वरळीतील स्थानिक मच्छीमारानी 'व्हेल' माश्याची 'उलटी' कांदळवन कक्षाकडे सुपूर्द केली आहे. संजय बैकर यांनी आपल्याकडे 'स्पर्म व्हेल' माश्याची उलटी असल्याचे सांगून ती कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली. ही उलटी घन स्वरुपात असून वरळीच्या लोटस जेट्टी बंदरावर, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विरेंद्र तिवारी यांच्या उपस्थितीत हे 'अंबरग्रीस' (स्पर्म व्हेलची उलटी) ताब्यात घेण्यात आले.
Read More