investments

ईशान्येतील गुंतवणुकीतून आग्नेय आशियातील बाजारपेठांचे दरवाजे खुले

ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाने मुंबईत ईशान्य व्यापार आणि गुंतवणूक रोड शोचे आयोजन केले होते. भारतातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर चाललेल्या रोड शोच्या मालिकेनंतर, मुंबईतील रोड शोने भारताच्या आर्थिक केंद्रातून गुंतवणूकदारांचे प्रचंड लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के. संगमा आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, पूर्वोत्तर राज्यांतील सरकारी अधिकारी उपस्थित होते.

Read More

अदानी समुह विदेशी संस्थेशी हातमिळवणी करत २.६ अब्ज डॉलर उभे करणार - सुत्र

' बिझनेस स्टँडर्ड ' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुप पश्चिम आशियातून २.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात आणून आपल्या ग्रीन हायड्रोजन, एअरपोर्ट या प्रकल्पासाठी आणू शकते. परदेशी सोव्हरिन फंडिंगची तरतूद करून अदानी समुहाकडून आगामी प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यासाठी हा निधी वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही गुंतवणूक २०२४ चा मध्यावर भारतीय बाजारात महत्वाची ठरणार असल्याचे आकलन तज्ज्ञांच्या मते केले गेले. याबाबत नक्की कधी गुंतवणूक येईल याबाबत प्राथमिक माहिती निश्चित झाली नाही. मार्च २४ च्या त

Read More

स्वत:च्या सेवानिवृत्ती नियोजनासाठी ६७ टक्के भारतीय सज्ज; पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड रिटायरमेंट रेडिनेस सर्व्हे २०२३

आर्थिक साक्षरता वाढीबरोबरच भारतीय आता निवृत्ती नंतरचे आयुष्य आर्थिक दृष्ट्या सुखकर जाण्यासाठी आर्थिक नियोजन करु लागले आहेत. अशी माहिती पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड रिटायरमेंट रेडिनेस सर्व्हे २०२३ मधून समोर आली आहे. या सर्व्हेनुसार निवृत्ती नियोजन करण्याकडे भारतीयांचा कल वाढत आहे. २०२३ मध्ये ६७ टक्के भारतीय सेवानिवृत्ती नियोजनासाठी मानसिकरित्या तयार असल्याची आकडेवारी या सर्व्हेतून समोर आली आहे. २०२० मध्ये फक्त ४९ टक्के भारतीय सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन करण्याविषयी विचार करत होते.

Read More

बीम्स फिनटेकने इन्शुरन्सदेखोच्या निधी उभारणी फेरीचे नेतृत्व केले

इन्शुरन्सदेखो या भारतातील आघाडीच्या इन्शुअरटेक कंपनीने सध्या चाललेल्या सीरिज बी निधीउभारणी फेरीतून ६ कोटी (६० दशलक्ष) डॉलर्स एवढा निधी उभा केला आहे. भारतावर लक्ष केंद्रित करणाऱ्या बीम्स फिनटेक फंडने या फेरीचे नेतृत्व केले. तर जपानमधील दिग्गज कंपनी मित्सुबिशी यूएफजे फायनान्शिअल ग्रुप इंक (‘एमयूएफजी’) आणि विमा कंपनी बीएनपी परिबास कार्डिफ या कंपन्या त्यांच्या युरोपातील गुंतवणूक कंपनी युराझिओद्वारे व्यवस्थापित इन्शुअरटेक फंडामार्फत तसेच योगेश महान्सारिया फॅमिली ऑफिसमार्फत नवीन गुंतवणूकदार म्हणून कंपनीमध्ये दाखल

Read More

निरमा ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसमध्ये सुमारे INR 7,500 कोटींच्या एंटरप्राइझ व्हॅल्यूमध्ये 75% स्टेक घेण्यास सहमत

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने ते ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस (Glenmark Life Sciences) मधील 75 टक्के भागभांडवल निरमा (Nirma) ला विकणार आहेत.हा करार 5,651 कोटी रुपयांना झाला असून याद्वारे 615 रुपयांना शेअर्सची विक्री केली जाईल.ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (GPL) ने त्यांच्या उपकंपनी ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसमधील 75 टक्के स्टेक निरमा लिमिटेडला 615 रुपये प्रति शेअर या दराने विकण्यास सहमती दर्शवली आहे,ज्याचे इक्विटी मूल्यांकन 7,535.4 कोटी रुपये आहे. ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसचे शेअर्स 1.25 टक्क्यांच्या घसरणीसह 6

Read More

गुंतवणूक आणणारे महायुती सरकार : मुख्यमंत्री शिंदे

“अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर गेल्याचे अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. आमचे सरकार सत्तेवर येण्याआधी गुजरात आणि कर्नाटक ही दोन राज्य आपल्या पुढे होती. पण, नव्या गुंतवणुकीमुळे आपण पुन्हा पहिल्या स्थानावर आलो. या अधिवेशनात उद्योग विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचे धाडस आमच्या उद्योगमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात गुंतवणूक आणणारे सरकार म्हणजे महायुती सरकार आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्

Read More

औद्योगिक क्षेत्रासह परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वनच!

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कधीही घराबाहेर पडले नाहीत. ‘कोविड’चे निमित्त करुन त्यांच्या नेतृत्वाखाली असलेले सरकार घरातच होते. मविआच्या कारकिर्दीत राज्याच्या विकसासाठी आवश्यक असलेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प स्थगित करण्यात आले. त्यामुळे ते ‘स्थगिती सरकार’ असल्याची नोंद झाली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सध्याचे ‘डबल इंजिन सरकार’ गतिमान आणि विकासाभिमुख कार्य करणारे सरकार म्हणून लोकाभिमुख झाले आहे. या सरकारची वर्षपूर्ती दि. ३० जूनला होत आहे.

Read More

काय सांगता! डिसेंबरपर्यंत सोन्याच्या दरांमध्ये होणार मोठी वाढ

सोन्याच्या किंमतीने वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच एमसीएक्सवर अनुक्रमे जवळपास ७.५ टक्के आणि ८ टक्के परतावा दिला आहे. रशिया-युक्रेन युद्ध, यूएस व युरोपियन बाजारपेठेतील मंदीचे वातावरण व जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, वाढत्या व्याजदरातील अस्थिरता, यूएस आर्थिक स्थितीत घट असे घटक सोन्याची किंमतीत वाढ होण्यास कारणीभूत असल्याचे एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.माल्या यांनी पुढे सांगितले की, डॉलरची वाटचाल वस्तूंची दिशा ठरवण्यामध्ये लक्षणीय भूमिका ब

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121