farmer

पंजाबमधील आप सरकारने शेतकऱ्यांचे सामान लुटले, ११८ व्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन कायम

AAP government पंजाबमधील शेतकरी प्रतिनिधींच्या गेल्या आठवड्यात छावण्या पाडण्यात आल्या असल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता पोलिस आणि पंजाब आप सरकारवर सामानाची लूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रमुख निदर्शके जगजीत सिंग दलेवाल यांचे उपोषण रविवारी ११८ व्या दिवशीही सुरू होते. ट्रॅक्टर, ट्रेलर, अगदी रेफ्रिजरेटर, एसी, इन्व्हर्टर, पलंग आणि गॅस सिलिंडर - पोलिसांच्या निगराणीखाली असलेले सर्व काही आता आप आमदारांच्या समर्थकांच्या घरात सापडले असल्याचा आरोप बीकेयूचे सचिव असलेले सचिव गुरदीप सिंग चहल यांनी केला आहे.

Read More

आदिवासी शेतकर्‍यांसाठी स्ट्रॉबेरी ठरतेय वरदान

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचे माहेरघर म्हणून नावारुपाला येत असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील शेती चांगलीच बहरली आहे. आंबट गोड चवीची फळे काढणी योग्य झाली असून, त्यांच्या रंगाने संपूर्ण परिसर गुलाबी आणि लालेलाल झाल्याचे नजरेस पडत आहे. वाढत्या थंडीबरोबर जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचा हंगाम चांगलाच बहरला आहे. शरीरासाठी आरोग्यदायक लालचुटूक स्ट्रॉबेरीची सप्तशृंगगड, वणी आणि सापुतार्‍याच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी शेतकर्‍यांकडून विक्री केली जात आहे. दुर्गम भाग असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्याच्या घाटमाथ्यावर

Read More

देवाभाऊ, सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्रासाठी !

देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१४मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अवघ्या दहा महिन्यातच त्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावं लागलं. २०१५मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊसच प्रमाण कमी होतं, परिणामी २०१५च्या ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोर जाण्याची वेळ आली. शेतीला पुरेसे पाणी नसल्यामुळे पीक घेता येत नव्हती तर दुसरीकडे पाण्याअभावी पीक जाळून गेली. जनावरांना पुरेसा चारा, पाणी नव्हतं. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाचा सामन

Read More

शेतकर्‍यांचा विकास हाच मोदी सरकारचा ध्यास!

निवडणुका आणि मतदान जवळ येताच, विरोधकांकडून अपप्रचाराची, ‘फेक नॅरेटिव्ह’ची एक पद्धतशीर मोहीमच राबविली जाते. ‘संविधान खतरे में हैं’ प्रमाणेच मोदी सरकार कसे शेतकरीविरोधी आहे, हे सिद्ध करण्यासाठी आटापिटा केला जातो. त्यासाठी कृषी कायदे, पंजाबमधील शेतकरी आंदोलनाचाही प्रसंगी आधार घेतला जातो. महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत पुन्हा एकदा भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याच्या अपप्रचाराला ऊत आला आहे. त्यानिमित्ताने कृषी क्षेत्रातील मोदी सरकारचे योगदान अधोरेखित करुन, विरोधकांच्या नॅरेटिव्हला सुरु

Read More

शेतकऱ्यांसाठी पहिला निर्णय घेणे हे भाग्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी साऊथ ब्लॉकमधील आपल्या कार्यालयात पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचे २० हजार कोटी रुपये जारी करण्याच्या पहिल्याच निर्णयावर स्वाक्षरी केली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली. याअंतर्गत २० हजार कोटी रुपये जारी करण्यात य

Read More

आता शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! पीएम कुसुम योजना लवकरच येणार

सरकारने आता शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसूम योजना आणण्याचे ठरवले आहे त्यासाठी कच्च्या मसुद्यावर सरकार काम करत आहे. या योजनेत आता शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप हाताळता यावा यासाठी सरकार काम करत आहे. सरकारच्या पोर्टलमार्फत पंप व्यापारी यांच्याशी शेतकरी थेट संपर्क करू शकतात. यापूर्वी सरकारने सोलार टॉप योजना आणली होती ज्या मध्ये घराघरात सौर ऊर्जेचे कनेक्शन देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले होते. याच योजनेत आता सरकार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप प्रकल्पाचा आधार मिळावा यासाठी सरकारने ही नवी योजना आखली आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121