मोदी सरकारने प्रारंभीपासून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबलेले दिसते. तसेच देशभरात नैसर्गिक शेतीला ( Natural Agriculture ) मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना’चा शुभारंभही करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने नैसर्गिक शेतीचे विविध आयाम आणि त्याचे कृषी उत्पादकतेवरील परिणाम यांचा उहापोह करणारा हा लेख...
Read More
शेतकर्यांच्या केळीला त्याच्या प्रतीनुसार योग्य भाव देत पंधरा दिवसांच्या आत त्यांचा मोबदला मिळवून देणार्या प्रमोद यशवंत नेमाडे यांच्याविषयी..
भारत सरकारने ‘इनोव्हेटिव्ह फार्मर’, राज्य सरकारने ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित केलेल्या मराठवाड्यातल्या विद्या रूद्राक्ष यांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणारा हा लेख...
प्रत्येक संघर्षाला प्रेरणा समजून परिस्थितीवर यशस्वी मात करणारे आणि गावासोबतच समाजासाठीही कार्य करणारे रोहिजन गावचे रविंद्र पाटील. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
समुद्री शेवाळाची शेती रत्नागिरीतील तीन गावांना फलदायी ठरली आहे (ratnagiri seaweed farming). गेल्या वर्षभरात गावकऱ्यांनी सुमारे २० टन समुद्री शेवाळ उत्पादित केले आहे (ratnagiri seaweed farming). त्यामाध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाली असून गावातील २५० हून अधिक गावकऱ्यांना थेट रोजगार मिळाला आहे. (ratnagiri seaweed farming)
परिस्थितीचा अजिबात बाऊ न करता, नातेवाईकांकडे राहून शिक्षण पूर्ण केले. वेळप्रसंगी शेतात मोलमजुरी करून स्पर्धा परीक्षेतही बाजी मारली. तेव्हा, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शिवारापासून ते शिक्षणापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करणार्या प्रशांत जाधव यांची ही यशोगाथा...
गोकूळ जाधव या उच्चशिक्षित तरुणाने पारंपरिक शेतीत संकरित गव्हाचा प्रयोग करत भरघोस उत्पन्न तर मिळवलेच, पण सोबतच इतर शेतकर्यांचे मार्गदर्शनही केले. त्यांची ही यशोगाथा...
तीन पदव्या असून, दहा वर्षं खासगी नोकरीचा अनुभव असतानाही, उद्योगाकडे वळलेल्या नाशिक जिल्ह्यातील संदीप सदाशिव कचरे यांची ही प्रेरणादायी वाटचाल...
शेतजमिनीमध्ये विविध उद्देशांनी गुंतवणूक केली जाते. अलीकडच्या काळात तर अशा प्रकारच्या जमिनींमध्ये गुंतवणुकीचे व्यवहारही वाढलेले दिसतात. तेव्हा, ही बाब लक्षात घेता, अशा शेतजमिनींसंबंधी व्यवहार करताना, गुंतवणुकीचा निर्णय घेताना, नेमकी काय काळजी घ्यावी, यासंबंधीचे मार्गदर्शन करणारा आजचा हा लेख...
आंबा-काजू उत्पादकांसाठी राज्य सरकारतर्फे मोठी घोषणा करण्यात आली असून कोकणातील आंबा, काजूसह फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. काजू महामंडळाच्या धर्तीवर आंबा महामंडळ स्थापन करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
वसईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अधून मधून हजेरी लावत काहीशी उसंत घेतल्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. अनेक शेतांमध्ये मोठा ट्रॅक्टर , पॉवर टिलर यांच्या आवाजाने शेत शिवार गजबजून गेले आहेत .यंदा सतत पडणाऱ्या पावसामुळे वसईतील आवण्या लांबणीवर पडल्या आहेत .त्यामुळे जमेल तशी आवणी उरकण्याची घाई शेतकरी करू लागले आहेत .यंदा जवळ पास निम्म्या आवण्या उरकत आल्या असून उरलेल्या आवणीसाठी भात खाचरात शेतकरी आणि मजूर यांची लगबग सुरू आहे .
कुक्कुटपालन किंवा ईद वगैरेसाठी बोकड पालन किंवा विक्रीसाठी मत्स्यपालन, हे पशुजीवी व्यवसाय जगभरात सुरू आहेत. जगभराचे देश या व्यवसायांसाठी त्यांच्या-त्यांच्या नागरिकांना प्रोत्साहन आणि सहकार्यही करत आहे. अर्थात पशू काय, पक्षी काय? त्याचे पालनपोषण करण्यामागे माणसाचा स्वार्थ आहेच. काय पाप, काय पुण्य या पार्श्वभूमीवरची यासंदर्भातली नीतीमत्ता तपासली तर?
देशात रासायनिक खतांच्या वापराचे प्रमाण सर्वाधिक वाढलेले दिसते. केंद्र सरकार खतासाठी अनुदान देत असून, त्याच्या किमती सर्वसामान्य शेतकर्याच्या आवाक्यात राहतील, यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, खतांच्या मात्रा वाढल्याने पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. तापमानवाढीपासून अनेक प्रकारे त्याचा अनुभव येतो आहे. सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढवणे, हाच खर्या अर्थाने हरितक्रांतीकडे जाण्याचा मार्ग आहे.
परभणी : गोआधारित,सेंद्रिय शेतीला चालना मिळावी, या उद्देशाने 'विवेक मल्टिव्हिजन फाऊंडेशन' (मुंबई) तर्फे परभणी जिल्ह्यातील दामपुरी येथे (रविवार, दि.९ रोजी) शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना 'विवेक मल्टिव्हिजन' च्या 'गोपाल शेणखत खत' आणि गोआधारित- सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकर्याच्या वेदना प्रत्यक्ष जाणून त्यादृष्टीने तयार करण्यात आलेल्या अवजारांचा प्रत्यक्ष वापर करणे, शेतकर्याकडून त्याची चाचपणी करून घेणे, निरीक्षण, सुलभता, सोपेपणा, प्रदीर्घ कामानंतर येणारा थकवा, अवजारासंदर्भात भविष्यात येणारी दुरूस्ती याची परीक्षणे आल्यानंतर त्या अवजाराच्या डिझाईनमध्ये बदल करणे... त्यासाठी संशोधक, सृजनात्मक तसेच संवेदनशील वृत्तीचे दर्शन मला जयवंत हरिश्चंद्र तथा दादा वाडेकर यांच्यात दिसले. नव्हे, तर ते जवळून अनुभवण्याचे भाग्य मला मिळाले.
पालघर जिल्ह्यात यंदा मार्च महिन्यात अवकाळी पाऊसाची अवकळा सुरूच असून 21 मार्च रोजी सकाळी धुमदार पडलेल्या पावसामुळे रब्बी शेती, फळ बागायत, वीट भट्ट्यां, मिठागरे, जनावरांचा सुका चाराआणि वाळायला टाकलेल्या सुक्या मच्छीला फटका बसला आहे. वरील व्यवसाय हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असल्याने या अर्थव्यवस्थेला याची झळ बसणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील ‘रामसर’चा दर्जा मिळालेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांचे संरक्षण, संवर्धन व्हावे म्हणून व्रतस्थपणे कार्यरत उत्तम डेर्ले यांच्या भरारीची ही कहाणी...
भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने दमदार पावले टाकायला सुरुवात केली आहे. भारतातील शेतीच्या विकासासाठी शाश्वत पर्यायांचा अवलंब करण्यासाठी भारत सरकारनेच पुढाकार घेतला आहे. भारतीय शेतीत आमूलाग्र बदल घडून येऊन नैसर्गिक शेतीच्या शाश्वत पर्यायाकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे यासाठी भारत सरकार लवकरच एक मोहीम सुरु करणार असल्याची माहिती आहे
पावसाने मागील आठवडय़ापासून दडी मारली असून भातशेती संकटात आली आहे.
‘झूम शेती’ हा शेती प्रकार हजारो वर्षे अस्तित्वात आहे. केवळ ईशान्य भारतीयच नाही, तर दक्षिण अमेरिका ते आफ्रिका ते दक्षिण-पूर्व आशिया या सर्व उष्ण कटिबंधातील स्थानिक समुदायांद्वारे शेतीचा हा प्रकार केला जातो. भारतात इतरही अनेक ठिकाणी ‘झूम’ पद्धतीने शेती केली जाते. तेव्हा, ईशान्य भारतात ‘झूम खेती’ नावाने ज्याप्रकारे शेती केली जाते, त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
गरिबीमुळे दहावीनंतर शिक्षण सोडले. मात्र, शेतीविषयक कात्रणांचा संग्रह त्यांनी सुरूच ठेवला. जाणून घेऊया सेंद्रीय शेतीचे पुरस्कर्ते आणि हजारो शेतीविषयक दस्तावेजांचे संग्राहक संजय गुरव यांच्याविषयी...
शेती आणि शेतकर्यांच्या शाश्वत विकासासाठी झटणारे उच्चशिक्षित अवलिया राजेंद्र भट यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा लेख...
भारताने सेंद्रिय शेतीबद्दल घेतलेली भूमिका आततायीपणाची म्हणता येणार नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. भारत सरकारने श्रीलंकेसारखी रासायनिक खत-कीटक नाशकाची आयात वा उत्पादन बंद करून सर्व शेतकर्यांना सेंद्रिय शेती करण्याचे बंधन घातलेले नाही हे समजून घेणे गरजेचे आहे.
ष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत (एनआरसीपी), महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी, एकूण 1182.86 कोटी रुपये खर्चाचे प्रदूषण कमी करणारे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचा हिस्सा म्हणून 208.95 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
शेती एक फायदेशीर उद्योग आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान तसेच कल्पकतेची जोड दिली, तर शेती फायदेशीर होऊच शकते. शेतकरी शालेय शिक्षणात मागे असला तरी तो शेतीत तज्ज्ञ असतो. त्याला तज्ज्ञ म्हणूनच ओळखले पाहिजे. स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी केला पाहिजे. आपल्या आधुनिक ज्ञानाचा उपयोग शेतीसाठी करून शेतीला नवीन रूप देणारी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. या क्षेत्रातही संधी आहेत आणि नवीन उद्योजकांनी याकडे आले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर शेती व शेतकर्यांसाठी ’AgriSeva 24/7’च्या माध्यमातून काम करणार्या निलेश क
गावठाण, कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी संयुक्त बैठक घ्यावी
उसाच्या शेतात बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या सात पिल्लांची (leopard cub) त्यांच्या आईसोबत पुनर्भेट करुन देण्यामध्ये जुन्नर वन विभाग आणि ‘वाईल्डलाईफ एसओएस’ टीमला यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही सात पिल्ले (leopard cub) केवळ सात दिवसांमध्ये आईच्या कुशीत पुन्हा विसावली आहेत. जुन्नर वन विभाग आणि ‘वाईल्डलाईफ एसओएस’च्या टीमने गेल्या वर्षभरात आईपासून विभक्त झालेल्या २३ पिल्लांची (leopard cub) पुन्हा आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचे काम केले आहे.
'नाॅर्थ इस्टर्न टी असोसिएन' ने आसाम सरकारकडे चा्य कामगारांची लवकरात लवकर लसीकरण करण्याची मागणी केली आहे. याचे कारण ५०५ कामगारांना कोरोनाची झालेली लागण.देशभर कोरोनाचा वाढता प्रभाव यामध्ये अनेक मोठमोठे ऊद्योग ंबंद पडले आहेत. त्यात आता चायशेती सूद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
महाराष्ट्रात तापमानात होणारी वाढ आणि हवामानातील बदलामुळे भविष्यात अन्नधान्य उत्पादनावर गंभीर परिणाम होणार असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. प्रामुख्याने २०३३ सालानंतर राज्यातील हवामानात होणाऱ्या बदलांमुळे बहुतांश प्रदेशातील महत्वाचे पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम अपेक्षित आहेत. या संशोधनानुसार २०५० पर्यंत राज्याच्या वार्षिक सरासरी तापमानामध्ये ०.५ ते २.५ अंश सेल्सिअस वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जुन्नरमधील ओतूरमध्ये उसाच्या शेतात सापडलेल्या पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्मिलन घडवून आणण्यात आले आहे. आईच्या कुशीत पुन्हा विसावल्याने पिल्लांना नवीन जीवन मिळाले आहे. वन विभाग आणि वाईल्डलाईफ एसओएसच्या पशुवैद्यकांनी ही कामगिरी पार पाडली. उस तोडणीच्या हंगाम सुरू झाल्याने उसाच्या शेतात बेवारस अवस्थेत बिबट्याची पिल्लं सापडू लागली आहेत.
एखाद्या भूमीवर बंदुकींपासून बॉम्बपर्यंत दारुगोळ्यांचा मारा होतो, तेव्हा प्रथम तेथील जमीन जळून-करपून जाते. प्रत्यक्ष युद्धात हे तर होतच असते. पण, युद्ध न करता जगातील ७० टक्के जमीन जळून आणि करपून गेली आहे ती रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे. भारतात त्याचा वापर करून ‘ग्रीन रिव्होल्युशन’च्या नावाखाली ‘कॅन्सर रिव्होल्युशन’ निर्माण झाले आहे.
रिलायन्स समुहाने नवे कृषी कायदे आणि काँट्रॅक्ट फार्मिंगबाबत प्रथमच स्पष्टीकरण देत मोठी घोषणा केली आहे.
टॉर्बन नील्सन आणि अन्य डॅनिश शेतकर्यांनी १९९३ साली हा ‘मिंक फार्मिंग’चा व्यवसाय सुरू केला. आज २७ वर्षांनंतर हा प्रत्येक शेतकरी वर्षाला किमान ३ लाख ६५ हजार युरो एवढा निव्वळ नफा कमावतो आहे.
२०१९सालच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित बुंदेलखंडच्या भारत भूषण त्यागी यांच्याविषयी माहिती देणारा हा लेख. या प्रगतशील शेतकर्याने ८० हजारांहून अधिक शेतकर्यांना ‘प्रॉडक्शन मॅनेजमेंट’ शिकवत, सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन केले आहे !
पारंपरिक पद्धतीबरोबरच विज्ञानाची कास धरून शेती केली तर शेतीही नफ्याची ठरते. यासाठी थोडे नियम आणि प्रयत्नांची जरूरी आहे. याचे तंत्र शिकवणारे पवन पाखले. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा...
बिबट्यांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नरमध्ये मंगळवारी एका नर बिबट्याचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू झाला. धोलवड गावातील एका उसाच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या पडला होता.
पाचोरा-भडगाव मतदार संघातील शेतकर्यांसाठी पाहिलांदाच मतदार संघात असा कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती व अमोल शिंदे यांच्या वतीने करण्यात आला. किसान कृषी प्रदर्शनात आधुनिक पध्दतीची शेती काळाची गरज असल्याचा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
राज्यात रासायनिक खतांचा व पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणल्यामुळे तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यामुळे हा पुरस्कार दिला गेला असल्याचे 'इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ ऑरगॅनिक ऍग्रीकल्चर मुव्हमेंट्स'ने म्हटले आहे.
शेतमाल किंवा खराब झालेल्या फळभाज्यांवर प्रक्रिया करून त्यापासून इथेनॉलची निर्मिती केली जाऊ शकते आणि त्याच्या उर्वरित पदार्थांपासून मोठ्या प्रमाणात जैविक खत तयार केले जाऊ शकते.
बलराज सिंह यांच्या या यशाने प्रेरित होऊन बांकी गावातलेच युवक नव्हे, तर आजुबाजूच्या गावातील युवकही शेतीकडे आकर्षित होत आहेत आणि बलराजद्वारे केली जाणारी आधुनिक शेती पाहायला व शिकायला येत आहेत.
सातबारा मुंबईमधून हद्दपार होत असून हळूहळू राज्यातल्या अन्य शहरांमधूनही नामशेष होणार आहे आणि त्याची जागा ‘मालमत्ता कार्ड’ घेणार आहे.
शेतीची प्रगती साधणे ही एकप्रकारे देशसेवाच आहे. भारताच्या सुरक्षेसाठी अन्नसुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज शेतीतूनच भागविली जाईल, असे प्रतिपादन जैन फार्मफ्रेशचे संचालक अथांग जैन यांनी केले.