( Chief Ministers Relief Fund and Charity Hospital Help Desk ) आरोग्यदायी जीवन ही मनुष्य प्राण्याची गरज. बदलत्या काळानुसार आरोग्यसेवा देणार्या आणि घेणार्या अशा दोन्ही वर्गांच्या प्राथमिकता बदलत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या ग्रामीण भागांत वैद्यकीय सेवा आणि तातडीने उपचार देणे, हे आव्हानात्मकच. विशेषकरुन ‘नाही रे’ वर्गाकरिता उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. यासोबतच आर्थिकदृष्ट्या गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक साहाय्य मिळावे, य
Read More
(Tanisha Bhise Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे. भिसे कुटुंबाकडून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांना पाच तास थांबवून ठेवले आणि त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे या घटनेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याने राज्यभरात एकच खळबल उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल पुढे आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत या अहवालाती ठळक बाबींवर भाष्य केले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
(Matoshree Ramabai Ambedkar Maternity Hospital) मुंबईतील चेंबूर पूर्व येथे असणाऱ्या मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृहाची तज्ञांच्या समितीमार्फत पाहणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही अद्याप कोणतीही पाहणी झालेली नाही. यासंदर्भात माजी नगरसेविका आणि सुधारणा समितीच्या सदस्या आशा मराठे यांनी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून तातडीने पाहणी करुन अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्याची विनंती केली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोर कारभारामुळे एका महिलेने जीव गमावल्याने शिवसैनिकांनी रुग्णालयावर धडक मोर्चा काढला आहे. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर चिल्लर पैसे फेकत निषेध व्यक्त केला.
(Tanisha Bhise death case) भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे आपला जीव गमवावा लागला. तनिषा यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला थेट मंत्रालयातून फोन आला होता. मात्र, तरीही रुग्णालायाने तनिषा यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप तनिषा यांची नणंद प्रियंका पाटील यांनी केला आहे.
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली दुकान उघडलेल्या डॉक्टरांच्या लालसेमुळेच दोन लेकरे जन्मत:च आईच्या मायेला पोरकी झाली, अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवर संताप व्यक्त केला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेने जीव गमावला असून राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
(Pune Pregnant Woman Case) पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोर कारभारमुळे गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुणे महानगरपालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची गंभीर दखल घेतली असून या घटनेच्या चौकशीसाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या (पुणे) अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेशी संबंधित लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी शुक्रवार, ४ एप्रिल रोजी केली.
आधी १० लाख रुपये भरा मगच रुग्णाला दाखल करून घेऊ, अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, ३ मार्च रोजी घडली.
उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आणि बच्चेकंपनीला सुटी लागली की, अनेक पालकांना पर्यटन आणि भ्रमंती खुणावते. नोकरदारवर्गासोबतच तरुणाईलाही भटकंतीचे वेध लागतात. त्यानिमित्ताने गेल्या काही वर्षांतील पर्यटन व्यवसायातील बदलत्या ट्रेंड्सचे आकलन करणारा हा लेख...
अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने प्रकाशित केलेल्या आणि बीएमसीसह डॉक्टर आणि संशोधकांच्या टीमने तयार केलेल्या सविस्तर अहवालानुसार धारावीत दरवर्षी सुमारे ३०० लोक औषधांना प्रतिरोध करणाऱ्या क्षय रोगासाठी पॉझिटिव्ह आढळतात. याच पार्श्वभूमीवर क्षयरोगावर मात करण्याचे मिशन टीबीमुक्त धारावी विषयावर सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
TB-Free Dharavi अमेरिकेतील ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन’ने प्रकाशित केलेल्या आणि मुंबई महानगरपालिकेसह डॉक्टर आणि संशोधकांच्या टीमने तयार केलेल्या एका सविस्तर अहवालानुसार, दरवर्षी सुमारे 300 धारावीकर औषधांना प्रतिरोध करणार्या क्षयरोगासाठी पॉझिटिव्ह आढळतात. या पार्श्वभूमीवर क्षयरोगावर मात करण्याचे ‘मिशन टीबीमुक्त धारावी’ या विषयी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद.
( Palghar dependent on Gujarat after 10 years of district formation the work of the district hospital is still incomplete ) जिल्हानिर्मिती होऊन दहा वर्षे लोटली, तरी पालघर अद्याप गुजरातवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी नंडोरे या गावात जिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली. परंतु, अद्याप 75 टक्केही काम पूर्ण न झाल्याने रुग्णांचे हाल कायम आहेत.
( Health Department take strict action against bogus doctors and hospitals Manisha Kayande & Pravin Darekar ) विधानपरिषदेत आज आमदार मनिषा कायंदे यांनी नाशिकच्या पंड्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरकारभाराबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत भाग घेत भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांनी बोगस डॉक्टर, दवाखान्यांवर सार्वजनिक आरोग्य विभाग कठोर कारवाई करणार का, ? असा सवाल उपस्थित केला.
( Glaucoma Week at Thane Civil Hospital ) आरोग्य तपासणी करतेवेळी अनेकजण डोळ्यांच्या तपासणीकडे दुर्लक्ष करत असले तरी याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळ्यांना काचबिंदू झाल्यास प्रथम दर्शनी कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र दुर्लक्ष झाल्यास कायमच अंधत्व येण्याचा धोका उद्भवतो. याच पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हील रुग्णालयात नुकताच काचबिंदू सप्ताहात नऊ टक्के रुग्णांना काचबिंदूची कमी अधिक लक्षणे दिसून आली आहेत.
मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालय आणि एम. ए. पोदार रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावर कार्यरत असलेल्या डॉ. संपदा संत यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...
प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रहमान यांना छातीत दुखू लागल्याने रविवारी सकाळी चेन्नईतील ग्रीम्स रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्यावर ईसीजी, इकोकार्डियोग्राम तसेच इतर काही आवश्यक चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज त्यांच्या अँजिओग्राम तपासणीची शक्यता असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, अंधत्वाचे प्रमुख कारण ठरणार्या आजारांपैकी एक म्हणजे काचबिंदू (Glaucoma). हा एक डोळ्यांचा गंभीर आजार असून वेळीच निदान आणि उपचार न केल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते. याच आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक काचबिंदू सप्ताह’ दरवर्षी मार्च महिन्यात साजरा केला जातो. आज दि. १२ मार्च हा दिवस ‘जागतिक काचबिंदू दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने नेत्ररोगतज्ञ, ‘अनिल आय हॉस्पिटल्स ग्रुप’च्या मेडिकल डायरेक्टर, डॉ. अनघा हेरूर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्
काचबिंदू म्हणजे काय? काचबिंदू झाल्यानंतर डोळ्यांवरील उपचार पद्धती काय असते? डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय उपाय करावेत? जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त (World Glaucoma Week) प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ अनिल आय हॉस्पिटल्स ग्रुप मेडिकलच्या डायरेक्टर, डॉ. अनघा हेरूर यांची विशेष मुलाखत
Mumbai मधील नागपाडा परिसरात ४ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे, त्यात एकजण बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी ९ मार्च २०२५ रोजी दुपारी बारा वाजता ही घटना घडली आहे. पाण्याची टाकी साफ करताना कर्मचाऱ्यांचा जीव गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे केंबूर्ली येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ( Mahad's Super Specialty Hospital ) उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार शासकीय जमीन हॉस्पिटलला देण्यासाठी शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र ज्या जमिनीवर हे रुग्णालय उभारायचे होते त्या जमिनीऐवजी डोंगरावरील जमीन हॉस्पिटलसाठी देण्याचा निर्णय झाला. यावर पोलादपूरचे सुपुत्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत हा निर्णय रद्द करून नवीन निर्णय जारी करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार
केईएममध्ये येणाऱ्या रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी रुग्णालयात आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, २१ जानेवारी रोजी दिले. केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात ते बोलत होते.
(Saif Ali Khan Heath Update) बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवार, दि. १८ जानेवारीला मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोराने केलेल्या धारदार शस्त्राच्या वारामुळे रक्तबंबाळ झालेल्या सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने CGHS कार्डधारकांसाठी नवीन नियमावली बनवली आहे. या नियमवाली अंतर्गत सीजीएचएस कार्ड धारकांना कुठलेही खासगी रूगणालयं उपचार नाकारू शकत नाही. त्याच बरोबर कार्ड धारकांना कुठल्याही प्रकारे दर्जाचे बेड देता येणार नाही. तसेच सरकारने दिलेल्या कार्ड वरील किंमतीपेक्षा जास्त रूपये या रूगणालयांना आकारता येणार नाही. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने CGHS लाभार्थ्यांच्या वारंवार येत असलेल्या तक्रारींवर उपाय म्हणून ही नियमावली तयार केली आहे. या मागचा प्रमुख उद्देश लाभ
चीनमधील एचएमपीव्ही (HMPV) या विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे अन्य देशांसह भारताचीही चिंता वाढली आहे. २ दिवसांपूर्वी भारतात कर्नाटकातील बंगळुरूमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर याचे संशयित रुग्ण गुजरात, नागपूरमध्ये आढळून आले. अशातच आता मुंबईतही या विषाणूचा पहिला रूग्ण आढळल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील एका सहा महिन्याच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग ( Manmohan Singh ) यांचे दि. २६ डिसेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर २८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. मनमोहन सिंग हे मितभाषी होते, परंतु संसदेत सुषमा स्वराज व मनमोहन सिंग यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. यावर मनमोहन सिंग यांनी 'माना के तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक तो देख मेरा इंतजार तो देख', अशा शायरीतून प्रत्य
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी ( Lalkrishna Adwani ) यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आणि अशक्तपणा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून आता त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मी चेकअपसाठी आलो असून माझी प्रकृती उत्तम आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी त्यांना तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ठाणे : प्रसूतिनंतर कमी वजनाची बालके जन्मल्यावर त्यांची काळजी घेणे तारेवरची कसरत असते. मात्र, खासगी प्रसूतिगृहाप्रमाणेच सुसज्ज प्रसूतिगृह सिव्हिल रुग्णालयात ( Civil Hospital ) आहे. गेल्या ११ महिन्यांत एक किलोपेक्षा कमी वजनाची ३६ बालके प्रसूतिगृहात जन्मली आहेत. सिव्हिल रुग्णालयातील एसएनसीयू कक्ष कृश बालकांसाठी देवदूत ठरत असून, बर्याच बालकांची प्रकृती सुधारून माता आणि बाळ सुखरूप घरी जात आहेत.
एक परिचित आवाज, बोलण्याची एक विशिष्ट पद्धत, आवाजात आपलेपणा आणि त्याचवेळी एक नैतिक अधिकार! बिमल यांच्याबाबत माझ्यासारख्या अनेकांना हा अनुभव आला असेल. फोनवरील संभाषणादरम्यान कधीही अधिकारवाणीत ते बोलले नाहीत किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल कधीही रागावले नाहीत. प्रत्येक व्यक्तीची ओळख आणि व्यक्तिमत्त्व ( Volunteer ) ) घडवण्यात अनेकांचे योगदान असते. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या मदतीला, आपल्याला मार्गदर्शन करायला जी जी व्यक्ती संपर्कात येते, तिचा त्या व्यक्तीच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. उलट अनेक गोष्टी
भारतातील आघाडीची खाजगी आरोग्य सेवा प्रदात्यांपैकी एक असलेल्या अपोलो हॉस्पिटलने नवीन विस्तार योजनेचे अनावरण केले. मुंबई आणि लखनऊ येथे १ हजार ६२५ कोटींच्या नवीन प्रकल्प बिल्ड, ऑपरेट आणि मॅनेजमेंट कराराद्वारे कार्यान्वित केले जाणार आहे. आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत देशभरातील ११ ठिकाणी ३,५०० बेड्स जोडून हॉस्पिटल्सची क्षमता वाढविण्यात येणार आहे.
Nashik district hospital : बाळांची अदलाबदल? नाशिकच नाही मराठवाड्यातही घडले असे प्रकार!
(Nashik District Hospital) नाशिक जिल्हा रुग्णालयातील बालकांच्या अदलाबदलीच्या प्रकरणातील एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नोंदवहीतील चुकीच्या नोंदीमुळे हा प्रकार घडल्याचे माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने बाळांची अदलाबदल झालीच नसल्याचा अहवाल दिला आहे.
नाशिक : (Nashik District Hospital) मुलाला प्रसुती दिलेल्या महिलेच्या हातात मुलगी ठेवल्याचा प्रकार नाशिक शहरात समोर आला आहे. हा प्रकार नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घडला आहे. येथे एका महिलेने मुलाला जन्म दिला. मात्र डिस्चार्ज घेताना रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून त्यांच्या हातात मुलगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एका महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. प्रसूतीनंतर या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. पण, डिस्चार्ज घेताना मुलगी झाल्याचे सांगत बाळ हातात देण्यात आले. रुग्णालयाच्या नोंदव
राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करतायेत हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत असे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
(Thane Civil Hospital) ठाणे सिव्हील रुग्णालय मूत्रपिंड (किडनी) रुग्णांसाठी आधारवड ठरताना दिसून येत आहे. सिव्हील रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये गेल्या सहा महिन्यात रुग्णांचे एक हजार सेशन्स पूर्ण झाली आहेत. तरी सध्या दोन सत्रात सुरू झालेल्या या डायलिसिस सेंटरचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
(Kolkata) कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय रुग्णालयामध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरुन सुरू असलेला गदारोळ अजूनही थांबलेला नाही. त्यातच कोलकाता येथील आणखी एका रुग्णालयात महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडित महिलेच्या मुलावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री आई मुलाजवळ झोपली होती. यावेळी, रुग्णालयाच्या वॉर्डबॉयने महिला झोपेत असताना तिचा विनयभंग केला आणि मोब
बाळकुम परिसरासह काल्हेरपर्यंत हजारो महिलांना आधार ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रसूतिगृहाला अवकळा आली आहे. यासाठी सूचवण्यात आलेली पर्यायी जागा देखील एका संस्थेला देण्यात आल्याने पालिका अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा आणि दिरंगाईचा निषेध आ. संजय केळकर यांनी केला आहे.
आर.जी. कार रुगणालयातील माजी प्रचार्य संदीप घोष यांना अटक झाल्यापासून, त्यांच्या मागील आरोपसत्र थांबायचं नाव घेत नाहीये.
कोलकाता येथील निवासी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर आता सर्वच राज्यातील प्रशासकीय यंत्रणांनी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली आहेत. दरम्यान दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दररोज नियमितपणे रुग्णालय परिसरात गस्त घालून विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पोलिसांकडून दररोज गस्त घातली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत कोलकाता येथील विद्यार्थ्यांनी नबन्ना मार्च (नबन्ना मार्च) काढला आहे.
कोलकात्याच्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार – हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांच्या निष्काळजीपणावर कठोर शब्दात ताशेरे ओढले. याप्रकरणी पुढील सुनावणी ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
Mamta Banerjee Resign आर जी कर महाविद्यालयात पीडितेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पीडितेच्या आईने प.बंगालच्या मुख्यमंत्रीं ममता बॅनर्जींनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ममता बॅनर्जी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचे पीडितेच्या आईचे म्हणणे आहे. ममता बॅनर्जींनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी आर्त मागणी पीडितेच्या आईने केली आहे.
Doctor Security Law विशेष प्रतिनिधी देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे शनिवारी देण्यात आले आहे.