भारताचा पॅरा ऑलिम्पिक संघ घवघवीत यश घेऊन परतला आहे. सध्या बुद्धीबळ आणि मुष्टीयुद्धाचे आंतराष्ट्रीय स्पर्धांचे वारे वाहत आहेत. तसेच या दोन्ही खेळांच्या एकत्रीकरणातून चेसबॉक्सिंग नावाचा नवीन क्रीडाप्रकार आला असून, भारताची स्नेहा वायकर त्यात अव्वल आहे. स्पर्धा ते राजकारण अशा क्रीडाक्षेत्राशी निगडीत घटनांचा घेतलेला हा आढावा..
Read More
पॅरा आलिम्पिक खेळाडू हरविंदर सिंगने पॅरिस पॅरा आलिम्पिकच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरात कोरले आहे. येथील पॅरा तिरंदाजीत पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनच्या अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा ६-० असा सरळसेटमध्ये पराभव करून सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज ठरला आहे. हरविंदरच्या सुवर्णपदकासह भारताच्या पदकांची संख्या आता २२ झाली असून यात ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि ११ कांस्य पदकांचा समावेश आहे.
रात तो वक्त की पाबंद है ढल जाएगी देखना ये है चरागो का सफर कितना है... पॅरिसमधील ‘स्टेड दी फ्रान्स’च्या अतिभव्य स्टेडियमबाहेर रात्री 2.30 वाजता नीरजशी बोलताना राहून राहून वसीम बरेलींच्या या शायरीची आठवण येत होती. मंद वाहणारा थंड वारा पहाटेची आगाज देत होता. नीरज आणि नदीम यांच्या ऐतिहासिक यशाने आशियाई पहाट उगवणार होती. पण त्यापूर्वी रात्रीच्या अंधारात या दोघांशी बोलताना काही गोष्टी काळजात सलत होत्या. नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 92.97 मीटरच्या ऑलिम्पिक विक्रमासहित भालाफेक करीत सुवर्ण पदक जिंकले आणि नीरजने रौप्
शील कुमारने जेव्हा लंडनमध्ये कुस्तीत सिल्व्हर मेडल जिंकले, तेव्हा अमन अवघा नऊ वर्षांचा होता. सुशीलची कुस्ती पाहून आपणही मोठेपणी कुस्तीत ऑलिम्पिकचे मेडल मिळवायचे, असा बालहट्ट त्याने आपल्या आईवडिलांकडे धरला. मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी हरयाणातील प्रसिद्ध छात्रसालमध्ये 10 वर्षांचा अमन कुस्तीचा श्रीगणेशा करण्यासाठी दाखल झाला.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने इतिहास रचला आहे. अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली असून आता भारताचं पदक निश्चित झालं आहे. विनेशचं सध्या लक्ष सुवर्ण पदकाकडे असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सध्या र्वच स्तरांतून सुरु आहे. काही वर्षांपुर्वी आमिर खानचा 'दंगल' चित्रपट हा फोगाट बहिणींवरच आला होता. गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांची विनेश ही चुलत बहीण. विनेशच्या या दमदार कामगिरीनंतर 'दंगल'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांनी व
पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळण्याची आशा लागली असताना आता भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. काही ग्रॅम वजन वाढल्यामुळे तिला या स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे.
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरविण्यात आले. ५० किलो वजनी गटात विनेश फोगाटचे १५० ग्रॅम वजन वाढल्याने तिला डिसक्वालिफाई करण्यात आले असून यावर आता देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वैसे तो इक आसूं ही बहाकर मुझे ले जाये ऐसे कोई तुफान हिला भी नही सकता... वसीम बरेलींचा हा शेर पॅरिस ऑलिम्पिकमधील रोलँड गॅरोसमध्ये अक्षरशः जगलो. टाय ब्रेकवर सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने स्पेनच्या कार्लोस अल्कराझविरुद्ध विजयी गुण वसूल केला आणि लाल मातीवर अश्रुंचा महापूर आला. एरव्ही कणखर वाटणारा 37 वर्षीय जोकोव्हिच लहान मुलासारखा ढसाढसा रडला. जिंकणारा जोकोव्हिच रडला अन् हरणारा कार्लोसही रडला आणि या दोघांचे अश्रू पाहून रोलँड गारोसवर उपस्थित प्रत्येक टेनिसप्रेमींच्या डोळ्यांत अश्रू दाटले. या अश्रूंत विजय
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून नवा इतिहास घडविण्याची संधी भारतीय संघाला असणार आहे. त्यातच आता भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पी आर श्रीजेशमुळे हे शक्य झाले असून याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स व्हायरल होत आहे.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण सध्या ऑलिम्पिकनिमित्त फ्रान्स दौर्यावर आहेत. ‘मिशन ऑलिम्पिक’मधून या क्रीडामेळ्यातील घडामोडीही ते दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून तमाम वाचकांपर्यंत पोहोचवित असतात. या दौर्यातून थोडी उसंत मिळताच संदीप चव्हाण यांनी लुव्र राजवाड्यातील फ्रान्सची राष्ट्रीय लायब्ररी गाठली. त्यांच्या या लायब्ररीच्या भेटीचे हे शब्दचित्रण...
सध्या देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष ऑलिम्पिकमधील क्रीडापटूंच्या कामगिरीकडे लागले आहे. पण, क्रीडा क्षेत्राची व्याप्ती केवळ विविध खेळांच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांपुरतीच मर्यादित नाही, तर यामागेही मोठे अर्थकारण सामावलेले आहे. तेव्हा, ऑलिम्पिकच्या या क्रीडापर्वाच्यानिमित्ताने क्रीडासाहित्य आणि एकूणच क्रीडाउद्योगाचा आढावा घेणारा हा लेख...
भारताला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक क्रीडाप्रकारातील ऑलिम्पिक पदक जिंकून दिले ते महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीची रगच न्यारी आहे. कुण्या कवीने म्हटले आहे, “वळून कुणी पाहिले नाही, म्हणून माळरानावरच्या चाफ्याचे अडले नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली म्हणून पठ्ठ्याने बहरणे सोडले नाही.”
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक मनू भाकरने जिंकले आहे. मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकले.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची सुरूवात गुरुवार, दि. २६ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे. फ्रान्सच्या राजधानीत १० हजारहून अधिक खेळाडू जमले असून सीन नदीवरील ऐतिहासिक ऑलिम्पिक सोहळ्याची तयारीही पूर्ण झाली आहे. दरम्यान, फ्रान्सच्या हायस्पीड रेल्वे मार्गांवर हल्ला करण्यात आला आहे.
फ्रान्समध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेसाठी भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) एलिट डॉग स्क्वॉड के-९ तैनात करण्यात येणार आहे. के-९ हे डॉग स्क्वॉड दि. १० जुलैला पॅरिसला रवाना झाले. हे पथक २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या विविध ठिकाणी सुरक्षा पुरवण्याचे काम करेल.
भारतीय खेळाडूंचे पथक पॅरिस ऑलिम्पिकसाठी रवाना होत आहे. त्याआधी पंतप्रधान मोदींनी शुक्रवार, दि. ५ जुलै २०२४ खेळाडूंची खास भेट घेतली आणि त्यांना विजयाचा मंत्र दिला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यावेळी भारताचे १२० खेळाडू सहभाग घेत आहेत. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताच्या १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने भालाफेकमध्ये नीरज चोप्राने मिळवलेल्या सुवर्णपदकासह एकूण सात पदके जिंकली होती. यावेळी भारतीय चाहत्यांना आपल्या खेळाडूंकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
खेळ मानवी जीवनात आनंद निर्माण करतात, त्यामुळे खेळायला सगळ्यांनाच आवडतं. पण शक्य होत नाही हे वास्तव. भारतात क्रिकेटची जेवढी चर्चा होते तितके महत्व इतर खेळांना मिळत नाही हे म्हणायचे दिवस गेले. आता प्रत्येक भारतीय ऑलिंम्पिकचे यश साजरे करतो. अशाच २०२४ च्या पॅरीस ऑलिंम्पिक Paris Olympics 2024 विषयी या लेखात जाणून घेऊया.
२०३६ साली ऑलिम्पिकचे यजमानपद भारताला मिळावे, यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेषत्वाने प्रयत्नशील आहेत. ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी गुजरातमधील अहमदाबाद शहरामध्ये ‘गॉलिम्पिक’ या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून विकासकामांची तयारीही वेगाने सुरु आहे. तेव्हा, ऑलिम्पिक सोहळ्याचे २०३६ साठीचे यजमानपद भारताला मिळालेच, तर त्यासाठी ‘गॉलिम्पिक’ने आजवर केलेल्या अहमदाबादमधील विकासकामांचा आढावा घेणारा हा लेख...
नुकत्याच पार पडलेल्या, १९ वर्षांखालील पुरूष क्रिकेट ‘विश्वचषका’च्या स्पर्धेतदेखील ऑस्ट्रेलियाने भारताला नमवले. त्यानिमित्ताने ऑस्ट्रेलियन मनुष्याच्या जीवनात खेळाला असलेले महत्त्व, त्याचप्रमाणे भारताची क्रिकेटमधील सद्यःस्थिती याविषयीचा आढावा घेणारा हा लेख...
महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिक पदकांचे ध्येय गाठण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मिशन लक्ष्यवेध' योजनेची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची आता पूर्तता झाली असून, महायुती सरकारने 'मिशन लक्ष्यवेध' योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १६० कोटी ४६ लाखांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) ने केलेल्या घोषणेनुसार ऑलिम्पिकमध्ये तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. २०२८ साली लॉस एंजेलिस येथे ऑलिम्पिकचे सामने भरवण्यात येणार असून टी २० स्वरूपात हे क्रिकेट सामने होणार आहेत. याशिवाय स्क्वॅश खेळालादेखील २०२८ च्या ऑलिम्पिक खेळाचा भाग बनवण्यात येणार आहे.
आपल्या देशात क्रिकेट अगदी सर्वदूर पोहोचलेला खेळ. या खेळामध्ये पुढे करिअर करावे, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. सामान्यतः क्रिकेट हा दहा देशांना अवगत आणि त्यांच्यामध्येच खेळला जाणारा खेळ. या खेळाची चर्चा मात्र सर्वदूर होत असते. भारतात क्रिकेटला राजकीय, सामाजिक आणि अनेक वादविवादाची किनार लाभते. याच क्रिकेटचा समावेश आता खेळाचा महाकुंभ असलेल्या ‘ऑलिम्पिक’मध्ये करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, १९०० नंतर प्रथमच क्रिकेटचा ‘ऑलिम्पिक’मध्ये समावेश करण्यात आला आहे. २०२८च्या ‘लॉस एंजेलिस ऑलिम्पिक’मध्ये क्रिकेटसोबतच
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी मुंबईत १४१व्या ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. २०३६ मध्ये भारत ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद भूषवण्यासाठी तयारी करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "२०३६ ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारत बोली लावेल. यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही. जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा देशात आणण्याचा भारताचा हा प्रयत्न आहे."
नारीशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. धार्मिक, सामाजिक ओळख असलेल्या, या उत्सवात गेल्या दशकापासून महिलांचा अधिकाधिक सहभाग महत्त्वपूर्ण असून केवळ देवी उपासना, व्रतवैकल्ये करीत असताना आजच्या नारी आता देवीमहात्म्यातील शक्ती उपासनेवर देखील भर देऊ लागल्या आहेत. किंबहुना, काळाचीदेखील तीच गरज म्हणावी लागेल. उत्सवातून आपल्या कलागुणांचे आणि संस्कृतीचे प्रदर्शन करताना भारतीयत्व अधोरेखित करण्याचा हा काळ...
हांगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताची देदीप्य कामगिरी राहिली असून आतापर्यंतची सर्वोत्तम पदकतालिका म्हणून गणली जात आहे. अशातच, भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले असून अंतिम सामन्यात जपानचा ४-१ ने पराभव केला. या विजयासह या विजयासह भारतीय संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. या दरम्यान त्याने हे सिद्ध केले की एक महान खेळाडू असण्यासोबतच तो एक महान माणूस देखील आहे. वास्तविक, एक महिला नीरज चोप्रा यांच्याकडे तिरंग्यावर ऑटोग्राफ मागण्यासाठी आली होती. पण तिरंग्याऐवजी त्यांने तिरंग्याचा मान राखत. टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला. त्याचवेळी सामना संपल्यानंतर पाकिस्तानी अॅथलीट अरशद नदीम ध्वजविना मैदानात दिसला. अशा स्थितीत नीरजने त्याला भारतीय झेंड्याखाली बोलावले.
फलटणमध्ये काही वर्षांपूर्वी ‘टेनिस कोर्ट’ सुरू करण्यात आले. या अत्यंत महागड्या खेळाची ओढ त्यावेळीच्या शाळकरी मुलांना लागली आणि त्यातून एक आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाला. अशा या ऑलिम्पिकसाठी सराव करणार्या विश्वजित सांगळेची ओळख करुन देणारा हा लेख...
नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व यश संपादित केले व भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला. बर्मिंगहॅमच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि२३ कांस्यपदकांची कमाई केली. तेव्हा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा घेतलेला हा विस्तृत आढावा...
भारतीय ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे
“ईशान्य भारतामध्ये यापूर्वीच्या सरकारच्या काळात २००६ ते २०१४ या कालावधीत लहान-मोठ्या ८ हजार, ७०० हिंसक घटना घडल्या होत्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात या घटनांमध्ये ७० टक्क्यांची घट झाली,” असे प्रतिपादन देशाचे गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केले. राष्ट्रीय जनजाती संशोधन संस्थेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
भारत सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमाअंतर्गत आणि दि. ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘स्पेशल ऑलिम्पिक भारत’ने बौद्धिक अपंगत्व असलेल्या लोकांसाठी राष्ट्रीय आरोग्य महोत्सवाचा यशस्वीपणे समारोप केला. या उपक्रमामध्ये भारतातील ७५ हून अधिक शहरांमध्ये बौद्धिक अपंग असलेल्या खेळाडूंची मोफत आरोग्य तपासणी केली. सरकारी संस्था, कॉर्पोरेट्स आणि समुदायांकडून राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर मिळालेल्या समर्थनाद्वारे ३१ राज्यांमधील १३९ ठिकाणी ७०७५ क्लिनिकल स्वयंसेवकांद्वारे ‘स्क्रीनिंग’ घेण
‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ अॅलार्डाईस यांनी ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या समावेशाबाबत नुकतेच एक विधान केले. २०२८ साली होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेतक्रिकेट या खेळाचाही समावेश करण्यासाठी ‘आयसीसी’ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले
विचार करा, तुम्ही जर एखाद्या हुकूमशाही देशातील रहिवासी असाल आणि तिथे जागतिक पातळीवरील एखादा कार्यक्रम होणार असेल, तर तुमच्यासोबत तिथलं सरकार काय करेल? तुम्ही पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्ते असाल, तर तुमच्यासोबत काय घडू शकते? अगदी बरोबर,तुम्हाला कैद केले जाईल किंवा तुमच्यावर पाळतही ठेवली जाईल. नागरिकांवर निर्बंध लादले जातील. हा सगळा गैरप्रकार जसाच्या तसा चीनमध्ये सध्या सुरू आहे.
हिवाळी ऑलिंपिक २०२२ चीनमध्ये होत आहे, ज्याला जगभरातील पत्रकारांनी कव्हर केले आहे. पण साम्यवादी विचारसरणी मानणाऱ्या चीनमध्ये लोकशाही आणि माध्यमांचे स्वातंत्र्य कुठून येणार? बीजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिकचे कव्हरेज करणाऱ्या एका डच रिपोर्टरसोबत हा प्रकार घडला. ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाच्या थेट कव्हरिंग दरम्यान त्याला चिनी पोलिसांनी जबरदस्तीने पकडले.
शुक्रवार दि. ४ फेब्रुवारीपासून चीनच्या बीजींगमध्ये हिवाळी ऑलिम्पिकची सुरुवात होत आहे. ऑलिम्पिक स्पर्धांच्या उद्घाटनावेळी ‘मशाल रॅली’चे आयोजन केले जाते, यंदाही तसे होत आहे.
गलवान खोऱ्यात झालेल्या भारत - चीन संघर्षात जखमी झालेल्या जवानास बीजिंग ऑलिम्पिक २०२२ साठी मशालवाहक निवडला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
चीनमध्ये आयोजित हिवाळी ‘ऑलिम्पिक’ला प्रारंभ होण्यास सात आठवड्यांहून कमी कालावधी बाकी आहे आणि मुत्सद्दीपणाने वातावरण तापत आहे. एका पत्रकार परिषदेत अमेरिकी माध्यम सचिव जेन साकी यांनी, अमेरिका अधिकृतपणे ‘ऑलिम्पिक’वर बहिष्कार टाकणारा पहिला देश असेल, याची घोषणा केली.
बीजिंग ‘ऑलिम्पिक्स’च्या स्पर्धेतील सहभागाबाबत अमेरिकेतील जो बायडन सरकारने जी पुचाट भूमिका घेतलेली आहे, त्यानुसार अमेरिकन खेळाडू स्पर्धेत भाग घेतील, पण बायडन सरकारमधील कोणीही राजकीय व्यक्ती अथवा अधिकारी या स्पर्धेला जाणार नाहीत. या भूमिकेला जे गोंडस नाव अमेरिकन सरकारने दिले आहे आणि त्याला ‘डिप्लोमॅटिक बहिष्कार’ असल्याचे संबोधन केले आहे. ते सूचक आहे. ‘जीत भी मेरी आणि पट भी मेरी’ अशी ही भूमिका आहे.
गेल्या दीड वर्षांपासून जगासह भारतावर कोरोनाची आपत्ती कोसळलेली आहे. कोरोनाच्या पहिल्या वर्षात तर सर्व काही बंद वा निर्बंधयुक्त असल्याने अनेक गतिविधी थांबल्या होत्या. यंदा मात्र लसीकरण सुरू झाल्याने कोरोनाचे सावट जवळपास नाहीसे झाल्यासारखे आहे. पण, कोरोनाच्या संकटाला संधी मानून आपल्या व्यवसायात वा नव्या वाटा शोधत गेल्या दीड वर्षांत अनेकांना नवनवे प्रयोग केले.
तब्बल ४१ वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर भारताने हॉकीत ‘ऑलिम्पिक’मध्ये पदक जिंकले. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी. भारताची हॉकी खेळामधली हुकूमत ते लागलेली उतरती कळा ते पुन्हा चार दशकांनंतर मिळालेले यश, असा हा प्रवास आहे.
तणावाच्या अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे वा त्याचा प्रतिकार कसा करायचा, हे एक जबरदस्त आव्हान खेळाडूंच्या समोर उभे ठाकलेले असते. उच्च प्रतीच्या राष्ट्रीय व जागतिक खेळांच्या मॅचेस किंवा अॅथलेटिक स्पर्धेतयश आणि अपयश हे अतिशय छोट्या फरकामुळे मिळत जाते. विशेषतः खेळाडूंची तांत्रिक, शारीरिक आणि विधायक क्षमता किती आहे आणि त्याचा ते मैदानावर खेळताना किती सशक्तपणे वापर करतात, यावर त्यांचे यश अवलंबून असते.
अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकत विराट कोहलीजवळ पोहचला
एक शास्त्रीय भाषेतील व्यक्तिमत्त्वाची व्याख्या सांगते की, वर्तवणूक, भावनिक प्रवृत्तीविषयक आणि मानसिक अंगाचे घटक एकत्रित येऊन जी संमिश्र प्रतिमा बनते ते म्हणजे व्यक्तिमत्त्व. दुसरी एक सर्वसामान्य व्याख्या सांगते की, एखादी व्यक्ती एकांतात असताना किंवा इतरांशी संवाद साधताना किंवा बाह्य वातावरणात वावरताना जे भावनिक आणि मानसिक स्थैर्य आणि सातत्य दाखविते किंवा विशिष्ट स्वभाववैशिष्ट्य दर्शविते ते त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व असते.
भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी या वर्षीचा राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष म्हणावा लागेल. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘टोकयो ऑलिम्पिक’मधल्या भारताच्या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राच्या अंतिम फेरीतील गडबडीबद्दल केला खुलासा
पंजाब सरकारने हा निर्णय घेत हॉकीपटूंना दिली अनोखी भेट
जागतिक स्पर्धेत सगळेच रथी-महारथी असतात. त्यांच्यात स्थान मिळवता येणे, हासुद्धा अनोखा विजय आहे. कधीकधी विजयाच्या शिखरावर विराजमान न होता, त्यांच्या जवळपास पोहोचण्याचे धाडस करणारी मंडळी खरेतर विजयमाला गळ्यात घालून वावरत असतात. कुठल्याही क्षेत्रातले प्रामाणिक झुंज देऊन मिळविलेले विजेतेपद हे नुसते नशिबाने मिळत नसते. मैदानावर तो उत्कट आणि उत्कृष्ट खेळ आपण पाहतो, त्यामागे अगणित काळ केेलेल्या परिश्रमाचा आणि गाळलेल्या घामाचा गुणाकार आहे.
पराभवाचे भय भारतीय खेळाडूंच्या मानगुटीवरून उतरायलाच तयार नव्हते. टोकियोत नीरज चोप्राच्या भाल्याने या भयाचा वेध घेतला आणि थेट ‘गोल्डमेडल’ला गवसणी घातली. ‘ऑलिम्पिक’च्या १२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय तिरंगा डौलाने मुख्य स्टेडियममध्ये फडकला आणि त्यावेळी स्टेडियममध्ये वाजवण्यात आलेल्या राष्ट्रीय गीताच्या धूनमध्ये ज्या मोजक्या भारतीयांचा आवाज अभिमानाने घुमला. त्यापैकी मी एक होतो. नीरजच्या त्या सुवर्णमय कामगिरीने ‘अॅथलेटिक्स’च्या मैदानावरील स्वातंत्र्याची नवी पहाट अवघ्या भारताने अनुभवली.
भारतासारख्या देशामध्ये मध्यमवर्गाची असलेली मोठ्या प्रमाणातील संख्या पाहता, खेळाबाबत जागरूकता येताना त्याच्या आर्थिक गणितांचा विचार केल्यावर बहुतांश पालक खेळ या करिअरच्या पर्यायाकडे डोळेझाक करतात. परंतु, ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था या जिल्हा पातळी, तालुका पातळीवर काम करतात, त्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समितींतर्गत खेळासाठी विशेष निधी देऊन व त्यासाठीच्या पायाभूत सुविधा उभ्या करता आल्या, तर येत्या काळामध्ये खेळाचा सुवर्णकाळ बघता येणार आहे.
नीरजनेसुद्धा हे दाखवून दिले की, स्वतःच्या गुणांनी मोठे होता येते. त्यासाठी आपल्या क्षमतांचा विकास करावा लागतो. खूप कष्ट करावे लागतात. त्याने खेळात आरक्षणाची कधी मागणी केली नाही की, मीराबाई चानूनेदेखील केली नाही. जो नियम खेळाला लागू आहे, तोच जीवनाच्या खेळाला लागू आहे. या खेळात यशस्वी होण्यासाठी गुणवत्तावाढ, क्षमतावाढ आणि त्यासाठी सातत्याने कष्ट करण्याची मानसिकता याला कसलाही पर्याय नाही.