी दिली आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना ऑनलाईन लॉटरी आणि जुगारासंदर्भात पत्र लिहीले. याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT), दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. बी.ए., बी.कॉम., एम.ए. आणि एम.कॉम. या दूरस्थ शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी शुक्रवार, दिनांक २३/०२/२०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
व्हॉट्सअप, टेलिग्राम आदी ‘ॲप’द्वारे जुगार खेळला जातो तेव्हा ‘ॲप’मध्ये शिरून कारवाईस मर्यादा येते. याविषयीच्या तक्रारी केंद्रशासनाकडेही प्राप्त झाल्या आहेत. सामाजिक प्रसारमाध्यमांचा ‘डेटा’ उपलब्ध झाल्यास अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणता येईल. त्यामुळे सामाजिक प्रसारमाध्यमांचा ‘डेटा शेअरींग’साठी केंद्रशासन कायदा करण्याच्या विचारात आहे. लवकरच याविषयीचा कायदा येईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी ऑनलाईन गेमिंग ॲपवर चर्चा पार पडली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भुमिका स्पष्ट केली. यावेळी ऑनलाईन गेमिंग प्रकरणी स्वतंत्र कायदा तयार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
ऑनलाइन गेमींगला ‘कौशल्याचे गेम’ (गेम ऑफ स्किल) असे लेबल चिकटवून करचोरी करणाऱ्यांना आता चाप लागणार आहे. राज्य सरकारने या प्रकारांची गंभीर दखल घेतली असून; शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी जीएसटी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाइन गेमींग चालकांना यापुढे १८ ऐवजी २८ टक्के कर भरावा लागणार आहे.
भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला असला तरी, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विश्वचषकाचे आयोजन खुप फायदेशिर ठरला आहे. विश्वचषकादरम्यान, देशातील मद्य, विमान वाहतूक आणि ऑनलाईन फूड डिलव्हरी कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. विश्वचषकादरम्यान, फूड डिलव्हरी कंपन्यांच्या ऑडर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
देशातील प्रसिद्ध फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी कंपनीला एका डिलिव्हरी ऑर्डर मागे किती रुपयांची कमाई होते याचा खुलासा केला आहे. त्यांनी ही माहिती युट्यूबर रणवीर अल्लाबदिया यांच्या 'द रणवीर शो' या कार्यक्रमात दिली.
यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी मोठी खरेदी केली आहे. सणासुदीच्या हंगामातील विक्रीमुळे ईकॉमर्स कंपन्यांना आणि ऑनलाइन ब्रँडच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. ज्यात इलेक्ट्रॉनिक्स, खाद्यपदार्थ, किराणा आणि दागिने यासारख्या श्रेणींनी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ नोंदवली आहे.
हाऊसिंगडॉटकॉम या भारतातील डिजिटल रिअल इस्टेट प्लॅटफॉर्मने गृहकर्ज प्रवासाचे डिजिटायझेशन करण्यावर लक्ष केंद्रित करणारी फिनटेक स्टार्ट-अप इझीलोन मध्ये धोरणात्मक गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. विशिष्ट गुंतवणूक रक्कमेबाबत अद्याप खुलासा करण्यात आला नसला तरी या सहयोगाचा भारतातील सर्वात मोठा डिजिटल गृहकर्ज उत्पत्ती प्लॅटफॉर्म निर्माण करण्याकरिता हाऊसिंगडॉटकॉमच्या योजनांसाठी पाया रचण्याचा मनसुबा आहे.
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल व्यासपीठाने आज एम्बेडेड संरक्षणासाठी इन्शुअरटेक कव्हर जिनियससोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली. कव्हर जिनियसचे पुरस्कार-प्राप्त जागतिक वितरण व्यासपीठ एक्सकव्हरला समाविष्ट करत इझमायट्रिपचे ग्राहक त्यांची तिकिटे बुक करताना कॅन्सल फॉर एनी रिजन (सीएफएआर) ट्रॅव्हल प्रोटेक्शनसह एम्बेडेड सर्वसमावेशक ट्रॅव्हल प्रोटेक्शनचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकांना एक्सकव्हरच्या एण्ड-टू-एण्ड ग्राहक अनुभवामधून फायदा मिळेल, जे सुरूवातीच्या सेलपासून व
महिलांना कौशल्य-विकास आणि उद्योजकतेच्या संधी प्रदान करण्यासाठी काम करणारा स्किलटेक प्लॅटफॉर्म हुनर ऑनलाईन कोर्सेसने भारतात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या एका कार्यक्रमात हुनर ऑनलाईन कोर्सेसने गुंतवणूकदार शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्यासह २८ राज्यांमध्ये ५५००० पेक्षा जास्त महिला उद्योजिकांना तयार करण्याच्या आपल्या वाटचालीचा तसेच भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोण्याच्या यशाचा आनंद साजरा केला.
प्रलोभने या जगात ठायी ठायी आहेत-स्नॅक करण्याचा मोह, तुमचा व्यायाम वगळण्याचा मोह, आवेगाने उगाचच ऑनलाईन खरेदी करण्याचा मोह. या प्रलोभनांवर मात करण्यासाठी आपल्याला इच्छाशक्तीवर विसंबून राहायचे असले तरी, तुमच्याकडे दररोज असलेली इच्छाशक्ती खरे तर मर्यादित आहे. विविध प्रलोभनांचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही करू शकता अशा काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. काही गोष्टी करण्याच्या वा गुंतण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्याची तुमची लढाई चांगले परिणाम देत नसल्यासारखे वाटत असल्यास, इतर कोणाची तरी मदत घ्या.
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज आणि अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये कपडे, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ९०% पर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास अजून वेगळी सूट मिळणार आहे.
डीजिटल लॉकर योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या सुविधेमुळे नागरिकांना कुठेही जाताना त्यांचे सर्व महत्त्वाचे कागदपत्र मोबाईलमद्धे डिजीटल लॉकरच्या माध्यमातून ऑनलाइन स्वरूपात ठेवता येणार आहेत.
ईडीकडून मुंबईसह विविध राज्यांमध्ये ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित ही छापेमारी करण्यात आली आहे. टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत.
म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेच्या "गो लाईव्ह" कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते आज करण्यात आला. कोंकण मंडळाच्या सोडतीमध्ये १०१० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत.
ऐन गणशोत्सवाच्या मुहूर्तावर ई-कॉमर्स व्यवसायातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनने कॅश ऑन डिलिव्हरीवर २००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत अपडेट जारी केले आहे. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून विविध ऑफर किंवा किंमतीत सवलत दिली जाते. त्यामुळे ग्राहक वस्तू खरेदीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना पसंती देतात. त्यातच आता अॅमेझॉनकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून दि. १९ सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटांची कॅश डिलिव्हरी घेणार नाही.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून शतकीय महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या भारताने चंद्रयान- ३ चे यशस्वी उड्डाण केले. या विज्ञानविषयक विचारधारेला प्रोत्साहन देण्यासाठी टिंकर टाईम संस्था व व्यास क्रिएशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहली उडान या ऑनलाईन विमानशास्त्र शैक्षणिक उपक्रमाने विश्वविक्रम नोंदवला.
देशात रोजगाराच्या संधी निर्माण होत असतानाच आता एका मोठ्या शालेय शिक्षण ऑनलाईन पध्दतीने देणाऱ्या कंपनीकडून नोकरकपात करण्यात येत आहे. बायजू या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरून नोकरकपात करण्यात येत आहे. दरम्यान, देशभरातील जवळपास ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी 'बायजू'ने आपल्या ४०० कर्मचाऱ्यांना रेजिगनेशन देण्यात आले आहे.
काही कालावधीतच पुन्हा जीएसटी (गुड्स आणि सर्विस टॅक्स) काऊन्सिलची बैठक पार पडली.जीएसटीचे नवा मूल्यांकन विचार करण्यासाठी या आँनलाईन बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.आँनलाईन गेमिंग क्षेत्राच्या बेट्स उत्पन्नावर ऑक्टोबर पासून २८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे.चालू असलेल्या पार्लमेंटच सत्रात यासंबंधीची तरतूद करण्यात येईल असे बुधवारी अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आले.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून आता बातम्या शेअर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबतच, न्यूज पोर्टलच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या बातम्यांच्या लिंक्स हटवण्यास मेटाने सुरूवात केली आहे. कॅनडामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
ऑनलाईन गेमिंग, धर्मांतर प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. रोज एक नवी घटना समोर येत आहे. शिवाय, मणिपूर प्रकरणावरही विरोधक आक्रमक भुमिका घेत आहेत. या सर्व विषयांवरुन आ. नितेश राणेंनी विरोधकांना आरसा दाखवला. मणिपूर प्रकरणावर राजकारण करणाऱ्यांना ही त्यांनी सुनावलं. मणिपूरच्या घटनेच्या संदर्भात घटना निषेधार्यच आहे, कोणच समर्थन करू शकत नाही. विरोधकांना महिलांच्या संदर्भात चिंता आपल्याला वाटते, पण ही खरंच प्रामाणिक भावना आहे का? असा थेट सवाल राणेंनी उपस्थित केला.
ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने पुण्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे राहणारी गणेश कलंदाते नामक व्यक्तीने जंगली रमीमध्ये ऑनलाईन २० हजार रुपये गुंतवले होते, त्यात त्याला नुकसान सहन करावे लागल्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. गणेश कलंदाते हा एक कॅब चालक असून त्याला मद्यपानाचे व्यसन होते. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादप्रमाणेच आता राजस्थानमध्येही ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. अलिगढचा तैयब खान फ्री फायर गेमद्वारे सीकरमधील एका हिंदू महिलेच्या संपर्कात आला. त्यानंतर तिचे ब्रेनवॉश करून धर्मांतर करण्यात आले. यानंतर पीडितेने सिंदूर आणि बिंदी लावणे बंद केले. ती नमाज अदा करू लागली. तसेच तिचे हर्षिता हे नाव बदलून हानिया ठेवण्यात आले.
ऑनलाईन धर्मांतरणाचा सूत्रधार शाहनवाज खान गाझियाबाद पोलिसांच्या ताब्यात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढतीलच. ‘लव्ह जिहाद’ व ‘लँण्ड जिहाद’ पेक्षाही ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतरण अधिक घातक आहे. हे रॅकेट थेट तुमच्या घरात घुसणार आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा.
मुंबई : म्हाडाच्या ऑनलाईन सोडतींसाठी अर्जदारांना अधिक सुलभतेने अर्ज सादर करता यावा, याकरिता म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे दिनांक १७ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता लाईव्ह वेबिना
ठाणे : ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातुन ’मोबाईल जिहाद पुकारणारा आरोपी मुंब्य्रातील असल्याचे उघड झाल्यानंतर आता आणखी एका धर्मांतर प्रकरणातील आरोपीही मुंब्य्रातीलच असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंब्रा धर्मांध कट्टरपंथीयांसाठी आश्रयस्थान ठरू लागले असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाल्याचे म्हटले जात आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ऑनलाइन गेमिंगद्वारे अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्येही करिअर गाईडन्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण तसेच धर्म परिवर्तनाचे धडे जात असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र घटनास्थळी जात हा प्रकार हानून पाडला. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याने संतप्त पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस स्थानकात दाखल होत पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दोन अल्पवयीन मुलांचे धर्मांतराचे विचित्र प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात त्या दोन मुलांचे ऑनलाइन गेमच्या नावाखाली धर्मांतर केलेच नाही तर त्यांना पाचवेळा नमाज पढायला लावले. हा प्रकार त्यांच्या घरच्यांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा खुलासा केला तेव्हा ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
विशेष प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतातील ऑनलाइन गेमिंगचे नियमन करणाऱ्या कायद्यांमध्ये मोठे बदल केले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, देशात विशिष्ट ऑनलाइन गेम चालवायला द्यायचा की नाही, हे ठरविण्याची जबाबदारी सेल्फ रेग्युलेटरी आर्गनायझेशनवर (एसआरओ) सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकारने देशात ऑनलाइन बेटिंग आणि जुगारावरील जाहिरांतीवरही बंदी घातली आहे.
चित्रपट आणि मालिकांचे कथा, संवादलेखन, पटकथा लेखन कसे केले जाते? लेखन कसे, केव्हा, कुठे, कधी करायला हवे, या विषयावर ’जागो मोहन प्यारे’, ’एक घर मंतरलेलं’, ’येऊ कशी तशी मी नांदायला’, ’नकुशी’, ‘वैजू नंबर वन’, ’तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांचे पटकथा लेखक तसंच ’जिंदगी नॉट आऊट’, ’शुभमंगल ऑनलाईन’, ’कन्यादान’, ‘भाग्य दिले तू मला’, ’खाद्यभ्रमंती’ मालिकेचे संवादलेखक त्याचबरोबर ’पुष्पक विमान’ आणि ’खारी बिस्कीट’ चित्रपटाचे कथा, पटकथा आणि संवादलेखक अशा अनेक भूमिका बजावलेले चेतन सैन्दाणे यांच्याशी खास बातचीत...
नुकतीच केंद्र सरकारने सोशल मीडियावर उत्पादन अथवा सेवांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जाहिरातबाजी करणार्या ‘इन्फ्ल्युएन्सर्स’, सेलिब्रिटींसाठी नवीन नियमावली जारी केली. तेव्हा, नेमक्या या नियमावलीची गरज काय होती आणि अशा लपवाछपवीतून होणार्या ऑनलाईन कमवाकमवीला कसा चाप बसेल, त्याचे आकलन...
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मोठे नाव असलेली रुपी बँक आता इतिहासजमा होणार आहे. रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केला असल्याने आता २२ सप्टेंबर पासून रुपी बँकेचा व्यवसाय बंद करावा लागणार आहे. आर्थिक गैरव्यवहार, व्यवसायातले अनियमितता, वाढते बुडीत कर्ज यांनी ग्रासलेल्या या बँकेवर रिझर्व्ह बँकेने अखेर कारवाई केली. अनेकदा नोटिशी बजावून सुद्धा,प्रशासकामार्फत व्यवसाय सुधारण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा रुपी बँकेच्या आर्थिक स्थितीत काहीच फरक पडला नाही आणि अखेर १० ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने रूपे बँके
'अशा' लोकांना वठणीवर आणायलाच हवं! : Raj Thackeray