यापुढे कुणालाही सरसकट मशीदींवरील भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. भोंग्याबाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल. जर त्यांनी पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
Read More
मुंबई : धार्मिक स्थळांवर भोंगे लावणे, हा कोणत्याही धर्माचा अनिवार्य भाग नाही. ध्वनी प्रदुषणामुळे आरोग्याला धोका होतो. त्यामुळे लाऊडस्पिकरला परवानगी नाकारल्याने मूलभूत अधिकारांवर गदा येते, असा दावा कोणीच करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने ( High Court ) गुरुवार, दि. २३ जानेवारी रोजी दिला. त्यामुळे मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मशिदीच्या बाहेरील बेकायदा लाऊडस्पीकरच्या आवाजाने हैराण झालेल्या जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी आता विरोध केला आहे. त्यानंतर जम्मूतील गांधी मेमोरियल गवर्नमेंट कॉलेजच्या जवळ सहा विद्यार्थ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांनी मशिदीबाहेर एकत्र येत हनुमान चालीसा पठण केले होते.
साममधील ओरांग नॅशनल पार्कमध्ये शिकाऱ्यांनी गेंड्याचे शिंग काढण्यासाठी ट्रँक्विलायझरचा वापर केल्याचे समोर आले. सोमवारी दि. ९ मे रोजी उद्यानात तैनात कर्मचार्यांना मुवामारी परिसरात नियमित गस्त घालत असताना सुमारे आठ ते दहा वर्षाचा शिंग कापला गेलेला प्रौढ नर गेंडा आढळून आला.
पुण्यातील डेक्कन परिसरातील मशिदींवरील अनाधिकृत भोंगे हटवावे, यासाठी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले आहे. हे भोंगे हटवण्यासाठी मनसेकडून पुणे पोलिसांना चार दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले आहे. ’चार दिवसात मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा, अन्यथा दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालीसाचे पठण करणार,’ असा इशारा या पत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिस स्टेशन, विश्रामबाग, फरासखाना पोलिस स्टेशनला हेमंत संभूस यांनी हे पत्र दिले आहे.