Asiduddin Owaisi जिल्ह्यात होळीनिमित्त गुरूवारी १३ मार्च रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काही हिंदू लोक हे मशिदीच्या गेटजवळ लाकडी ओंडका घेऊन जाताना दिसत होते. याबाबत मोहम्मद जुबैर असदुद्दीन ओवैसी आणि काही इस्लामिक कट्टरवादी संघटनांनी दावा केला की, हिदूंनी मशिदीवर हल्ला केला. हे सर्व होळी सणाच्या दिवशीच घडले.
Read More
वक्फ बिलाला हात लावल्यास देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल’ ही धमकी दिली आहे खा. असदुद्दीन ओवेसी यांनी. ओवेसी वारंवार अशा धमक्यांचा वापर करून लोकशाहीला कायमच दबावाखाली आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. पण, ओवेसींनी आता हे लक्षात घ्यावे की, या देशात निजामशाहीची पाळेमुळेदेखील शिल्लक नाहीत.
AIMIM दिल्लीतील हिंदूंविरोधातील झालेल्या दंगलीला पाठबळ देणारे नेते ताहिर हुसेन यांच्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत आणखी एक आरोपी शाहरूख पठाणला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मुस्लिमबहुल सीलपूर येथून दिल्ली पोलिसांवर पिस्तुल दाखवणाऱ्या शाहरूख पठाणला एमआयएम पक्ष असदुद्दीन औवेसी यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे.
पुष्पा २ हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासून रोज नवे विक्रम करतो आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा पुष्पा मात्र आता चांगलाच अडचणीत येणार असल्याचे दिसते आहे. तेलंगणाच्या विधानसभेत बोलताना एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी अभिनेता अल्लू अर्जुनवर गंभीर आरोप केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच सध्या संभाजीनगर येथे एका बॅनरची चर्चा आहे. संभाजीनगर येथे भाजप विरूद्ध एमआयएममध्ये टक्कर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी करत १५ मिनिटांचे शंभर टक्के मतदान करा असे उत्तर देण्यात आहे.
( Devendra Fadnavis ) राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दि. ९ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
( Devendra Fadnavis )"सुन लो ओवैसी, छत्रपती संभाजीनगर... किसी का बाप भी पैदा हुआ तो अब ये नाम नही बदल सकता...", अशी गर्जना करत देवेंद्र फडणवीसांनी एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींना खुले आवाहन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दि. ९ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना सुरुवातीलाच छत्रपती संभाजीनगर या नावावर भर देत त्यांनी ओवैसींवर निशाणा साधला आहे.
Akbaruddin Owaisi एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी १५ मिनिटांचा संदर्भ देत उल्लेख केला. प्रचाराच्या वेळेचा संदर्भ देत ओवैसी म्हणाले की, १० वाजून ४५ मिनिटांची वेळ आहे, यामध्ये अजून १५ मिनिटे शिल्लक आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना ते म्हणाले की, अरे जरा धीर धरा, १५ मिनिटे बाकी आहेत. ना ती आम्हाला सोडते ना ती मला सोडते, असे वक्तव्य अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापणार असल्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर ते छत्रपती संभाजीनगर
बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची गँग देशभर चर्चेत आली आहे. बाबा सिद्दीकीने सलमान खानशी मैत्री असल्यामुळे त्याला याचे परिणाम भोगावे लागले असे बिश्नोई गँगने सांगितले आहे. अशातच, आता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मारण्याची धमकी दिली आहे.
इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत पत्र दिल्याचे एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मविआमध्ये उडी घेण्यासाठी एमआयएम उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे.
गोव्यात 'विश्व हिंदु राष्ट्र महोत्सव' संपन्न होत आहे. दि. २४ ते ३० जून या कालावधीत होणाऱ्या महोत्सवासाठी देशातील २६ राज्यांतील एक हजाराहून अधिक हिंदू संघटनांच्या २ हजार प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले असून त्यासोबतच परदेशातील प्रतिनिधीही सहभागी झाले आहेत.
असदुद्दीन ओवैसींची जीभ छाटून त्याला भर चौकात उभं करायला हवं, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेताना संसदेत जय पॅलेस्टाईन असा नारा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली.
१८व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यादरम्यान त्यांनी संसदेत शपथविधी सोहळ्यात जय पॅलेस्टाईन म्हणत नवा वाद निर्माण केला आहे. शपथ झाल्यानंतर ओवेसींनी अशाप्रकारचा नारा दिला. तर ओवेसींनी आपल्या शपथविधीची सुरुवात बिस्मिल्लाचा पठण करून घेतली. खासदार म्हणून शपथ घेताना जय भीम, जय मीम, जय तेलंगणा आणि नंतर जय पॅलेस्टाईनच्या घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी दि. ८ मे २०२४ रोजी हैदराबादच्या भाजप उमेदवार माधवी लता यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी हिंदूंना १५ मिनिटांमध्ये संपवण्याची भाषा करणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसीला चांगलेच उत्तर दिले.
हैदराबाद लोकसभा निवडणूक दिवसेंदिवस अधिक चुरशीची होत चालली आहे. भाजप उमेदवार माधवी लता यांनी एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या खोट्या विकासाचा आणि तुष्टीकरणाचा बुरखा टराटरा फाडलाय. ओवेसीसारख्या मातब्बर उमेदवाराला माधवी लता जोरदार टक्कर देत असून, झंझावाती प्रचारामुळे आता ओवेसी हैदराबादच्या गल्लीबोळात मतांची भीक मागत फिरताना दिसतात.
काँग्रेस पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हैदराबादमध्ये एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात उमेदवार उभा करणार नाही. अशी माहिती तेलंगणा काँग्रेसचे सरचिटणीस यांनी ही माहिती दिली आहे. मतांचे विभाजन रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना पाठिंबा देईल, असे त्यांनी म्हटले आहे.
एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात भाजपच्या माधवी लता या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजपकडून लोकसभा उमेदवार असलेल्या माधवी लता तेलंगणाबाहेर अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांची मुलाखत पत्रकार रजत शर्मा यांनी इंडिया टीव्ही शो 'आप की अदालत'मध्ये त्यांची मुलाखतदेखील घेतली आहे.
भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात डॉक्टर माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. प्रचारादरम्यान त्यांनी एमआयएम पक्षाचे प्रमुख ओवेसींवर गंभीर आरोप केले आहेत. अलीकडेच त्यांनी मीडियासमोर दावा केला होता की, ओवेसी बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांना दोन बेडरूमचे फ्लॅट देत आहेत. हे मुस्लिम कोठून आले आहेत, ते पाकिस्तानी आहेत की बांगलादेशी आहेत, हे माहीत नाही, पण सत्य बाहेर येईल.
भारतीय जनता पक्षाने शनिवारी दि. २ फेब्रुवारी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये हैदराबादमध्ये AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भाजपने डॉ. माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा देशभरात सुरू आहे. माधवी यांना उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर तिच्या समर्थनार्थ प्रचार सुरू झाला आहे.
तेलंगणात चक्क २१ कुत्र्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेचा तपास तेलंगण पोलिसांकडून करण्यात येत असून या गोळीबारात ५ कुत्रेही जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेच्या दिवशीच स्थानिक आमदार अकबरूद्दीन औवेसी यांनी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विधानसभेत भाषण केले होते.
ज्ञानवापी संकुलाच्या धार्मिक वैशिष्ट्यावरून सुरू असलेल्या न्यायालयीन वादाच्या दरम्यान वाराणसीतील जिल्हा न्यायालयाने दि.३१ जानेवारीला ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघर (व्यास तळघर) हिंदूंनी दैनंदिन पूजेसाठी सोपवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ३० वर्षानंतर ज्ञानवापीत पुजा-अर्चा झाली. पण या निर्णयाबद्दल असदुद्दीन औवेसी म्हणाले की, हा निर्णय वर्शिप कायद्याचे उल्लघंन आहे.
"मी तुम्हाला हेही सांगायला आलो आहे की, ना मोदींना घाबरू नका, ना शहांना घाबरू नका, ना सरकारला घाबरू नका, कोणाला घाबरू नका, फक्त अल्लाचे भय बाळगा." असा सल्ला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना दिला आहे. हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी ३६ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिप एक्स हँडलवर शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी हे विधान केलेले आहे.
“तरुणांनो, मी तुम्हाला सांगत आहे, आम्ही आमची मशीद गमावली आहे आणि तिथे काय केले जात आहे ते तुम्ही पाहत आहात. तरुणांनो, तुमच्या अंतःकरणात वेदना नाही का? ज्या ठिकाणी आपण बसून ५०० वर्षे कुराण-ए-करीमचे पठण केले ते आज आपल्या हातात नाही. तरुणांनो, तुम्हाला दिसत नाही का आणखी तीन-चार मशिदींबाबत षडयंत्र सुरू आहे, ज्यामध्ये दिल्लीची मशीदही सामील आहे." असे वक्तव्य एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.
राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा व चार राज्यातील निवडणूकांची मतमोजणी सुरू आहे. चारही राज्यात कोण सत्तास्थापन करणार याकडे पूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. त्यातच आता तेलंगणामध्ये काँग्रेसची वाटचाल बहुमताकडे चालली आहे. ११९ जागांपैकी काँग्रेसने ७० जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी बीआरएसला अवघ्या ३७ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजपने देखील ८ जागांवर आघाडी घेतली आहे.
हैदराबादमध्ये 'एआयएमआयएम'चा दरारा कमी होताना दिसत आहे. मुस्लिमांचा एक मोठा वर्ग ओवेसी बंधूंना (अकबरुद्दीन ओवेसी आणि असदुद्दीन ओवेसी) विरोध करत आहे. त्यांच्यावर भाजप आमदार टायगर राजा सिंह यांना घाबरण्याचा आणि मुस्लिमांचा विश्वासघात केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे टी राजा सिंह यांचे नाव ऐकून ओवेसींना पळता भुई थोडी होते, असे विधान एका व्यक्तीने केले आहे.
तेलंगणातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. परंतू, प्रचारादरम्यानचा एक धक्कादायक व्हिडीओ पुढे आला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी प्रचार करत असताना एका महिलेने भाजप नेते टी राजा सिंह यांची हत्या करणार असल्याचे म्हटले आहे.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात झाली असून प्रचारासभा ठिकठिकाणी घेण्यात आहेत. १९८४ च्या शीख नरसंहारात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची मोठी भूमिका असल्याचा मोठा गौप्यस्फोट एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला. दरम्यान, AIMIM खासदार असदुद्दीन ओवैसींनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे.
भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच राजकारणी आणि इतरांना पाठवलेल्या 'सरकार प्रायोजित हॅकर्सपासून सावध रहा' या संदेशावर अॅपलकडून प्रतिसाद मागितला आहे. IT मंत्रालयाने दि. २ नोव्हेंबर २०२३ रोजी Apple ला नोटीस पाठवून या दाव्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले. या नोटीसवर मंत्रालयाने अॅपलकडून तत्काळ उत्तर मागितले आहे.
हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत दीड हजार निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तरीही काही लोकं पॅलेस्टाईनच्या नावाखाली हमासला समर्थन देत आहेत. अशा लोकांना आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच त्यांच्या एकमेकांवरील टीका टिपण्णींमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. आता एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी राहूल गांधींवर जोरदार टीका केली आहे.
२०१९ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभव होणार असल्याचे लक्षात येताच. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तिथून ते निवडूनही आले होते. पण आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आगामी लोकसभा निवडणूक वायनाडमधून नव्हे तर हैदराबादमधून लढण्याचे आव्हान दिले आहे.
केंद्र सरकारकडून विशेष संसद अधिवेशन घेण्यात आले असून अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्यात आली आहे. लोकसभेत या चर्चेवर चर्चा करताना काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून सहभाग घेण्यात आला आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकारने महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदन हे विधेयक आणले आहे. या विधेयकावर आज संसदेत चर्चा सुरु आहे. याच चर्चेदरम्यान एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.
आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मुस्लीम राजकारणही वळण घेण्याच्या तयारीत आहे. मात्र, यावेळी भारतीय जनता पक्षाचाही त्यात समावेश आहे. हिंदुत्वाच्या रथावर स्वार होऊन भाजप पसमंदा मुस्लिमांचा मुद्दा जोरात मांडत आहे. रामपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयामागे पसमंदा मुस्लिमांचा हात असल्याचा दावाही भाजपने केला आहे.
उत्तर प्रदेशामधील बरेली जिल्हा पोलिसांनी फेसबुकवर भडकाऊ व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सद्दाम, उवैश, सोहिल, मुस्तफा, अरमान, सलमान आणि ताहिर अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांवर अकबरुद्दीन ओवेसी यांनी हिंदूंना दिलेले १५ मिनिटांचे धमकीचे शब्द लिहून मोहरमचा व्हिडिओ मिसळून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपा सरकार विरोधात विरोधी पक्षांच्या आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे. या ठरावावरील चर्चेत असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा भाग घेतला. आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकार मुस्लिमांसोबत भेदभाव करत असल्याचा आपला जुनाच आरोप केला.
बुलढाणा : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींची शनिवारी बुलढाण्यातील मलकापूर येथे जाहीर सभा होती. मलकापूर येथील सभेत असदुद्दीन ओवेसींनी "औरंगजेब अमर रहे"च्या घोषणा दिल्या. तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भारतीय जनता पक्षाकडून पोलीसांत तक्रार करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुलढाणा पोलीसांशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील कडासने यांच्याशी बोलून औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये नमाज अदा करण्यासाठी यूपी रोडवर बस थांबवल्याप्रकरणी ओवैसी यांचे वक्तव्य आले आहे. AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे की, जर दोन मुस्लिमांनांनी बस थांबवून नमाज अदा केली तर त्यात कोणती कयामत आली.
उत्तर प्रदेशातील मेरठ असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM चा शहराध्यक्ष असल्याची बतावणी करून एका तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपी उमैरला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ५ जून २०२३ रोजी लालकुर्ती पंथ बाजारपेठेतील आहे. त्याचा व्हिडिओही ७ जून रोजी व्हायरल झाला आहे.
दि. ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने आतापर्यंत २२५ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. पण, या चित्रपटाचे ‘ट्रेलर’ प्रदर्शित झाल्यापासून सुरू झालेली वादांची मालिका अजूनही थांबलेली नाही. ‘द केरला स्टोरी’ला नावे ठेवणार्यांच्या गटात आता निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचाही समावेश झाला आहे. कमल हसननंतर कश्यप यांनीही आता ‘द केरला स्टोरी’वर तोंडसुख घेतले.
नवीन संसद भवनाचे उद्धाटन दि.२८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते होणार आहे. परंतू उद्धाटनाआधीच विरोधी पक्षांनी याला विरोध केला आहे. तसेच मोदींच्या उद्घाटनाला विरोध करणाऱ्या बहुतांश विरोधी पक्षांनी समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्धाटन करू नये, असे विधान एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींनी केले आहे.
माफिया अतीक अहमदचा मुलगा असद अहमद आणि त्याचा साथीदार मोहम्मद गुलाम यांच्या एन्काऊंटरवरून राजकारण सुरू झाले आहे. १३ एप्रिल रोजी यूपी एसटीएफने त्या दोघाचा ही एन्काऊंटर केला. मात्र सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी या एन्काऊंटरला फेक असल्याचे म्हणटले आहे. तसेच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मावरून एन्काऊंटर केले जात असल्याचे म्हणटले आहे.
“भारतात राहणार्या सर्वांचा ‘डीएनए’ एकच आहे, सगळे भारतीय हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन यांच्यात ‘डीएनए’ समान आहे,” असे विधान सरसंघचालक मोहनराव भागवतांनी केल्यावर देशभर प्रतिक्रिया उमटल्या. संघाला आता हिंदू आणि हिंदुत्वाशी काहीहीदेणंघेणं नाही इथपासून ते भाजपच्या ‘सबका साथ, सबका विकास’ घोषणेला अनुसरून संघ आता मुस्लीम अनुनय करतो आहे इथपर्यंत या प्रतिक्रिया होत्या. याच्या दोन्ही बाजू तपासण्याची आवश्यकता आहे. सुरुवात दुसर्या बाजूपासून करू...
आपल्या एकगठ्ठा मतांसाठी ते या हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचविण्याच्या उद्योगांच्या मागे लागले आहेत. स्वत:ला ‘मुसलमानांचे नेते’ म्हणविणारे नेते हे असेच वागणार, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. कारण, पाकिस्तानचे राजकारणच मुळी भारतद्वेषावर चालते. तसेच ओवेसी, जलील, अबू आझमी यांचे राजकारण आपल्यातल्या धर्मांधांना अजून धर्मांध करून चालते.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरच काय ओवैसी यांच्याशीसुद्धा युती करू शकतात, पण आमच्या विरोधात कोणी कितीही युती केली तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही एक्कावन्न टक्के मतांची लढाई लढून कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे केले.
योगी सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेल्या मदरशांच्या सर्वेक्षणानंतर राज्यातून तब्बल २५०० मदरसे गायब झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मदरसा शिक्षा परिषद अध्यक्षांनी ही माहिती दिली आहे. मदरशांच्या सर्वेक्षणामुळे बेकायदेशीर धंदे राजरोस सुरू करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. १३ सप्टेंबरपासून योगी सरकारने मदरशांचे सर्वेक्षण सुरू केले. ५ ऑक्टोबरपर्यंत योगी सरकारकडे याचा अहवाल सादर करायचा आहे. Madarsa Survey
योगी सरकारने राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी, तिथे शिकणाऱ्या मुलांना आधुनिक आणि त्यांच्या भविष्यासाठी सुयोग्य असे शिक्षण मिळावे यासाठी राज्यातील मदरशांचे सर्वेक्षण सुरु केले आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडलेल्या नुपूर शर्मांचे समर्थन केले आहे. शर्मा यांची बाजू घेताना "नुपूर शर्मा जे बोलल्या होत्या, झाकीर नाईकनेही तेच सांगितले होते". "पण नाईकने माफी मागावी अशी कोणीही मागणी केलेली नव्हती", असे विधानकरून त्यानंतर राज ठाकरे यांनी एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर ठाकरी भाषेत तोफ डागली.
बू आझमी यांच्या पाठच्या पिढीचा मागोवा घेतला, तर साधारण पाच-सहा पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज कोण होते? आझमींचे पूर्वज जर याच भारत देशातील असतील, तर त्यांचे मूळ पूर्वज मुस्लीम असणे शक्यच नाही. पण, आपण किती कट्टर मुस्लीम आहोत, हे दाखवण्यासाठी अबूसारख्यांवर आपण औरंगजेबाची औलाद आहोत, हे सिद्ध करण्याची नामुश्की येते
"देशातील कोरोना लसीकरण पूर्ण झाल्यानंतर सीएए कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरु होईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्याला आश्वस्त केले असल्याचे पश्चिम बंगालचे विरोधीपक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी जाहीर केले