अणुयुद्धाची तयारी करणे नंतर होऊ शकते. मात्र, संशोधन व आधुनिकीकरण चालू ठेवावे. जगात सध्या विविध ठिकाणी ६० हून अधिक युद्धे सुरू आहेत. संरक्षणदृष्ट्या अत्यंत प्रबळ असलेल्या राष्ट्रावर दुसरी राष्ट्रे आक्रमण करण्यास धजावत नाहीत. आपल्याला शांतता हवी आहे. पण, आपणास सर्व प्रकारच्या लढाईकरिता सदैव तयार राहणे जरुरी आहे.
Read More
रशिया-युक्रेन युद्ध चिघळतच चालले आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले- प्रतिहल्ले होत असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी रशियाच्या न्यूक्लीयर डिटेरेन्स फोर्सेसना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत
नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक विद्यार्थी नेत्यांपासून माध्यम क्षेत्रातील एकाहून एक विचारवंत-संपादक आठवडाभर आधी ‘कलम ३७०’ रद्द होण्याची साधी बातमी देऊ शकणार नसतील, तर त्यांच्यासाठी परिषदा, मेजवान्या किंवा चर्चासत्रांचे पंचतारांकित समारंभ योजण्यावर पाकने पैसे कशाला खर्चावेत? इमरानपासून जनरल बाजवा यांच्यापर्यंत सगळे पाकिस्तानी नेते, आपली पुरोगामी गुंतवणूक बुडित गेल्यामुळे मात करीत आहेत. मणिशंकर अय्यर उगाच नाही, मल्ल्यासारखे बेपत्ता झाले.
साधने वाईट नसतात, साधने वापरणारे हात वाईट प्रवृत्तीचे असतात आणि आज जगासमोर याच घातक प्रवृत्तींचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पण, या आव्हानांनाही विज्ञानाधिष्ठित विकासानेच उत्तर देता येईल. भारताने तर ‘तंत्रज्ञानातून विकास’ हे सूत्र जगसिद्ध केले आहे.