( Inauguration development works in Poladpur taluka by MLA Pravin Darekar ) पोलादपूर तालुक्यातील विविध विकास कामांचे उदघाटन आज भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये खडकवाडी ते चिखली ते खोतवाडी रस्ता, कामथे ते चांदले ते धनगरवाडी सिमेंट कॅाक्रिट रस्त्याच्या कामासह कुलस्वीग बेवर्ज प्रा. लि. सावित्री पॅकेज अँड ड्रिंकीग वॅाटर प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आ. दरेकर यांनी पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका दूर करण्याचा प्रयत्न करू, अस
Read More
( Pandharpur Corridor work begin in three months Devendra Fadanvis ) “पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्वांना विश्वासात घेऊन करणार असून पुढील तीन महिन्यांत जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. २९ मार्च रोजी केली.
बेघर बालकांना शिक्षणाच्या परिघात आणण्यासाठी, शोषित, वंचित महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असणार्या मुंबईच्या माधवी अरोलकर. त्यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
( Palghar dependent on Gujarat after 10 years of district formation the work of the district hospital is still incomplete ) जिल्हानिर्मिती होऊन दहा वर्षे लोटली, तरी पालघर अद्याप गुजरातवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी नंडोरे या गावात जिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली. परंतु, अद्याप 75 टक्केही काम पूर्ण न झाल्याने रुग्णांचे हाल कायम आहेत.
महिलांसाठी विशेषत: त्यांच्यात आत्मबळ निर्माण व्हावे, म्हणून कार्य करणार्या रणरागिणी गौरी बेनकर-पिंगळे यांच्याविषयी...
( one-window scheme for sugarcane harvesting workers in all districts of the state: Deputy Speaker Neelam Gorhe ) मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करा. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे, ट्रॅकींग सिस्टीम,रेशनची पोर्टिबीलीटी यासारख्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने योजना राबवण्यावर भर द्यावा.बीड जिल्ह्या प्रमाणे इतर जिल्ह्यातही का
( Narendra Modi work of the Rashtriya Swayamsevak Sangh ) “बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकींना उपस्थित राहणे माझ्यासाठी आनंददायी होते. आपण देशासाठी समर्पित जीवन जगावे, हे मला रा. स्व. संघाने शिकवले. यावर्षी 100 वर्षे पूर्ण करणार्या रा. स्व. संघापेक्षा जगात अन्य दुसरा मोठा स्वयंसेवी संघ नाही.‘आरएसएस’ समजून घेणे सोपे काम नाही, त्याचे कार्य समजून घेणे आवश्यक आहे,” अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होत
( The art of workers Ashish Shelar ) “श्रमिकांची कला वृद्धिंगत होऊन पुढील पिढीपर्यंत नेली पाहिजे. आज ‘चॅट जीपीटी’चा जमाना आहे. त्यात कृत्रिम ट्यून मिळते; पण सृजनाची ट्यून श्रमिक कलावंतच बनवू शकतो. या श्रमिकांच्या कलेला घामाचा सुगंध असतो,” असे गौरवोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञानमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी काढले.
धर्मांतरणविरोधी चळवळ ते गावासाठी एक निस्वार्थी समाजसेवक म्हणून काम करणार्या, डहाणूच्या सावजी बीज यांच्याविषयी...
भाजप आपल्या संघटनेत कार्यकर्त्यांमधून नेतृत्व तयार करते, आणि काँग्रेस नेतृत्व आपल्याच कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवते! मग पक्षाच्या अधोगतीला जबाबदार कोण? भाजप की राहुल गांधी? खरं तर, हा प्रश्न आता काँग्रेसच्या उरलेल्या निष्ठावंतांनी स्वतःला विचारायला हवा. राहुल गांधी यांची एकूणच नेतृत्वशैली बघता, काँग्रेसचा भविष्यकाळही अंधारातच जाणार, हे निश्चित! why rahul gandhi says congress leaders working for bjp ?
आजची पिढी ही मोबाईलच्या युगात वावरणारी. तेव्हा, हिंदू धर्मातील सण, संस्कृती आणि परंपरा यांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या हेमा नरेंद्र पवार कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी...
व्यवस्थापनातील उच्चपदस्थांचे राजीनामे हे कंपन्यांच्या कामगिरीवर आणि एकूणच कार्यसंस्कृतीवर सर्वांगीण परिणाम करणारे ठरतात. विशेषकरुन ‘कोविड’ महामारीच्या काळात मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्यामुळे विविध कंपन्यांची अवस्था अधिक बिकट झाली होती. पण, सध्या अशा राजीनाम्यांची संख्या घटलेली दिसून येते. त्यानिमित्ताने व्यवस्थापन क्षेत्रातील मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्याचे प्रमाण आणि त्याचे परिणाम यांचा आढावा घेणारा हा लेख...
Israel मध्ये रोजगारासाठी काही भारतीय गेले असता, दहा भारतीय कामगारांची सुटका करण्यात आली. त्यांना काम देतो या बहाण्याने एक महिना एका गावात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी आता अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पॅलिस्टिनी कामगारांना एका महिन्यापर्यंत ठेवण्यात आल्यानंतर वेस्ट बँकच्या अल-झायेम गावात आणले होते. त्यानंतर आता त्यांचे पासपोर्ट काढून घेण्यात आले आणि त्याचा वापर इस्रायलमध्ये प्रवेश करण्यात आला आहे,
मुंबई पाठोपाठ महानगरातील शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावी तसेच झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावावा या उद्देशातून आता वसई-विरारमधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने वसई-विरार परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वसई-विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी जनजागृती करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
‘क्विक कॉमर्स’ची वायुवेगाने वाढ होत असून, या क्षेत्राने लाखो गिग कर्मचारी देशात निर्माण केले. वर्षाखेरीस त्यांची संख्या तब्बल पाच लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. उद्योगक्षेत्रातील ही नवी संधी लक्षात घेता, या कर्मचार्यांना सोयीसुविधा प्रदान करण्याबरोबरच, त्यांच्या सर्वांगीण विकास आणि कौशल्यवृद्धीकडेही लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज...
‘लार्सन आणि टुब्रो कंपनी’चे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम यांनी नुकतेच मजुरांबाबत केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले. एकप्रकारे सरकारी योजनांच्या यशाची ती कबुलीच होती. मात्र, त्यात मजुरांच्या परिस्थितीचा विचारही नव्हता हे तितकेच सत्य. श्रमसन्मानाचे करण्याचे वातावरण देशात निर्माण होण्याची गरज या विधानाने अधोरेखित केली आहे.
Budget 2025 देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि त्यांचा आठवा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीत सादर करण्यात आला आहे. संबंधित अर्थसंकल्पातून गिग वर्कर्सनाही अधिकृत कामगार असा दर्जा देण्यात येणार असे सांगितले आहे. तसेच त्यांना ओळखपत्रही दिले जाणार असल्याची घोषणा निर्मला सितारामण यांनी केली आहे.
माथाडी कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याबाबत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे गुरुवार, ३० जानेवारी रोजी निवेदन दिले.
सध्या देशातील काही दिग्गज कंपन्यांचे सीईओ-अध्यक्ष कंपनीतील कर्मचार्यांनी साप्ताहिक ७० तास, ९० तास काम करावे, असे वायफळ सल्ले देत सुटलेले दिसतात. त्यामुळे पुन्हा एकदा अधिक काम की दर्जेदार काम,( More or Quality Work ) या चर्चेला तोंड फुटले आहे. त्यानिमित्ताने व्यवस्थापन आणि मानवी संसाधन क्षेत्राच्या दृष्टिकोनातून या विषयाचा उहापोह करणे क्रमप्राप्त ठरावे.
साहित्यिक, प्रकाशक, समाजसेवक आणि मुक्त पत्रकार ( Freelance Journalists ) अशा विविध भूमिका बजावत देशाची भावी पिढी घडविण्यासाठी अमूल्य योगदान देणार्या ज्योती कपिले यांच्याविषयी...
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंच्या ( Savitrimai Phule ) विचारकार्यापासून प्रेरणा घेऊन समाजकार्य करणार्या, पुण्याच्या रागिणी विजयकुमार लडकत यांच्या विचार आणि कार्याचा घेतलेला हा मागोवा...
ज्ञानदानासारखे पुण्य नाही असे म्हणतात. समोर येणार्या प्रत्येक अडचणींचा सामना करत विद्यादानाचे कार्य अविरत करणार्या वैभव ठाकरे ( Vaibhav Thackeray ) यांच्याविषयी.
एकेकाळी दहशतवादाने ग्रस्त असलेल्या काश्मीरमध्ये, नवनवीन विकासकामे होताना दिसत आहेत. गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेले, काश्मीरचे रेल्वेचे ( Kashmir Railway ) स्वप्न देखील आता सत्यात उतरले आहे. यामुळे नक्कीच विकसित भारताच्या यात्रेमध्ये काश्मीर महत्वाची भुमिका बजावेल. महाराजा प्रताप सिंह यांच्या काश्मीरच्या रेल्वेच्या स्वप्नाची पूर्ताता होताना काश्मीर रेल्वेच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना संघटनात्मक बांधणीचे काम देऊन संघटन प्रभारी पद देण्यात आले होते. लवकरच ते मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून जबाबदारी स्वीकारतील.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि रस्त्यावरील वाहतुककोंडी कमी करण्यासाठी मुंबई आणि मुंबई उपनगरांत विविध ‘मेट्रो’ प्रकल्पांची ( Metro Work ) कामे प्रगतीपथावर आहेत. या ‘मेट्रो’ प्रकल्पांचा आणि मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु असणार्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी ‘मेट्रो’ची कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित वेळापत्रक करण्याचे निर्देश दिले.
(Mumbai-Goa Highway) राज्यात रस्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या विभागाचा मंत्री म्हणून मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी दिली.
ठाणे : पदोन्नती आणि प्रशासकिय बदल्यासाठी वस्तु व सेवा कर (जीएसटी) ( GST ) विभागांतील कर्मचाऱ्यांनी शुक्रवार २० डिसेंबर रोजी ठाणे जीएसटी कार्यालयात दोन तास काम बंद आंदोलन केले. महाराष्ट्र वस्तु व सेवा कर कर्मचारी संघटना, मुंबई या संघटनेच्या माध्यमातून गेले तीन दिवस महाराष्ट्रभर हे कामबंद आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत काम ठप्प झाल्याने ठाणे जीएसटी कार्यालयात शुकशुकाट पसरला होता.
बेस्टच्या व्हायरल व्हिडिओ मागचं भयाण सत्य काय? कशी चालतेयं कंत्राटी कामगारांची व्यवस्था? भाजप नेते रवी राजांनी ( Ravi Raja ) दाखवला बेस्ट प्रशासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या कंत्राटी व्यवस्थेचा काळा चेहरा!
महाराष्ट्राने महायुती सरकारला दिलेल्या बहुमतामुळे आता राज्यातील विकासकाम ( Development Work ) आणि प्रकल्पांची वाट अधिक सुकर झालीये. ही विधानसभा निवडणूक राजकीय दृष्टिकोनातून जशी महत्वाच्या होती तशीच अनेक विकास प्रकल्पांच्या भविष्यासाठीही महत्वाची होती. राज्यात कोणकोणत्या प्रकल्पांचा मार्ग मतदारांनी मोकळा केलाय याचा आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊया.
नाशिक : मागील दोन विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपकडून चांदवड-देवळा मतदारसंघातून सहज विजय मिळवणारे डॉ. राहुल आहेर ( Rahul Aher ) यांची यंदाची वाट त्यांचे चुलत बंधू केदा आहेर यांनी काहीशी बिकट केली आहे. परंतु, शांत आणि संयमी डॉ. आहेर तिसर्यांदादेखील विजय मिळवतील, अशी अपेक्षा स्थानिकांना असल्याचे दिसून येत आहे. मागील दहा वर्षांत संपूर्ण मतदारसंघात डॉ. आहेर यांच्या प्रयत्नांतून विकासकामे जलद गतीने झाली. चांदवड आणि देवळा या दोन तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ निर्माण झाला आहे. मतदारसंघातील शेवटच्या वाडी-वस्तीपर्यंत
विरोधकांवर बोलण्यापेक्षा आपल्या विकासकामांवर बोलणारे, जनतेच्या आशीर्वादाचे पाठबळ असणारे घाटकोपर पश्चिमचे महायुतीचे उमेदवार राम कदम ( Ram Kadam )यांच्याशी साधलेला संवाद.
( Let's Imagine ) गेली सहा वर्षे आमची ‘लेट्स इमॅजिन’ संस्था कलेचा आस्वाद घेत वाडा व विक्रमगडमधील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांबरोबर पणत्या रंगविणे, शुभेच्छा कार्ड व एन्व्हलप सुशोभित करणे, कंदील तयार करणे अशा कलाप्रकारांची दिवाळी कार्यशाळा घेत दिवाळी साजरी करत आहे. या कलाप्रकारातूनही आनंद मिळतो आणि नवनवीन कल्पना आकाराला येतात. शिकण्याची आणि अनुभवांची समृद्ध देवाणघेवाण होते. यावर्षी आम्ही विक्रमगडमधील मोह बुद्रुक या शाळेत दिवाळीची कार्यशाळा घेतली. मोह बुद्रुक शाळेतील या मोहवून टाकणार्या अनुभवाचे शब्दचित्रण...
पिंपरी : राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ ( इंटक INTUC) सीओडी देहूरोड या संघटनेने भोसरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना आरपीआय, आठवले महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय संरक्षण कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब गुंड यांनी एका पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे.
( MVA ) “राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच विरोधकांच्या ‘नॅरेटिव्ह’ बांधणीला वेग येऊ लागला आहे. उद्योग राज्याबाहेर गेले, महायुतीच्या सत्ताकाळात महाराष्ट्र मागे पडला,” असे मुद्दे दामटवून मतदारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण, याकडे डोळसपणे पाहाता, ‘मविआ’च्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाचा आलेख तळाला गेल्याचे समोर येते. त्यामुळे ‘विकासनीती हवी की भकास व्यक्ती’ हे आता मतदारांनी ठरवण्याची वेळ आली आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी मतपेटीत बंद होणारे प्रत्येक मत महाराष्ट्राचे
बहुराष्ट्रीय कंपनी केपीएमजीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे की भारतातील ९० टक्के सीईओंनी वर्क फ्रोम ऑफीसला प्राधान्य दिले आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारी बक्षिसे, पदोन्नती, वाढ, आदी गोष्टी सीईओ, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीशी जोडू इच्छितात असे सुद्धा यात नमूद करण्यात आले आहे.
(Vijay Girkar) मुंबईतील २८ हजार सफाई कामगारांच्या रखडलेल्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशी आग्रह मागणी माजी मंत्री, आमदार विजय (भाई) गिरकर यांनी शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी पालिका आयुक्त भुषण गगराणी यांच्याकडे केली.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करणार असून भाऊबीजेनिमित्त त्यांना २००० रुपये ओवाळणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.
सारथीच्या माध्यमातून मराठा तरुण मोठमोठ्या पदांवर गेलेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. बुधवारी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
( Shri Ram Mandir ) अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी ट्रस्ट कटीबद्ध असून संपूर्ण मंदिर संकुलाचे बांधकाम ३० जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे.
बांगलादेशातील हिंदूंविषयी राहुल गांधी बोलणार का, असा प्रश्न सॅम पित्रोडा यांना विचारल्यामुळे राहुल गांधींच्या टीमने आपल्याला धक्काबुक्की केली; असा अतिशय गंभीर दावा पत्रकार इंडिया टुडे या माध्यमसमुहाचे रोहित शर्मा यांनी केला आहे.
जपानमध्ये प्रथमच चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याचे समर्थन केले आहे. सरकारने आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा उपक्रम सुरू केला असला तरी जुनी मानसिकता अडसर ठरल्याचे दिसून येत आहे. तसेच, सरकारकडून चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या योजनेला चालना देत आहे.
Gujrat Rain गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने नको केले आहे. या पावसामुळे गुजरात येथील वडोदरा शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून तब्बल २८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर आता प्रशासन अलर्ट मोडवर असून भारतीय क्रिकेट रवींद्र जडेजाची पत्नी आणि भाजप आमदार रिवाबा जडेजा जामनगर येथील पूरपरिस्थिची पाहाणी करत असताना पूरजन्य परिस्थितील १० ते १५ फुट पाण्यात उतरल्या आहेत. याचा पती जडेजाला भलताच अभिमान वाटू लागला आहे.
देशातील कारखान्यामधील नोकरदारवर्गाला दरमहा २० हजार रुपये किंवा त्याहून कमी वेतन मिळत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा एक मोठा भाग आर्थिक तणावाने ग्रस्त असून घर, आरोग्य सेवा आणि शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहे, असेही अहवालातून दिसून आले आहे.
“पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या घरांसाठी 42 हजार, 135 रुपये इतके वार्षिक सेवाशुल्क आकारले आहे. हे सेवा शुल्क परवडणारे नसल्यामुळे ते कमी करावी,” अशी मागणी विजेत्या गिरणी कामगारांकडून वारंवार ‘म्हाडा’कडे करण्यात येत होती. याबाबत गृहनिर्माण विभागाने निर्णय घेतला असून एप्रिल 2024 ते मार्च 2025 या एका वर्षाचे शुल्क माफ करण्याबाबत मंजुरी दिल्याचे पत्र ‘म्हाडा’ला पाठविले आहे.
राजकरणात एक सत्य आहे की तुम्ही जर सत्तेमध्ये नसाल तर आमदार होऊन काही फायदा नाही. म्हणून "मला तुम्हाला सत्तेत बसवायचे आहे" हे विधान राज ठाकरे यांनी केले असले तरी आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही. लोकांची कामे करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे अशा शब्दांत मनसे नेते आमदार राजू पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली.
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्यावतीने दि. ३ ऑगस्ट आणि ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संस्थेच्या प्रेक्षागारात दोन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी असणाऱ्या आणि भाषेच्या क्षेत्रात व्यावसायिक संधी शोधणाऱ्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त अशा 'प्रमाण मराठी लेखन कार्यशाळा' आणि 'आवाजाची कार्यशाळा' या दोन कार्यशाळा अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार असून कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. सह्याद्री अतिथीगृह येथे 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी' खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी रोजगाराची मागणी नोंदविण्यासाठी आयोजित केलेल्या 'उद्योजकांशी संवाद'या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त निधी चौधरी
कर्नाटकची राजधानी बंगळुरू ही भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखली जाते. पण, काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यापासून बंगळुरूच्या आयटी क्षेत्राला धक्के दिले जात आहेत. आता कर्नाटक सरकार एक नवीन कायदा आणत आहे, ज्या अंतर्गत आयटी कर्मचाऱ्यांना दिवसाचे १४ तास काम करावे लागणार आहे. म्हणजेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने हा कायदा केल्यास आयटी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना अधिक वेळ कार्यालयात घालवावा लागेल.
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दि. १५ जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४ जवानांच्या बलिदानानंतर आणखी एक दहशतवादी हल्ला झाला आहे. कास्तीगड भागातील जद्दन बाटा गावात हा हल्ला झाला. गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच लखनऊमध्ये झालेल्या भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. कार्यकर्त्यांनी बॅकफूटवर येण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री योगींनी विरोधकांच्या जातीयवादावर लक्ष ठेवून २०२७ ची तयारी सुरू करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आता बदलली आहे. यापूर्वी मोहरमच्या काळात ताजियाच्या नावाने घरे पाडली जात होती. आता मनमानी चालत नाही.