मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. स्वच्छता, यंत्रसामुग्री, गाळवहन आणि गाळ टाकण्यासाठी मोठमोठ्या निविदा काढल्या जातात. प्रत्यक्षात ही नदी कायम गाळाने भरलेली, दुर्गंधीयुक्त आणि धोकादायक स्वरूपात दिसते. यामागचे गौडबंगाल जाणून घेण्यासाठी ‘एसआयटी’ने खोलवर तपास केला असता, ‘न उपसलेल्या गाळा’ची थक्क करणारी कहाणी समोर आली. कोट्यवधींच्या कामाची फसवी आकडेवारी सादर करून लुटमार करण्यात आली.
Read More
अग्निशमन दलामध्ये सध्या वापरात असलेल्या ६४मीटर शिडीपेक्षा अवघ्या एक मजल्या एवढ्या वाढीव ६८ मीटर शिडीसाठी अग्निशमन दलाने एका कंपनीवर तब्बल ४० कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट घातला आहे. हे प्रकरण गंभीर असून या खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी शुक्रवार, दि. २३ मे रोजी केली. यासंदर्भात त्यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांना पत्र लिहिले आहे.
कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जवाटप योजनेच्या नावाखाली व्याज परताव्यासाठी लागणारे प्रमाणपत्र (एलओआय) लवकरात लवकर देण्याचे आमिष दाखवून लाभार्थ्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा भामट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवार, दि. २२ मे रोजी दिली.
सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार करण्याची सवय वाढली असली तरी त्यात धोकेही वाढले आहेत. नागरिकांनी त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहीजेत,असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
(Mehul Choksi Arrested) पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या विनंतीवरून शनिवारी १२ एप्रिलला बेल्जियममध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. हिऱ्यांचा व्यापारी असणारा मेहुल चोक्सी कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. पंजाब नॅशनल बँकेत१३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे.
(Karnataka MGNREGA Fraud) कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील मल्हार गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) फसवणुकीची घटना समोर आली आहे. माहितीनुसार, मनरेगा योजनेअंतर्गत मजुरी मिळविण्यासाठी काही पुरुषांनी साड्या परिधान करुन महिला असल्याचे भासवून बनावट फोटो सादर केले होते.
( Chief Minister Devendra Fadanvis on RERA fraud case ) ‘रेरा’ फसवणूक प्रकरणी त्या ६५ बांधकामांमधील एकाही रहिवाशांला बेघर होऊ देणार नाही. खोटे कागदपत्रे सादर करून संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांना फसवले आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांना तुरुंगात पाठविल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकार नागरिकांच्या पाठीशी असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २६ मार्च रोजी अधिवेशनात जाहीर केले.
गेल्या काही वर्षांत वाढलेल्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक म्हणावी लागेल. म्हणूनच नागरिकांनी सायबर गुन्ह्यांची तत्काळ तक्रार करावी, यासाठी हेल्पलाईन क्रमांक, हेल्पलाईन संकेतस्थळ अशी व्यवस्थादेखील सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकार, रिझर्व्ह बँकेसह अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्तींद्वारेही या गुन्ह्यांबाबत जागरुकता वाढविण्याची मोहीम राबवली जात आहे. तरीही फसवणूक होणार्यांचे प्रमाण आणि अशा गुन्ह्यांमधील रक्कम यांचे प्रमाण मोठे आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगणे हाच यावरील प्रभावी
(Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या पाच मिनिटांमध्ये बनावट हुबेहुब कागदपत्रं तयार करुन मिळत असल्याचे समोर आले आहे. नंदुरबारमधील तळोदा आणि धडगाव या शहरांत १०० रुपयांमध्ये जातीचा दाखला तसेच उत्पन्नाचा दाखला बनवून दिला जात आहे. या भागात बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे.
प्रसिद्ध रिॲलिटी शो 'व्हू वॉन्ट्स टू बी अ मिलेनीयर' मध्ये स्पर्धक चार्ल्स इंग्रॅमने ९ सप्टेंबर २००१ मध्ये सहभाग घेतला. फास्टेस्ट फिंगर फस्ट ची पहिली फेरी जिंकून हॉट सीट वर बसला. इंग्रॅमने शोमध्ये एक मिलियन पौंड जिंकले असले तरी निर्मात्यांना लगेचच काहीतरी संशयास्पद वाटले.
‘टोरेस’ कंपनीच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय ठरल्या. अनेकांनी यात सरकारला दुषणेही दिली. पण, अशा घोटाळेबाज कंपन्यांना चाप कसा बसेल? अशा अन्य कंपन्यांवर काही कारवाई होणार नाही का? सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असतानाही गुंतवणूकदार अशा प्रलोभनांना ग्राहक बळी का पडतात? घोटाळेबाजांना चाप कसा बसणार? याचे हे आकलन.
(Torres Company Fraud) करोडो रुपये घेऊन मुंबईतील टोरेस कंपनीचा मालक फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोरेस कंपनीचा मालक गुंतवणूकदारांचे सगळे पैसे घेऊन पसार झाल्याचे समजते आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना ५०० कोटींचा गंडा घालत पोबारा केला आहे. त्यामुळे या कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना दर आठवड्याला १० टक्के व्याजाने पैसे परत करण्याची हमी देण्यात आली होती. कंपनीने अश्या स्वरुपाची अनेक आमिष
(AAP) दिल्लीतील आप सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. दिल्ली सरकारने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देत या योजना अद्याप अधिसूचित नाही, त्यामुळे कोणालाही आपली कागदपत्रे देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. तसेच दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागानेही यासंदर्भात सूचनापत्र जारी केले आहे.
एनएसई (National Stock Exchange) यांनी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करताना सावधानतेचा इशारा दिला आहे. एनएसईने इन्स्टाग्राम, टेलिग्राम या चॅनेलवर काही गुंतवणूकीसाठी टिप्स दिल्या जात असल्याचे गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर गुंतवणूकदारांना अशा कुठल्याही टिप्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या काही वर्षांत जितकी प्रगती होत आहेत तितक्याच प्रमाणात सायबर हल्ले व सायबर फसवणूक, गुन्हे, गैरप्रकार वाढले आहेत. ते नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने नवीन पाऊले उचलली आहेत. यामध्ये सरकारने हॅकर्स पासून वाचवण्यासाठी 'डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म' ची निर्मिती करण्यासाठी ठरवले आहे.
खतरनाक ! सायबर क्राईम व टेलिकॉम क्षेत्रातील ऑनलाईन घोटाळे, अथवा गैरवापर रोखण्यासाठी टेलिकॉम बँक ऑपरेटरने १.८ दशलक्ष सिमकार्ड ब्लॉक करण्याचे ठरवले आहे. तसा रिपोर्ट प्रसारमाध्यमांनी दिला असून घोटाळेबाजांसाठी हा मोठा धक्का ठरणार आहे. यावर नियामक मंडळाने कडक कारवाई करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. गेले काही दिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नियामक मंडळांनी या सिमकार्डवर लक्ष ठेवले होते.
सरकारने सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी मोठी मोहिम उघडली आहे त्याच प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून येत आहे. अशीच मोठी कारवाई करत सरकारने टेलिकॉम कंपन्यांना सायबर क्राईममध्ये वापरले गेलेले मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यास सांगितले आहे.याशिवाय कुठल्याही सायबर क्राईम अथवा यांच्याशी संबंधित असलेल्या मोबाईल नंबरवर बंदी घालण्यास सरकारने सांगितले आहे .
महिंद्रा फायनान्सने कंपनीत १५० कोटींचा घोटाळा झाल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. कंपनीच्या वाहन कर्ज विभागातील एका शाखेत घोटाळा झालेला आहे. यामुळे कंपनीने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल पुढे ढकलले आहेत. मंगळवारी कंपनीचे तिमाही निकाल अपेक्षित होते मात्र रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटल्याप्रमाणे ईशान्य पूर्व भागातील एका शाखेत हा घोटाळा उघडकीस आला आहे.
गंभीर फसवणूक तपास कार्यालयांतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गंभीर फसवणूक तपास कार्यालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळणार आहे.
अंधेरी पोलिसांनी हरियाणातून दोन आरोपींना सुमारे दोन लाख रुपयांच्या वीजबिलाच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. हा प्रकार साधारणत: फेब्रुवारी महिन्यातील आहे. यावेळी तक्रारदाराला त्याच्या फोनवर संपर्क साधण्यात आला होता आणि बिल न भरल्यास त्याच्या घराचे वीज कनेक्शन तोडले जाईल असे सांगण्यात आले होते.
नवरात्री उत्सवादरम्यान मुंबईत प्रसिद्ध दांडिया आणि गरबा क्वीन फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाईट’चे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. उत्सवाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आणि लाइव्ह म्युझिक गरबा खेळण्यासाठी रसिक मोठ्या संख्येने पास खरेदी करतात. दरम्यान, पासेसच्या नावाखाली मुंबईतील बोरिवली परिसरात तब्बल १५६ तरुणांची लुट केल्याची माहिती समोर आली आहे.
बँकांसंदर्भातील डिजिटल व्यवहार वाढत असल्यामुळे रोखीने व्यवहार करणे कमी होत आहे. तसेच, डिजिटल व्यवहारांकरिता बँकांकडून ग्राहकांना नवनवीन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून दिली जातात. त्यात संबंधित बँकेचे अॅप असेल किंवा डिजिटल पेमेंट असतील या माध्यमातून व्यवहार होतात. परंतु, या व्यवहारात फ्रॉड होण्याची शक्यतादेखील असते.
आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर एकाकी पडलेल्या ठाण्यातील एका मराठी तरुणाची कंपनी बनावट दस्ताऐवज व स्वाक्षऱ्या करून हडपण्याचा दोघा व्यापाऱ्यांचा डाव फसला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर नौपाडा पोलिसांनी तब्बल २३ दिवसांनी व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
' टाईम्स ऑफ इंडिया ' ला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अदानी यांच्यावरील 'Stock Manipulation' वर आधारित गुप्त अहवाल ईडीने सेबीकडे सुपूर्त केला आहे. त्यातील माहितीनुसार, फॉरेन पोर्टफोलिओ इनव्हेसटर्स (FPI's) सगट खाजगी क्षेत्रातील भारतीय बँकांच्या संशयास्पद व्यवहाराप्रकरणी हा रिपोर्ट असल्याचे समजते आहे. टाईम्स ऑफ इंडियाचा बातमीनुसार या १५ ते १६ संस्थांशी निगडित व्यवहारांचा लेखाजोखा सेबीकडे पाठवण्यात आला. ईडीकडे PMLA ( Prevention of Money Laundering) या गुन्ह्याखाली कारवाई करण्याचा अधिकार नसला तरी अनैतिक
‘फिनटेक’ कंपन्या आधुनिक ‘डिजिटल’ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच या ‘फिनटेक’ कंपन्या कशाप्रकारे घोटाळेबाजांच्या पुढे राहत आहेत आणि गुंतवणूकदारांना सक्षम करत आहेत, याबद्दल आजच्या लेखात माहिती करुन घेऊया.
आयकर परतावा भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. यावेळी ६ कोटींहून अधिक लोकांनी आयकर परतावा भरला आहे. आयटीआर फाइल केल्यानंतर, करदाते त्यांच्या आयटीआर फाइलवर प्रक्रिया होण्याची आणि परतावा मिळण्याची प्रतीक्षा करतात
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आता सायबर फसवणूक होत आहे. AI वरून मित्र आणि नातेवाईकांचा आवाज बदलून, सायबर घोटाळेबाज फोन करून फसवणूक करत आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे कोणी नातेवाईक म्हणून फोन करून मदतीच्या नावाखाली पैसे मागितले तर सावधान. यूपी सायबर क्राईम आता अलीकडच्या काही महिन्यांत नोंदवल्या गेलेल्या व्हॉईस कॉल फसवणुकीत AI चा वापर करत असल्याचे सांगितले आहे. AI च्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीबाबत एक सल्लाही जारी करण्यात आला आहे.
समाजमाध्यमात ‘फॉलोअर्स’च्या अमिषाचा बळी!
अवघ्या दोन महिन्याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नागपुरात अल्पसंख्यांक समाजाचा तरुण चेहरा म्हणून ज्या 'गुलाम अश्रफी'ने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
महिला गृहउद्योगाच्या नावाखाली राज्यभरातील हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक झाली असून या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी करावी व या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अजित हिवरे याला तातडीने अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्याक्ष आ. संजय कुटे यांनी गुरुवारी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मनी लाँडरींग प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे.
“ विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असे ‘शिपयार्ड घोटाळ्या’विषयी बोलले जात आहे.
मोबाईल, संगणकाचा वापर करुन ऑनलाईन बँकिंग व्यवहार ही आता नित्याची बाब झाली असली तरी असे डिजिटल व्यवहार करताना फसवणुकीचे प्रमाणही वाढलेले दिसते. त्यामुळे वारंवार ग्राहकांना विविध माध्यमातून यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येते. तेव्हा, आज ‘भारतीय ग्राहक दिना’निमित्त ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाच्या छोट्या-मोठ्या खबरदारीच्या उपाययोजनांविषयी... banking fraud
आजच्या डिजिटल युगात आपले बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन पार पडतात. पण, हल्ली या ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रमाणही तितकेच वाढलेले दिसते. तेव्हा, या सायबर गुन्ह्यांपासून एकूणच सावध कसे राहायचे, नेमकी काय खबरदारी घ्यायची, यासंबंधीची माहिती आजपासून दर रविवारी आपण ‘सायबर सुरक्षा’ या नवीन लेखमालिकेतून वाचकांसमोर मांडणार आहोत. आज या लेखमालिकेच्या पहिल्या भागात जाणून घेऊया 'फिशिंग’विषयी...
औषधे आणि जादूचे उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) या कायद्याअंतर्गत बदल करण्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने प्रस्तावित केले आहे.
सायरस मिस्त्रींच्या गच्छंतीवर ‘कोप-अपशकुन’ अशा देवभोळ्या संज्ञांचा आधार घेणार्या पुरोगामी (?) संपादकांनी/वृत्तपत्रांनी अपिलात, टाटांच्या विरोधात निर्णय आल्यावर मात्र न्यायप्राधिकरणाच्या विवेकावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वस्तुनिष्ठ माहितीकडे दुर्लक्ष करणारे चालक लाभलेले ‘टाटायान’ सफरीसाठी उपलब्ध असताना निकालाच्या योग्य अन्वयार्थाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
वैधानिक दृष्टीकोनातून समाजाचे मुल्यांकन करताना,‘अनिवार्य कायद्यां’च्या अंमलबजावणीचे प्रमाण, हा निकष विचारातघेतला पाहिजे. कारण ‘फौजदारी कायदे’ काय करू नये हे बजावणारे; तर ‘अनिवार्य कायदे’ कसे वागावे, हे सुचविणारे असतात.
देशातील कोट्यवधींचा गैरव्यवहार करून एंटीगुआ येथे राहत असलेला हिरेव्यापारी मेहुल चोक्सी याच्या प्रत्यार्पणात भारताला मोठे यश मिळाले आहे. एंटीगुआ येथील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहीतीनुसार, तेथील पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी चोक्सीचे नागरीकत्व रद्द करण्याला संमती दर्शवली आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बिग बाझारसारख्या एका नावाजलेल्या ब्रँडमध्ये अशी अफरातफर होणे ही अतिशय धक्कादायक बाब आहे. बिग बाजार या कंपनीचा देखील एक व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो जरूर बघा
सरकारी बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून इंग्लंडमध्ये फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात विजय माल्या याने दाखल केलेली याचिका इंग्लंडमधील न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
प्रसिद्ध हिरेव्यापारी नीरव मोदी यांनी पीएनबी बॅंकेत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी त्याला बुधवारी अटक करम्यात आली आहे.
तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केले असल्याचा एक बोगस मॅसेज सध्या सगळीकडे फिरत आहे. अशा आशयाचा एसएमएस मोबाईलवर अनेकांना येत आहे.
'आरबीआय'ची मोबाईल वॉलेट्ससाठी नवी नियमावली
‘गो फंड मी’ या संस्थेच्या नावाखाली मॅकक्लर, तिचा प्रियकर डी. एमिको आणि जॉनी बॉब्बीट ही तीन पात्रे मिळूनच हा सापळा रचतात आणि त्यात फसले सुमारे १४ हजार कोटी नेटकरी.
तुम्हालाही आलाय ‘ब्लॅक फ्रायडे सेल’ किंवा ब्लॅक ‘फ्रायडे कॉन्टेस्ट’ असा मेसेज आला आहे तर वेळीच सावध व्हा.
‘मैत्रेय समूहा’कडून ठेवीदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी राज्यात ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हल्लीचे दरोडेखोर संगणकाच्या माध्यमातून नवनवीन प्रकारे लूट करत आहेत. त्यासाठी त्यांनी बँकेमध्ये जाणे गरजेचे नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार चंद्री पेपर आणि अलायन्स प्रॉडक्ट प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला आहे.
पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी सीबीआय ने काल १ मार्च रोजी निवृत्त मुख्य लेखापरीक्षक बिष्णूब्रत मिश्रा याला अटक केली
राजेश जिंदाल असे त्याचे नाव असून, २००९ ते २०११ या दरम्यान पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रेडी हाउस या शाखेचा मुख्य व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता.