मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते व पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले जाते. परंतु त्या दिवशी या महापुरुषांच्या प्रतिमेसह त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देणारे फलक ठेवण्यात येत नव्हते. त्यामुळे सर्व सामान्यांना महापुरुषांच्या जीवन चरित्राबाबत योग्य माहिती मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने थोर महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलक सुद्धा लावाव
Read More
भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्याचा दिवस ( Mahaparinirvan ) म्हणजे ६ डिसेंबर. या युगप्रवर्तकास माझे कोटी कोटी प्रणाम. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी मोठे ध्येय व स्वप्न पाहता येतात, नव्हे प्रत्यक्षात सत्यात उतरवता येतात याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणून आज आपण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघून म्हणू शकतो. आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचा जागर होण्याची आवश्यकता आहे.
नदीपात्रात अनधिकृत बांधकामे उभारून नदीपात्र लुप्त होत असल्याची ओरड आपण नेहमीच ऐकतो. त्याचवेळी दुसरीकडे जागतिक हवामानबदल, हिमनद्यांच्या पाणीपातळीत होत असलेली वाढ आणि पृथ्वीचे वाढत असलेले तापमान, यावरही जागतिक पातळीवर मंथन सुरू आहे. अशावेळी दूरवर पसरलेल्या लिबियातील वाळवंटात ’ग्रेट मॅन-मेड रिव्हर’ हा मानवनिर्मित नदी प्रकल्प म्हणजे जगातील आठवं आश्चर्यच, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
एकूणच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्रभक्तीने रसरसलेले व एका सच्चा समाजसुधारकाचे जीवन आहे. कुठल्याही भारतीय उपासना पद्धतीचा विरोध त्याच्यात दिसत नसून, जर असेल तर तो केवळ आणि केवळ समाज सुधारणेच्या दृष्टीनेच आहे. मात्र, त्यांच्या सगळ्या भूमिका लक्षात येण्यासाठी, त्यांची स्वतः लिहिलेली पुस्तके वाचणे गरजेचे असून, त्यांच्याबाबत अनेक एजंटांनी स्वतःची मतं बाबासाहेबांच्या तोंडी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे, ती वाचून आपल्याला खरे बाबासाहेब उमजणार नाहीत. आपले राष्ट्रभक्त व समाज सुधा
शुक्रवार, दि. २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १४६वी जयंती संपन्न झाली. त्यानिमित्ताने शाहू महाराजांच्या शिक्षण, समाजव्यवस्था, कृषी, जलसंपदा, उद्योगधंदे, कला, क्रीडा, अशा विविध क्षेत्रांतील सर्वंकष कार्याचा थोडक्यात परिचय करुन देणारा हा लेख...