(Inspection in Vasai under the leadership of local MLA Sneha Dubey Pandit) वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी आज वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार तसेच विविध विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वसई विधानसभा क्षेत्रातील नाल्यांची व विविध विकासकामांची पाहणी केली.
Read More
(Murshidabad Violence) मुर्शिदाबाद हिंसाचारादरम्यान इस्लामिक कट्टरपंथीयांच्या भीतीमुळे धुलियान आणि मुर्शिदाबादमधील शेकडो हिंदू कुटुंब घरे सोडून मालदा येथे पळून गेली होती., परंतु राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस हे स्वीकारण्यास तयार नाही. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार अमीरुल इस्लाम यांनी या हिंसाचारात हिंदू नागरिकांच्या घरांच्या तोडफोडीच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
( Eknath Shinde on UBT leaders ) “२०२२ साली मी लपूनछपून काहीही केले नाही, जे केले ते निधड्या छातीने केले. पण तुमचे नेते (उबाठा गट) लपूनछपून भाजपश्रेष्ठींना भेटून आले. युती करू असे म्हणाले. पण पुन्हा पलटले”, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी विधानसभेत केला.
भाजप आपल्या संघटनेत कार्यकर्त्यांमधून नेतृत्व तयार करते, आणि काँग्रेस नेतृत्व आपल्याच कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवते! मग पक्षाच्या अधोगतीला जबाबदार कोण? भाजप की राहुल गांधी? खरं तर, हा प्रश्न आता काँग्रेसच्या उरलेल्या निष्ठावंतांनी स्वतःला विचारायला हवा. राहुल गांधी यांची एकूणच नेतृत्वशैली बघता, काँग्रेसचा भविष्यकाळही अंधारातच जाणार, हे निश्चित! why rahul gandhi says congress leaders working for bjp ?
दै.‘मुंबई तरुण भारत’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराधारित दैनिक आहे. आतापर्यंतच्या संचालकांनी संघाच्या विचाराने समाजात समरसता निर्माण करण्याचे काम दक्षतेने केले आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे, निरनिराळ्या ज्ञातींच्या माध्यमातून बनलेल्या हिंदू समाजाचा सर्वांगीण विकास साधणे. ज्ञाती ही संस्कृती, अस्मिता आणि समाजाची ओळख असते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मिळालेल्या विधानसभा निवडणुकीतील यशात डोंबिवलीचे ‘कॅप्टन कुल’ नेते रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांचे मोठे योगदान आहे. कुठेही गाजावाजा न करता, देवेंद्र फडणवीस यांनी आणि पक्षाने दिलेली जबाबदारी ते चोखपणे पार पाडतात. कोकण आणि मुंबई महानगर प्रदेशात पक्षाची पाळेमुळे घट्ट रोवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता प्रदेश कार्याध्यक्षपदाची धुराही ते सक्षमपणे पार पाडतील आणि भाजपचे राज्यातले स्थान अधिक भक्कम करतील, यात कोणतीह
जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेची निवडणूक जिंकल्यानंतर जगाची रचना पूर्वपदावर आणण्याचा चंग डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधला आहे. त्यालाच अनुसरून ते आक्रमक विधाने करत आहेत. मात्र, आजही त्यांचा प्रवास हा त्यांच्या सर्व नेतृत्वगुणांचा कस पाहणारा असेल, हे निश्चित...
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अनेक प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचा घेराव सुरू केला आहे. सपा, डावे पक्ष आणि राष्ट्रवादीनंतर आता राजदने इंडी ( INDI ) आघाडीच्या नेतृत्वासाठी बैठक घेऊन एकमताने नेता निवडण्याची मागणी केली आहे.
मल्लिकार्जून खर्गेंनी ( Mallikarjun Kharge ) राज्यातील काँग्रेस नेतृत्वाला सुनावले खडेबोल!
आपल्यासाठी पक्षादेश शिरसावंद्य असून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने ही जागा शिवसेनेलाच जाईल. याठिकाणी आपण स्वतःच प्रमुख दावेदार असल्याचे सूतोवाच आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देण्याच्या आश्वासनामागील हेतू नुकताच काँग्रेस उमेदवार कांतीलाल भुरिया यांच्या वक्तव्यावरून उघड झाला. मध्य प्रदेशचे माजी केंद्रीय मंत्री आणि रतलाम काँग्रेसचे अध्यक्ष कांतीलाल भुरिया यांनी येथील जाहीर सभेला संबोधित करताना महिलांना काँग्रेस एक लाख रुपये आणि दोन पत्नी असलेल्यांना दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली.
काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील गदग जिल्ह्यात नगरपालिका उपाध्यक्षांच्या घरात घुसून चार जणांची हत्या करण्यात आली. पालिकेचे उपाध्यक्ष हे भाजपचे नेते आहेत. या हल्लात त्याचा मुलगा ३ नातेवाईक मारले गेले. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांचे हात अजूनही रिकामे आहेत.
भावी सिनेस लीडर्स घडवताना आजूबाजूला असणार्या सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि समाजभान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे, या उद्देशाने जयश्री शरदचंद्र कोठारी (जेएसके) बिझनेस स्कूल या मुंबईतील मॅनेजमेंट स्कूलने आयोजित ‘मंथन’ या उपक्रमाचा समारोप नुकताच दादर येथील किर्ती महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा (डीईएस) भाग असणार्या जेएसके िझिनेस स्कूलने व्यवस्थापन कौशल्यासोबत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास हे ध्येय समोर ठेवून हा उपक्रम राबविला होता. या अंतर्
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये काँग्रेस नेत्याने पत्रकाराच्या घरात घुसून मारहाण केली. तो आपल्या समर्थकांसह पत्रकाराच्या घरात घुसला, त्यावेळी हातात बंदूक घेऊन घरात घुसून पत्रकाराला बेदम मारहाण केली. यावेळी त्याने घरातील महिलांशीही गैरवर्तन केले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. त्याचबरोबर हा गुन्हा करणाऱ्या काँग्रेस नेत्याचे नाव अन्वर कादरी असल्याचे बोलले जात आहे. ते इंदूरच्या वॉर्ड क्रमांक ५७ चे नगरसेवक आहेत.
‘फॉक्सकॉन’चे सीईओ आणि तैवानी नागरिक असलेले यंग लिऊ यांना नुकताच ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘पद्मभूषण’ पुरस्कार यादीतील ते एकमेव विदेशी नागरिक. लिऊ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करणे हा ‘फॉक्सकॉन’च्या भारतातील आजवरच्या योगदानाचा हा सन्मानच. तसेच या पुरस्काराने चीनला शह देण्याबरोबरच ‘फॉक्सकॉन’च्या भारतीय गुंतवणुकीचा मार्गही अधिक प्रशस्त केला आहे. त्याचे आकलन...
"जी काँग्रेस रामाची होऊ शकत नाही, ती आता कोणाचीही होऊ शकत नाही." अशी प्रतिक्रिया देत मध्य प्रदेशतील ग्वालियर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि तीनवेळा नगरसेवक आनंद शर्मा दि. १५ जानेवारी सोमवारी मकर संक्रांतीच्या दिवशी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला.
मिलिंद देवरा, हार्दिक पटेल, आरपीएन सिंग, ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, अल्पेश ठाकुर, अनिल अँटनी ही सात नेत्यांची नावं. या सातही नेत्याचं एका गोष्टीत साम्य आहे, ते म्हणजे हे सर्व काँग्रेसचे माजी नेते आहेत आणि एकेकाळी या सातही नेत्यांना राहुल गांधींचं निकटवर्तीय मानलं जातं. पण आज हे सर्व राहुल गांधींच्या काँग्रेसला सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये सामील झाले आहेत. यातील जवळपास सर्वांनाच काँग्रेस सोडल्यानंतर चांगल राजकीय यश मिळालं आणि सध्यातरी त्यांचे राजकीय भविष्य उज्वलच दिसतय.
पिरामल ग्रुपने राजस्थानातील जयपूरमध्ये पिरामल स्कूल ऑफ लीडरशिप सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. पिरामल ग्रुपकडून जयपूर येथे लीडरशिपचा शिलान्यास करण्यात आला आहे.
स्वत्व प्रगती करणे शक्य लगेच होऊ शकते. पण दुसऱ्याला घडवणे हे निरंतर यशाचे मानक ठरते. नेतृत्व करणे ही वरकरणी सोपी गोष्ट वाटली असली तरी ती तितकीशी सोपी नाही. व्यवसायाचे नेतृत्व असल्यास तर कर्मकठीण काम. पण निश्चितच ते अशक्य नाही. आपल्या आदेशांवर कर्मचाऱ्यांना नाचवणे म्हणजे ' लीडरशीप स्किल ठरत नाही. किंबहुना प्रोत्साहित करून नवीन नेतृत्व घडवणे याला नेतृत्व म्हणतात. विविध परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्याची क्षमता असलेला व्यक्ती नेहमीच यशस्वी ठरतो. कालाचे योग्य आकलन हा वस्तुनिष्ठ प्रश्न असला तरी तो शेवटी मान
नवी दिल्ली : पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना जनाधार असल्याने त्यांना धक्के पचविता आले. मात्र, सध्याच्या काँग्रेस नेतृत्वास अजिबात जनाधार नाही, असे प्रतिपादन डेमोक्रॅटिक आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. एका वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचिंद्र कुमार यांनी बुधवार, दि. १ मार्च रोजी लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांच्याकडून लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. कुमार यांनी आज जयपूर स्थित सप्तशक्ती कमांडची सूत्रे हाती घेतली आहेत. लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार हे लष्कराच्या मुख्यालयात सैन्य उपप्रमुख (रणनीती) या पदावर कार्यरत होते. त्यांच्या अलीकडील नियुक्तींमध्ये गुप्तचर मोहिमा, दलांची रचना, ऑपरेशनल लॉजिस्टिक आणि तंत्रज्ञान अशा विविध कामाचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अत्यंत महत्त्वाचा निकाल निवडणूक आयोगाने दि. १७ फेब्रुवारी रोजी दिला. आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपली. त्यामुळे पक्ष चिन्ह, पक्षप्रमुख पद आणि पक्षाचे नाव ही उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेले दादर येथील शिवसेना भवन अद्याप ही उद्धव ठाकरेंकडेच आहे. पंरतू शिवसेना भवन हे जरी शिवसेनेचे मुख्यालय असले तरी त्याच
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी दि. ४ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर होते. राजशिष्टाचारानुसार सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करावे लागले असते. परंतु, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून अमित शाह हे मुंबई विमानतळावर वेळेपूर्वीच दाखल झाले. दिवस भरातील उर्वरित बैठका त्यांनी विमानतळावरच घेतल्या.
ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, केसीआर वगैरे इतर इच्छुक नेते नितीशकुमारांचे नेतृत्व मान्य करतील का? राजकीय क्षेत्रात वेगळा आणि रोख व्यवहार असतो. नितीशकुमार या नावाला जरी वलय असले, तरी त्यांचे राजकीय कर्तृत्व मायावती, ममता बॅनर्जी, केजरीवाल वगैरे स्वबळावर एका राज्याची सत्ता मिळवू शकलेल्या नेत्यांच्या तुलनेत फार कमी आहे.
नुकतचं किसिंजर यांचं ‘लीडरशीप’ हे पुस्तक बाजारात आलं आहे. किसिंजर यांनी उत्तम नेतृत्त्वगुणांचं वर्णन करून सांगण्यासाठी वाचकांसमोर सहा नेत्यांची चरित्र मांडली आहेत. किसिंजरनी आपल्या समोर चार्ल्स डि गॉल, कॉनराड अॅडनॉर, ली क्वान यी, रिचर्ड निक्सन अन्वर सादात आणि मार्गारेट थॅचर अशा सहा नेत्यांची चरित्र मांडली आहेत.
राजकीय नेते, कार्यकर्ते, आमदार, खासदार ते नगरसेवक या सर्वांचे संविधान साक्षरतेचे वर्ग घ्यायला पाहिजेत. प्रत्येक पक्षाने हा कार्यक्रम करायला पाहिजे. राजकीय पक्षांना सत्तेद्वारे देश चालवायचा असतो आणि देश संविधानाप्रमाणे चालवावा लागतो.
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचा राष्ट्रपत्नी म्हणून उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी यांनी गुरुवारी दि. २८ जुलै रोजी संसदेत आणि संसदेबाहेर काँग्रेसच्या विरोधात आक्रमक आंदोलन केले आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना “राष्ट्रपत्नी” म्हणून संबोधल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या दोन नेत्यांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए)च्या तरतुदींखाली माननीय विशेष पीएमएलए न्यायालय, लखनौसमोर तक्रार दाखल केली आहे. आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी ईडी प्रयत्नशील आहे
जगभरातील ख्रिस्ती धर्मियांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांना सध्या पायाच्या दुखण्यामुळे व्हीलचेअर वरून फिरावे लागत आहे आणि दुसरीकडे भारतात त्यांचे अनुयायी बाजिंदर सिंग हे आपल्या चमत्कारांनी रुग्णांना एका झटक्यात व्हीलचेअरपासून मुक्तता मिळवून दिल्याचा दावा करत असल्याचे उघड झाले आहे
भ्रष्टाचार, खंडणीखोरी प्रकरणी महाराष्ट्रातील 2 नेते तुरुंगात; राष्ट्रासाठी ते चिंताजनक
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात तटरक्षक दलाचं नेतृत्व करण्याची संधी सांगलीतल्या कन्येला मिळाली आहे. अपूर्वा गौतम होरे असे या वाळवा तालुक्यात राहणाऱ्या मुलीचे नाव असून गेल्या तीन वर्षांपासून त्या पोरबंदर इथल्या नौदलाच्या विभागात असिस्टंट कमांडंट पदावर कार्यरत आहेत.
उत्तर प्रदेशात आपणही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहोत, असा दावा काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी – वाड्रा यांनी शुक्रवारी केला.
आशियातील महिलांचे नेतृत्वगुण दर्शविणाऱ्या ‘जीएलआय इंडेक्स’मध्ये एकूण आशियातील १९ देशांतील महिलांच्या नेतृत्वाचा सहा विविध क्षेत्रांतील आढावा घेण्यात आला. या देशांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, ब्रुनेई, कंबोडिया, भारत, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपिन्स, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, तिमोरलेस्ते आणि व्हिएतनाम यांसारख्या देशांचा समावेश आहे.
अलीकडेच आठ कोटी रुपयांची रोल्स रॉयस कार खरेदी करणाऱ्या कल्याणमधील शिवसेनेचे नेते आणि सुप्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांच्यावर सुमारे ३५ हजार रुपयांच्या वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण बिल भरले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या (महावितरण) अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कल्याणमधील कोळसेवाडी पोलिस ठाण्यात संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुठलीही राजसत्ता सामुदायिक नेतृत्व स्वीकारत नाही. प्रत्येक राजसत्ता मग तिचा प्रकार कोणताही का असेना, ती एकाच चेहर्याची असते. सर्वोच्च सत्तेच्या म्यानेत एकच तलवार राहू शकते. हा एक शाश्वत सिद्धान्त आहे.
भाजपकडून हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार
भाजप नेते नितेश राणेंनी संजय राऊतांना फटकारलं
खिलाफत चळवळीचे नेतृत्व करणारी मंडळी कोण होती? इस्लामची आणि त्या अनुषंगाने अखिल-इस्लामवादाची धुळाक्षरे त्यांनी कुठे गिरविली होती? भिन्नभिन्न मार्ग तुडवीत हे लोक एका उद्दिष्टापर्यंत कसे पोहोचले? खिलाफत चळवळ समजून घेण्यासाठी आधी तिच्या नेत्यांची कुंडली मांडायला हवी.
सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदावर कायम राहणार आहे. पुढील सहा महिन्यात नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे.
सध्या पाकिस्तान आणि चीनने भारताच्या राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे राजदूत काही राजकीय नेत्यांना भेटतात आणि ‘मुत्सद्देगिरी’च्या नावाखाली त्यांना चीनमध्ये भेटीकरिता बोलावले जाते. तिबेटला किंवा मानस सरोवराला भेट, पाकिस्तानमध्ये लाहोरला भेट. काही राजकीय नेत्यांनी पाकिस्तानी आणि चिनी मीडियाला दिलेल्या मुलाखती इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यामध्ये दिसेल की, काही नेते भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध बोलत आहेत. सरकारविरोधी अनेक पत्रकारांना चीन आणि पाकिस्तानला भेटीवर बोलावले जाते आ
‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ ही तुकोबा उक्ती या मंडळींना नेमकी लागू होते. मात्र, ज्या व्यक्ती ही आव्हानपर जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतात, त्या यशस्वी वरिष्ठ व्यवस्थापक ठरतात, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.
गुन्हेगारांना उमेदवारी देण्याची कारणे वेबसाईटवर टाकण्याचे निर्देशदेखील सर्व राजकीय पक्षांना देण्यात आले आहे
७० ते ८० सर्वपक्षीय आमदारांच्या पाठिंब्यामुळेच आलमचा ‘आलम पुढारी’ झाला. ‘पुढारी’ नावाने त्याने स्वत:चा ब्रॅण्ड प्रस्थापित केला. एका वर्षाच्या आत आमदार निवास येथील पुढारी वस्त्रभांडाराचा तो मालक झाला. विधानसभा आणि विधान परिषदेचे असे एकूण ३६६ आमदार आहेत. त्यातील अंदाजे ६६ महिला आमदार आणि ५० इतर आमदार सोडून उरलेले आमदार आलमच्या ‘पुढारी’ ब्रॅण्डचे खादीचे कपडे परिधान करतात.
लोकशाहीचे नाव घेऊन सत्तेवर आलेले राजनेते आपली बाजू पालटून आंधळे समर्थन करत कधी लष्कराचे बूट चाटू लागतील, याचा काही नियम नाही. आताच्या नव्या कायद्याच्या निर्मितीतूनही पाकिस्तानातील राजनेत्यांनी लष्कराने अतिशय अहंकाराने केलेल्या लोकशाही पावित्र्याच्या निर्लज्ज उल्लंघनांना तिरस्कृत करण्याऐवजी पुरस्कृत करण्यासाठी निवडले.
भारत बंदवरून मनसेचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र
आपण अतिशय अनैतिक निर्णय घेतला असे पवार सांगत नाहीत, तर दोन मित्रपक्षांमध्ये वितुष्ट वाढवण्याची खेळी असेच आपल्या निर्णयाचे वर्णन करतात. त्यामुळे ‘राजकारण’ हा कसा बदमाशीचा खेळ असतो, त्याचीच कबुली देतात ना? आज राज्यातील तेच सर्वात ज्येष्ठ व अनुभवी राजकारणी असल्यावर त्यांचा शब्द प्रमाण मानायला हवा ना?
पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरसंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली असतानाही अजूनही काही काश्मिरी नेत्यांना भारताने जी पावले उचलली आहेत, ती मान्य असल्याचे दिसत नाही. सध्या बंदिवासात असलेले त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, काश्मिरी जनतेला हाती बंदुका घ्याव्यात, अशी चिथावणी देत आहेत. राज्याचे हे माजी मुख्यमंत्री काश्मिरी जनतेला हाती बंदुका घेण्याचे आणि बलिदान करण्याचे आवाहन करणारे संदेश पाठवित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आपले विचार मांडले. देशाच्या पंतप्रधानांचे विचार हे त्यांचे व्यक्तिगत मत नसून ती देशाची धोरणे असतात. त्यामुळे मोदींच्या भाषणाला जागतिक स्तरावर भारताचा दृष्टिकोन म्हणून गणले जाणे स्वाभाविक आहे. यावेळी भारताने जागतिक परिप्रेक्ष्यात असणार्या विविध समस्यांचा ऊहापोह करताना त्यासाठी आवश्यक असणार्याक सामूहिक प्रयत्नांची गरजदेखील अधोरेखित केली.
व्हीआयपी क्लोदिंग लिमिटेडचे संचालक कपिल पाठारे यांना त्यांच्या व्यवसाय व औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बॉल्सब्रिज युनिव्हर्सिटीकडून 'मानद डॉक्टरेट इन बिझनेस' ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रथितयश व्यावसायिक आणि लेखक असलेल्या कपिल यांना व्यवसाय आणि छोट्या व्यवसायांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर प्रसार करून नेल्याबद्दल एंटरप्राईजेस एडिशन २०१९ मध्ये ग्लोबल लीडर्स ॲवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले.
रोजगार, उद्योग व व्यापारामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी आजघडीला जगातल्या महासत्तांपासून ते विविध देशांमधील राज्यांमध्येही प्रकर्षाने दिसून येते.