नुकतेच महाराष्ट्रातील २३५९ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका झाल्या आणि त्यांचा निकालही लागला. मराठा आरक्षण, राज्यातील काही भागांमध्ये पडलेला दुष्काळ, अशा वातावरणात महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेने भाजपवर आणि महायुतीवर विश्वास व्यक्त केला. आणि उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला. त्यामुळे सतत निवडणुका घ्या,मग कळेल महाराष्ट्रात कोणाची ताकद किती आहे, अशी विधान आपोआप कमी झाली. दरम्यान आता ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. उबाठा गटाने आता लोकसभेच्या कोल्हापूर , इच
Read More
निवडणुकांमध्ये तुमची जिरवायला आम्ही सज्ज आहोत. असा पलटवार भाजप आमदार नितेश राणेंनी खासदार संजय राऊतांवर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचं वर्चस्व दिसुन आले. तर, ठाकरे गटाची पिछेहाट झाली. यावर खासदार संजय राऊतांनी ट्विट करत निशाणा साधला होता. त्यांच्या या ट्विटला नितेश राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेले नेत्रदीपक यश हा या राज्यातील जनतेने या लोककल्याणकारी सरकारवर पुन्हा एकदा दाखविलेल्या विश्वासाचा मूर्तिमंत पुरावा आहे.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करीत क्रमांक १ चे स्थान पटकाविले. या यशाचे संपूर्ण श्रेय भाजपाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे भाजपा केवळ गावागावात नाही तर घराघरात पोहोचला आहे, ही बाब आजच्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांन
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकारण हे आता डाव्या पक्षांपेक्षाही अधिक क्रूर झाले आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांदरम्यान संपूर्ण राज्यात अभूतपूर्व हिंसाचार उफाळून आला. नव्हे, तो घडवून आणला गेला. संवेदनशील मतदान केंद्रांची माहितीच केंद्रीय सुरक्षा दलांना देण्यात आली नाही. म्हणूनच हिंदी चित्रपटाला लाजवतील, असे प्रसंग मतदानादिवशी तेथे दिसून आले. भाजप विरोधकांना बॅलेट पेपर का हवा, या प्रश्नाचे उत्तरही झालेल्या घटनांमध्ये आहे.
पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीसाठी दि. ८ जुलै रोजी मतदान होत आहे. पण सकाळपासून सुरू असलेले बॉम्ब हल्ले , गोळीबारांच्या घटनात आतापर्यत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण यात जखमी झाले आहेत. तसेच या हिंसाचारात काही मतदान केंद्रावर मतपत्रिका पेटी चोरण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी झालेल्या पंचायत निवडणुकीमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला. दिवसभरात तब्बल १० पेक्षा अधिक विविध राजकीय पक्षांच्या हत्या करण्यात आल्या. या प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून राज्य सरकारकडे अहवाल मागविला आहे. प. बंगालमध्ये शनिवारी २२ जिल्हा परिषदा, ९ हजार ७३० पंचायत समित्या आणि ६३ हजार २२९ ग्रामपंचायतींच्या सुमारे ९२८ जागांसाठी मतदान झाले. पंचायत निवडणुकीची मतमोजणी येत्या ११ जुलै रोजी होणार आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल पंचायत निवडणूक हिंसाचाराविषयी राज्य निवडणूक आयोग आणि ममता बॅनर्जी सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दोन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय चिन्हांवर झाल्या नसल्या तरी त्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे चार खेळाडू होते हे निश्चित. या निवडणुकांनी सर्वच पक्षांना आत्मचिंतनासाठी प्रवृत्त केले.
‘जितं मया, जितं मया’च्या कोणी कितीही आरोळ्या ठोकल्या, तरी मतदारराजाला कोणाला हसवायचे नि कोणाचे हसू करायचे, हे चांगलेच समजते. त्यातूनच त्याने मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची पात्रता दाखवून दिली नि तिला राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकून दिले, तर भारतीय जनता पक्षाला प्रथम क्रमांकावर विराजमान केले.
नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या माघारीच्या प्रक्रियेंतर्गत तब्बल पाच हजार ४६३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. ५,८९५ जागांपैकी तब्बल १,६२७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. सर्वाधिक २३८ जागा सिन्नरमध्ये बिनविरोध झाल्या असून, आता ४,२६८ जागांवर प्रत्यक्षात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामपंचायतीचे लिलाव केल्यामुळे लोकशाहीच्या तत्त्वालाच हरताळ फासला जाणार आहे. ‘सर्वांना समान संधी’ या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वालाच हरताळ फासला जात आहे आणि म्हणून लिलाव पद्धतीद्वारे होणाऱ्या निवडणुका निवडणूक आयोगाने रद्दबातल ठरवाव्यात.