रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना(ईएलआय) माध्यमातून रोजगारनिर्मितीस चालना मिळणार आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजनेची त्वरित अमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय श्रम, रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिले आहेत. ईएलआय योजना २ कोटींहून अधिक रोजगार निर्माण करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
Read More