Russia Ukraine युद्धात #DeepState ची नवी खेळी!
Read More
रशिया-युक्रेन युद्धावरून भारताला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रहार केला. भारताच्या सीमा बदलण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा जागतिक समुदायापैकी एकालाही यात दखल घ्यावी, असे वाटले नाही. भारतासोबत जाऊ, असा जागतिक प्रतिसाद आम्हाला कधी दिसलाच नाही, असा प्रहार करत, त्यांनी या देशांना आरसा दाखवला आहे.
विज्ञान-तंत्रानाच्या संगणकीय क्रांतीमुळे युद्धतंत्र अधिक व्यापक, अधिक घातक, अधिक मारक बनलं असून त्यास इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ किंवा ‘ई. डब्ल्यू.’ म्हटले जाते. त्याचाच आविष्कार ड्रोन प्रणाली. ही प्रणाली येत्या काळात अधिक विकसित होाणर असून त्याचा घेतलेला हा आढावा...
२०२२च्या प्रारंभी ठिणगी पडलेल्या, रशिया-युक्रेन युद्धाला आता ६५० हून अधिक दिवस लोटले. अमेरिकन गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, या युद्धात रशियाचे जवळपास ८० टक्के म्हणजे ३ लाख, १५ हजार सैनिक मृत्युमुखी पडले, तर दुसरीकडे युक्रेनच्याही दोन लाख सैनिकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे हा अहवाल सांगतो.
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून संपूर्ण जगाने सीरिया, लेबेनॉन आणि आफ्रिकेतील देशांमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. जागतिक राजकारणात खासकरून पाश्चिमात्य देश आपल्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधाला धक्का लागताच मानवाधिकाराच्या नावाखाली युद्धात उतरतात.
रशिया लगेच युक्रेनची मालवाहू जहाजं बुडवायला सुरुवात करेल का? याला उत्तर म्हणून युक्रेन रशियाची जहाजं की, विशेषतः सीरियन एक्सप्रेस बंद पाडू शकेल का आणि सर्वात महत्त्वाचे म्हणने एर्दोगान काय भूमिका घेतील?
युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. जगभराने रशियाचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्र सभेत जर्मनीने प्रस्ताव ठेवला. यामध्ये रशियाने युक्रेनमधून सैन्य मागे घेण्याची मागणी केली आहे. १४१ देशांनी प्रस्तावाच्या समर्थनार्थ मत टाकले. रशियासह सात देशांनी विरोध केला. रशियाने युद्धाची सुरुवात करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना त्यांच्या सैनिकांनी आश्वासन दिले होते की, 'युक्रेन काय आपण दोन आठवड्यांत संपवुन टाकु.' मात्र या दोन आठवड्यांचे आता ५२आठवडे झाले तरी रशियाला ते काही जमले नाही.
अख्ख्या जगाचे डोळे हे रशिया-युक्रेन संघर्षाच्या ज्वलंत मुद्द्याकडे लागल्याने उत्तर कोरियाने नेमकी हीच संधी साधत आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणी केल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी केला.