राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर करण्यात आला. यामध्ये राज्याच्या प्रगतीची, तसेच राज्यासमोरील आव्हानांची सखोल मांडणी करण्यात आली आहे. याच आर्थिक पाहणी अहवालाचा घेतलेला हा धांडोळा...
Read More
(Mumbai Bike Taxi) मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईमधील रस्त्यांवर आता बाईक टॅक्सी धावणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा मोठा निर्णय मानला जात आहे. या निर्णयामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वावाला कोळी गीतांची आणि कोळी नृत्यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. याच परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय कोळी गीत नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दांडेश्वर शंकर मंदिराच्या प्रांगणात दि. ७ मार्च ते दि. ९ मार्च असे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, महिला आणि मुलींमध्ये एचपीव्ही लसीकरण करण्याचा विचार सुरू केला आहे, ही एक महत्त्वाची बाब आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या लसीकरणासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याची भूमिका जाहीर केली असून, या निर्णयामुळे राज्यातील महिला आरोग्याच्या संरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
माहितीचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य आधारसामग्री’ धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. डेटा ही आजच्या काळातील सर्वांत मौल्यवान संपत्ती असल्याचे मानले जाते. या माहितीचा योग्य पद्धतीने वापर केला, तर त्याचा जनतेला मोठा फायदा होणार आहे.
HSRP Number Plate : १ एप्रिल २०१९ पासून तयार केलेल्या आणि खरेदी करण्यात आलेल्या वाहनांना केंद्र शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक केली होती. त्यामुळे सर्व वाहन वितरक हे एचएसआरपी नंबर प्लेट बसवूनच वाहने ग्राहकांच्या ताब्यात देतात. मात्र आता जुन्या वाहनांनासुद्धा म्हणजेच १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांनासुद्धा 'एचएसआरपी' नंबर प्लेट बंधनकारक केली जाणार आहे. ३१ मार्च २०२५ च्या आधी एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने बंधनकारक केलेले आहे. ज्यांच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट म्हणजेच एचएसआर
Chandrashekhar Bawankule महाराष्ट्रात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी राहणार असून, याप्रमाणे राज्यभरात सुमारे एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त करणार असून प्रत्येक ठिकाणी ३३ टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी राज्य निवड समितीचे अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्यघटनेनुसार भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र सद्यस्थितीत सरकारने केवळ एका समाजाची, म्हणजे हिंदूंचीच धार्मिक स्थळे नियंत्रणात घेतली आहेत. कायदा सर्वांना समान असावा. त्यामुळे केवळ हिंदूंचीच नव्हे, तर अन्य धर्मियांची धार्मिक स्थळेही नियंत्रणात आणण्याविषयी सरकारने विचार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी दिले.
कुर्ल्यातील बेस्ट बस दुर्घटनेमुळे अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक नियोजनाची आवश्यकता असे अनेक मुद्दे चर्चेत आले आहे. मुंबईचे वाहतूक नियोजन आखताना महानगरपालिका, एमएमआरडीए, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील समन्वयाची आवश्यकता याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
पणजी : ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फिल्म बाजार’ या उपक्रमात ‘महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागा’तर्फे दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून चार मराठी चित्रपटांचे ( Marathi Films ) प्रदर्शन दि. २१ नोव्हेंबर ते दि. २३ नोव्हेंबर या दरम्यान गोवा, पणजी येथे केले जाणार आहे. या उपक्रमाबद्दल दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला संवाद.
विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर अमित गोरखे यांनी २५ हून अधिक जिल्हे आणि १५० हून अधिक तालुक्यांतील नागरिकांशी 'बहुजन संवाद यात्रे'द्वारे संपर्क साधला असून, ठिकठिकाणी या यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
राज्यातील सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाला 'संत भोजलिंग काका' यांचे नाव देण्यात आले आहे.
(Dharavi Redevelopment Project) धारावी पुनर्विकासामध्ये धारावीतील जनता सरकारच्या मागे पूर्णपणे पाठीशी आहे. मला शंका नाही की, जर विरोधी पक्ष सत्तेवर आला, तर ते हा पुनर्विकास प्रकल्प रद्द करतील. कारण त्यांचा ट्रॅक रेकॉर्डच असा आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने मुंबईमधील सर्व रामलीला मंडळांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मंगळवार, दि. २४ सप्टेंबर रोजी सर्व रामलीला मंडळांच्या प्रश्नासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काही महत्त्वाचे निर्देश दिले. त्यामुळे रामलीला उत्सवाचे आयोजन आता अधिक सोपे होणार आहे.
पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
National Pension Scheme राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही योजना मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४’ ची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपाना पूर्णत: विनामूल्य वीज पुरवली जाणार आहे. राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकर्यांना याचा लाभ होणार आहे. एप्रिल २०२४ पासून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून नामांकित १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यासाठी आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
राज्यातील महिलांना सुरक्षित मातृत्वाची हमी देण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने ६०० 'सुमन' संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी शनिवारी, २५ नोव्हेंबरला त्यासंदर्भात घोषणा केली.
कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना मंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भाजप नेते पाशा पटेल सध्या या आयोगाचे अध्यक्ष आहेत. राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळावेत आणि ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा, या दुहेरी उद्देशाने राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरातील रस्ते पाण्याने धुण्याचे आणि रस्ते धुलाईसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी बुधवार पासुन शहरातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते धुण्यास प्रारंभ केला आहे.
शासकीय सेवेत असतानाही क्रीडा क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी बजावणारे ‘आयर्न मॅन’ विकास गजरे यांची यशोगाथा...
मुंबई शहरातील वाढत्या वायू प्रदुषणामुळे महापालिका प्रशासन सतर्क असून सरकार पातळीवर नवनवीन उपाययोजना राबविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. दरम्यान, पालिका प्रशासन वायू प्रदुषणाबाबत उपाययोजना करण्यात व्यस्त असताना एका व्यक्तीने X वर पोस्ट करत आणखी नवा एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे.
सून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील ड्रग्जबाबात चौकशी अहवाल शासनास सादर केला असून शासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या ९ नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने दि.१० नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे.
राज्यातील महायुतीचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर ग्रामपंचायतींच्या निकालांनी शिक्कामोर्तबच केले. राज्यात महायुती अस्तित्वात आल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने अव्वल स्थान राखले, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. महायुती सरकारविरोधात विशेषतः फडणवीस यांच्याविरोधात कायमच द्वेषाचे राजकारण करणार्या शरद पवारांना मोठा झटका देणारा निकाल, असे निश्चितपणे म्हणता येईल.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना 'नॉन क्रिमिलियर' प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात (एमपीएससी)अंतर्गत मेगाभरती केली जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र गट -क सेवा मुख्य परीक्षा २०२३ द्वारे एकूण ७,५१० पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी 'आठवडी बाजार' महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. दरम्यान, महापालिकेने आठवडी बाजारांचा अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला असे सांगतानाच महिला बचतगट खूप चांगल्या प्रकारे कार्यरत असून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे मंत्री लोढा यावेळी म्हणाले.
कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खारीगाव टोलनाक्यावर एका टेम्पोमध्ये सुमारे साडेचोवीस लाखांचा सुगंधी पानमसाला व जाफरानी जर्दा वाहतूक होत असल्याची माहिती कळवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार,अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि कळवा पोलिसांनी तपासणी करून मुद्देमालासह टेम्पो ताब्यात घेऊन चालकाला अटक केली.
दिवाळी सण जवळ आला की, सर्व कर्मचाऱ्यांना पगारात मिळणारा बोनस आठवू लागतो. या बोनसबाबत सर्वच कामगारवर्गात उत्सुकता पाहायला मिळते. सरकारी कर्मचारी असो की, गैर-सरकारी कर्मचारी या प्रत्येकामध्ये बोनसविषयी एक ओढ पाहायला मिळते. तर आज जाणून घेऊयात बोनस नेमका ठरवला कसा जातो?
बिहारमध्ये नुकतीच जातनिहाय जनगणना झाली. त्यावरून देशभरात सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावर काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्यांनी देशभरात जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी केली. जातनिहाय जनगणना का आणि कशासाठी? काँग्रेसने त्यांच्या समविचारी पक्षाने, अशी मागणी का करावी? यापाठीमागचे कारण काय? जातनिहाय जनगणना कराच, अशी मागणी करण्यामागे यांचा उद्देश नक्की काय, याचा सांगोपांग विचार करायलाच हवा. त्या विचारांचा या लेखात परामर्श घेतला आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत असतानाच ओबीसी नेते मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ओबीसी नेते आणि राज्य सरकार यांच्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत मराठा आरक्षणाला ओबीसी कोटातून आरक्षण देण्यास विरोध करण्यात आला.
मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून दि. ९ नोव्हेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ(एमआयडीसी) अंतर्गत विविध पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेत नमूद केलेल्या माहितीनुसार एमआयडीसी, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून सर्वण समाजातील आर्थिक दुर्बल किंवा होतकरू तरूणांचा हाताला काम मिळावे यासाठी सरकारी योजना महामंडळ अथवा निधी सहाय्य मिळावे अशी मागणी समाजातून होती. अर्थात त्यातून किती मतदान राजकीय पक्षांना मिळेल हा वेगळा मुद्दा आहे. परंतु राष्ट्रावर प्रेम असलेल्या राष्ट्रवादी विचारांची मोट बांधलेल्या समविचारी लोकांनी एकत्र येत ' अमृत' योजना राबवायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकांना सक्षम बनविण्यासाठी या महाराष्ट्र शासन पुरस्कृत अमृत योजना ही स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी निर
'कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय' (DOGR) पुणे येथे “यंग प्रोफेशनल-I” पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदानुसार पात्र मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) चंद्रपूर येथे विविध रिक्त पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीप्रक्रियेतून १० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. 'सीआयपीईटी'मध्ये एकूण रिक्त असलेल्या ६० जागांसाठी ही भरती केली जाणार असून पात्र उमेदवारांनी २ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करायचे आहेत.
कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी ज्योति जगताप हिच्या जामीन याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २१ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे. ज्या फॉर्म्युलाच्या आधारे प्रकरणातील सह-आरोप वर्नोन गोंसाल्वेस आणि अरुण फरेरा यांच्या जामीन याचिकेवर निर्णय घेण्यात आला,त्यात जगताप यांची याचिका बसते की नाही यासंबंधी विचार केला जाईल,असे तोंडी मत खंडपीठाने मंगळवारी नोंदवले आहे.
सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या जिल्हा परिषदेच्या 19460 पदांसाठी मेगा भरतीला सुरुवात झालेली असून सर्व जिल्हा परिषदेच्या जाहिराती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. आयबीपीएस मार्फत ऑनलाईन अर्जाला सुद्धा आजपासून सुरुवात झालेली असून २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.
कृषी सेवक पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. कृषी सेवक पदांच्या तब्बल ९०० हून अधिक रिक्त पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. कृषी सेवक पदाच्या ९५२ रिक्त जागा या विविध जिल्ह्यांत असणार आहेत. राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त असणाऱ्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांसाठी ही भरती केली जात आहे.
राज्यातील विविध जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे भरण्याकरिता भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेतील ४९९ पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ही भरतीप्रक्रिया ४९९ रिक्त पदांकरिता असून यात विविध पदांसाठी उमेदवारास अर्ज करता येणार आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्हा परिषदेने ४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिध्द केली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमधील शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी नागरिक येतात. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना अधिकाधिक आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आगामी काळात शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
राज्य शासनाकडून दिला जाणार्या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’ची घोषणा १४ जुलै रोजी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. त्यानिमित्ताने क्रीडा क्षेत्राकडे समाजाचा बदललेला दृष्टिकोन आणि क्रीडा पुरस्कारार्थींची थोडक्यात ओळख करुन देणारा हा लेख...
मागच्याच रविवारी म्हणजे दि. २ जुलै रोजी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नऊ मंत्र्यांसह अजित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते फडणवीस-शिंदेंच्या महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. पण, या एकाच आठवड्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आरोप-प्रत्यारोप, नियुक्त्या-प्रतिनियुक्त्या आणि बरेच काही. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजवरची वाटचाल, शरद पवारांच्या अगम्य राजकीय भूमिका आणि अजितदादांच्या बंडाची बीजे यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
रत्नागिरी: रांगोळीच्या विविध छटांतून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले. या रंगावलीतून ते साक्षात वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत, असा भास होतोय, गौरवोद्गार श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्नाशेठ सुर्वे यांनी काढले. स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहानिमित्त पतितपावन मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
’बेस्ट’ उपक्रमासाठी करण्यात येणारी बस खरेदी आणि राबविण्यात येणार्या प्रक्रियेवरून मागील काही दिवसांपासून नवनवीन वाद उद्भवत असताना भाजपचे आमदार अमित साटम यांनी आणखी एक नवा आरोप केला आहे.
नवीन निवृत्तिवेतन योजना रद्द करण्याच्या मुख्य मागणीसोबतच इतर अनेक मुद्द्यांसाठी सरकारी-निमसरकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने २३ व २४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात करोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे समोर आले आहे