Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही सदस्याने पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सर्वांत उंच पुतळ्याला भेट देण्याचे कष्टही घेतले नाहीत. यावरून काँग्रेसचे पटेलप्रेम किती खोटे आहे, तेच सिद्ध होते.
Read More
निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोठ्या तोर्यात बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना राहुल गांधीच्या मुखातून बाळासाहेबांविषयी दोन शब्द तरी बोलवून दाखवा, या दिलेल्या आव्हानाची पार्श्वभूमी त्याला होती. पण, नको तिथे धाडस केले की, अंगाशी येते अशी अवस्था प्रियांका गांधी यांची झाली आहे. बाळासाहेबांबाबत भाषणात बोलताना प्रियंका गांधी यांनी बाळासाहेब आणि काँग्रेस यांची विचारधारा भले भिन्न असेलही,
संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकारने महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदन हे विधेयक आणले आहे. या विधेयकावर आज संसदेत चर्चा सुरु आहे. याच चर्चेदरम्यान एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.
भारताच्या अमृतकाळातील पहिल्याच वर्षी संसदेच्या नव्या भवनातून जगातील सर्वात मोठी लोकशाही, असे बिरूद अभिमानाने मिरणार्या भारतीय लोकशाहीच्या कामाचा आज श्रीगणेशा होत आहे. त्यामुळे भारताच्या विकसित राष्ट्राच्या अमृतप्रवासाचे हे नवे संसद भवन साक्षीदार ठरेल, हे नि:संशय...
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे त्यांच्या वक्तव्यावरून भाजपच्या निशाण्यावर आहेत. आता भाजपचे प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधींच्या चीनबाबतच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. सुधांशू यांनी आरोप केला की, जेव्हा चिनी सैन्य उपासमारीने मरत होती, तेव्हा माजी पंतप्रधान नेहरूंनी तांदळाची रसद त्यांना पुरवली होती. त्यावर काँग्रेस काही का बोलत नाही?
अत्र्यांच्या लेखांचे संकलन ‘पत्रकार अत्रे’ (संपादिका शिरीष पै); ‘सिंहगर्जना’ (प्रकाशक ः परचुरे प्रकाशन) यातून झाले आहे; त्याबरोबरच अलीकडेच प्रकाशित झालेल्या बाबूराव कानडे यांच्या ‘काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्र’ या पुस्तकातून अत्र्यांच्या त्या जहाल लेखणीचा प्रत्यय येऊ शकतो. त्यांचाच आधार घेऊन अत्र्यांची वाटचाल काँग्रेसचे पाठीराखे ते काँग्रेसचे प्रखर विरोधक, अशी कशी झाली याचा आढावा घेता येऊ शकतो. आचार्य अत्र्यांच्या १२५व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या या कामगिरीचा वेध घेणे औचित्याचे ठरेल.
अविश्वास ठराव दाखल झाला, तेव्हाच तो संमत होणार नाही, हे स्पष्ट झालेले होते. ज्या मणिपूरवरून विरोधकांनी तो दाखल केला, त्या मणिपूरची वस्तुस्थिती मात्र यानिमित्ताने देशासमोर आली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे सरकार एकीकडे आणि केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून घराणेशाहीचे स्वार्थी राजकारण करणार्या विरोधकांचा चेहरा मात्र उघडा पडला.
प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होण्यासाठी दि. २६ जानेवारी, १९६३ रोजी तीन हजार स्वयंसेवक कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिले. संघाचे पथक संचलनात शेवटी होते. या पथकाचा क्रमांक आल्यावर संघाच्या घोषाच्या तालावर स्वयंसेवकांचे शानदार संचलन सुरू झाले. तेथे उपस्थित लष्करी अधिकार्यांनी आणि जनतेने संघाच्या अत्यंत शिस्तबद्ध पथकाचे कौतुक केले.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. वनवासी आणि त्यातही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून मार्गक्रमण करत सर्वोच्चपदी विराजमान झालेली स्त्रीशक्ती म्हणजे द्रौपदी मुर्मू. पण, आजपर्यंत ‘याची मुलगी, त्याची पत्नी’ यांनाच सत्तेवर बसवत घराणेशाहीचा डंका पिटणार्या लोकांना या स्त्रीशक्तीचा महिमा कसा कळणार? त्यांना आवडणारच नाही की, एक महिला स्वकर्तृत्वावर स्वतःचे यशस्वी नेतृत्व निर्माण करते.
स्वा. सावरकर आणि पं. नेहरु या दोघांच्याही तुलनेतला महत्त्वाचा भाग हा आहे की, हे दोघेही महापुरुष नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध टोकावर उभे होते. त्यांच्या जीवनातील काही समांतर गोष्टी समोरासमोर ठेवून ही तुलना जर केली तर एक वेगळेच चित्र आपल्यासमोर उभे राहाते.
मोदी सरकारने ऑगस्टमध्ये ‘कलम ३७०’ आणि ‘३५-ए’ हद्दपार केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच पंचायत पातळीवरील ‘ब्लॉक कौन्सिल’च्या निवडणुका संपन्न झाल्या. काश्मिरींचा निवडणुकांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, ही काश्मिरातील लोकशाहीतील दिवाळी पहाटच म्हणावी लागेल.
वास्तविक, मोदी सरकारने उचललेले पाऊल आपल्याला का उचलता आले नाही, याचा विचार करणे दूरच, उलट पावलोपावली आपल्या मूर्खपणाचे प्रदर्शन मांडून त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविला आहे. त्या प्रयत्नात आपल्या हातून देशाचे नुकसान होऊ शकते, पक्षाचे तर हसेच होऊ शकते, याचे भानही त्याला नाही. कशाला हा पक्ष आणि कसले हे त्या पक्षाचे नेते? नेते कसले अक्षरश: बाजारबुणगेच म्हणाना.
नेहरूंनी पंतप्रधानपदी आल्यानंतर भारतीय सैन्याची निर्मिती केलेली नाही. नेहरूंना वारसा मिळाला, तो ब्रिटिश सैन्याचा. उलट नेहरूंनी सैन्याच्या बळकटीकरणाकडे दुर्लक्ष करत खच्चीकरणालाच प्राधान्य दिले. सैन्यविघातक नेहरुनिती ही एवढ्यावरच थांबते, असे नाही, तर जवाहरलाल नेहरुंनी अजूनही बरेच कारनामे करुन ठेवले आहेत, ज्याची फळे आजही देश भोगतोच आहे.
गांधी, पटेल व नेहरू यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण वेगळी होती, त्यांचे स्वभाव वेगळे होते, त्यांच्या प्राथमिकता वेगळ्या होत्या. यापैकी प्रत्येकजण आपल्या प्रकृतीनुसार विचार करत होता व त्याचे भलेबुरे परिणाम देशाला भोगावे लागले. त्यांचे परस्पर संबंध हा एखाद्या शेक्सपिअरच्या प्रतिभेला स्पर्श करणारा विषय आहे. ते आपापल्या स्वभावानुसार जगत गेले आणि परिस्थितीला त्यानुसार वळण देण्याचा प्रयत्न केला.