(Sanjay Raut) 'वेगळा गट म्हणून राहिल्यास अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री होता येणार नाही', असे विधान उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेसंदर्भातील वक्तव्याबाबत मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Read More
(Bhaskarrao Khatgaonkar Patil) माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर (Meenal Khatgaonkar)काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या दोघांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला असून येत्या २३ मार्च रोजी नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे आहेत.
आजकाल राजकारणात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, काही रिकामटेकडे लोक समाजमाध्यमे आणि वाहिन्यांवरून प्रकाशझोतात येण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात आणि आपले हसेच करून घेतात. अशी काही स्टंटबाजी केली की, आपण नेते बनतो किंवा आपल्या ‘गॉडफादर’च्या मर्जीत राहतो, असा या दीडशहाण्यांचा भ्रम. मग केवळ उपद्रव माजविणे, एवढे एकच आपले कर्तव्य, असा समज लोकांमध्ये रुजविण्याचा घातक प्रयास अशा मंडळींनी सुरूच ठेवला आहे. वस्तुतः यातून काहीही साध्य होत नाही. ना जनतेचे प्रश्न हे लोक सरकार दरबारी नेऊन सोडवू इच्छितात आणि ना त्यातून आपल्
(Rohit Pawar) हिंदूंना डावलून सत्तेसमीप जाता येत नाही, याची प्रचिती आल्यानं पुरोगाम्यांकडून आस्थेचा बाजार मांडला जात आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीसुद्धा महाकुंभात अमृतस्नान करून परतल्यानंतर आस्थेचा बाजार भरवला आहे. त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा घाट रोहितब्रिगेडकडून घातला जात आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? रोहित पवारांना आपण हिंदू असल्याचा अचानक साक्षात्कार का झाला? याचाच आढावा
महाराष्ट्रात युतीचे सरकार दगाबाजी करून घालविल्यानंतर जे काही घाणेरडे राजकारण उद्धव ठाकरे गटाच्या आणि शरद पवार गटाच्या लोकांनी राज्यात सुरू केले आहे, ते अतिशय लाजिरवाणे आणि महाराष्ट्रातील सभ्य राजकीय संस्कृतीला अशोभनीय असेच आहे. त्यामुळे त्यांची सत्ता उपभोगता न येण्याची आणि सत्ता घालवावी लागल्याची चीडचीड, आता रोज कोणत्या ना कोणत्या तर्हेने गरळ ओकल्यासारखी बाहेर येत राहते. अधूनमधून एक जाहिरात दूरदर्शन वाहिन्यांवर झळकत असते. त्यातील ‘जळजळतय... मळमळतय...’ हे प्रभावीपणे मांडलेले संवाद, या उबाठा आणि शरद पवारा
(Chiplun and Sangameshwar) कोकणातील चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शुक्रवार दि. २२ फेब्रुवारीला सावर्डेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दोन्ही तालुक्यातील तब्बल आठ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती आहे. यावेळी आमदार शेखर निकम देखील उपस्थित होते.
(Sunil Tatkare) मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दि. २६ फेब्रुवारी रोजी 'मराठी पाऊल पडते पुढे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
Bell’s Palsy Disease : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला आहे. त्यांनी दि. २० फेब्रुवारी रोजी एक्सवर या आजारासंबंधित एक पोस्ट करत माहिती दिली आहे. या आजारामुळे त्यांना दोन मिनिटंही नीट बोलता येत नाही, ज्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सहभागी होता येत नाही, अशी माहिती त्यांनी पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. बेल्स पाल्सी हा एक दुर्मीळ असा आजार आहे, ज्यात चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. यात अनेकदा चेहऱ्याच्या एका बाजूवर प
बाप-लेकींची साथ सोडून अजितदादांसोबत चला, अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात आली आहे.
(Chhagan Bhujbal) मंत्रीमंडळातून डावलल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांनी सोमवारी दि. २३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर छगन भुजबळ दिल्लीला रवाना होणार आहेत.
(Chhagan Bhujbal) मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांना राज्यसभेत पाठवले जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र आपण राज्यसभेवर जाणार नाही, असे भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. "आता राज्यसभेवर जाणं म्हणजे मतदारसंघातील मतदारांशी प्रतारणा केल्यासारखं होईल", असं भुजबळ म्हणाले आहेत.
(MVA) राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने विजयी बहुमत मिळवले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. दरम्यान मविआमधील तिन्ही घटकपक्षांनी २८८ पैकी फक्त ४६ जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ म्हणजे २९ जागांचा अपेक्षित आकडा सध्या मविआतील एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे तिन्ही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरला नाही. दरम्यान आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे विरोधीपक्षनेते पद देण्या
(Chandrashekhar Bawankule) महाविकास आघाडीतील काही आमदार आणि खासदार अस्वस्थ असून, ते आपली अस्वस्थता आमच्याकडे व्यक्त करीत आहेत. अनेकजण भाजपाच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. ११ डिसेंबर रोजी केला.
मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. आपल्या हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि हिच इच्छा सूरज चव्हाणने बोलून दाखवली होती. बिग बॉस नंतर बारामतीला गावी पोहोचलेल्या सूरजचं गावात जंगी स्वागत झालं. पण, यादरम्यान काही करून हक्काचं घर बांधायचं हे स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं. मोढवे गावी परतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला भेटीसाठी आमंत्रण दिलं होतं. या दोघांमध्ये भेट झाल्यावर अजित पवारांनी सूरजला लवकरात लव
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा भव्यदिव्य सोहळा ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच या शपथविधीला दहा हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार असून त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल करून निवडणूक लढवली. परंतु, या अपक्ष उमेदवारांमधून केवळ दोघांनाच निवडणूक जिंकून आमदार होण्याचा मान मिळवता आला. यातील एक नाव म्हणजे जुन्नर मतदारसंघाचे विजयी उमेदवार शरद सोनवणे. विद्यमान आमदाराची थेट तिसर्या क्रमांकावर रवानगी करणारे, तसेच साखर कारखान्याच्या संचालकाला धूळ चारत विजयी मताधिक्य मिळवणारे शरद सोनवणे नक्की आहेत तरी कोण? त्यांच्या विजयाची कारणं काय आहेत? याबाबतच्या विश्लेषणात्मक सविस्तर माहितीचा आढावा.
अहिल्यानगर जिल्हा जसा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने चर्चेत आला तसाच कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजप आमदार प्रा.राम शिंदे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामान्यामुळेही चर्चेत आला होता. या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार केवळ १२४३ मतांनी विजयी झाले. या निकालांचा अन्वयार्थ घेऊया.
(Ajit Pawar) महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या सत्तास्थापनेबाबत भाजपचे केंद्रातील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असेही म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनीही संख्याबळावर भाष्य करत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे सूचक विधान केले. अशातच "अजित पवारांना मुख्यमंत्री केले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू", अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली होती. रोहित पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रत्य
विदर्भातून महाविकास आघाडी हद्दपार!
(Parth Pawar) अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या डिझाईन बॉक्स्डच्या नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढून पोस्ट केल्यानंतर मिटकरींनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. याच संदर्भात अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी त्यांचा पक्ष अमोल मिटकरींच्या या मतांचे समर्थन करत नसल्याच्या आशयाची पोस्ट करत मिटकरींना चांगलीच समज दिली आहे.
(Eknath Shinde) राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला कौल दिल्याने महायुतीने राज्यात अविश्वसनीय मतांचा आकडा ओलांडला आहे. या अभूतपूर्व यशासाठी कारणीभूत असलेल्या कारणांपैकी एक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय. खरंतर या योजनेतील लाभार्थी ठरलेल्या लाडक्या बहिणींनी महायुतीला मतांच्या रुपात भरभरून दिलेले आशीर्वाद फळले. महायुतीच्या या ऐतिहासिक विजयानंतर लाडक्या बहिणींकडून वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदेंचे औक्षण करुन विजयोत्सव साजरा
(Ajit Pawar) महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा महानिकाल आज जाहीर होणार आहे
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात मोठ्या पवारांची एकाधिकारशाही महायुतीने मोडीत काढली आहे. पुणे जिल्ह्यातील निकाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांच्या वर्चस्वाला धक्का देणारे ठरले आहेत. मविआच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा घेऊनदेखील पवारांचा बहुतांश जागांवरील पराभव हा खूप मोठा संदेश देऊन जातो.
(Supriya Sule) "गौरव तुम्ही माझ्या फोनचे उत्तर का देत नाही, आता निवडणूका घोषित झाल्या आहेत. आम्हाला बिटकॉईन तातडीने हवे आहेत. आता बिटकॉईनची जी किंमत आहे त्यानुसार त्याला चांगली किंमत मिळणार आहे. तुमच्याकडे बिटकॉईनची रोख रक्कम तुमच्याकडे आहे. मला पैसे हवे आहेत, गुप्ता कुठे गायब आहे. मला माहिती नाही पैशांची गरज आहे," राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या आवाजाशी साधर्म्य असलेल्या एका ऑडिओ क्लीपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
(Ajit Pawar) बारामतीमध्ये काटेवाडी येथे बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "सदर ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे. तर दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे. या सहकाऱ्याने आमच्याबरोबर महाविकास आघाडीत काम केले होते. या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल. त्यान
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्याकडून कर्जत-जामखेड मतदारसंघात पैशांचे वाटप सुरु असल्याचा आरोप भाजपने केला आहे. बारामती अॅग्रोच्या अधिकार्यांकडून कर्जत-जामखेडमध्ये हे पैशांचे वाटप सुरु असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. या अधिकार्यांकडे दारूसाठी किती पैसे आणि कुणाला द्यायचे किती याचा तपशील आहे. मतदारांची यादी आणि पैशांचे घबाडही सापडले आहे.
ठाणे : “मुंब्रा-कळव्यातून एकाला १५ वर्षे संधी दिलीत, त्याने वीज चोरी केली. आता राष्ट्रवादी-महायुतीच्या नजीब मुल्ला यांना निवडून द्या. मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी तीन हजार कोटी देईन, हा माझा वादा आहे,” असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांनी मतदारांना केला.
(President's Rule) महाराष्ट्रात २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या काही घटना घडल्या. राष्ट्रपती राजवट लागू झाली, पहाटेचा शपथविधी होऊन औटघटकेचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षाच्या काळात राजकीय वर्तुळात सुरू झालेली नाट्यमय घडामोडींची मालिका अजूनही सुरूच आहे. परंतु या सर्व घडामोडींना कारणीभूत असलेली राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागू झाली या मुद्यावर आता उपमुख्यमंत्री द
ठाणे : कळवा मुंब्र्यातील विधानसभा निवडणुकीतील ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे, सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे, नजीबभाईंची लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे. असा हल्लाबोल करीत राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगितले. येत्या २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.
(AIUB )महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतश्या नवनवीन राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता 'ऑल इंडिया उलेमा बोर्ड, महाराष्ट्र' या मुस्लीम संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि उबाठा यांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा देत आपल्या १७ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे, या मागण्या मान्य झाल्यास मुस्लिम समाज आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला भरघोस मतदान क
ठाणे : कळवा - मुंब्रा विधानसभा क्षेत्रात गेले तीन टर्म आमदारकी भुषविणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना टोरन्ट पॉवरचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. गेल्या चार वर्षापासुन कळवा - मुंब्रावासियांचा विरोध असलेल्या टोरन्ट पॉवर कंपनीला बंद करण्याचे आश्वासन महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी (अजितदादा गट) काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला ( Najeeb Mulla ) यांनी दिले आहे. शुक्रवारी मुंब्य्रात मुल्ला यांची प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांनी फटाक्यांची आतिषबाजी करुन नजीब मुल्ला यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी मु
( Jitendra Awhad )राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर या आणि यांसारख्या अनेक महान व्यक्तींबद्दल अवमानकारक वक्तव्यं आव्हाडांच्या मुखातून बाहेर पडली आहेत.
( MahaVikas Aghadi ) राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अवघे १२ दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांसंदर्भात महाविकास आघाडीच्या महिलांविरोधी भूमिकेचा पर्दाफाश झाला आहे. म्हणूनच महिला मतदारांनी मतदान करताना या गोष्टी लक्षात ठेवून मतदान करावे, असे आवाहन महायुतीने केले आहे.
निवडणूक जवळ आली म्हणून ‘लाडकी बहीण’ दिसते. १ हजार, ५०० रुपये देऊन कोणाचे घर चालते, हे सांगावे.” इति उद्धव ठाकरे. अर्थात, पैशाची किंमत कोणाला? ज्यांना कमतरता आहे त्यांना! तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना १ हजार, ५०० काय, १५ कोटी रुपयेदेखील चिल्लरच वाटतील. १०० कोटींचे प्रकरण ज्यांच्या सत्ताकाळात घडले, त्यांना १ हजार, ५०० रुपयांची काय कदर? काही लोक म्हणतात, उद्धव ठाकरेंना हे विचारण्याचा अधिकार आहे. कारण, त्यांच्या ३४ वर्षांच्या ‘लाडक्या बाळा’ची संपत्ती २३ कोटी आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या सोबत्या
मुंबई : ( Sharad Pawar ) “मी जातीयवाद केल्याचे एक उदाहरण दाखवा,” असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि मविआचे शिल्पकार शरद पवार यांनी नुकतेच दिले होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांनी जातीयवादी राजकारणाने महाराष्ट्राचे समाजमन कलुषित केल्याची टीका एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना, शरद पवारांनी दि. २ नोव्हेंबर रोजी बारामती येथे पत्रकार परिषदेत मी जातीयवादी राजकारण केल्याची उदाहरणे देण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे दै. ‘म
( Parvati Assembly constituency ) राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत अखेर संपली असून दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात आली होती. या वेळेपूर्वी अनेक उमेदवारांकडून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. मात्र पुण्यामधील एका उमेदवाराला ३ मिनिटे उशिर झाल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही.
( Jitendra Awhad on Ajit Pawar) ठाण्यातील चंदननगर मुंब्रा येथे आयोजित एका जाहीर सभेला संबोधित करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान बोलत असताना अजित पवार गट हा पाकिटमारांची टोळी आहे, असे आव्हाड म्हणाले. तसेच अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर स्वतःचा वेगळा पक्ष काढून नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी, असे म्हणत अजित पवारांवर हल्लाबोल केला.
( Pravin Darekar on Jitendra Awhad ) राष्ट्रवादी काँग्रसचे शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते यावर प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. अशातच आव्हाडांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी जहरी टीका केली आहे.
( Trumpet Symbol ) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 'ट्रम्पेट' या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरीत नाव तुतारी ऐवजी ट्रम्पेट असेच ठेवले जाणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे बाबा सिद्दीकी यांची देखील हत्या करण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर हा धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा धमकीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने झिशान आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. याप्रकरणी झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोल
( Sharad Pawar - NCP ) "हा प्रश्न भावनेचा नसून हा तत्वाचा आहे, गांधी, नेहरू आणि यशवंतराव चव्हाण तसेच शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घेऊन मी काम करणारा आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतोयं त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राची सत्ता मला बदलायची आहे. महाराष्ट्राची सत्ता सामान्य माणसासाठी सत्ता हातात घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा, आपल्याला सामाजिक क्षेत्रात आणखी काम करायचे आहे," असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या ५२ मनिटांच्या भाषणात शरद पवार यांन
गेल्या काही आठवड्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर एकच खळबळ माजली होती. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून यांसदर्भात नोएडा येथून एकाला अटक करण्यात आली आहे. या धमकीबाबत झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात वोट जिहाद आणि आतंकवादाच्या समर्थकांचा पराभव होणार, असा विश्वास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला. मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याठिकाणी शिवसेनेचे सुरेश पाटील आणि समाजवादी पक्षाचे अबु आझमी हे रिंगणात आहेत.
Belapur Vidhansabha : नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. पाहूया काय आहे या मतदारसंघाचा इतिहास आजच्या व्हिडिओतून.
NCP Ajit pawar Second List जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत एकूण ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. आता एकूण ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे आता सिद्ध झाले आहे.
( MahaVikas Aghadi ) महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरू असलेला गुंता सुटण्याचे काही नाव नाही. जवळपास महिनाभर चर्चेच्या फेर्या झडल्यानंतर अखेर बुधवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी त्यांना केवळ २५५ जागांवरील फॉर्म्युला जाहीर करता आला. त्यानुसार, काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या वाट्याला प्रत्येक ८५ जागा येणार आहेत.
(Ajit Pawar - NCP) 'घड्याळ' या चिन्हाचा वापर न्यायालयीन अंतिम निर्णयाच्या अधीन आहे, असे जाहिरातीत जोडण्याच्या पूर्वीच्या आदेशाचे पालन करत असल्याचे हमीपत्र दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास (अजित पवार) गुरुवारी दिले आहेत.
( Sanjay Kelkar ) भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संजय केळकर हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत वर्णी लागल्यानंतर आ. केळकर यांनी मंगळवार दि. २२ ऑक्टोबर रोजी चा मुहूर्त साधत प्रचाराचा श्रीगणेशा केला. हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि नौपाड्यातील घंटाळी देवी मंदिरात दर्शन घेऊन ‘घर चलो अभियाना’ला सुरूवात करण्यात आली.
नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. पाहूया काय आहे या मतदारसंघाचा इतिहास
भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.