Indians dominate capital market राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध कंपन्यांच्या मालकी हक्कात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना मागे टाकले आहे. गेल्या 22 वर्षांत प्रथमच अशी घटना घडली आहे. यावरून भारतीय गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारावर आणि देशाच्या वेगवान प्रगतीवर दाखवलेला विश्वास प्रकर्षाने अधोरेखित होतो.
Read More
भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा कायम राखला असून, जागतिक अनिश्चितता कायम असतानाही, भारतात विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला आहे. त्याचवेळी, देशातील गरिबांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे, केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचेच हे यश आहे.
जागतिक बाजारात वाढीला लागलेल्या अस्थिरतेमुळे सोन्याच्या दराने उसळी घेतली असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत चालली आहे. अमेरिकेने अतिरिक्त शुल्क आकारण्यास ९० दिवसांचा ब्रेक लावल्याने देशांतर्गत बाजारात बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ९८ हजार, ३८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सोन्याचे दर १ लाख, १ हजार, ३८० झाल्याचे बघायला मिळाले. सोन्याच्या दराचा हा नवीन उच्चांक असून या पुढील काळात सर्वच उच्चांक मोडले जाणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
(Chief Minister Market Committee Scheme) वर्षानुवर्षे बाजारसमित्या ताब्यात ठेवून एकाधिकारशाही गाजवणार्यांना फडणवीस सरकारने दणका दिला आहे. तळकोकणासह 65 तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजारसमित्यांना मंजुरी देत प्रस्थापितांच्या वर्चस्ववादाला शह देण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री बाजार समिती योजने’अंतर्गत प्रत्येक तालुक्यात बाजारसमित्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा हा महत्त्वाचा भाग आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी आयात शुल्काच्या किंमतीवर ९० दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा हा भारताला झाला असून यासोबत इतर ७५ देशांना याचा फायदा होणार आहे. नुकतेच चीनला यापासून सूट दिली गेली आहे. चीनवर अमेरिकेने टौरीफद्वारे १०४ % हून अधिक म्हणजेच १२५ % करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका-चीनदरम्यान व्यापार युद्धाचा धोका बळावला गेल्याची भिती आहे.
Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ हा ब
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासूनच जगभरात त्याचे गंभीर पडसाद उमटू लागले. मागील काही दिवस भारतीय शेअर बाजारांतून परकीय गुंतवणूकदारांनी हात आखडते घेतल्याने पडझड दिसून आली, तर सोमवारी मंदीच्या सावटाखाली अमेरिकी शेअर बाजारही कोसळला आणि गुंतवणूकदारांचे तब्बल चार लाख कोटी बुडाले. त्यानिमित्ताने ट्रम्प यांच्या टोकाच्या, बदलत्या भूमिकांचे परिणाम आणि जागतिक स्थैर्याची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
( Nitesh Rane on fish market in Marol ) दुबई आणि सिडनीच्या धर्तीवर मरोळ (अंधेरी पूर्व) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार आणि कोळी भवन उभारण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी दिले.
‘एमएसएमई’ क्षेत्र देशाच्या जीडीपीत सर्वाधिक भर घालणारे तर आहेच, त्याशिवाय कृषी क्षेत्राखालोखाल रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ते उदयास आले. केंद्र सरकारनेही या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत येत्या काळात जागतिक बाजारपेठेत ‘एमएसएमई’ क्षेत्र मोलाचे योगदान देताना दिसून येईल, हे निश्चित.
भारतीय Share Market ची गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेली घसरण साखळी बुधवारी अखेर खंडित झाली. ७४० अशांची उसळी घेत अखेरिस बाजाराने ७३ हजारांचा टप्पा ओलांडला.
Orange Festival महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ संकल्पने अंतर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थ वगळून शेतक-यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा उद्देश या महोत्सवाच्या आयोजनमागे आहे.
जानेवारी महिन्यात निर्यातीत झालेली वाढ आणि देशांतर्गत बाजारपेठेत वाढलेली मागणी या दोन प्रमुख कारणांमुळे, उत्पादन क्षेत्राने विक्रमी कामगिरी केली. त्याचवेळी येणार्या कालावधीतही ही मागणी कायम राहील, असे संकेत आहेत. तसेच भारतीय फळे आणि भाजीपाला निर्यातीनेही विक्रमी कामगिरी केली आहे.
अमेरिकेतील मंदीच्या शक्यतेवर अब्जावधी डॉलर्सचे सट्टे लागतात. अमेरिकी मंदीचा भारतीय बाजारावरही ( Indian Market ) विपरित परिणाम होईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तथापि, भारतीय बाजारपेठ जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणातही, निश्चितपणे वाटचाल करत आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी बाजाराला सावरण्याचे काम केले आहे.
मुंबई : राज्यातील सोयाबीन ( Soybean ) उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास दिनांक ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली.
उबाठा गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी हा निर्णय दिला आहे. बाजार समितीच्या मासिक सभेला सात वेळा गैरहजर राहिल्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
साई लाइफ सायन्सेस लिमिटेडचा आयपीओ लवकरच बाजारात दाखल होणार आहे. साई सायन्सेस लिमिटेडकडून ३,०४३ कोटी रुपये बाजार भांडवल उभारले जाणार असून गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.
अदानी समुहावरचे आरोप आता षड्यंत्राकडे अंगुलीनिर्देश करत आहेत. भारताने कायमच विकसनशील राहावे या विचाराने आजही हुकूमशाही प्रवृत्तीच्या संस्था, देश आणि माणसे कार्यरत आहेत. त्यांच्या दिमतीला आपले इमान कवडीमोल भावात विकलेले काही आपले राजकारणी आहेतच. अदानींवरील आरोपांचा आणि त्यामागील इकोसिस्टमचा हा आढावा...
भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आली. सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत सकारात्मक वाढ दिसून आली. सेन्सेक्स २३०.०२ अंकांच्या वाढीसह ८०,२३४.०८ च्या पातळीवर स्थिरावला तर निफ्टी ८०.४० अंकांनी वधारत २४,२७४.९० वर बंद झाला. जागतिक बाजारातील वाढीमुळे भारतीय शेअर बाजाराने पुन्हा वेग पकडल्याचे पाहायला मिळाले.
मौल्यवान वस्तूंवरील कस्टम ड्युटीतील कपातीस बराच अवधी उलटल्यानंतर आता आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. आज सोने-चांदी भाव घसरणीसह उघडले असून सोन्याचे फ्युचर्सचे भाव सुमारे ७६,४५० रुपये, तर चांदीचे वायदे ९०,६०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या आगामी भावात घसरण होत आहे.
ट्रम्प यांच्या विजयानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली होती. दुसऱ्या दिवशी मात्र मार्केट बंद होताना मोठी घसरण नोंदविण्यात आली असून नफावसुली, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि कंपन्यांचे दुस-या तिमाहीचे कमजोर निकाल यामुळे बाजार नकारात्मक परिणाम दिसून आला. जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमध्ये भारतीय शेअर बाजारात नरमाई दिसून आली.
देशातील फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आयपीओ लाँच करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वाी केली होती. त्यानंतर आता दि. ०६ नोव्हेंबर पासून सबस्क्रिप्शनकरिता खुला करण्यात आला असून ०८ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना अप्लाय करता येणार आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून आयपीओ बाजारात सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे.
भारतीय शेअर बाजाराने दुपारच्या सुमारास मोठी उसळी घेतली असून सेन्सेक्स ९०१.५० अंकांनी तर निफ्टी २७०.७५ अंकांनी वधारला. दुपारच्या सुमारास अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल जाहीर होताच शेअर बाजारात सेन्सेक्स ८५९.४१ अंकांच्या वाढीसह ८०,३३६.०४ वर व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टी ५० देखील २५१.८० अंकांच्या वाढीसह २४,४६५.१० च्या पातळीवर पोहोचला.
भारतीय शेअर बाजाराने आज सकारात्मक वाढ नोंदविली आहे. सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकात वाढ दिसून आली आहे. पहिल्या सत्राच्या सुरूवातीच्या व्यवहारात घसरण होऊन दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. मेटल, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या समभाग खरेदीचा परिणाम बाजार बंद होताना तेजीत झाला. परिणामी, आशियाई बाजारातील सकारात्मक ट्रेंडमध्ये मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने वाढ नोंदवली.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण नोंदविली गेली. बीएसई निर्देशांक सेन्सेक्स ७९ हजारांच्या खाली तर एनएसई निर्देशांक निफ्टी २४ हजारांच्या खाली गेल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दि. ०५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर विक्री आणि वाढलेली अस्थिरता यामुळे बाजारात घसरण दिसून आली.
नवीन संवत वर्षाच्या सुरूवातीला बाजाराची दिशा नेमकी कशी असेल, याबाबत बाजार विश्लेषकांनी अंदाज वर्तविला आहे. दोन दिवसांपूर्वीच देशातील दोन प्रमुख भांडवली बाजार बीएसई, एनएसईने लक्ष्मीपूजनानिमित्त एक तासांचा मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केला होता. या व्यापारी सत्रासह नवीन संवत २०८१ ची सुरुवात झाली. आता बाजारातील वातावरण नेमकं कसं असणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
मागील आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर विक्रीचा सपाटा सुरु होता. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्यानंतर आता विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांबाबत नवी माहिती समोर आली आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) ऑक्टोबरमध्ये भारतीय शेअर बाजारातून ९४ हजार कोटी रुपये काढून घेतले आहे.
'पुदुमजी पेपर प्रॉडक्ट्स लिमिटेड'च्या नफ्यात मोठी वाढ झाली असून सहामाहीत कंपनीने चांगली कामगिरी नोंदविली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत पुदुमजी पेपर प्रोडक्ट्स लिमिटेडचा नफा ९९ टक्क्यांनी वाढला आहे. सहामाहीत करपूर्व नफ्यात मोठी वाढ नोंदवत कच्च्या मालाची किंमत आणि निव्वळ कमी झाल्यामुळे ७,७०३ कोटी रुपये इतके आहे.
देशातील ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी लवकरच बाजारात आयपीओ खुला केला जाणार आहे. दि. ०६ नोव्हेंबर ते ०८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयपीओ सबस्क्रिप्शनकरिता खुला होणार आहे. स्विगीने आयपीओ जारी करत भारतीय भांडवली बाजारात आपला प्रवेश निश्चित केला आहे. स्विगी आयपीओच्या माध्यमातून ११,३०० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.
भारतात सोन्याच्या मागणीत मोठी वाढ दिसून आली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत सोन्याच्या मागणीत तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण मागणी २४८.३ टन इतकी झाली आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोन्याच्या आयात शुल्कात कपातीची तरतूद केली. त्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती.
मागील काही काळापासून भारतीय भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण होत असून गुंतवणूकदार धास्तावले आहेत. आज सेन्सेक्स ६०२.७५ अंकांनी तर निफ्टीत १५८.३५ अंकांनी वधारला. गेल्या आठवड्यात बाजार लाल रंगात बंद होताना दिसला. त्यानंतर आता आठवड्याच्या सुरूवातीला बाजारात तेजी पुन्हा येण्याची शक्यता आहे.
मागील काळापासून भारतीय भांडवली बाजारात आयपीओचा प्रचंड ओघ दिसून येत आहे. त्यातच आता दिवाळीच्या मुहूर्तावर आणखी नवीन आयपीओज बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या काळात विविध क्षेत्रातील कंपन्या त्यांचे आयपीओ लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत.
गुंतवणूकदारांचा ओढा शेअर बाजाराकडे वाढल्यानंतर ‘आयपीओ’चेही जणू पीक आले आहे. पण, बरेचदा या ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल अथवा नाही, हे ठरविताना गुंतवणूकदारही संभ्रमात असतात. त्यानिमित्ताने ‘आयपीओ’चे गणित आणि गुंतवणूकदारांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करणारा हा लेख...
ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदी दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडींमुळे कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचा ओढा अधिक दिसून येत असून सोने-चांदीच्या किंमती दिवसागणिक वाढत होताना दिसत आहेत.
सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांक लाल रंगात बंद झाले आहेत. पश्चिम आशियाई देशांमधील तणाव, एफपीआयकडून मोठ्या प्रमाणात होणारी समभाग विक्री या सर्व कारणांचा नकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला आहे. सेन्सेक्स ८०,०६५.१६ पातळीवर तर निफ्टी ५० २४,३९९.४० च्या पातळीवर बंद झाला.
भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली असून मागील काही दिवसांपासून विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्रीचा सपाटा सुरू आहे. सेन्सेक्स १३८.७४ अंकांच्या घसरणीसह ८०,०८१.९८ पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० देखील २४,४३५.५० च्या पातळीवर बंद झाला.
आज शेअर बाजार बंद होताना दोन्ही निर्देशांकांत घट दिसून आली आहे. सेन्सेक्समध्ये ७३.४८ अंकांनी तर निफ्टीत ७२.९५ अंकांनी घसरण झाली आहे. सेन्सेक्स ८१,१५१.२७ वर स्थिरावला तर निफ्टी ५० २४,७८१.१० पातळीवर बंद झाला. शेअर बाजार पहिल्या सत्रातील मोठ्या उसळीनंतर घसरणीसह बंद होताना दिसला.
देशातल्या दोन बड्या आयटी कंपन्यांनी तिमाही निकाल जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर तिमाहीत विप्रोचा निव्वळ नफ्यात मोठी वाढ झालेली आहे. विप्रो कंपनीच्या निव्वळ नफ्यात २१ टक्क्यांनी वाढ होत ३,२०९ कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीने आपल्या भागधारकांसाठी मोठा निर्णय देखील घेतला आहे. यावेळी संचालक मंडळाने बोनस शेअर देण्याची घोषणादेखील केली आहे.
'वारी एनर्जीज लिमिटेड'चा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) लवकरच बाजारात दाखल होणार आहे. वारी एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ दि. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार आहे. कंपनी आयपीओद्वारे ४,३२१ कोटी रुपये बाजार भांडवल उभारले जाणार आहे. प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले ४,८००,००० इक्विटी समभाग विक्रीची ऑफर यामार्फत केली जाणार आहे.
ह्युंदाई मोटर कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. ह्युंदाई मोटर आयपीओच्या माध्यमातून बाजार भांडवल उभारणी करणार असून दि. १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान खुला असणार आहे. कंपनीकडून आयपीओच्या माध्यमातून २७,८७०.१६ कोटी रुपये भांडवल उभारले जाणार आहे. ह्युंदाई मोटर्स आयपीओचा एक लॉट ७ शेअर्सचा असून १८६५-१९६० प्राईस बँड ठेवण्यात आला आहे. २२ ऑक्टोबरला बीएसई आणि एनएसईवर कंपनी सूचीबध्द होणार आहे.
देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेड इश्यू लाँच होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. दि. १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आयपीओकरिता अप्लाय करता येणार आहे. ह्युंदाई मोटर्सने आयपीओसाठी १,८६५-१,९६० रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे.
सलग सहा दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात वाढ दिसून आली. मागील काही दिवस बाजारात पडझडीचे सत्र सुरू होते. मध्य-पूर्वेतील संघर्ष आणि आरबीआय पतधोरण यासह अन्य गोष्टींचा परिणाम बाजारावर दिसून आला. आज हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले स्पष्ट बहुमत यामुळे घसरणीचा ट्रेंड थांबला आहे.
इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होताना दिसून येत आहे. विशेषतः गुंतवणूकदारांच्या मनात धाकधूक वाढली असून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. जगापेक्षा भारतात सोने खरेदी करणारा वर्ग खूप मोठा आहे.
इस्त्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील प्रमुख शेअर बाजार कोसळताना दिसून येत आहेत. भारतीय शेअर बाजारात घसरण झाली असून सेन्सेक्स ६३८.४५ अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टी ५० ८१,०५० पातळीवर बंद झाला. आरबीआय एमपीसी बैठकीत रेपो रेट संदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणेदेखील यानिमित्ताने महत्त्वाचे असणार आहे.
सणासुदीच्या काळात गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळणार असून आणखी सहा कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. या आठवड्यात दोन नवीन आयपीओ बाजारात येणार असून आणखी ६ कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हेडहंटरशी मुक्त गप्पा | Headhunter Girish Tilak | Marathi Podcast | MahaMTB Gappa
भारतीय शेअर बाजार आज जवळपास क्रॅश झाल्याचे पाहायला मिळाले. मध्यपूर्वेतील इराण-इस्त्रायल यांच्यातील वाढता संघर्षामुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दरम्यान, शेअर बाजारातील कमकुवत ट्रेंडमध्ये सेन्सेक्स १७६९.१९ अंकांच्या घसरणीसह ८२,४९७.१० वर बंद झाला. तर निफ्टी ५४६.८० अंकांनी घसरत २५,२५०.१० वर बंद झाला.
इराण-इस्त्रायल यांच्यातील वाढत्या तणावानंतर जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ होणार असून इराणच्या हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे ४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे तेल विपणन, पेंट्स, एव्हिएशन आणि टायर यासारख्या प्रमुख तेल संबंधित क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची गुंतवणूकदारांनी विक्री केली.
देशातील भांडवली बाजारात आयपीओ जोरदार इंट्री पाहायला मिळत आहे. बाजारातील आयपीओमध्ये गेल्या आठ महिन्यांत तीन पटीने वाढ झाली आहे.
आता कंपनीच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुलभ होणार आहे. आयपीओ(IPO)प्रमाणेच खात्यातील निधी ब्लॉक करण्यासाठी युपीआय सुविधा मिळणार आहे.
भारतीय भांडवली बाजाराचा ‘बुल’ सध्या उधळलेला असून, महिन्यातील काही दिवस सोडले, तर बर्याच अंशी बाजार वधारलेल्या स्थितीतच बघायला मिळतो. रालोआ सरकारच्या गेल्या दोन कालखंडात भांडवली बाजाराने गुंतवणूकदारांना बक्कळ नफा मिळवून दिला आहे.