( 35 new flights from Nashik from tomorrow ) नाशिक येथून बुधवार, दि. २ एप्रिल रोजीपासून तामिळनाडूतील कोइम्बतूरसाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे नाशिकहून देशातील या प्रमुख औद्योगिक शहरात अवघ्या चार तासांत पोहोचता येणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून दि. ३१ मार्च रोजीपासून देशातील ३५ प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू होणार आहे. यामध्ये तिरुपती, श्रीनगर, चंदीगढ, गुवाहाटी, कोइम्बतूर, कोलकाता, अयोध्या, दरभंगासह ३५ प्रमुख शहरांचा समावेश आहे. सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून ‘इंडिगो’ या हवाई कंपनी
Read More
(Beed District Jail) बीडच्या जिल्हा कारागृहात सोमवार दि. ३१ मार्चला वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि बबन गिते टोळीचा महादेव गिते एकमेकांना भिडल्याचे समोर आले. कारागृहात गिते आणि कराड समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर महादेव गितेसह आणखी चार जणांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले होते. तसेच आता मकोका मधील आठवले टोळीतील आरोपींची रवानगीही नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.
( nashik trimbakeshwar temple ) प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यानंतर 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने जोरदार तयारी सुरू केली असून, त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंदिराच्या विकासाला चालना मिळेल आणि भाविकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होतील.
( Nashik Municipal Corporation Urban Planning Department approves 1100 construction proposals ) महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने निर्णयांचा धडाका लावत दि. १६ मार्च ते दि. २६ मार्च या दहा दिवसांच्या कालावधीत तब्बल 1 हजार, 100 बांधकाम प्रस्तावांना ऑफलाईन मंजुरी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील १८१ बांग्लादेशींनी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेचा लाभ घेतल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुढे आणली होती. दरम्यान, आता या बांग्लादेशींविरोधात बुधवार, २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( Preparations for Garud Rath in Nashik are in the final stages ) गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेबरोबरच नाशिककरांसाठी श्रद्धा, जल्लोष आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळख असलेल्या ‘श्रीराम रथ’ आणि ‘गरुड रथा’च्या मिरवणूक उत्सवासाठी ‘श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळा’ची नुकतीच शौनकाश्रम, पंचवटी येथे बैठक पार पडली.
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर नाशिक कुंभमेळ्यासाठी कायदा तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, २३ मार्च रोजी दिली. त्यांनी २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रत्येक शहराला आपली स्वतःची ओळख असते. ही ओळख जपत ते शहर मार्गक्रमण करत आपल्यापाशी असलेला पुरातन अनमोल ठेवा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित करत असते. अशीच आपली पौराणिक आणि धार्मिक ओळख नाशिक शहराने जपली आहे. पेशवेकाळापासून सुरू झालेला रहाडींचा रंगोत्सव बदलत्या काळानुसार अधिक खुलत चालला असून येणारी नवीन पिढी अधिक जोमाने हा उत्सव साजरा करीत आहे. उपलब्ध कागदपत्रांवरून २० रहाडी असलेल्या नाशकात सध्या सात रहाडी अस्तित्वात आहेत. पुढील काळात सर्वच्या सर्व रहाडी खुल्या करुन नाशिकच्या या रंगोत्सवाला अधिक झळाळ
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या जबर तडाख्यांनी उबाठा गटाचे बुरुज एकामागून एक ढासळू लागले आहेत. या बुरुजांची डागडुजी करणे अजूनही उद्धव ठाकरे यांना शक्य झालेले नाही. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या कामाचा आवाका पाहून, ठाकरेंचा एक एक मोहरा एकनाथ शिंदेंकडे डेरेदाखल होत असून, ठाकरे आणि त्यांच्या विश्वप्रवक्त्यांना हताशपणे बघण्यावाचून दुसरा पर्यायच राहिलेला नाही. कोकणातून राजन साळवी यांनी ठाकरेंना रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. तिकडे छत्रपती संभाजीनगरमधूनही ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली आह
‘सशक्त आपुल्या राष्ट्रातें। करणें असल्या योग शिका॥’ हा मंत्र जपत योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झटणार्या नाशिकच्या स्वाती प्रमोद मुळे यांच्याविषयी...
भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. नाशिकमधील स्थानिक नागरिकांनी कृष्णा आंधळेला पाहिल्याचा दावा केला आहे.
'अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा किनारा तुला पामराला' आज १० मार्च, कोलंबसचे गर्वगीत गाणाऱ्या कुसुमाग्रजांचा आज स्मृतिदीन. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य विश्वात स्वताचा वेगळा ठसा उमटवला. विष्णु वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव. नाशिक जवळच्या शिरवाडे या गावात त्यांचा जन्म झाला. शब्दांच्या माध्यमातून सुवर्णकाळ उभं करणाऱ्या कुसुमाग्रजांना त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाने ओळख मिळवून दिली. ज्येष्ठ साहित्यीक विष्णु सखाराम खांडेकर अर्थात 'ययाति'कार खांडेकर यांनी विशाखा या क
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिकमधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी दि. २० मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकं
धार्मिक शहर म्हणून असलेल्या Nashik city ची ओळख मधल्या काळात, ‘वाईन कॅपिटल’ म्हणून करण्याचा प्रयत्न काही राजकारण्यांनी करून पाहिला. परंतु, दिवसागणिक त्यातील फोलपणा उघडा पडून, शेतकरी वर्गाला आर्थिक खाईत लोटण्याचाच हा प्रकार असल्याचे पुढे आले. त्यामुळे शेतकरी वर्गाने, वाईन उद्योगाकडे पाठ फिरवली ती कायमचीच. त्यामुळे नाशकातला वाईन उद्योग बाळसे धरण्याआधीच मातील रुतला, तो परत कधीच वर आला नाही. आता नावाला चार-दोन कंपन्या आपले अस्तित्व धरून आहेत. यातून आपल्या पुरातन संस्कृतीची जपणूक करून, त्यातूनच आपला विकास साधणे क
ज्यांच्या काव्यप्रतिभेने मराठी साहित्य उजळून निघाले असे विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज यांची जन्मभूमी असणारे शिरवाडे वणी हे गाव ' कवितांचे गाव ' म्हणून घोषित करण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव 'कवितांचे गाव' म्हणून घोषित करण्यात आले. भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी शालेय शिक्
मराठी भाषेला सातासमुद्रापार नेण्यास हातभार लावणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या नावाने त्यांच्या मूळ गावी शिरवाडे-वणी येथे कुसुमाग्रज महोत्सव होणार आहे. हा महोत्सव पुढील वर्षापासून सुरू करण्यात येणार असून तो दोन दिवस चालेल अशी घोषणा उद्योग तथा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली.
प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभाचा समारोप होत असून अनेकांना ओढ लागलीये ती नाशिक येथे येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची... #Prayagraj #Nashik #Trimbakeshwar #SinhasthaKumbhmela #News #Hindu #Sanatan #MahaMTB
विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना त्यांनी रक्तदानालाही तितकेच महत्त्व दिले. रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि सेवाकार्य मानणार्या नाशिकच्या भगवंता झिपरा राऊत यांच्याविषयी...
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या आणि सहा वेळा नगरसेविका राहिलेल्या माजी सभागृह नेत्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील महाराष्ट्र भवनात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही ४९३ घरे २० टक्के सर्वसमावेश योजनेतील असून या घरांच्या सोडतीची साठीच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस शुक्रवार दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता सुरुवात झाली.
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे पर्यटन विभागाकडून पहिल्यांदाच महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा महोत्सव असेल.
Employment-rich Nashik भारताला जगातील श्रेष्ठ अर्थव्यवस्था म्हणून प्रतिष्ठित करण्याचा उद्देश ‘स्वावलंबी भारत अभियाना’चा आहे. या अभियानाला नाशिकमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नाशिक जिल्हा उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आतापर्यंत 2 हजार, 500 तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करून सहकार्य करण्यात आले आहे. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया ‘स्वावलंबी भारत अभियान’ आणि अभियानाच्या नाशिक जिल्हा उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुरू असलेल्या कार्याबाबत...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (दि. २४ जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते मालेगावमध्ये विविध विकासकामांचे उद्धाटन करणार आहेत. तसेच ते गोरेगावमध्ये एका परिसंवादातही सहभागी होणार आहेत.
नाशिक जिल्ह्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातून महायुतीने महाविकास आघाडीला ( MVA ) धोबीपछाड दिल्यानंतर, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मविआची नौका किनार्याला लागण्यापूर्वीच बुडण्याच्या मार्गावर आहे. एक-एक करुन मविआतील तिन्ही घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत असून, उबाठा आणि काँग्रेसला चांगलीच गळती लागली आहे. ज्यांची पूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली, अशा उत्तम कांबळे यांचा मुलगा जॉय कांबळे यांनी नुकताच काँग्रेसचा ‘हात’ सोडत, हाती शिवबंधन बांधले. त्यांच्या पाठोपाठ ३० व
नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपला मिेळेल, असा विश्वास महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २१ जानेवारी रोजी व्यक्त केला. मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काश्मीर ते कन्याकुमारी हे ४ हजार, ११२ किमीचे अंतर अवघ्या ४४ दिवस, १७ तास, १५ मिनिटांत पूर्ण करुन, विश्वविक्रमाला साद घालणार्या शेतकरीपुत्र वैभव शिंदे याच्याविषयी... ( Tamaswadi Express )
पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. शुक्रवार, १७ जानेवारी रोजी सकाळी ही घटना घडली असून यात ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
देशातील सर्वांत मोठे बंदर वाढवणमध्ये उभारण्यात येणार आहे. या बंदराशी राज्यातील अधिकाधिक जिल्हे जोडण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे नियोजन सुरूये. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईनंतर नाशिक हे महाराष्ट्राचे तिसरे औद्योगिक केंद्र आहे. नाशिक शहराचे मुख्य औद्योगिक शहर मुंबई आणि पुणे पासून केवळ २०० किमी अंतरावर आहे. नाशिकमध्ये अनेक सरकारी कंपन्या तसेच उपक्रम आहेत.
५५ कोटी रुपयांचे कथित जमीन हस्तांतरण प्रकरण अंगलट आल्यानंतर, वैद्यकीय रजेवर गेलेल्या नाशिक मनपाचे ( Nashik Municipal Corporation ) तत्कालीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या जागी राज्य शासनाने त्यांचे उत्तराधिकारी म्हणून राहुल कर्डीले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. परंतु, एका दिवसातच हा निर्णय फिरवत ‘एनएमआरडीए’च्या मनीषा खत्री यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली. खत्री यांनी पदभार हाती घेतल्यापासूनच, रोज काही ना काही घडामोडी घडत आहेत. पहिल्या दिवसापासूनच ‘अॅक्शन मोड’वर आलेल्या खत्री, रोज नवीन निर्णय
नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! ८ जणांचा मृत्यू
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचे माहेरघर म्हणून नावारुपाला येत असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील शेती चांगलीच बहरली आहे. आंबट गोड चवीची फळे काढणी योग्य झाली असून, त्यांच्या रंगाने संपूर्ण परिसर गुलाबी आणि लालेलाल झाल्याचे नजरेस पडत आहे. वाढत्या थंडीबरोबर जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचा हंगाम चांगलाच बहरला आहे. शरीरासाठी आरोग्यदायक लालचुटूक स्ट्रॉबेरीची सप्तशृंगगड, वणी आणि सापुतार्याच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी शेतकर्यांकडून विक्री केली जात आहे. दुर्गम भाग असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्याच्या घाटमाथ्यावर
Ramkal Path केंद्र शासनाकडून १०० कोटी रुपये, तर उरलेला ४८ कोटी रुपयांचा निधी राज्य शासन आणि नाशिक मनपाच्या माध्यमातून उभारला जाईल. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर खर्या अर्थाने नाशिकची पौराणिक ओळख अधिक दृढ होणार आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिर, रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीता गुंफा येथे देश विदेशातून शेकडो पर्यटक दररोज या भागाला भेट देत असतात. त्यांना प्रभू श्रीराम यांचा सहवास ‘रामकाळ पथ’ हा प्रकल्प सत्यात उतरल्यानंतर खर्या अर्थाने मिळणार आहे.
नाशिक : ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ अशा घोषणांनी नाशिकचा ( Nashikkar ) आसमंत दणाणून सोडत हिंदू एकवटल्याचे दिसून आले. निमित्त होते बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील अत्याचाराविरुद्ध काढण्यात आलेल्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रा अर्थात मोर्चाचे. मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी सकाळी शहरातील सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी आणि मानवाधिकार आयोगाला आपले कर्तव्य समजावून सांगण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
नाशिक : दोन दिवसांच्या बेमोसमी पावसामुळे शहरातून गायब झालेली थंडी पुन्हा जाणवायला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये ( Nashik ) गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, वातावरणात चांगलाच गारवा वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून नाशिकचा पारा सारखा खाली सरकत असल्याचे दिसून येत आहे. रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी १२.५ अंश असलेले तापमान सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी ३ अंशांनी घसरुन ९.५ अंशांवर आले. तर मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी पारा आणखी खालावत ९.४ अंशावर पोहोचला.
Hindu Shaurya Diwas महाराष्ट्रातील नाशिक येथील पोलिसांनी शनिवारी ७ डिसेंबर २०२४ रोजी मीझान शेख, आयान शेख, आयेश शाह, शारिक शाह आणि फहीम शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू शौर्य दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी राम जन्मभूमी आयोध्या येथे उभा असलेला बाबरी ढाचा पाडण्यात आला होता. त्यामुळे हिंदू शौर्य दिनानिमित्त इंस्टाग्राम पोस्टवर स्टोरी शेअर करण्यात आली होती. त्यावेळी काही कट्टरपंथींनी संबंधित युवकावर हल्ला केला आहे.
नाशिक : दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्र सेविका समिती, नाशिकचे सघोष पथसंचलन ( Path Sanchalan ) होणार आहे. रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी नाशिकरोड परिसरात सेविकांचे पथसंचलन होणार आहे.
मालेगाव वोट जिहाद प्रकरणी नाशिक मर्चंट को. ऑप. बँकेचे व्यवस्थापक आणि सहव्यवस्थापकांना अटक करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. मालेगावमधील बँकेत २५० कोटींचा बेनामी आर्थिक व्यवहार झाला असून यातील १२० कोटी रुपयांचा वोट जिहादसाठी वापर करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर आता याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा नेत्रदिपक व्हावा, यासाठी मोदी सरकारकडून ( Modi Govt ) आश्वासक पावले उचलण्यात आली असून, प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमधील गोदाघाट परिसरात राम काल पथ उभारणीला आर्थिक पाठबळ दिले आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून नुकतेच सुमारे १०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ’एक्स’ हॅण्डलवर पोस्ट करत याबाबतची घोषणा करण्यात आली. गोदाघाट परिसरात होणार्या या प्रकल्पासाठी महापालिकेकडून सुरुवातीला ३०४ क
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) ताफ्यात लवकरच लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. या बस आगामी काळात नाशिक किंवा मुंबई मार्गावर धावण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत ५ डिझेल बसेसचे एलएनजी बसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळेच नाशिक आणि मुंबईतील पुरवठादारांकडून कोटेशन मागवण्यात आले आहे.
नाशिक : यंदा नाशिक जिल्ह्यावर वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी दाखवल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच पुढील वर्षभराचा शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे. त्याचप्रमाणे शेतात असलेल्या विहिरी आणि बोअरवेललादेखील मुबलक पाणी ( Water ) असल्याने जिल्ह्यातील शेती वर्षभर बहरणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान मागील वर्षी अचानक पावसाने ओढ दिल्याने धरणांमध्ये जलसाठा उपलब्ध झाला असला, तरीही विहिरींनी तळ गाठल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला
नाशिक : ( Nashik ) लहान बालकांना होणारे जंताचे आजार नष्ट करण्यासाठी महानगरपालिकेकडून विशेष मोहीम राबविण्यासाठी हालचाल सुरु करण्यात आली आहे. बुधवार, दि. ४ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ आणि दि. १० डिसेंबर रोजी ‘मॉप अप दिना’निमित्त विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
नाशिक : महानगर परिवहन मंडळाकडून दिव्यांगांना देण्यात येणार्या मोफत पासचे ( Free Pass ) नूतनीकरण रविवार, दि. १५ डिसेंबर रोजीपासून करावे लागणार आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत राहणार्या दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवास करता यावा यासाठी मोफत दिव्यांग कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नाशिक : दुचाकी वेगाने चालविणार्या चालकास हटकल्याचा राग येऊन कामगारनगर येथील काळेनगर भागात राहणार्या माजी नगरसेविका योगिता आहेर ( Yogita Aher ) यांच्या घरावर टोळक्याने दगडफेक केली. तसेच क्षुल्लक कारणावरून वाद घालत बुधवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी आहेर यांच्यासह त्यांचा मुलगा व भावाला मारहाण केल्याचीदेखील घटना घडली. आहेर यांच्या घरासमोरील रस्त्यावरून दुचाकीस्वार संशयित करण कटारे (२२, रा. संत कबीरनगर) वेगात दुचाकी चालवत होता. यावेळी आहेर यांनी त्याला हटकले व गाडी हळू चालवण्यास सांगितले. त्याचा या दुचाकीस्वाराला
नाशिक : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ( MVA ) मिळालेला अल्पसा आनंद अवघ्या सहा महिन्यांतच महायुतीने हिरावून घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत मविआच्या विजयी भ्रमाचा भोपळा फोडत जिल्ह्यात महायुतीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी १४ जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला जिल्ह्यात नावालाही शिल्लक ठेवले नाही. यात भाजपला पाच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सात, शिवसेनेला (शिंदे) दोन जागी विजय मिळाला. तर एमआयएमच्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी अपक्ष उमेदवार आसिफ
नाशिक ( Nashik ) : नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर आता नाशिक जिल्ह्यात भाजप-महायुती एकहाती सत्तेवर आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच वाढला आहे. त्यात नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघापैकी तीन ठिकाणी भाजपचा तर एका जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आमदार मोठ्या फरकाने निवडून आला आहे. त्यामुळे येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजपचाच विजय होण्याची शक्यता वर्तविण्यास सुरुवात झाली आहे.
नाशिक : संपूर्ण नाशिक ( Nashik ) जिल्ह्यातून महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारत हद्दपार करण्याचे काम केले आहे. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ झालेला सामना महायुतीने १५ पैकी १४ जागा असा जिंकला आहेत. तर मालेगाव मध्य या एका जागेवर एमआयएमने अपक्ष उमेदवाराचा पराभव करत ७५ मतांनी निसटता विजय मिळवला. शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांवरून नाशिक जिल्हा भगवामय झाल्याचे दिसून आले. दरम्यान, शेतकरीबहुल असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा देताना वीजबिल माफ केले. तसेच लोकसभेला
कला, संस्कृती, क्रीडा या क्षेत्रात काहीतरी वेगळे करायचे या भावनेतून नाशिकमधील समविचारी लोकांनी एकत्र येत २०१८ साली आयाम, नाशिकची स्थापना केली. आयाम नाशिकच्या माध्यमातून आजपर्यंत विविध विषयांवर कार्यक्रम झाले. ज्याचे मूळ कायम भारतीयत्व, भारतीय संस्कृती, आपला इतिहास असेच होते. माध्यम अनेक असले तरीही राष्ट्रप्रथम हे एकमेव सूत्र. पुढील महिन्यात ‘गोदावरी संवाद’ ( Godavari Sanvad ) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत आयामच्या विविध उपक्रमांसह ‘गोदावरी संवाद’ कार्यक्रमाविषयीची माहित