ज्यांच्या काव्यप्रतिभेने मराठी साहित्य उजळून निघाले असे विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज यांची जन्मभूमी असणारे शिरवाडे वणी हे गाव ' कवितांचे गाव ' म्हणून घोषित करण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव 'कवितांचे गाव' म्हणून घोषित करण्यात आले. भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी शालेय शिक्
Read More
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या मायमराठीच्या समृद्धीसाठी महायुतीचे सरकार सदैव तत्पर राहील " असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिम्मित आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्यादेखील उंचावते आहे. आर्थिक परिस्थिती नसताना पालक आपल्या पाल्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. यामागील कारणांचा शोध घेतला असता, भाषेत उदरनिर्वाहाची असणारी क्षमता, भाषेमुळे मिळणारी प्रतिष्ठा या गोष्टी कारणीभूत आहेत. नोकरी मिळण्याची क्षमता एखाद्या भाषेच्या अंगी कशी येते, याचा शोध घेऊन मराठीला त्यादिशेने पावले टाकण्याची गरज आहे.
स्वातंत्र्यानंतर मराठी ही शासकीय भाषा म्हणून स्वीकारली गेली असली, तरी तिचा प्रभावी वापर संपूर्णपणे रूढ झालेला नाही. इंग्रजी शब्दप्रयोग अजूनही सरकारी लिखाणात आणि संभाषणात सहजगत्या घुसखोरी करताना दिसतात. उदाहरणार्थ, मीटिंग, डिपार्टमेंट, ऑफिस, अटेन्डन्स, सर्क्युलर असे शब्द सहज वापरले जातात, जे बैठक, विभाग, कार्यालय, हजेरी, परिपत्रक असे सहजपणे मराठीत बदलता येऊ शकतात.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची बातमी आली आणि समस्त मराठी जनता सुखावून गेली. तरुणांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच ही गोष्ट साजरी केली. मात्र, अभिजात दर्जा मिळल्यानंतर नेमकी कोणती गोष्ट घडणार आहे, याचा विचार फार कमी तरुणांनी केला असेल, असे आपल्या आसपासचे वातावरण पाहिल्यावर लक्षात येते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आपल्या सर्वांनाच अतिशय आनंद झाला. परंतु, मराठी भाषेच्या श्रेष्ठत्वासाठी काम करताना सर्व क्षेत्रांत ती उपयोगांत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भारतीय राज्यघटनेनुसार, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळणे हा एक मूलभूत हक्क आहे. परंतु, न्यायालयीन प्रक्रिया ही बहुतेक वेळा इंग्रजी भाषेत चालत असल्याने, अनेक मराठी भाषकांना न्याय मिळवताना अडचणी येतात आणि भाषा म्हणून मराठी केवळ टिकवण्यासाठीच नाही, तर तिला समृद्ध करण्याच्या दृष्टीनेही विचार व्हायला हवा. याच पार्श्वभूमीवर, न्यायव्यवस्
अलीकडच्या काळात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा ही सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. एक प्रकाशक म्हणून माझ्यासाठीसुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठीमध्ये सकस साहित्यनिर्मिती होते. हे साहित्य वाचणारा चांगला वाचकवर्ग मराठीच्या नशिबी आहे. येणार्या काळात आपल्या अभिजात मराठीचा वाचकवर्ग वाढेल, यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
मागील वर्षीच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्या पार्श्वभूमीवर दि. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करताना ‘एआय’च्या युगात मराठी यावर विचार करणे विशेष आवश्यक ठरते.