राजुरा विभागातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्गावर बुधवारी दि. १० ऑगस्ट रोजी पाहटे एका सब अडल्ट वाघाचा मृत देह आढळून आला. पहाटेच्या सुमारास या वाघाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. बल्लारशाह-काझीपेठ सेक्शनवरील राजुरा-कन्हाळगाव दरम्यानच्या रूळाजवळ सुमारे दोन वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला. ही धडक इतकी भीषण होती की वाघाचे शरीर अर्धवट उरले. डोके आणि पाय नाहीसे झाले होते.
Read More