प्रत्येक कोकणी माणसाच्या घराच्या बांधावर असणारा आंबा म्हणजे रायवळ. हापूस आंब्याच्या झगमगाटात दुर्लक्षित राहिलेला रायवळ आंबा टिकवणे म्हणजे आपल्या इतिहासाला, संस्कृतीला आणि चवीला अभिवादन करणे होय. त्याविषयी आढावा घेणारा हा लेख...
Read More
मराठी बिग बॉस फेम अंकिता वालावलकर आणि लोकप्रिय मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांचा विवाहसोहळा कुडाळ येथे १६ फेब्रुवारी रोजी थाटामाटात पार पडला. गेल्या काही महिन्यांपासून ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या लग्नाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. तिच्या या खास सोहळ्याला राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिला फार कमी वेळात प्रसिद्धी मिळाली. आपल्या कोकणाचे महत्व सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अंकिताने केला होता आणि त्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आणि बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच तिने तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल सांगितले होते. अंकिताचा होणारा नवरा मनोरंजनविश्वातील संगीतकार असून त्याचं नाव कुणाल भगत आहे. दरम्यान, होणाऱ्या नवऱ्यास
मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा फिनाले जवळ येत चालला आहे. तसे, दिवसेंदिवस टास्क अधिक कठोर आणि कधी सदस्यांच्या डोळ्यांत पाणी आणत त्यांना भावनिक करणारे आहेत. नुकताच, बिग बॉसच्या घरात फ्रिझ-रिलिजचा टास्क झाला आणि दरम्यान, घरातील सदस्यांना भेटायला त्यांच्या घरातील मंडळी आले होते. कधीही आजवर मुंबईत न आलेल्या वडिलांना या टास्कमुळे आणि बिग बॉसमुळे आलेलं पाहून अंकिता वालावलकरला अश्रु अनावर झाले होते.
हिंदी बिग बॉसचा विजेता मुनव्वर फारुकी याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी तो दिल्लीत गेला असता त्याला ही धमकी देण्यात आली असून तो तातडीने मुंबईला रवाना झाला आहे, दरम्यान, शनिवारी दिल्लीतल्या इनडोअर स्टेडियम आणि सूर्या हॉटेल या ठिकाणी ही घटना घडली.
कोकणात गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गणेशोत्सव अवघ्या दिवसांवर येऊन ठेपला असून सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांकरिता दादर ते कणकवली पर्यंत मोफत सोडण्यात आलेली मोदी एक्स्प्रेस आज सकाळी ११.३० वाजता दादर स्टेशनवरून कोकणकडे रवाना झाली. प्रवाशांच्या उत्साहात, बाप्पाच्या जयघोषात ही रेल्वे सिंधुदुर्गसाठी रवाना झाली. आमदार नितेश राणे यांनी दादर स्टेशनवर मोदी एक्स्प्रेस ला झेंडा दाखवला.
अंकिता प्रभू वालावलकर मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे. अंकिता तिचा खेळ उत्तम खेळत असल्यामुळे तिने बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन होण्याचा बहुमानही मिळवला होता. दरम्यान, अंकिता ही कोकणातील असल्यामुळे तिच्यासाठी गणेशोत्सवाचे खास महत्व आहे. आणि सध्या गणेशोत्सव अगदी जवळ आला असून अंकिता मात्र बिग बॉसच्या घरात असल्यामुळे तिला घरी गणपतीला जायला मिळणार नाही म्हणून ती अस्वस्थ झालेली पाहायला मिळाली.
हिंदी बिग बॉस १८ चा विजेता आणि कथित स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने कोकणी माणसांबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. मुनव्वरने कोकणी माणसाविषयी अपशब्द वापरले असून सामान्य माणसांसह राजकीय नेत्यांनी देखी त्याची चांगलीच कानउघाडणी केली आहे. यात भाजप पक्षाच्या नेत्यांनी तर त्याला थेट पाकिस्तानमध्ये पाठवण्याची धमकी दिली होती. सर्व स्तरांतून विरोधी आणि टीका झाल्यानंतर आता मुनव्वरने कोकणवासियांची व्हिडिओच्या माध्यमातून जाहिर माफी मागितली आहे. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वरने गेल्या आठवड्यात एक शो केला होता. त्यामध्
कोकण पदवीधर मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांचा दिलीप जाधव यांच्या अष्टविनायक निर्मिती संस्थेकडून सत्कार करण्यात आला. गडकरी रंगायतनमध्ये 'आज्जीबाई जोरात' या नाटकाच्या सुरुवातीलाच सुप्रसिद्ध कलाकार निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर, अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे संचालक डॉ. विशाल कडणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत निर्माते दिलीप जाधव यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
‘माझ्यातील बुद्धाचा शोध’ या मानसी चिटणीस यांच्या काव्यसंग्रहाला नुकताच ‘बाबा भारती साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला. त्यानिमित्ताने या समाजशील कवयित्रीच्या साहित्यजीवनाचा घेतलेला मागोवा...
'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड' अंतर्गत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड'मधील विविध रिक्त पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कोकण रेल्वेत होणाऱ्या एकूण ११ रिक्त जागांच्या भरतीअंतर्गत थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून भरल्या जाणाऱ्या रिक्त जागांकरिता वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव व मुलाखतीची तारीख याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
लोकसभा निवडणूक २०२४ करिता एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महायुतीला २४ जागा तर मविआला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार नारायण राणे निवडून येण्याची शक्यता आहे.
'कोकणातील पुष्पप्रजातींची राणी' म्हणून ओळखली जाणारी 'एकदांडी’ म्हणजेच 'दिपकाडी कोंकणेन्स’ (dipcadi concanense) या प्रजातीच्या नव्या वाणाची (व्हरायटी) नोंद करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील सड्यावरून या वाणाची नोंद करण्यात आली असून, त्याचे नाव 'देवरुखेन्स’ असे ठेवण्यात आले आहे (dipcadi concanense). महाराष्ट्रासाठी प्रदेशनिष्ठ असणार्या या संकटग्रस्त प्रजातीच्या नव्या वाणाच्या नोंदीमुळे देवरुखमधील सड्यांचे जैविक महत्त्व अधोरेखित झाले आहे. (dipcadi concanense)
राज्यातील किमान तापमानात मागील काही दिवस वाढ होत आहे. तापमानातील ही वाढ पुढील अजून काही दिवस तशीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी बुधवार, दि. ३ जानेवारीपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच तिच्या सोशल मिडियावरील मालवणी भाषेतील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेच असते. याशिवाय राजकारण, सामाजिक स्थिती अशा विविध विषयांवर ती आपली मते परखडपणे मांडत असते. याशिवाय ती स्वत: मालवणी असल्यामुळे तेथील पर्यटनस्थळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती व्हिडिओ करुन लोकांना त्या ठिकाणांबद्दल वेळोवेळी माहिती देखील देत असते. परंतु, कोकणातील पर्यटन आणऱी सुधारावे अशी अपेक्षा अंकिताने ‘महाएमटीबी’शी बोलताना व्यक्त केली.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच तिच्या सोशल मिडियावरील मालवणी भाषेतील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेच असते. याशिवाय राजकारण, सामाजिक स्थिती अशा विविध विषयांवर ती आपली मते परखडपणे मांडत असते. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी म्हणजे व्यंगत्व नसल्याचे सांगत 'सशुल्क (भरपगारी) मासिक पाळी रजा धोरणा'ला विरोध केला होता. यावर अंकिता वालावलकर हिने ‘महाएमटीबी’शी संवाद साधताना, “स्मृती इराणी यांनी मासिक पाळीबद्दल योग्यच वक्तव्य केले आहे”, असे स्पष्टपणे म्हणाली.
हिवाळ्यात धुक्यामुळे सिग्नलची दृश्यमानता कमी असते. अनेकदा दाट धुक्यामुळे रेल्वे गाड्या कमी वेगाने धावतात. परिणामी, रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होतो. तर कमी दृश्यमानतेमुळे सिग्नल लक्षात न येण्याने जोखीम वाढते. हे टाळण्यासाठी मध्य रेल्वेने धुके सुरक्षा यंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता दि. १३ डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित ऑनलाईन संगणकीय सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे.
कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीची करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली असून कोकण रेल्वेकडून यांसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, कोकण रेल्वेतील एकूण १९० रिक्त पदे भरली जाणार आहेत. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
रेल्वे मार्गाची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी कोकण रेल्वेने दि. १ डिसेंबर रोजी रत्नागिरी ते वैभववाडीदरम्यान सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यंत अडीच तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.
गुरुवारपासून आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्याला सुरुवात झाली असून ते सावंतवाडी इथे दाखल झाले आहेत. या दोऱ्यामध्ये ते खळा बैठक घेणार आहेत. यावेळी ते काही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्य सरकारकडून महाराष्ट्रात मोठमोठ्या उद्योगांची निर्मिती करण्यात येत असून कोकणात उच्च दर्जाच्या टिशूची निर्मिती केली जाणार आहे. राज्य सरकारकडून तब्बल १० हजार कोटींचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या उद्योगामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
'डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ' अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये विविध पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
स्वत: शिकणारी, इतरांना शिक्षित करणारी सरस्वती आणि स्वत:च्या कुटुंबासह तमाम गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणारी लक्ष्मी म्हणजे माधुरी कदम. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...
‘झुक झुक झुक आगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढत’ कोकण रेल्वे स्थापनेला ३३ वर्ष पूर्ण झाली आहेत. कोकण रेल्वेने प्रथमच ५१५२.२३ कोटींचा महसुली उत्पन्न टप्पा गाढला आहे. २७८.९३ कोटी निव्वळ नफा मिळाला असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण झाली असून नव्या वर्षात या महामार्गावरून सुसाट प्रवास करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे हा महामार्ग अखेर पूर्णत्वास जात आहे. कोकणच्या समृद्धीचा महामार्ग अशी ओळख असलेल्या या महामार्गाचा इतिहास-वर्तमान, कोकणाची भावी वाटचाल आणि कोकणच्या प्रगतीत महामार्गाची भूमिका यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला हा संवाद!
म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेच्या "गो लाईव्ह" कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते आज करण्यात आला. कोंकण मंडळाच्या सोडतीमध्ये १०१० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत.
आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यश संपादन करून, त्या ज्ञानाचा फायदा इतरांनाही व्हावा. या एकमेव उद्देशाने पूर्वानुभव नसताना राजकीय वर्तुळात पाय रोवून उभे राहण्याची दुर्दम्य इच्छा बाळगणार्या सरपंच सोनाली मेस्त्री यांच्याविषयी...
'दादर अभिमान गीता'च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स निर्मिती संस्थेचा दुसरा म्युझिक व्हिडीओ येत्या २० ऑगस्टला विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘तूच मोरया’ असे या म्युझिक व्हिडीओचे नाव असून समाज माध्यमावरुन लोकप्रियता मिळवणारी कोकणहार्टेड गर्ल अर्थातच अंकिता वालावलकर या म्युझिक व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच झळकणार आहे. अंकिता आणि अभिनेता विशाल फाळे ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
वसईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अधून मधून हजेरी लावत काहीशी उसंत घेतल्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. अनेक शेतांमध्ये मोठा ट्रॅक्टर , पॉवर टिलर यांच्या आवाजाने शेत शिवार गजबजून गेले आहेत .यंदा सतत पडणाऱ्या पावसामुळे वसईतील आवण्या लांबणीवर पडल्या आहेत .त्यामुळे जमेल तशी आवणी उरकण्याची घाई शेतकरी करू लागले आहेत .यंदा जवळ पास निम्म्या आवण्या उरकत आल्या असून उरलेल्या आवणीसाठी भात खाचरात शेतकरी आणि मजूर यांची लगबग सुरू आहे .
स्वयंसेवकांचे प्रेरणास्थान, मृदू स्वभाव, कुशल संघटक, विचारक, कोकण प्रांत प्रचारक असताना अथक प्रवास करणारे जयंतराव सहस्रबुद्धे. दि. २ जून रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी विज्ञान क्षेत्रात उभे केलेले कार्य सर्वस्वी अद्भुतच. वैज्ञानिकांच्या सहज संवादातून हृदयस्थ संबंधांचे रुपांतर त्यांनी ‘विज्ञान भारती’शी जोडण्यात केले. जयंतरावांचा स्वभाव धीरगंभीर. मोजकेच पण परिणामकारक बोलणारे. असा हा भारतमातेचा नररत्न गमावल्याची खंत आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असेल.
आपल्या मधुर वाणीने, नम्र व प्रेमळ स्वभावाने, व्यवहाराने व त्या-त्या क्षेत्रातील अध्ययनाने जयंतराव सहस्रबुद्धे यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला. श्रेष्ठ गुणवत्ता, सात्त्विकता व समर्पण ही त्यांच्या जीवनाची त्रिसूत्री होती.
सीआरपीएफमध्ये तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सीआरपीएफ भरती परीक्षा राज्यातील तरुणांना आता मराठी भाषेत देणं शक्य होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफ भरतीसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.
महाराष्ट्रात ‘कूर्म’ नावाने प्रसिद्ध असलेली एक प्रजात म्हणजे ‘लेदरबॅक’ कासव (leatherback turtle). महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रामधील ‘लेदरबॅक’चा (leatherback turtle) वावर हा संशोधनाचा विषय बनला आहे. जगातील सागरी कासवांमधील सर्वात मोठी असलेली ही प्रजात दोन दशकांच्या विरामानंतर राज्याच्या सागरी परिक्षेत्रामध्ये पुन्हा दिसू लागली आहे. अशा परिस्थितीत कोकण किनारपट्टीवरील या प्रजातीचे अस्तित्व, तिचे भविष्य आणि स्थलांतराविषयी आढावा घेणारा हा लेख... (leatherback turtle)
यंदाही गणपती स्पेशल मोदी एक्सप्रेस
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात कोकणातील प्रवास, खाद्य संस्कृती आणि उद्योजकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी म्हणून 'कोस्टल कोकण' या संस्थेने इंग्रजी भाषेतून मॅगझीन प्रकाशित केलं.
मुख्यमंत्र्यांनाही भास्कर जाधव यांच्या अरेरावीत काही वावगे वाटले नाही, हेच स्पष्ट होते. त्यावरून उद्धव ठाकरेंचीही आपल्या आमदारांकडून होणार्या दमदाटीला मूकसंमती असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही आणि भास्कर जाधवांनी शनिवारी सर्वांसमोर दाखवलेली मग्रुरी त्यातूनच आलेली आहे.
किती सरकारे आली अन् गेली, पण कोकणचा विकास मात्र आश्वासनांच्या भरती-ओहोटीत कायमच वाहून गेला. त्यातच आता महाविकास आघाडी सरकारने नुकतीच घोषणा केलेला ‘हरित कोकण एक्सप्रेस-वे’ कोकणचा विकासमार्ग ठरेल का, याचा केलेला हा ऊहापोह...
'कोकण राॅकड्वेलर' असे नामकरण
चाकरमान्यांना 'नो एन्ट्री'
'नॅशनल वेटलॅण्ड अॅटलास'मधील प्रत्येक पाणथळींचे संरक्षण करण्याची सूचना
रायगड जिल्ह्यात सागरी कासवाची १३ घरटी
निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात १० मार्चपासून साजरा होणार आहे. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ तसेच पुजारी यांच्याकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गेली १५ वर्षे कोकणातील जनआंदोलनांमध्ये सहभागी असणारे कार्यकर्ते सत्यजित चव्हाण यांची ही विशेष मुलाखत...
राज्यातील कासव विणीच्या १५ किनाऱ्यांना नकाशांमध्ये आरक्षण नाही
मंत्रिपद न दिल्याने भर व्यासपीठावर दाखवली नाराजी
रत्नागिरीतील गावखडी आणि सिंधुदुर्गातील वायंगणी किनाऱ्यावरील कासवांच्या घरट्यांमध्ये हे उपकरण बसविण्यात आले आहे.
कोकणातील सुरू असलेल्या 'खवले मांजर संवर्धन मोहिमे'च्या परिणामांची प्रचिती करुन देणारा हा लेख...
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला पर्यावरणीय परवानगी देताना आंबोळगडला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित केले आहे.