मिशन लोकसभा २०२४! हातकणंगलेच्या तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी ?
Read More
अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana patole Akola यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे, घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये आणि मते मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
सांगली आणि भिवंडी हे काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ. मात्र, उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्यावर अडून बसल्याने अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे त्यांनी या जागांचा हट्ट न सोडल्यास स्वतंत्र उमेदवार देण्याबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.
रामटेक लोकसभा मतदारसंघातुनही महायुतीकडुन शिवसेनेचे राजु पारवे तर महाविकास आघाडीकडुन काँग्रेसच्या रश्मी बर्वे Rashmi Barve यांनी अर्ज दाखल केला आहे. रश्मी बर्वे यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याची माहीती आहे. त्यामुळे आता त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला जाण्याची श्यक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाकडुन कसबा विधानसभा kasaba vidhansabhaमतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे. आगामी लोकसभेला पुणे लोकसभा मतदारसंघातुन कसब्याचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. ती जागा आगामी विधानलभेला ठाकरे गटाला मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत अंतिम चर्चा होणे बाकी असतानाच १७ उमेदवारांची यादी जाहीर केली काँग्रेसचे इच्छुक उमेदवार sangli congress आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातु विशाल पाटील यांनी मात्र सांगली काँग्रेसचीच असं म्हणत बंडाचा पवित्रा घेतला आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा Govinda Shivsena यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपुर्वीच गोविंदा यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हापासुनच गोविंदा यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु होती. गोविंदा यांच्या पक्षप्रवेशाने त्या चर्चांना पुर्णविराम लागला आहे.
देशभरात लोकसभा निवडणुक २०२४ चे वारे वाहु लागले आहेत. सर्वंच पक्ष लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार घोषित करत आहेत. अशामध्ये काँग्रेसला पुन्हा सुरुंग INC MLA resign लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे पाच आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यात तीन विधानसभेतील आमदार आहेत, दोन विधान परिषदेतील आमदार आहेत.
उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी वंतिच बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना चार जागांचा ( 4 seats to Vanchit in MVA ) प्रस्ताव कायम आहे. असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा आजही कायम आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला १२ जागांची मागणी केली होती. महाविकास आघाडीतील चारही पक्ष १२ १२ जागा लढवतील अशी त्यांची इच्छा होती.
चंद्रपुर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज भरताच सुधीर मुनगंटीवार हे उमेदवारी अर्ज भरणारे विदर्भातील पहीले उमेदवार ठरले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी Raju Shetti MVA यांना पाठींब्यावरुन मविआमध्ये गोंधळ उडाला आहे. राजु शेट्टींनी मविआत सोबत यावे अशी इच्छा आहे. परंतु त्यांनी पाठींबा न घेतल्यास आम्हाला उमेदवार द्यावा लागेल असं मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते गोविंदा राजकारणात पुन्हा एंट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे. गोविंदा यांनी काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेतली असल्याची माहीती आहे. त्यामुळे माजी खासदार गोविंदा ( Govinda Shivsena ) राजकारणात पुनरामन करणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे ( Vijay shivtare Baramati ) यांनी मी कमळ चिन्हावर निवडणुक लढवण्यास तयार आहे. असं म्हटलं आहे. हे बंड नसुन मतदारांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मी ही निवडणुक लढवत आहे. असंही विजय शिवतारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत चिन्ह काय असावे, यासंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीकडुन गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोड रोलर या चिन्हांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातुन महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपला उमेदवार जाहीर केला आहे. गुरुवारी २१ मार्चला काँग्रेसने आपल्या महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पुणे लोकसभेचा समावेश आहे. पुण्यामध्ये काँग्रेसने लोकसभेसाठी आमदार रविंद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांच्या नावाची घोषणा केली आहे. पण यामुळे आता पुणे काँग्रेसमध्ये उभी फुट पडली आहे.