सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु असून, सर्व विद्यार्थी अभ्यासात गर्क आहेत. आता परीक्षा म्हटले की, चिंता, तणाव हे ओघाने आलेच. पण, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही परीक्षेच्या काळातील तणावाचे योग्य व्यवस्थापन केल्यास, ‘परीक्षेचा काळ सुखाचा’ असे म्हणता येईल. त्यासाठी नेमके काय करावे, याबाबत मार्गदर्शन करणारा हा लेख...
Read More
( Pravin Darekar ) सारथी, बार्टी, महाज्योती आणि टीआरटीआयमार्फत दिल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षणात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली.
12th - SSC Board Exam मध्ये कॉपी होऊ नये यासाठी, राज्य सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, कॉपी करण्यास विद्यार्थी का जातात हाच खरा प्रश्न आहे. त्याचे कारण आजच्या समाजाच्या विचारसरणीत लपलेले आहे. वाढत्या कॉपी प्रकरणांचा आणि सामाजाच्या विचारसरणीचा घेतलेला हा आढावा...
आजपासून इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. त्यासाठी सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा! एव्हाना सर्व विद्यार्थ्यांची अभ्यासाची तयारीही पूर्ण झाली असेल. तेव्हा, एकूणच या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी काय करावे, पालकांची भूमिका काय असावी, यासंदर्भात मार्गदर्शन करणारा हा लेख...
(Jalna ) राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. एकीकडे कॅापीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कॅापीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तर दुसरीकडे दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर येथे एका परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरु झाल्यावर अवघ्या पंधरा मिनिटांत या पेपरच्या प्रती झेरॅाक्स सेंटरवर मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई : नीट-यूजी परिक्षेबाबत ( NEET Exam ) केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय पदवी प्रवेश परिक्षा (नीट) लेखी पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय चाचणी कक्ष म्हणजेच एनटीएकडून दि. १६ जानेवारी रोजी परिपत्रक काढण्यात आले. पेपर- पेनच्या साहाय्याने ही परिक्षा घेतील जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयबीपीएस आणि एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा दि. २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांनंतर एमपीएससीने संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान दहावी आणि बारावीच्या परिक्षा होणार आहेत.
स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या नुकत्याच झालेल्या पाचव्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ४७६९ पैकी ४१६५ उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या पाचव्या परीक्षेचा निकाल ८७ टक्के लागला आहे. पाचव्या परीक्षेला ४७६९उमेदवार बसले होते. या निकालात मुंबईच्या शरद मोटा आणि पुण्याच्या दिवेश माहेश्वरी या दोघांनी १०० टक्के गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे.
सर्वोच्च न्यायालयात मंगळवार, दि. २३ जुलै २०२४ नीट प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आयआयटी दिल्लीच्या अहवालाचीही दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की रेकॉर्डवरील डेटा नीट-यूजी २४ प्रश्नपत्रिका फुटल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे संपूर्ण परिक्षा पुन्हा घेण्याचे सांगणे हा न्याय होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची पुरवणीपरीक्षा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. 12वीची परीक्षा दि. 16 जुलै ते दि. 6 ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा दि. 16 जुलै ते दि. 30 जुलै या कालावधीत होणार आहे.
मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आजूबाजूचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत मुंबईसह अनेक भागांत संततधार पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आज ८ जुलै रोजी होणाऱ्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे.
वर्ग 'क'ची सगळी पदं एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी नवा कायदा आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
'नीट' आणि 'युजीसी नेट' परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मोदी सरकार 'ॲक्शन मोड' मध्ये आले आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत कठोर कायदा लागू केला आहे. केंद्र सरकारने 'पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रिव्हेन्शन ऑफ फेअर मीन्स) कायदा, 2024' अधिसूचित केला आहे. या पेपरफुटीविरोधी कायद्याचा उद्देश स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि कॉपी रोखणे हा आहे. या कायद्यांतर्गत गुन्हेगारांना कमाल 10 वर्षे तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
सक्षम, सुदृढ आरोग्य व्यवस्था ही कुठल्याही देशाची ‘विकासाची दिशा’ ठरविण्यात मोलाची भूमिका बजावते. त्यासाठी वैद्यकीय सोयीसुविधांबरोबर आवश्यकता असते ते कुशल वैद्यकीय मनुष्यबळाची. ‘नीट’सारख्या परीक्षांमधून अशीच भावी डॉक्टरांची पिढी निर्माण होत असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ‘नीट’ परीक्षेचे निकाल वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. तेव्हा, ‘नीट’च्या निकालांवरील आक्षेप आणि न्यायालयाचे यासंबंधीचे आदेश यांचा आढावा घेणारा हा लेख...
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी (NEET) नीट परिक्षेतील गैरप्रकाराबाबत मोठे विधान केले आहे. नीट परिक्षेतील दोषींना सोडणार नसून कठोर शिक्षा देऊ. तसेच, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)मध्ये सुधारणांची गरज असल्याचेही शिक्षणमंत्री प्रधान यावेळी म्हणाले. नीट परीक्षेच्या निकालांमध्ये काही अनियमितता झाल्याचे सांगतानाच यात ज्यांचा सहभाग असलेल्या बड्या अधिकारीही सोडले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुगल मॅपने दाखविलेल्या चुकीच्या पत्त्यामुळे युपीएससीच्या परिक्षेपासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षा सेंटरवर जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला. परंतु, गुगल मॅपमुळेच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेल्याचे समोर आले आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या ‘नीट’ परीक्षेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सीबीआय चौकशीविषयी सर्वोच्च न्यायालयाने ‘एनटीए’ला नोटीस बजावली आहे. तसेच १,५६३ विद्यार्थ्यांना दिलेले वाढीव गुणही रद्द करुन फेरपरीक्षेचा निर्णयही घेण्यात आला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ‘नीट’च्या निमित्ताने प्रवेश परीक्षांमधील गैरप्रकार आणि त्यावरील उपाययोजनांचा उहापोह करणारा हा लेख...
नीट परीक्षा घोटाळा (NEET Exam) प्रकरणात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. नीट परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आता न्यायालयात सुनावणी पार पडली.
"लहानपणापासूनच त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्याने दहावीनंतर महागडे क्लासेसही लावलेत. बारावीची परिक्षा आणि डॉक्टर बनण्यासाठी नीटची (NEET Exam) तयारी या दोन्ही गोष्टी त्याने उत्तमरितीने सांभाळल्या होत्या. नीटच्या परिक्षेचा दिवस उजाडला आणि आपलं स्वप्न साकार करण्यासाठी तो परिक्षा केंद्रावर पोहोचला. मन लावून पेपरही सोडवला. त्यानंतर निकाल आला आणि तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. मात्र, तरीही त्याला त्याच्या मनाजोग्या शासकीय विद्यालयात मध्ये अॅडमिशन मिळणार नव्हती. का? त्याचा अभ्यास कमी पडला? क
टेटवली गावच्या नमिता भुरकुड, गीतांजली भुरकुड, अंजली फडवले, निकिता भुरकुड, अलका मेढा आणि जागृती फडवले या सहा महिला नुकत्याच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांचे अभिनंदन. त्याचबरोबर पाड्यातील वंचित आणि समाजप्रवाहापासून दूर असलेल्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्याचे सोने करणार्या केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पाच्या परिसस्पर्शाचेही मनोमन अभिनंदन. दहावी उत्तीर्ण होणार्या या भगिनींच्या यशाच्या पार्श्वभूमीचा या लेखात मागोवा घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वच पक्ष आणि उमेदवारांकडून जोरदार प्रचार चालू असला तर मतदारांमध्ये निवडणुकीबाबत मोठा उत्साह पाहायला मिळालेला नाही. गेल्या दोन ते तीन टप्प्यात झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ चे सुधारीत पत्रक जारी केले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाल्यानंतर फेब्रुवारी महीन्यात महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण लागु केले. त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन विधानसभेत मराठा आरक्षणासंबंधीचा ठराव संमत करण्यात आला.
कल्याण पूर्वेच्या रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स, आयुर हॉस्पिटल अणि रिक्षा चालक मालक असोसिएशन ( सिद्धार्थ नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शहरातील सुमारे ११० रिक्षाचालकांनी आरोग्य तपासणी चा लाभ घेतला.
स्पर्धा परीक्षांचा घोळ हा कुणा राज्यापुरता मर्यादित नसून ती एक राष्ट्रीय समस्याच. याचा नाहक मनस्ताप विद्यार्थी आणि पालकांनाही सहन करावा लागतो. तेव्हा, स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटीपासून ते फसवणुकीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच ‘स्पर्धा परीक्षा विषयक गैरप्रकार प्रतिबंधक-२०२४’ कायदाच पारित केला. त्यानिमित्ताने...
मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यस्तर व जिल्हा परिषद यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.
१० वी आणि १२ वीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून दहावीच्या विद्यार्थांसाठी एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन हॉलतिकीट उपलब्ध होणार आहे. बुधवार, ३१ जानेवारीपासून विद्यार्थी आपले हॉलतिकीट मिळवू शकतील. SSC Board Exam
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी १९ जानेवारीला जाहीर करण्यात आली. त्यात कोल्हापुरच्या विनायक पाटील याने पहिला क्रमांक मिळवला आहेत.
तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी ठोस कायदा केला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी लेखी उत्तरात दिली.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा सोहळा असतो. त्यामुळे हा सोहळा मोठया थाटामाटात पार पडावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. लग्न थाटामाटात होत असताना खर्च ही तसाच होतो. पण लग्न थाटामाटात करून त्यावर खर्च करण्यापेक्षा काही रक्कमेचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करण्याचे काम डोंबिवली नजीक असलेल्या लोढा हवन मधील प्रमोद चित्ते यांनी केले आहे. प्रमोद चित्ते यांच्या ज्येष्ठ कन्या पल्लवी हिचा विवाह साधेपणाने करीत त्यांनी 50 हजार रूपयांचा धनादेश नवी मुंबईमधील सुख सुमन सामाजिक व शैक्षणिक संस्थेला दिला आहे. यावरून लग्ना
बारावीची परिक्षा पुढील वर्षी २१ फेब्रु. पासुन तर, दहावीची परिक्षा १ मार्च पासुन सुरू होणार आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करत आहेत. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी २० नोव्हें. संपली असून, दहावीसाठी मुदतवाढ आणि बारावीसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यासंबंधी परीपत्रक काढण्यात आले आहे.
लग्नानंतर अभ्यासात अजिबात खंड न पडू देता, नोकरीसोबतच अभ्यासाचे नियोजन आखत, तब्बल सहा वर्षं मेहनत करून यश खेचून आणणार्या वंदना गायकवाड यांच्याविषयी...
कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने भरती परीक्षेच्या वेळी हिजाबसारख्या डोकं झाकण्याऱ्या कपड्यांवर बंदी घातली आहे. दरम्यान, परिक्षेच्या वेळी केवळ मंगळसूत्र घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रात ब्लूटूथ, इयरफोन यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने भरती परीक्षेच्या वेळी हिजाबसारख्या डोकं झाकण्याऱ्या कपड्यांवर बंदी घातली आहे. दरम्यान, यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात मुस्लीमांना लक्ष्य केलं जात असून काँग्रेसकडून अशी अपेक्षा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटकातील कलबुर्गी येथे रविवारी एका सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेदरम्यान हिंदू विद्यार्थिनींचे मंगळसूत्र आणि कानातले काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, बुरखा घातलेल्या मुलींना तपासणी करून आत प्रवेश दिला जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
कोतवाल भरती परीक्षेत झालेल्या कॉपी प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, जालना येथील कोतवाल भरती परीक्षेदरम्यान आणखी अजून सात ते आठ परीक्षार्थींनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचा डाटा सायबर पोलिसांकडे तपासादरम्यान उपलब्ध झाला आहे. परंतु, याप्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा जुलैमध्ये झालेल्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (टंकलेखन) परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी अंतर्गत राज्यसेवा २०२२चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा यंदाचा कट ऑफ जाहीर करण्यात आला असून यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड होणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथील शासकीय सार्वजनिक ग्रंथालयात तयार केलेला स्पर्धा परीक्षा विभाग व स्वर्गीय वसंतराव डावखरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे (ई-लायब्ररी) लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. या केंद्रामुळे कुडाळ शहराबरोबरच अन्य तालुक्यांतून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना सहजगत्या दर्जेदार पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात (युपीएससी) अंतर्गत अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२४ अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, युपीएससी अंतर्गत होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२४ नोंदणी प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे.
कर्मचारी निवड आयोग (एसएससी) अंतर्गत दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा २०२३ साठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दि. ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारांकडून नोंदणी करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) पुरुष आणि महिलांच्या ७५४७ पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी) यांच्यामार्फत राज्यातील विविध रिक्त पदे भरली जातात. राज्य शासनाच्या वतीने विविध रिक्त पदे भरण्यासाठी बंपर भरती केली जाईल. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी संधी शासनाकडून उपलब्ध होणार आहे. तसेच, एमपीएससीतर्फे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांच्या संख्येत यंदा वाढ करण्यात आली आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता दहावीची परिक्षा १ मार्च २०२४ ते २२ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे. तर इयत्ता बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ या दरम्यान होणार आहे.
केंद्र सरकारने शालेय शिक्षणात मोठे फेरबदल केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींची अंमलबजावणी करताना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षण-परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींनुसार बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जातील.
महसूल विभागाच्या गट "क" संवर्गातील तलाठी भरती परीक्षा - २०२३ दि.१७ ऑगस्ट ते १४ स्प्टेंबर २०२३ पर्यंत १९ दिवस ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण ०२ परीक्षा केंद्रांवर तीन सत्रात आयोजित करण्यात आली असून या परीक्षा केंद्राच्या परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. अशी माहिती ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.
राज्यात तलाठी भरतीप्रक्रियेत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. पुण्यात तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. भरती प्रक्रियेत इच्छुक उमेदवारांनी पसंतीचे परीक्षा केंद्र निवडले असता त्यांना दूरवरचे केंद्र देण्यात आले आहे. यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयाचे तात्पुरत्या स्वरूपात नवीन जागेत स्थलांतर होत आहे. नवीन कार्यालय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) भांबुर्डा, आगरकर रोड, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर, पुणे-411004 येथे कार्यरत राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.
डोंबिवली : दहावीच्या परिक्षेत 100 टक्के गुण मिळविलेल्या वैदेही शेटय़े हिचा ज्येष्ठ नागरिक साईबाबा कट्टा, चामुंडा गार्डन सोसायटी ए टु एच तर्फे सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे वैदेहीने स्व अध्ययानावर भर देत कोणतीही शिकवणी न लावता हे यश मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्य सरकारी कर्मचार्यांचा संप सुरू झाल्यावर त्याबाबत आजकाल समाजमाध्यमांवर ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्यावरून समाज जाणिवांचा कल लक्षात यावा. हा संप आगामी काळात दीर्घकाळ चालेल किंवा मिटेलदेखील कदाचित, मात्र त्यावर एकूणच सामाजिक भावनांचा सोशल मीडियावरील अनुकूल-प्रतिकूल दृष्टिकोन बघितला तर समाजात होत असलेला हा सजग राहण्याचा बदल एकूणच आपल्या सामाजिक व्यवस्थेची दिशादर्शक वाटचाल ठरविण्यासाठी उपयुक्त ठरेल किंवा नाही, यावर मंथन करण्याची वेळ आली आहे.
"विद्यार्थ्यांना कॉपी करू द्या!", म्हणत पार्थडीत पथकावर दगडफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता परीक्षा सुरू असताना हा प्रकार घडला. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत बैठ्या पथकांचा सामावेश परीक्षा केंद्राबाहेर करण्यात आला आहे. या अंतर्गत परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांवर कडक पहारा दिला जातो. कॉपीसारखे गैरप्रकार टाळावेत तसेच विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरून कुणी कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन देऊ नये, यासाठीही विशेष दखल घेतली जाते.