फ्लेमिंगोंचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी विधानसभेत केली. “ही समिती कांदळवनांच्या जमिनीवरील अतिक्रमण शोधण्याचे कामही करेल,” असे त्यांनी नमूद केले. नवी मुंबईतील नेरुळच्या डीपीएस तलावाजवळ काही फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याचा मुद्दा आ. चेतन तुपे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला.
Read More
घाटकोपर पूर्वेकडे विमानाच्या धडकेत जवळपास ३५ रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली (flamingo bird strike). वन विभागाने फ्लेमिंगोचे मृतदेह ताब्यात घेतले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे (flamingo bird strike). प्रसंगी या घटनेसाठी कारणीभूत असलेले विमान काल रात्री मुंबई विमानतळावर उतरवल्याची माहिती मिळत आहे. (flamingo bird strike)
'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) 'जीपीएस टॅग’ केलेला एक रोहित (फ्लेमिंगो) पक्षी 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’च्या निवार्यास आला आहे (flamingo migration). 'मकॅन’ नावाचा हा रोहित पक्षी टॅग केल्यापासून गुजरात ते ठाणे खाडी असा प्रवास करत असून गेली दोन वर्षे तो अटल सेतू परिसरात स्थलांतर करत आहे (flamingo migration). 'जीपीएस टॅग’मुळे त्याच्या या संपूर्ण प्रवासाचा उलगडा झाला आहे. ( flamingo migration )
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातील पक्ष्यांचे भारतात तसेच मध्य आशियात स्थलांतर सुरू आहे. मात्र, हवामान आणि वातावरण बदलांमुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावर कोणते परिणाम आणि बदल झाले आहेत या विषयावर सदर परिषदेत चर्चा झाली.
मुंबई-नवी मुंबई दरम्यानचा प्रवास वेगवान करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे बांधकाम पुर्ण होत आले आहे. मुंबई ट्रान्सहर्बर लिंक रोड लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. तसेच या सागरी सेतूचे अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू असे नामाकरण करण्यात येणारेयं. मुंबई ट्रान्सहर्बर सागरी सेतू हा देशातील सगळ्यात लांब मार्ग अशी ओळख असलेल्या आणि सुमारे २१. ८० किमी लांबीचा हा सागरी सेतू मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान वाहतुकीसाठी वेगवान पर्याय ठरणारेय. आतापर्यत या प्रकल्पाचे ९७ टक्क्यांहून अधिक काम पुर्
गेल्या तीन महिन्यांपासून आलेले पाहुणे पक्षी भारतातील विविध भागांत मुक्कामी होते. यंदा काहीसे उशिरा आलेले हे पाहुणे मात्र लवकर परतू लागले आहेत. अचानक वाढलेल्या तापमानामुळे पाहुण्या पक्ष्यांनी आवराआवर सुरू केली असून घरात आलेला पाहुणा जाताना यजमान ज्याप्रमाणे भावूक होत असतो, तशीच अवस्था पक्षिप्रेमींची झाली आहे. पक्षीनिरीक्षकही हिरमुसले आहेत. त्याविषयी...
जूनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व संरक्षित जंगलांच्या सीमेपासून किमान 1 किमीचा इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) असावा, असा आदेश जारी केला होता. मात्र हा आदेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याला लागू होणार नाही असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी दिले. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दाखल केलेल्या अंतरिम स्पष्टीकरण अर्जानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे.
ठाणे खाडी परिसरातील भांडूप पंपिंग स्टेशनमध्ये या वर्षी दि. ३१ जानेवारी रोजी टॅग केलेला ग्रेटर फ्लेमिंगो 'मॅककॅन' दि. १५ जुलैला गुजरातच्या भावनगर येथे पोहोचला आहे. तब्बल १५ तास सलग प्रवास करत या पक्ष्याने ३०० किमीचे अंतर काटले आहे. एप्रिल महिन्यात 'ग्रेटर' आणि 'लेसर' फ्लेमिंगोंचे जीपीएस टॅगगिंग करण्यात आले होते. हे सर्व फ्लेमिंगो बेलापूर जवळच्या 'ट्रेनिंग शिप चाणक्य' आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत होते. नंतर या सहा फ्लेमिंगोंपैकी 'हुमायून' दि. ३० जून रोजी भावनगरला पोहोचला, तर सालीम दि. ७ रोजी, आणि आता मॅक
नवी मुंबईमध्ये या वर्षी दि. १९ एप्रिल रोजी टॅग केलेला लेसर फ्लेमिंगो 'सलीम' दि. ७ जुलैला गुजरातच्या भावनगर येथे पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात 'ग्रेटर' आणि 'लेसर' फ्लेमिंगोंचे जीपीएस टॅगगिंग करण्यात आले होते. हे सर्व फ्लेमिंगो बेलापूर जवळच्या 'ट्रेनिंग शिप चाणक्य' आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत होते. नंतर या सहा फ्लेमिंगोंपैकी 'हुमायून' दि. ३० जून रोजी भावनगरला पोहोचला, त्यानंतर आता दि. ७ जुलैला सलीम देखील पोहोचला आहे.
नवी मुंबईमध्ये या वर्षी दि. १९ एप्रिल रोजी टॅग केलेला लेसर फ्लेमिंगो 'हुमायून' गुजरातच्या भावनगर येथे पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात 'ग्रेटर' आणि 'लेसर' फ्लेमिंगोंचे जीपीएस टॅगगिंग करण्यात आले होते. बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी भरतीच्या ठिकाणी जाऊन सहा फ्लेमिंगोना रेडिओ टॅग केले. हे सर्व फ्लेमिंगो बेलापूर जवळच्या 'ट्रेनिंग शिप चाणक्य' आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत होते. नंतर या सहा फ्लेमिंगोंपैकी 'हुमायून' दि. ३० जून रोजी भावनगरला पोहोचला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) सोमवारी दि. १३ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला '(एमआयडीसी') ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात (टीसीएफएस) सांडपाणी गळती झाल्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावली आहे. आणि तातडीची पावले न उचलल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. गळती प्लग करण्यासाठी.
मुंबईत प्रथमच 'ग्रेटर' आणि 'लेसर' फ्लेमिंगोंचे जीपीएस टॅगगिंग करण्यात आले आहे. बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी भरतीच्या ठिकाणी जाऊन सहा फ्लेमिंगोना रेडिओ टॅग केले आहे. सध्या, हे सर्व फ्लेमिंगो बेलापूर जवळच्या 'ट्रेनिंग शिप चाणक्य' आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत आहेत.
मुंबई महानगरातील पाणथळींवरुन ७१ हजार ग्रेटर फ्लेमिंगो पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) गेल्या चार वर्षांमध्ये केलेली ही ग्रेटर फ्लेमिंगो पक्ष्यांची सर्वाधिक नोंद ठरली आहे.
'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'च्या 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रा'ला (इएसझेड) केंद्र सरकारने अंतिम मंजूरी दिली आहे. ४८.३०५ चौ.किमी विस्तार असलेल्या या अभयारण्याचे इएसझेड क्षेत्राची अंतिम अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध झाली. या अधिसूचनेमुळे रखडलेल्या बांधकामांना दिलासा मिळाला आहे.
मागील भागात मुंबईतील काही गृहनिर्माण प्रकल्पांचा आपण आढावा घेतला होता. आज मुंबईच्या विकासाला गतिमान करणार्या अशाच दोन प्रकल्पांची आपण सविस्तर माहिती करुन घेऊया.
मुंबईच्या खाडीलगत असणारा दलदलीचा परिसर हा स्थलांतरित पक्ष्यांना पोषक खाद्य पुरविण्याकरिता समृद्ध आहे. दलदलीच्या परिसरात लहान मासे, नील आणि हरित शैवाळ, जलकीटकांच्या अळ्या, एकपेशी वनस्पती हे खाद्य विपुल प्रमाणात मिळत असल्याने स्थलांतरित पक्ष्यांसोबत फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी स्थलांतर करतात. मुंबईतील महानगर क्षेत्रातील अशा काही महत्त्वाच्या पाणथळींचा घेतलेला हा वेध...
'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'च्या 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रा'त (इएसझेड) वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील अंतिम मंजुरीचा प्रस्ताव नुकताच राज्य शासनाने केंद्र सरकारला पाठवला आहे. यापूर्वी प्रस्तावित करण्यात आलेल्या 'ईएसझेड' क्षेत्रात १४.२६ चौ.किमीची वाढ करण्यात आली असून यामुळे अभयारण्याचे एकूण 'ईएसझेड' क्षेत्र ४८.३२ चौ.किमी झाले आहे.
भर पावसात किनाऱ्यावर फ्लेमिंगोचा मुक्त विहार
ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याची केली सफर
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएचएस) अंतर्गत देशातील दहा राज्यांमध्ये पार पडलेल्या दोन दिवसीय रोहित पक्ष्यांच्या (फ्लेमिंगो) मोजणी मोहिमेत दीड लाख फ्लेमिंगो पक्षी आढळून आले आहेत. लोकसहभागाच्या माध्यमातून (सिटीझन सायन्स) अशा प्रकारे देशात प्रथमच फ्लेमिंगो पक्ष्यांची मोजणी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे या मोजणीअंतर्गत फ्लेमिंगो पक्ष्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आढळून आली आहे.
'मॅंग्रोव्ह सेल'कडून ठाणे खाडीत 'फ्लमिंगो दर्शन सफारी'ला सुरुवात
उत्तर-मध्य आशियाच्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी फ्लेमिंगो पक्ष्यांचे थव्यांच्या थवे दरवर्षी मोठ्या संख्येने मुंबई महानगराच्या खाडीकिनारी मुक्कामास येतात. याच गोऱ्या-गुलाबी पाहुण्यांची ओळख करुन देणारा हा लेख...