मराठी 'बिग बॉस’ सीझन ५ चा विजेता सुरज चव्हाण सध्या प्रचंड चर्चेत आहे. एकीकडे त्याच्या हक्काच्या घराचं स्वप्न पुर्ण झालं. तर दुसरीकडे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरजला चित्रपटात काम करण्याची संधी देणार हा दिलेला शब्द पुर्ण केला आहे. ‘झापुक झुपूक हा सुरज चव्हाणचा नवा चित्रपट लवकरच येणार असून चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे.
Read More
नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.
हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसारखी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. विविध आशय, विषय, अभिनयातील वेगळ्या शैली असे वेगळे प्रयोग मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी केले. आता हे वर्ष संपत असताना, नव्या वर्षात प्रदर्शित होणार्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. मराठी प्रेक्षकांना त्यांच्या आवडीनुसार आशयांची निवड या नव्या चित्रपटांतून करता येईल. तेव्हा, जाणून घेऊयात २०२४ मध्ये प्रदर्शित होणार्या काही मराठी चित्रपटांविषयी...
“दोनों” चित्रपटाच्या टीझरनंतर निर्मात्यांनी नुकताच चित्रपटाचा पहिला टायटल ट्रॅक रिलीज केला आहे. सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन यांनी हा ट्रॅक आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. सलमान आणि भाग्यश्री या दोघांनीही आपल्या करिअरची सुरुवात ‘मैने प्यार किया’ मधून केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि तेव्हापासून सलमान चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.
बॉक्स ऑफिसवर सध्या एक चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहे. आणि अभिमान आहे की तो मराठी चित्रपट आहे. केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा या चित्रपटाने १७ दिवसांमध्ये ५७.१५ कोटींची कमाई केली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठी चित्रपट कमाई करत नाही किंवा मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत आणि चित्रपटगृहे मराठी चित्रपटांना मिळत नाहीत, अशा सर्व तक्रारदारांची तोंडंच बाईपण भारी देवा या चित्रपटाने बंद केली आहेत. दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या शेवटी १२.५० कोटी रुपयांची कमाई के