पूजा चव्हाण मृत्यु प्रकरण वनमंत्री संजय राठोड यांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांचा राजीनामा घेण्यात आला. ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्र्याला पायउतार व्हावे लागले. या प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राठोड यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवला. पूजाच्या मृत्यूनंतर इतक्या दिवसांनी राठोड यांचा राजीनामा घेतल्यावर त्यांना अटक कधी करणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.
Read More
मुख्यमंत्र्यांच्या दुटप्पीपणाचा हा सगळा कळस म्हणावा लागेल. खरंतर त्यांच्याकडून फार काही कारवाईची वगैरे अपेक्षाच नाही आणि राठोडांच्या राजीनाम्यानेही काही साध्य होईल, याची शक्यता धुसरच!
राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव बंजारा समाजातील पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आल्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूने विरोधकांनी टीका सुरू केली आहे. पूजाच्या मृत्यूची आता सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पूजा प्रकरणात अद्याप १३ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतरही कारवाई झालेली नाही. यामुळे आता या प्रकरणी निःपक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार लाड यांनी केली आहे.